पुण्याचा परिसर हा विविध टेकडय़ांनी व्यापलेला आहे. यातील पर्वती हनुमान, वेताळ, तळजाई, चतु:शृंगी अशा विविध टेकडय़ा भटक्यांच्या जगातही प्रसिद्ध आहेत. या टेकडीप्रेमातून पुढे पर्वतारोहणाची आवड रुजण्यासाठी पुण्यातील ‘एक्सप्लोअर अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २१ डिसेंबर रोजी ‘हिल हंट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिल हंट’ स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. या अनोख्या स्पर्धेत टेकडी चढणे, तिच्या विविध टोकांपर्यंत जाणे, उतरणे याचा समावेश आहे. ही स्पर्धा ९ आणि १८ किलोमीटर अशा दोन गटात आहे. तिच्यात सहभागी होण्यासाठी २ जणांच्या गटाची आवश्यकता आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान १० वर्षे वयाची अट आहे. यामध्ये ४० वयापेक्षा जास्त वयाची महिला किंवा ४५ वयापेक्षा जास्त वयाची पुरुष सहभागी झाल्यास त्यांना बोनस गुण देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके आणि पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८२२१२८२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.