काझीरंगा जंगल सफारी

वाइल्ड ट्रेल्स या संस्थेच्या वतीने १ ते ४ एप्रिल दरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भ्रमंतीचे आयोजन केले आहे. हे जंगल एकशिंगी गेंडय़ासाठी जगप्रसिद्ध आहे. जगात उपलब्ध एकशिंगी गेंडय़ांपैकी एकतृतीयांश गेंडे इथे या जंगलात अस्तित्वात आहेत. या जंगलात वाघांची संख्याही मोठी आहे. याशिवाय अन्य पशू-पक्ष्यांसाठी देखील हे जंगल प्रसिद्ध आहे. या भ्रमंतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रकाश पवार (९८६९२३२११४) यांच्याशी संपर्क साधावा.

नेकोरेरी लेक, धरमशाला ट्रेक

‘अॅडव्हेंचर्स हॉलिडेज’तर्फे हिमाचल प्रदेशमधील
नेकोरेरी लेक, धरमशाला येथे २७ एप्रिल आणि २५ मे अशा दोन पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. धौलाधार पर्वत रांगेत असलेले हे ठिकाण कांग्रा जिल्हय़ात ३३०० मीटर उंचीवर आहे. अधिक माहितीसाठी ९८६७३१८४४८ यांच्याशी संपर्क साधावा.

भूतान भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या १ ते १२ मे दरम्यान भूतानमध्ये दुचाकी सफरीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

देवरीताल-चंद्रशिला ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या १० मार्च ते १८ मार्च दरम्यान गढवाल हिमालयातील देवरीताल ते चंद्रशिला दरम्यान पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत हिमालयाचे सर्वागसुंदर असे दर्शन घडते. या मार्गात विविध पशू-पक्षी दिसतात. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम एक आकर्षण ठरू शकणारी आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द्र पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५०हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ मार्च या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.