नंदादेवी बेसकँप पदभ्रमण

‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २७ मे ते ११ जून दरम्यान कुमाऊँ गढवाल हिमालयातील नंदादेवी बेसकँप पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. नंदादेवी हे उत्तराखंडमधील कुमाऊँ गढवाल हिमालयातील एक महत्त्वाचे शिखर आहे. भारतातील हे क्रमांक दोनचे उंच शिखर. या पर्वताची उंची आहे ७८१६ मीटर. या शिखराच्या पायथ्यापर्यंतचा ट्रेक म्हणजे भटक्यांसाठी एक खास आकर्षण असते. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल सफारी
ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे १ ते ५ एप्रिल आणि ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाप्रमाणेच बिबळ्या, मगर अस्वल, रानकुत्रे, हरीण सांबर आदी वन्यप्राणीही दिसतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड असे काही पक्षी बघण्याची संधीही सफारीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी राधिका फडके ९८३३०२६९६९ आणि आर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ यांच्याशी संपर्क साधावा.