झेप संस्थेतर्फे मे महिन्यातील सुटीत हिमालयातील विविध पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. यामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प (९ ते ३० एप्रिल) मनाली हम्प्टा पास ट्रेक (१९ मे ते २ जून), मणिमहेश ग्लेशिअर ट्रेक (९ ते २२ मे), दोडीताल दारवा टॉप (८ ते २२ मे) अशा या पदभ्रमण मोहिमा आहेत. या सर्व मोहिमांदरम्यान हिमालयाच्या पर्वत शिखरांचे विलोभनीय दर्शन घडते. या सर्व मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी चालण्याचा, अतिउंचीवर फिरण्याचा सराव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी देवेश अभ्यंकर (९८२२२ ९७२९७ किंवा ९८५०० ००४८७) यांच्याशी संपर्क साधावा.
सिंधुदुर्ग अभ्यास सहल
‘सेव्ह अवर प्लॅनेट’तर्फे येत्या १ ते ३ मे दरम्यान सिंधुदुर्ग अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीमध्ये जिल्ह्य़ातील ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. या जोडीने जिल्ह्य़ातील लोककलांची ओळख या वेळी करून दिली जाणार आहे. या सहलीमध्ये पक्षी निरीक्षण, अवकाश दर्शनाचाही समावेश आहे. अधिक माहितीसाठी किरण (९८७०२८६५५८) यांच्याशी संपर्क साधावा.
मून लाईट ट्रेक
‘नोमॅड्स’तर्फे येत्या २ ते ५ एप्रिल दरम्यान सागरी किनाऱ्यालगत भ्रमंतीचे आयोजन केले आहे. यामध्ये केशवराज, जयगड, बामणघळ आदी स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
नागझिरा व्याघ्र गणना
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेस सर्व जंगलांमध्ये प्राणी गणना केली जाते. यंदाही ती ४ मे रोजी होणार आहे. विदर्भातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात या दिवशी वाघांची गणना होणार आहे. यासाठी ‘वाईल्ड ट्रेल्स’ संस्थेच्या वतीने इच्छुक वन्यजीवप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही गणना ४ मे रोजी सकाळी १० ते ५ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अशी सलग २२ तास होणार आहे. एवढा वेळ उन, वारा, थंडीमध्ेय मचाणावर बसून ही गणना करायची असल्याने अशी तयारी असलेल्या वन्यप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश पवार (९८६९२३२११४) यांच्याशी संपर्क साधावा.

रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे जंगल वसलेले आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवीसन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. देशातील एक महत्वाच्या किल्ल्यांमध्ये रणथंबोर किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावरूनच या जंगलाला रणथंबोर राष्ट्रीय उद्यान असे नाव मिळाले. हे जंगल आणि किल्ला भटकंतीचे २४ ते २८ मे दरम्यान ‘निसर्ग टूर्स’च्या वतीने आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –
‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com