ताडोबा जंगल सफारी

ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे २८ मे ते १ जून २०१५ दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबरच येथे बिबळ्या, मगर, अस्वल, हरिण, सांबर असे अनेक वन्यप्राणी आढळतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे अनेक स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीमध्ये मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क राधिका फडके- ९८३३०२६९६९, अर्चिस सहस्रबुद्धे- ९८९२१७२४६७. संकेतस्थळ – http://www.twineoutdoors.com

रांगणा भ्रमंती
सह्याद्री ऐन रांगेवर कोल्हापूर जिल्ह्य़ात इतिहासप्रसिद्ध रांगणा किल्ला वसलेला आहे. निसर्गसंपन्न आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंनी भरलेल्या या किल्ल्यावर १० आणि ११ मे दरम्यान दुर्गवेध संस्थेतर्फे भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी सिद्धार्थ पेंडूरकर (८०८७५०८७१४) यांच्याशी संपर्क साधावा.

निसर्ग साहस शिबिर
ब्ल्यू व्हेल नेचर असोसिएशनतर्फे १२ ते १६ मे दरम्यान १२ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लोणावळ्याजवळील शिरोटा तलाव परिसरात निसर्ग साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीराम कोळी (९८९२९०३८६३) कुलदीप वैती (९८१९८०७३०७) यांच्याशी संपर्क साधावा.

सायकल आणि पदभ्रमण मोहीम
पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे येत्या ३ मे रोजी गाढेश्वर धरणाच्या परिसरात सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत सायकलची निगा, दुरुस्तीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच संस्थेतर्फे ६ ते ८ मे दरम्यान चंद्रगड ते ऑर्थरसीट, महाबळेश्वर या पदभ्रमण मोहिमेचेही आयोजन केले आहे. संपर्क – मंदार कर्वे (९४२२५ ५२९०८)