उपक्रम
निसर्गस्थळांपासून ते पर्यटन स्थळांपर्यंत सध्या सर्व जागा या कचऱ्याच्या प्रदूषणाने ग्रस्त झाल्या आहेत. कागद, प्लास्टिक, बाटल्या, काचा अशा नाना प्रकारच्या कचऱ्याने सध्या आपल्या अनेक निसर्गदत्त स्थळांची दुर्दशा झाली आहे.या साऱ्यांवर मात करण्याचे, या प्रदूषण निर्मूलनाचे काम काही गिर्यारोहण संस्थांकडून सतत सुरू असते. यामध्येच नगर जिल्ह्य़ातील ‘जिवाशी टेकर्स’ ही एक संस्था आहे. या संस्थेतर्फे नुकतीच १६ ऑगस्ट रोजी नगर जवळील ‘चांदबिबी महाल’ या ऐतिहासिक स्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ३०० निसर्गप्रेमी सहभागी झाले. या निसर्गप्रेमींनी या स्थळाभोवती त्या एका दिवसात तब्बल अडीचशे पोती कचरा गोळा केला. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांपासून ते दारूच्या बाटल्यांपर्यंत असा मोठा कचरा होता.या वेळी संस्थेतर्फे निसर्गस्थळांच्या स्वच्छतेविषयी जनजागरणही करण्यात आले. संस्थेतर्फे  अन्य गडकोटांवरही अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.