ट्रेकिंग, गिर्यारोहण असे शब्द म्हटले, की अगदी सुरुवातीला धडधाकट शरीरे डोळय़ांपुढे येतात. डोंगरदऱ्यांमधून खडतर आव्हानांचा सामना करत धावणाऱ्या या विश्वामध्ये हे तितकेच खरेही आहे. पण या निसर्गनियमाला अपवाद अशी काही कणखर मनेही असतात. या अशा खऱ्या गिर्यारोहकांनाच ‘प्रहार’ या संस्थेतर्फे भटकंतीचे आवाहन करण्यात आले आहे.या संस्थेतर्फे येत्या ६ सप्टेंबर रोजी केवळ अपंगांसाठी शिवनेरी सहलीचे आयोजन केले आहे. कुठल्याही प्रकारच्या अपंगत्व असलेल्या व्यक्तीची या सहलीत सहभागी होण्याची इच्छा असल्यास ते या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.भटकंतीची खूप इच्छा असतानाही केवळ अपंगत्वाअभावी ज्यांना अशा छंदात भाग घेता येत नाही, अशा गिर्यारोहकांच्या मदतीसाठी ‘प्रहार’ संस्थेतर्फे या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते.या पूर्वी या उपक्रमा अंतर्गत या विशेष गिर्यारोहकांनी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर स्वारी केली होती. या भटकंतीमध्ये अपंगांच्या मदतीसाठी  स्वयंसेवकही असतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही.

या उपक्रमामध्ये  सहभागी होण्यासाठी ३० ऑगस्ट
पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीआणि नोंदणीसाठी
शिवाजी गाडे (९४०३५९२७५०किंवा ९७३०८९२७५०) यांच्याशी संपर्क साधावा.

multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Citizens of Dombivli suffering because of bad roads Excavation of roads for laying of new roads and channels
खराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई
Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना