कास पठार, वरंध घाट वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २० सप्टेंबर रोजी पावसाळी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. यामध्ये कासशिवाय सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचाही समावेश आहे. याशिवाय २१ सप्टेंबर रोजी भोर, भाटघर, नीरा देवधर धरण, वरंध घाट, शिवथरघळ परिसरात वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
Renovation of Afghan War Memorial Church completed Mumbai
अफगाण वॉर मेमोरियल चर्चचे नूतनीकरण पूर्ण; ३ मार्चपासून सर्वांसाठी खुले होणार, नूतनीकरणासाठी १४ कोटींचा खर्च
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…
nagpur mahalaxmi saras exhibition marathi news, nagpur exhibition marathi news
नागपुरातील सरस प्रदर्शनावर ‘लक्ष्मी’ प्रसन्न, १.६३ कोटींची विक्री

कास पठार सहल
सप्टेंबर महिना लागला की, निसर्गभटक्यांना कास पठाराचे वेध लागतात. पावसाळी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले हे पठार या दिवसात बहरून येते. हे पठार आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचे २१-२२ सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विकास जयवंत (९९३०९३५१९३) यांच्याशी संपर्क साधावा.
जंगल सफारींचे आयोजन
‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे विविध जंगल सफारींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पेंच (२७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर), रणथंबोर (२ ते ७ नोव्हेंबर), कान्हा (२५ ते ३० डिसेंबर), बांधवगड (२५ ते ३० डिसेंबर) आदी जंगलांना भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी योगेश (९४२२५०२६१९) यांच्याशी संपर्क साधावा.

धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान गोकाक, जोग, सातोडी आदी धबधब्यांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
कास, ठोसेघर भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या २० ते २१ सप्टेंबर रोजी कास पठार आणि ठोसेघर धबधबा भटकंतीचे आयोजन केले आहे.  अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

कान्हा सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १२ ते १५ डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील कान्हा येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

दोडीताल दारवा ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंडातील ‘दोडीताल दारवा ट्रेक’चे आयोजन करण्यात आले आहे. दोडीताल हे हिमालयातील ११ हजार फूट उंचीवर जंगल आहे. देवदार झाडांच्या या घनदाट जंगलात एक सुंदर तलाव आहे. या तलावात हिमालयीन ट्राईट जातीचे मासे दिसतात. या पदभ्रमण मार्गात विविध पशू-पक्षी दिसतात. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.