मानसिक आरोग्याबद्दलचा ‘एक जागृत संवाद’ या लेखमालेच्या अनुषंगाने झाला. कुणी आपल्या आईबद्दल, कुणी बहिणीबद्दल, कुणी पत्नीबद्दल, मानसिक आरोग्याबद्दल माहिती विचारली. भाव बदललेल्या, संवेदना बदललेल्या आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींना आपण सांभाळले पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे हे अनेक कुटुंबीयांना पटले. आजारांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अनेक मैत्रिणींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. नातेवाईकांच्या मनीचा हा सुंदर बदल पाहता मला वाचकांचे मनसोक्त कौतुक करावेसे वाटते.

मॅडम, तुमचा चतुरंगमधला ‘जीवन सुंदर आहे’ लेख वाचला. खूप छान वाटले. गेले कित्येक दिवस आयुष्य संपवून टाकावेसे वाटत होते. मनातल्या स्वप्नांची पूर्तता होत नव्हती; मन निराश झाले होते. पण मन खचत असताना तुमच्या लेखातले वाक्य वाचले, ‘थोडीशी वाट पाहिली तर हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात मिळूनही जातात. आत्महत्या आयुष्यच संपविते. पण सहनशीलता मात्र समस्या संपेपर्यंत साथ देते आणि माणसाला वाचविते.’ या वाक्याने मला सहनशीलतेचे महत्त्व पटले. ‘आता पुन्हा कधी आत्महत्येचा विचारही करणार नाही,’ या माझ्या वाचकाने मनापासून दिलेल्या कबुलीने माझे मन तृप्त झाले. पहिल्यांदा मला जाणवले की, केवळ क्लिनिकमध्ये बसून रुग्णांना ठीक करतो, याचा भरपूर आत्मविश्वास आम्हाला असतो. पण एखाद्या लेखानेसुद्धा रुग्णांना आत्मविश्वास मिळू शकतो, हे समाधान देणारं आहे.
मनावर व मानसिक आरोग्यावर लिहिताना लेखिका म्हणून माझ्याही मनात विचारांचे, कल्पनांचे व संकल्पनांचे संवाद प्रतिसंवाद जागत होते. हे लेख मला स्त्रियांसाठी लिहावयाचे होते. वर्षभर आपल्यावर एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव होत होती. मी स्वत:वरची ही जबाबदारी प्राजंळपणे स्वीकारली. रोजच तणावाने व मानसिक रोगांनी पीडित भगिनींना भेटत असताना काही सर्वसाधारण व काही खास विषयांना हात घातला. खरे तर सुरुवातीच्या चार-पाच लेखांनंतर माझ्या काही रुग्णांनी मला विनंती केली, गळही घातली की, आमच्या काही समस्या आणि आजारांबद्दल तुम्ही या लेखमालेत लिहा. म्हणजे आमच्या इतर भगिनींच्याही लक्षात अनेक समस्या येतील. पण ओ.सी.डी. किंवा मंत्रचळ व भयगंडसारखे आजार ‘अचपळ मन माझे’ या लेखमालिकेत प्रकटले आणि अनेक नातेवाईकांना प्रामुख्याने ‘पतीं’ना आपल्या पत्नीबद्दलच्या विकारांबद्दल कळले व वळलेही याचे कौतुक वाटते. त्यांच्या मनात आता या आजाराबद्दल गूढ उरले नव्हते. त्यामागचे शास्त्र त्यांना उलगडले होते. मला सहज ओळी आठवल्या – ‘जगी हा खास वेडय़ांचा पसारा माजला सारा, गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा.’ मा. दिनानाथांच्या स्वरातली ही कविता माझी खूप आवडती आहे. कारण आपण ज्यांना वेडे समजतो ते खरे पिडलेले जीव असतात. या जगातील अन्यायाला विटलेले, छळाला कंटाळलेले. बऱ्याच आमच्या भगिनी घरातल्या नातेवाईकांच्या बेरक्या स्वभावाशी आणि छक्क्यापंजांबरोबर टिकूही शकत नाहीत. सारा क्लेश, राग, संताप मनात साचून राहतो. त्यांची वैचारिक क्षमताच कमी होते. त्या खूप भावूक होतात. भावूक मन आणखी घायाळ होतं. अशा वेळी आजार शरीराचा असला तरी त्रास मनाचा असतो. पण त्या शारीरिक दु:खाच्या आणि वेदनेच्या चक्रव्यूहात शिरलेल्या आपल्या भगिनींना त्यातून बाहेर यायची कला जमत नाही. कारण आपल्याला काही मानसिक आजार आहे हे स्वीकारायची तयारी या स्त्रियांमध्ये दिसत नाही. परवाच माझ्याकडे एक भगिनी आल्या होत्या. बारा वष्रे त्यांना झोप लागली नव्हती. चिडचिडत आयुष्य घालविले होते. पण हा सगळं त्यांना त्यांच्या अपूर्ण आयुष्यातून आलेला अनुभव वाटला होता. जगणं कठीण वाटत होतं. रोजच्या रोज दिवस घालवणंसुद्धा कठीण वाटत होतं. मग उपचार का शोधायचे नाहीत? मदत का मागायची नाही? दोष नसताना अपमान सहन करीत का राहायचे? रडतकढत जगणं आणि सहन करत तडफडणं ही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वसामान्य गोष्ट तिला वाटते. नसीर कज्मींचा शेर येथे आठवतो
हमने अपनों से जख्म खाये है,
तुम तो गरों की बात करते हो॥
स्त्रीच्या मानसिक संवेदनाचा विषय हाताळताना सामाजिक भान ठेवण्याची नितांत गरज आहे. आपण स्त्रीची बुद्धी, भावुकता आणि कार्यक्षमता गृहीत धरतो. स्त्री पुरुषप्रधान फिलॉसॉफीतून आजही मुक्त झालेली नाही. आज हा लेख लिहीत असताना एक भगिनी तिच्या आईबरोबर माझ्याकडे आली होती. डिप्रेशनच्या आजारासाठी तिच्या आईने आणले होते. तिची कहाणी सांगत असताना लक्षात आले की तिचा नवरा गेली दोन वष्रे दुसऱ्या बाईबरोबर लग्नाशिवाय राहात होता. ही भगिनी मनातल्या मनात कुढत होती. आपण लग्नाची बायको असूनही या नवऱ्याने आपल्याला कसे सहजरीत्या भिरकावून दिले, या विचाराने मनातल्या मनात खदखदत होती. तिच्या पतीने तिला सांगितले की, तू तुझ्या आईकडून दरवर्षी ५ लाख रुपये दिलेस तरच मी तुझ्याबरोबर राहीन. नाहीतर तू घरातून निघून जा. याशिवाय त्याने आपल्या तीनही मुलांना आपल्या आईकडे नेऊन ठेवले. पहिल्या वर्षी या भगिनीने आपल्या आईकडून दोन लाख रुपये त्याला आणून दिलेही. तो काही दिवस तिच्याबरोबर आलाही व पुन्हा तीन महिन्यांत त्या दुसऱ्या बाईकडे जाऊन राहिला. अलीकडे तर त्याने तिला खूप मारहाण केली होती. अशा तऱ्हेने स्त्रीला ब्लॅकमेल करायचे अनेक प्रसंग घडत असतात, ज्यामुळे ती नराश्याच्या मानसिक आजाराचा बळी ठरते. अशा आजारात केवळ नराश्यावर मात करण्यासाठी मानसोपचार गरजेचे आहेतच. पण स्त्रीला स्वत:च्या सन्मानाची, हक्काची जाणीव व कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे.
मानसिक आजारात स्त्रियांमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये जैविक घटकांबरोबर अनेक सामाजिक घटक खूप महत्त्वाचे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने स्त्रियांच्या नराश्यामध्ये सामाजिक घटकांवर भर दिला आहे. त्यामध्ये तिची आíथक कुवत, दारू पिणारा नवरा, घरगुती िहसा व लंगिक िहसा हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. याव्यतिरिक्त स्त्रीच्या आयुष्यात आंतग्रंथींचे शारीरिक व मानसिक परिणाम शास्त्रीयदृष्टय़ा लक्षात घेतले जात नाहीत. पाळी येण्याच्या वेळी, गर्भावस्थेत, प्रसूतिनंतर आणि रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना ज्या मानसिक तणावातून जावे लागते त्याचे दु:ख आणि क्लेश तिलाच समजू शकतात.
‘अचपळ मन माझे’ या लेखमालेत मी स्त्रीच्या या टप्प्यांशी निगडित असलेल्या मानसिक वेदनेवर प्रकाश टाकला आणि आपल्या वाचक भगिनींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जे भोगावे लागले त्याबद्दल जनजागृती किती आवश्यक आहे हे आपल्या बऱ्याच मत्रिणींना कळलं. यातील काहींनी तर या विषयावर परिसंवादही घडवून आणला ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
याशिवाय वाचकांबरोबर बऱ्याच वेळा मानसिक आरोग्याबद्दलचा ‘एक जागृत संवाद’ या लेखमालेच्या अनुषंगाने झाला. भरपूर ई-मेल्स आल्या. फोनही आले. कुणी आपल्या आईबद्दल, कुणी बहिणीबद्दल, कुणी पत्नीबद्दल मानसिक आरोग्याबद्दल माहिती विचारली. भाव बदललेल्या, संवेदना बदललेल्या आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींना आपण सांभाळले पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे हे अनेक कुटुंबीयांना पटले. याचे मला लेखक या नात्याने मनापासून अप्रूप वाटते. बऱ्याच भगिनींना स्वत:मध्ये असलेल्या मानसिक समस्यांची उकल झाली. मुख्यत्वेकरून पॅनिक अ‍ॅटॅक, मंत्रचळ, हायपोकॉड्रीयासिस या आजारांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अनेक मत्रिणींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आपण आजाराच्या भूलभुलयातून बाहेर यायला पाहिजे. त्यासाठी आपले मन कणखर केले पाहिजे हे त्यांना उमजले. मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी ज्यांना हा आजार होतो त्यांची व त्यांच्या अवतीभोवती असलेल्या मित्रपरिवाराची, कुटुंबाची व समाजाची एक सामाजिक व सांस्कृतिक क्रांती होणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती या विषयाला समजून घेण्याची. ‘लोकसत्ते’च्या एका प्रामाणिक वाचकाने अत्यंत माणुसकीने भारवलेला प्रतिसाद या सदराला दिला. मला तो सगळ्यात जास्त भावला. या सद्गृहस्थाची पत्नी स्किझोफ्रेनियाने आजारी होती. तिला सांसारिक जबाबदारी कधीच समजली नाही. तिच्या विचित्र वागण्याने, बोलण्याने व संशयकल्लोळाने ते गृहस्थ खूप चिडले होते. तिच्या या बेजबाबदार वागण्याने ते कावले होते. तिच्या आईवडिलांना तिचा हा आजार ज्ञात होता. तरी त्यांनी फसवून तिचे लग्न करून दिले होते. तिला सांभाळणे त्यांना केवळ अशक्य झाले होते. संतापाच्या भरात ते तिला खूप मारत असत. खोलीत बंद करून ठेवत असत. पण ‘अचपळ मन माझे’तल्या स्किझोफ्रेनिया वरचा लेख त्यांनी वाचला व समजून घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीवर उपचारही सुरू केले. स्वत:च्या निर्दयी वागणुकीबद्दल त्यांना खूप पश्चात्तापही झाला. नातेवाईकांच्या मनीचा हा सुंदर बदल पाहता मला वाचकांचे मनसोक्त कौतुक करावेसे वाटते. भावनिक आधाराची पुंजी मानसिक रोग्यांसाठी परमेश्वराचे वरदान आहे.
बा.भ. बोरकरांनी म्हटलेच आहे,
जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळाले हो
चराचरांचे होऊनी
जीवन स्नेहासम पाजळले हो,
जीवन त्यांना कळले हो!
‘अचपळ मन माझे’ला वाचकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला व हा प्रतिसाद सविस्तर व गहिरा होता. स्वत:चे मनच आपल्या वाचकांनी ई-मेलमधून व्यक्त केले. झोप येत नाही, मनामध्ये काही गोष्टी कशा अडकल्या आहेत, मृत्यूची सदैव भीती कशी वाटत असते, नराश्याने वेढलेलो असतो तेव्हा किती एकाकी वाटते अशांसारख्या अनेक मानसिक तक्रारींचे वर्णन त्यांनी विश्वासाने केले. खरे तर या प्रतिसादावरच पूर्ण लेखमाला लिहिता येईल असे वाटते. एक सर्वसामान्य प्रश्न वाचकांनी आपल्या भावनांबद्दल विचारला आहे. खूप राग येतो, चिड येते, संताप येतो, अपराधी वाटते अशा अनेक भावना आपल्याला सदैव त्रास देत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपली चित्तप्रवृत्ती अस्वस्थ असते. जवळचे कुटुंबीय व दोस्त मंडळी या भावनांमुळे खूप दूर जातात. या भावनांवर काबू मिळवायचा हे जाणवतं, पण जमत नाही. या भावनांना काबूत कसं ठेवायचं? वाचकहो, हा एक खूप क्लिष्ट प्रश्न आहे. याला उत्तर द्यायचे म्हटले, तर ते एक प्रवचनच होईल. आपल्या मनात भावनांचे काहूर माजलेले असते. अनेक वेळा मन नकारात्मक विचारांबद्दलच जास्त विचार करते. आणि हे असे का होते? तर आपल्या मनात आपल्याला जे जे हवे आहे, असे वाटते ते ते मिळालेच पाहिजे, हा अवास्तविक आग्रह किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे हा दुराग्रह असतो तेव्हाच मन दु:खीकष्टी होते. म्हणूनच आपल्या भावनांना आपण प्रामाणिकपणे ओळखायला शिकलं पाहिजे. त्यांचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. तेव्हाच हळूहळू मनाला शांत होण्याची सवय भासेल. आयुष्यात आपण इच्छिलेल्या काही गोष्टी आपल्याला मिळतातही पण सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत हा नियम नाही.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

कुछ खोना, कुछ पाना चलता रहता है
साँसो का अफसाना चलता रहता है।

अर्थात, बरेच काही या लेखमालेत लिहायचे राहून गेले आहे. लैंगिक अत्याचार व घरगुती िहसेतून होणाऱ्या मानसिक आजारांची माहिती या लेखमालेत वेळेअभावी देता आलेली नाही. स्मृतिभ्रंशासारख्या महत्त्वाच्या आजारावर ऊहापोह करता आला नाही. कारण वर्षांचे आठवडे आपल्याला वाढविता येत नाहीत. पण तरीही पुन्हा कधीतरी ही संधी येईलच आणि अशा संवेदनशील विषयांवर, विचारांवर लेख लिहिता येतील हा विश्वास आहे. मन हे आपल्या आयुष्याचं सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर आपल्यालाच विकसित करायला हवं. या सॉफ्टवेअरमध्ये जितका सकारात्मक संवाद आपण घालू तितके आपले आयुष्य सुखी आणि सकारात्मक होईल यात शंकाच नाही.
pshubhangi@gmail.com (सदर समाप्त)