17 August 2017

News Flash

जग हे ‘बंदी’शाळा..

या मुलाखतीचा भर जगभरात मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेल्या असहिष्णुतेवर आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 24, 2017 12:23 AM

शेट्टी या मुलाखतीत भारतातील परिस्थितीवर आणि प्रामुख्याने माध्यम स्थितीवर विस्तृत भाष्य करतात.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे सरचिटणीस सलील शेट्टी यांनी भारतातील परिस्थितीवर केलेले भाष्य गंभीर आणि तितकेच चिंतनीय आहे..

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही जगभरातील स्वयंसेवी संस्थांची मेरुमणी. इतिहासात संतुलित भूमिकेसाठी ती प्रसिद्ध होती असा दावा त्या संघटनेचे कडवे समर्थकदेखील करणार नाहीत. परंतु एकंदरच जागतिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे असेल किंवा वयपरत्वे येणाऱ्या पोक्तपणामुळे असेल वर्तमानात ही संघटना दखल घ्यावी इतकी विवेकी झाली असून त्याचमुळे या संघटनेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस सलील शेट्टी यांचे जगाच्या अस्वस्थ वर्तमानावरील भाष्य महत्त्वपूर्ण ठरते. शेट्टी हे अर्थातच भारतीय आहेत आणि या संघटनेच्या लंडन येथील मुख्यालयात ते असतात. संयुक्त राष्ट्र, विविध आंतरराष्ट्रीय संस्था आदींतील कामाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याचमुळे त्यांचे भाष्य हे क्रियाशीलाचे निरीक्षण ठरते. ‘द हिंदू’ या दैनिकास त्यांनी विस्तृत मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केवळ भारताविषयीच नव्हे तर जगातील अनेक प्रमुख लोकशाही देशांतील परिस्थितीवर साधार टिप्पणी केली. त्या मुलाखतीतील संयतपणा आणि वास्तववादी दृष्टिकोन यामुळे त्यांचे भाष्य चिंतनीय ठरते.

या मुलाखतीचा भर जगभरात मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेल्या असहिष्णुतेवर आहे. या विषयी भाष्य करताना ते नुकत्याच जर्मनीतील हॅम्बर्ग येथे झालेल्या जी २० परिषदेचा हवाला देतात. या परिषदेस ते स्वत: हजर होते. त्यांचे निरीक्षण असे की या परिषदेच्या मंचावर हजर असणाऱ्या २० देशप्रमुखांपैकी चार जण वगळता अन्य १६ जणांच्या लोकशाहीवरील निष्ठा संशयास्पद आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टड्रो आणि युरोपीय संघटना हे सदस्य वगळले तर अन्य १६ सदस्यांतून जगाचे भयावह चित्र उभे राहते. ते आश्वासक म्हणता येणार नाही. त्यांच्या मते आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आहोत की वेगवेगळ्या कारणांमुळे जगात व्यक्तिवादात कमालीची वाढ होताना दिसते. या संदर्भात त्यांनी केलेले भाष्य भेदक आहे. ‘‘अ‍ॅम्नेस्टी संघटना अलोकशाहीवादी आणि अवैध मार्गानी सत्तेवर आलेल्यांशी कसे वागावे याविषयी सुपरिचित आहे. परंतु लोकशाही मार्गानी सत्ता मिळवणाऱ्या हुकूमशहांना सामोरे जाण्याची वेळ आमच्यावर प्रथमच येत आहे’’ हे त्यांचे मत. जागतिक राजकीय परिस्थितीतील मूलगामी बदल ते अधोरेखित करते. आम्ही रशिया, चीन, सौदी अरेबिया वा इराण या देशांतील परिस्थितीशी दोन हात करण्यास सरावलेले होतो. परंतु टर्की, फिलिपिन्स, हंगेरी, काही प्रमाणात अमेरिका आणि भारत या देशांत जे काही सुरू आहे ते अद्भुत आहे, असे शेट्टी म्हणतात. अमेरिकेचे ट्रम्प वा हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांची भाषा भयचकित करणारी आहे, याकडे ते लक्ष वेधतात. या आणि अशा देशांतील प्रमुख उघडपणे संकुचित लोकशाहीचा पुरस्कार करतात. हे असे कधी घडले नव्हते. या आणि अशा नेत्यांना जनतेचा पाठिंबा मिळतो. तो तात्पुरता असेल असे मानता येईल. परंतु या काळात संस्थात्मक व्यवस्थेपुढे मोठे आव्हान निर्माण होते, हे शेट्टी यांचे मत निश्चितच विचार करावा असे आहे.

जागतिक परिस्थितीच्या या बदलत्या वास्तवाच्या अनुषंगाने शेट्टी या मुलाखतीत भारतातील परिस्थितीवर आणि प्रामुख्याने माध्यम स्थितीवर विस्तृत भाष्य करतात. टर्कीचे अध्यक्ष एर्दोगान वा रशियाचे पुतिन यांच्याइतकी हुकूमशाही प्रवृत्ती भारतीय नेतृत्वात अजून तरी दिसलेली नाही, हे ते प्रांजळपणे मान्य करतात. परंतु त्याचबरोबर भारतीय नेतृत्वाची पावले त्याच दिशेने कशी पडत आहेत, हे ते सोदाहरण स्पष्ट करतात. त्यांच्या मते जगातील वर उल्लेखलेल्या सर्वच देशांतील प्रमुखांत.. यात भारतही आला.. एक समान धागा आहे. तो म्हणजे सामान्य जनतेत राष्ट्रवादाची पोकळ भावना चेतविण्यात त्यांना आलेले यश. हे सर्व नेते एकाच मार्गाने निघालेले दिसतात आणि ते जे काही करताना दिसतात त्यामागे कमालीचे साम्य आढळते. या संदर्भात त्यांनी दाखवून दिलेला एक विसंवाद अत्यंत बोलका आहे. आणीबाणीच्या काळ्या कालखंडात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सामाजिक संस्थांची गळचेपी करण्यासाठी Foreign Contribution Regulation Act (FCRA) आणला. या कायद्यामुळे स्वयंसेवी संस्थांवर परकीय आर्थिक मदतीचे कडवे निर्बंध घातले गेले. शेट्टी त्या वेळी भारतातच होते. या कायद्यास त्या वेळी शेट्टी यांच्याप्रमाणे तत्कालीन विरोधी नेत्यांनी जोरदार विरोध केला. पण त्या वेळी या मागास कायद्यास विरोध करणारे आता सत्ताधारी असून ते आता याच कायद्याच्या आधारे दिवंगत इंदिरा गांधी यांनी जे केले तेच करीत आहेत, हे शेट्टी दाखवून देतात. विद्यमान सरकारने गेल्या फक्त एका वर्षांत तब्बल १० हजार स्वयंसेवी गटांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातही सरकारची लबाडी अशी की परदेशी आर्थिक मदत स्वीकारणाऱ्या सर्वच संघटनांवर कारवाई केली जाते, असे नाही. ज्या संघटना सरकारची तळी उचलण्यात धन्यता मानतात, त्यांना मिळणाऱ्या परकीय मदतीकडे सोईस्कर कानाडोळा केला जातो. परंतु एखादी संघटना जरा जरी सरकार विसंवादी सूर लावीत असेल तर तिच्यावर ताबडतोब कारवाई केली जाते, असे शेट्टी यांचे निरीक्षण आहे. ते भक्त वगळता अन्य कोणीही अमान्य करणार नाही. शेट्टी यांचे म्हणणे असे की या अशा सरकारधार्जिण्या दमनशाहीचा सत्ताधाऱ्यांना फायदा होतो. पण तो अत्यंत तात्कालिक असतो. दीर्घकाली धोरणांतून पाहू गेल्यास त्यामुळे देशाचे नुकसानच होते, हे त्यांचे मतदेखील सर्वमान्यच व्हावे. या अनुषंगाने येथील माध्यमांवर त्यांनी केलेले भाष्य भेदक ठरावे. या संदर्भात ते वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी असा भेद करतात. त्यांच्या मते भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थिती अत्यंत दयनीय असून त्या तुलनेत वर्तमानपत्रे काही प्रमाणात तरी आपले स्वातंत्र्य जपताना दिसतात. सरकारला आव्हान वाटू शकतील असे प्रश्न विचारणाऱ्या वर्तमानपत्रांची संख्याही लक्षणीयरीत्या घटलेली आहे. याचा अर्थ सरकारी दमनशाही आहे, असा नाही. परंतु विचारस्वातंत्र्याची कोंडी करणाऱ्या वातावरणात एक प्रकारची भीती दबा धरून असते आणि त्यामुळे माध्यमे नकळत स्वनियंत्रण.. सेल्फ सेन्सॉरशिप.. करू लागतात आणि सरकारवर टीका करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. ही परिस्थिती भारतात सध्या तयार झाली आहे. ‘‘आपणा सर्वाना हवा असलेला आणि अभिमान बाळगावा असा भारत हा नाही,’’ हे त्यांचे स्पष्ट मत.

या मुलाखतीत गोवंश हत्याबंदी, स्वघोषित गोरक्षकांचा हिंसाचार, काश्मीर परिस्थिती, महिला आणि दलित प्रकरणे हाताळण्यातील दिरंगाई आदी अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह झाला. त्याबाबतच्या त्यांच्या मतांत येथील विवेकवाद्यांपेक्षा वेगळे काही नाही. परंतु जग भारताकडे कोणत्या चष्म्यातून पाहत आहे, या संदर्भात त्यांचा इशारा दखल घ्यावा असा आहे. व्यवसायविस्ताराच्या मोहापायी जगाने चीन आणि भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परंतु हे आर्थिक आकर्षण आता पूर्वीइतके राहिलेले नाही. हे वास्तव आहे. आणि ते महत्त्वाचे अशासाठी ठरते की त्यामुळे भारतातील असहिष्णू वर्तमानाची अधिकाधिक चिकित्सा आता जागतिक पातळीवर होऊ लागली असून भारतासाठी ते अडचणीचे ठरणारे आहे. या संदर्भात ते संयुक्त राष्ट्राच्या जीनिव्हा येथील परिषदेचा दाखला देतात. या परिषदेत भारताने मानवी हक्कांसंदर्भात चढय़ा सुरात आत्मस्तुतीचा प्रयत्न केला. परंतु तो अन्य देशांनी हाणून पाडला आणि येथील वाढत्या असहिष्णुतेकडे संबंधितांचे लक्ष वेधले. भारतातील वास्तवाची कठोर चिकित्सा व्हायला हवी, हा मतप्रवाह जगात सुदृढ होत असल्याचे त्यांचे मत म्हणूनच महत्त्वाचे. त्याची दखल सत्ताधारी घेतील, ही आशा. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा २०१६चा वार्षिक अहवाल जग हे कसे बंदिशाळा होऊ घातले आहे, ते दाखवून देतो. या बंदिशाळेत भारताचाही समावेश होणे हे आपणास खचितच भूषणावह नाही.

First Published on July 24, 2017 12:23 am

Web Title: amnesty international head salil shetty comment on situation in india
 1. R
  Ranjeet
  Jul 27, 2017 at 8:51 am
  अ िष्णुता का वाढत आहे याचा विचार अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल करणार नाही,सलील शेट्टी न मध्ये राहून भारतातील जमिनी वरील अ िष्णुता काय मापनार?? अ िष्णुता वाढीस लागण्याची प्रकिया काँग्रेस च्या ध्येय धोरणाने लागू झाली, नि ती ध्येय धोरणे मोदी सरकार कितपत बदलणार याचीच शंका जनेतला असावी बर अ िष्णुतेचा फायदा विरोधक हि घेतातच कि, तथाकथित बुद्दी? वादी, गॅंग,मोदींचे भामटे भक्त, लोकसत्ता सारखे प्रत्रक हे हि आप आपल्या सोयी प्रमाणे वागतात, ती त्याचे पाप मोदीच्या वाटयाला देतात. उदा.भारत आरक्षणविषयी/काश्मीर पंडित हत्या कांड/काँग्रेस व इतर राजकीय पक्षाचा चा मोठा प्रमाणात सामाजिक व आथिर्क भ्र्रष्टचार/इस्लामी अतिरेकीचा उच्छाद नि त्याला पाठींबा देणारे बुद्दिवादी/नि सरकारच्या धोरणाने गरीब व श्रीमंत यांच्यात वाढणारी दरी, याचा विषयीहि जनतेच्या मनात मोठया प्रमाणात अ िष्णुता आहेच कि???
  Reply
 2. N
  Nilesh Deshmukh
  Jul 26, 2017 at 5:46 pm
  सगळ्यात भिकार आणि देशद्रोही या मानवाधिकार संघटनाच आहेत, त्यातील कळस म्हणजे हि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल हि अमेरिका आणि इंग् च्या ख्रिस्ती लोकांच्या भरवशावर चालू असून हिंदुस्तान ला स्थिर होण्यापासून खाली खेचणे हेच यांचे लक्ष्य, अश्याना चपलेने झोडपावे आतंकवाद्यांना माफी द्या, बलात्कार्यांना कमी शिक्षा द्या, अल्पसंख्यांक पहिले आणि बहुसंख्याक दुय्यम स्थान द्या हे सगळे पडद्याआड यांचेच कारनामे... पैश्यामुळे भारतीय मीडिया यांची पूर्ण ीक, यांवर केवळ बंदी न्हवे तर भरचौकात फाशी द्यावी
  Reply
 3. N
  Nilesh Deshmukh
  Jul 26, 2017 at 5:45 pm
  सगळ्यात भिकार आणि देशद्रोही या मानवाधिकार संघटनाच आहेत .. त्यातील कळस म्हणजे हि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल हि अमेरिका आणि इंग् च्या ख्रिस्ती लोकांच्या भरवशावर चालू असून हिंदुस्तान ला स्थिर होण्यापासून खाली खेचणे हेच यांचे लक्ष्य ... अश्याना चपलेने झोडपावे आतंकवाद्यांना माफी द्या, बलात्कार्यांना कमी शिक्षा द्या, अल्पसंख्यांक पहिले आणि बहुसंख्याक दुय्यम स्थान द्या हे सगळे पडद्याआड यांचेच कारनामे... पैश्यामुळे भारतीय मीडिया यांची पूर्ण ीक .. यांवर केवळ बंदी न्हवे तर भरचौकात फाशी द्यावी
  Reply
 4. N
  narendra
  Jul 26, 2017 at 9:55 am
  जो तो बुद्धीच सांगतो असे रामदासांनी महाराष्ट्रातील त्यावेळच्या स्थितीचे वर्णन केले आहे तशी स्थिती येणे हेही चांगले नाही.एक लक्ष्मण रेषा सर्वांनी स्वतः पाळली तर आणि न्यायबुद्धीने वर्तन केले तर आणि सर्वांच्या बद्दल समानतेने पाहिले तर असला प्रश्न विवेकवाद्यांनाही पडणार नाही. फक्त एका विशिष्ट बाजूलाच दोष लावून पुरस्कार वापसी करणे हे न्यायाचे आहे का?त्यामुळे विवेकवाद्यांनीही सर्व बाबतीत समानतेने वर्तन करावे तरच त्यांच्या म्हणण्याला अर्थ राहील नाहीतर पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे कि देवाने केलेले कृत्य म्हणजे रासक्रीडा आणि बंडूने केले तर त्याला मात्र लफडं किंवा भानगड म्हणायचे असं होत.
  Reply
 5. M
  Mahesh
  Jul 24, 2017 at 11:10 pm
  Sampadak mahodayani pakistan madhe jaun asle lekh khapvave. khup vachak miltil.
  Reply
 6. S
  sanjay
  Jul 24, 2017 at 9:04 pm
  जवाहरलाल नेहेरूंनी डावी विचारसरणी - काँग्रेस मध्ये राहून- कशी अंगिकारली आणि देशाला अंगिकारण्या साठी भाग पडली-हे सत्य जाणून घ्यायचे असेलतर प्रत्येकाने एक पुस्तक नाकी वाचा- " कहाणी कोम्मुनिस्ट कि" -संदीप देव-BLOOMSBURY PUBLICATION- भारताला तोडायचेया प्रयत्न किती पूर्वीपासून होत आहे आणि आजून सुरु आहे-जे आता असल्या देशद्रोहत्यांना शक्य होणार नाही-हे मोदीजी आल्यावर कळून चुकले आहे -आणि मोदीजींचा पाठिंबा दिवस दिवस वाढत आहे ! सर्वच आघाडीवर मोदीजींनी कार्यवाही सुरु केली आहे- परंतु लोकसत्ता सारख्या " मोदीविल" (कावीळ) झालेल्या लोकांना सतत प्रयत्न करावेलागतील- कारण ते सर्व काँग्रेस च्या पगारावराजूं काम करत आहेत !! "इंडिया टुडे " - ची स्थापना का आणि केव्हा झाली होती ते तपास???
  Reply
 7. A
  ad
  Jul 24, 2017 at 4:58 pm
  भक्तांनो करा टिवटिव.
  Reply
 8. विनोद
  Jul 24, 2017 at 3:38 pm
  भक्त पूर्णवेळ पगारी प्रतिक्रीयाकार असल्याशिवाय का त्यांना प्रतिक्रीया द्यायला एवढा वेळ आहे ? रिकामटेकडे सुद्धा प्रतिक्रीया देताना एवढे सातत्य आणी चापल्य दाखवू शकत नाहीत. पूर्णवेळ पगारी असल्याचेच त्याच्या प्रतिक्रीया आेरडून सांगत असतात.
  Reply
 9. A
  Abhishek Dabli
  Jul 24, 2017 at 3:19 pm
  मुळात या संस्थेला कवडीची किंमत नाही. भारताविषयी तर मुळीच दिसत नाही. भारतात तद्दन सगळी माध्यमे दिवस रात्र मोदींविरुद्ध कंठशोष करीत असतात. खरंच कावीळ झाला आहे काय हो तुम्हाला? मी स्वतः मोदी वर भरपूर टीका केली आहे... आजपर्यंत कुणीही त्रास दिला नाही... थांबवा हा मूर्खपणा.
  Reply
 10. A
  Aniket
  Jul 24, 2017 at 1:54 pm
  अरे याला कोणीतरी डॉक्टरांकडे न्या रे...कावीळ झाले या संपादकाला. याच्या डोक्यात मोदींशिवाय कोणताच विषय नाही.....केव्ह येते असला फालतू दर्जाचा संपादक लोकसत्ताला मिळाला
  Reply
 11. A
  AMIT
  Jul 24, 2017 at 1:47 pm
  चीन आणि उत्तर कोरिया चा आदर्श देणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्तीची कीव करावीशी वाटते. अ ्य भामट्यांचा आदर्श कोरिया असल्यावर मग यांना केवळ दमनशाही हवी आहे हे सिद्ध होते. बाकी अम्नेस्टी ने चीन वर टीका केली नाही हि माहिती धादांत खोटारडेपणा आहे - पण या भाजप समर्थकांना खरे खोटे पानाशी काही देणे घेणे नसते.
  Reply
 12. U
  Ulhas
  Jul 24, 2017 at 1:25 pm
  मोदी विरोधकांच्या प्रतिक्रिया हल्ली केविलवाण्या होत चालल्या आहेत. हा काय म्हणेल, त्या काय लिहितील अशी भीती संपादकमजकूर साहेबाना घालणे आणि भक्तांच्या रोजगाराची उठाठेव करणे इतक्या पातळीवर त्या उतरल्या आहेत. अर्थात, ही वेळ त्यांच्यावर आली ह्यात नवल काही नाही.
  Reply
 13. S
  Somnath
  Jul 24, 2017 at 1:10 pm
  काँग्रेसच्या अंधाऱ्या कोठडीतल्या बंदी शाळेत लाळघोटेपणा करत असणाऱ्यांना सजग वाचकांच्या प्रतिक्रिया झोम्बल्या का उपाशी पोटी ओरडणे चालू होते.तुकड्यावर पोट भरणारे हल्ली बेरोजगारीने चांगलेच त्रस्त झाले आहेत.
  Reply
 14. A
  Ameya
  Jul 24, 2017 at 1:08 pm
  याला म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर ठेऊन बंदूक चालवणे. पुन्हा एकदा संपादकांचा मोदी आणि ट्रम्प द्वेष उफाळून आला. आहे. पण या वेळेस त्यांनी थेट स्वतःच्या दृष्टिकोनातून न लिहिता कुण्या दुसऱ्या "थोर विचारवंताचा" आसरा घेतला आहे. भारतातील लोकशाहीची सर्वात मोठी गळचेपी हि इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये केली होती हे सगळे सोयीस्कररीत्या विसरतात. शिवाय १९८४ च्या दंगली? छे हो, त्या दंगली नव्हत्याच. असो तर तात्पर्य असे की जगभरात इस्लामी दहशतवादाने घातलेले थैमान यांना दिसत नाही, पाकिस्तान बांगलादेश इत्यादी ठिकाणी अल्पसंख्यान्काची होणारी कत्तल यांना दिसत नाही, दिसते काय तर फक्त काही स्वघोषित गोरक्षकांचे उपद्व्याप. त्याच वेळी भारतात घडणाऱ्या बंगालमधील दंगलींबद्दल, केरळमधील हिंसाचाराबद्दल हे गप्प बसतात. यातूनच लेखकाचा आणि शेट्टी नामक "थोर विचारवंतांचा" फोलपणा उघड पडतो. जिथे जिथे पीडित व्यक्ती दलित अथवा मुसलमान असते, तिथे हे धावतात गिधाडासारखे लचके तोडायला, बाकी गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून वावरतात.
  Reply
 15. M
  milind
  Jul 24, 2017 at 12:55 pm
  एक चोर दुसऱ्या चोराला चांगला माणूस म्हणतो तसे झाले. म्हणजे अ‍ॅम्नेस्टी हि मेरू मणी आहे हे तुम्ही कुठल्या आधारे सांगता ? त्यांनी सौदी कुवैत इथल्या जाचक धर्मभेदी घटनां विषयी का नाही लिहिले? चीन मध्ये वा कोरियामध्ये तर यांना कोनो विआचारात हि नाही...आम्ही यांचे म्हणणे प्रमाण का मानावे? आता तुमचेही. आम्ही इतर देशांच्या बातम्या हि वाचतो नि विचार हि समजतो. तुम्ही लेख लिहिताना लोक्कांना मूर्ख का सामंजता? NGO किव्वा सेटलवाड सारख्या भामट्यांनी देशात जे काही गोंधळ घातला आहे त्याला सरकार ने चाप लावला तर काय चूक आहे? म्हणजे त्यांनी कुठलेही नियम ना पाळता कितीही पैसे बाहेरून आणून चुकीच्या मार्गाने वापरावेत नी सरकारने काहीच करू नये? हे भ्रम पसरवण्यात तुम्ही का अग्रणी आहेत?
  Reply
 16. S
  SACHIN मोंडकर
  Jul 24, 2017 at 11:03 am
  कालपरत्वे अॅम्नेेस्टी इंटरनॅशनल ही संस्था विवेकी झाली आहे - हे मुळात कोण ठरवणार?
  Reply
 17. J
  Janardan
  Jul 24, 2017 at 11:02 am
  नेहरूंनी भारताला पंचशील-नॉनअलाइनमेंट इ.स्वप्नाळू ,भ्रामक धोरणाने जागतिक स्तरावर फक्त दुबळे सॉफ्टस्टेट बनवले परिणामी पाकिस्तान-चीन भारताला सतत रक्तबंबाळ करतात,तर भारतांतर्गत खऱ्याखुऱ्या 'सर्वधर्मसमानते' ऐवजी दिखाऊ 'निधर्मी'लोकशाहीच्या नावे फक्त घातक व अंध अल्पसंख्यांकतोषण व्यवस्था निर्माण केली त्यामुळे भ्रष्ट गत-सत्ताधीशांनी अल्पसंख्यांकी छुप्या गद्दारांना लोकशाहीतल्या पळवाटा वापरत देशघातक राजमार्ग बनवू दिले आता नव-सत्ताधीशानी पूर्वीची देशनाश करणारी पळवाट बंद करण्यास सुरुवात केल्यास कोणता मानवी हक्कभंग आणि कोणती अ िष्णुता होतेय? हे करताना निरपराध अल्पसंख्यांक बळी जाऊ नयेत यासाठी गुन्हेगाराला त्वरित 'जन्मठेपे'सम जरब बसावी.नवसत्ताधीश म्हणजे जादूची कांडी नव्हे.त्यांच्यातील देखील छुपे संधीसाधू व भ्रष्ट गणंग उघडे पडतील अशा कडक व्यवस्थेसाठी मोदींना उसंत द्यायला हवी. ऍम्नेस्टी इं.नॅशनलने भारतावर अ िष्णुतेबद्दल केलेली टीका सत्य नसून पक्षपाती आहे.चीनने मानवीहक्क पूर्णपणे ले आहेत(आठवा तियेंनानमानचौकहत्याकांड) तरीदेखील ही संस्था चूप.वास्तव हे कि चीन बलवान तर भारत आपल्या करंटेपणामुळे बलहीन.
  Reply
 18. M
  Mahesh
  Jul 24, 2017 at 10:44 am
  Vartman patre self sensorship ghalun ghet ahet. Kharach ahe karan jya SRA ghotalyachi batami 10 divsapasun saglya news channel war aahe, agadi samajik karykarta Sandeep yani 40 lakh oatrakarasamote dakhvale. Hi batami aajparyant Loksatta madhe aali nahi. Ka...??Uttar dya nahitr faltu gappa maru naka. Band kara Sampadkiy. Ani batami aali asel tr link pathava. Bghu jara kiti Nirbhidpana ahe.
  Reply
 19. U
  umesh
  Jul 24, 2017 at 10:32 am
  मोदी सरकारवर नेहमीचीच कंटाळवाणी टीका करण्यासाठी लोकसत्ता कुणाचा आधार घेईल सांगता येत नाही आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जी क्रूरकर्मा दहशतवाद्यांनाही माफी देऊ इच्छिते अशा संघटनेच्या कुठल्या तरी फालतू माणसाच्या मुलाखतीचा आधार घेऊन मोदी सरकारवर दुगाण्या झाडल्या आहेत एवढे संशोधन तर कॉंग्रे ी करत नसेल पण संपादकांना आपली कॉंग्रेसनिष्ठा सिद्घ करायला अशी धडपड करावी लागते सरकारला मुद्दाम डिवचण्याचा हेतू दिसतोच पण इंदिरा गांधींनी आणिबाणी आणली त्या दिवसांपेक्षा खूपच मनमोकळे वातावरण आहे हे आम्ही मानतो संपादक भाजपद्वेषाने पिसाळले आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
  Reply
 20. विनोद
  Jul 24, 2017 at 10:19 am
  भक्तांच्या आजच्या राेजगाराचा प्रश्न मिटवणारा लेख.
  Reply
 21. S
  Somnath
  Jul 24, 2017 at 10:05 am
  ‘‘डोंगी पुरोगामी,सेकुलर वाल्याना हवी असलेली काँग्रेस आणि अभिमान बाळगावा अशी ती राहिली नाही,’’ हे त्यांचे रुदन वेगवेगळ्या नाटकीय रूपात पाहावयास मिळते.वाढत्या अ िष्णुतेचा बागुलबुवा दाखवून जनतेला भुलण्याचे दिवस संपले. इतरत्र घडलेली घटना कोणत्या जाती धर्माशी संबंधीत आहे हे बघून बातम्या देणारी लोकसत्तासारखे अयुब पंडितांची हत्या झाली त्यावर मूग गिळून बसतात.चोर चिलटांचे,दरोडेखोरांचे,आतंकवाद्यांचे,खतरनाक कैद्याचा कैवार घेणारे मानवी हक्कवाले आणि वळचणीला पडलेला मीडिया.आणि डोंगी सेक्युलरवाले याना जनता चांगलीच ओळखून आहे.संपादक साहेबांच्या डोक्यात जाऊन बसलेले जे आहेत त्याविषयी कायमची गटारी मळमळ कोणाच्या तरी नावाने काढणे भाग पडते कारण काँग्रेसच्या बंदिशाळेतून जो पर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत कुबेरी ज्ञानाचे कुजकट लेखणी खरडू ढोस वाचकांच्या माथी मारल्या जाणारच.व्यवसायविस्ताराच्या मोहापायी जगाने चीन आणि भारतातील मानवी हक्कांच्या पाय ्लीकडे सातत्याने दुर्लक्ष केले अशी तुलना लेखणी खरडू कडून होते तेव्हा अकलेचे दिवाळे व्यक्तीदोषातून कोणत्या बाजूला आहे हे लेखणी मानसिकता दर्शविते.
  Reply
 22. Load More Comments