25 September 2017

News Flash

ऐसे कैसे झाले भोंदु..

या भोंदूंविरोधात कारवाई आदी करण्याची प्रक्रिया पोलीस वगैरे सरकारी यंत्रणेकडून व्हायला हवी.

लोकसत्ता टीम | Updated: September 12, 2017 11:05 AM

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर करवून घेणे, हे भोंदूबाबांची यादी जाहीर करण्यापेक्षा दूरगामी आणि कायमस्वरूपी ठरेल..

अनैतिकांची म्हणूनदेखील एक नैतिकता असते. ती सहसा भंग होणार नाही, याची काळजी यातील प्रत्येक घटक घेत असतो. याचे अनेक दाखले देता येतील. एक शर्वलिक सहसा दुसऱ्या शर्वलिकाचे उद्योग उघडय़ावर येतील असे काही करीत नाही. किंवा वजनात मारणारा व्यापारी दुसरे तसेच काही करणाऱ्यास कधी बदनाम करण्याच्या फंदात पडत नाही. किंवा औषध कंपन्यांकडून लाच घेऊन रुग्णांच्या गळ्यात नको ती औषधे मारणारे किंवा उगाचच अँजिओप्लास्टी, आंत्रपुच्छ शस्त्रक्रिया, अनावश्यक शल्यकीय प्रसूती वगैरे करणारे दुसरे तसेच काही करणाऱ्यांच्या विरोधात बोलत नाहीत. एखादा राजकीय नेता निवडून येण्यासाठी वापरल्या गेलेल्या क्लृप्त्या दुसऱ्या राजकीय नेत्यास बदनाम करण्यासाठी वापरीत नाही. इतकेच काय राजकारण्यांच्या कच्छपि लागण्यात धन्यता मानणारे माध्यमवीर अन्य राजकारण्यांची तळी उचलण्यात धन्यता मानणाऱ्यांना कधी उघडे पाडत नाहीत. हे असेच सुरू असते आणि ते तसेच सुरू राहील यात व्यवस्थेचे हितसंबंध असतात. तेव्हा या पाश्र्वभूमीवर आखाडा परिषदेने देशातील १४ बाबाबापूबुवांची वर्गवारी भोंदू या सदरात करावी यास निश्चितच अर्थ आहे. तो शोधायला हवा. याचे कारण आखाडा परिषदेच्या या कृत्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थेकडून मिळण्याची शक्यता नसली तरी त्या प्रश्नांना भिडणे आवश्यक ठरते.

यातील पहिला प्रश्न म्हणजे या संदर्भात असे प्रामाणिक, भोंदू आदी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आखाडा परिषदेस नेमका दिला कोणी? म्हणजे देशातील कथित साधुसंतबाबांचे प्रमाणीकरण केले जावे असे काही फर्मान सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहे काय आणि त्या आदेशाद्वारे तसे करण्याचा अधिकार या आखाडा परिषदेस दिला आहे काय? या खात्याचे मंत्री मा. प्रकाश जावडेकर यांनी या प्रश्नावर प्रकाश टाकण्यास हरकत नाही. या आखाडा परिषदेच्या यादीत आसाराम बापू, या आसारामाचा मुलगा नारायण साई, राधे माँ, निर्मलबाबा, सच्चिदानंद गिरी, ओमबाबा, इच्छाधारी भीमानंद, ओम नम: बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी, मलकान गिरी, राम रहीम, रामपाल अशा अनेकांचा समावेश आहे. ही यादी पाहिल्यावर सहज लक्षात येणारी बाब म्हणजे यातील अनेकांवर याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातील काही तुरुंगातही आहेत. तेव्हा उशिराने का असेना कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग यांना भोंदू म्हणण्याचे शौर्यकृत्य या आखाडा परिषदेने केले आहे. हिंदी चित्रपटात पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्याची खात्री झाल्यावर एखादा शूरवीर त्या गुन्हेगारास टप्पल मारण्याचे धर्य दाखवतो, तसेच हे आखाडा परिषदेचे कृत्य नव्हे काय? या आसारामाच्या चरणावर एके काळी गुजरातमधील अत्यंत समर्थ राजकारणी डोके टेकीत होता, तेव्हा त्यास भोंदू म्हणून जाहीर करण्याचे धर्य या आखाडा परिषदेमध्ये का नव्हते? स्वत:च्या निवासकक्षापासून गुप्त भुयाराने साध्वीनिवासापर्यंत संधान साधणाऱ्या राम रहीम अशा डबलबॅरल फिल्मी संताच्या आशीर्वादासाठी देशातील सर्वोच्च सत्ताधीश रांगा लावीत होते, तेव्हा ही आखाडा परिषद समाधिस्थ होती काय? आताही जे शरणागत आहेत वा गुन्हेगार म्हणून बदनाम झालेले आहेत त्यांनाच भोंदू ठरवण्याखेरीज त्यांच्या कृपाप्रसादासाठी सरकारी खर्च, वेळ ज्यांनी वाया घालवला त्यांचा धिक्कार करण्याचे धर्यदेखील ही आखाडा परिषद दाखवणार का? आपल्या देशात कररचनेतील निवडक बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने करण्याचा थोरपणा गेल्या काँग्रेस सरकारने दाखवला. या सरकारनेही तेच पाप पुढे चालू ठेवले. अशा परिस्थितीत या साधुसंतांना भोंदू ठरवण्याचा निर्णय हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने अमलात येणार काय? देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर बसणारी व्यक्ती पदाची सूत्रे हाती घेण्याआधी पूजाअर्चा, होमहवन आदी उद्योग करते ते कृत्यदेखील भोंदूगिरीच्या व्याख्येत बसू शकते असे म्हणण्याचा प्रामाणिकपणा या आखाडा परिषदेकडे आहे काय? हे झाले भूतकाळाबाबत. परंतु त्याच वेळी भगवी वस्त्रे परिधान करून, आपण म्हणजे आयुर्वेदातील कथित सात्त्विकतेचे प्रतीक आहोत असे भासवून वाटेल ती अप्रमाणित उत्पादने बिनविचारी ग्राहकांच्या गळ्यात मारणाऱ्यांचे मूल्यमापन ही आखाडा परिषद करणार आहे का? किंवा सध्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला राहून आपले बरेच काही बरे करून घेणारे अनेक बाबा वा बापू हे भावी भोंदू असू शकतात, असा काही धोक्याचा इशारा देण्याची व्यवस्था ही आखाडा परिषद कशी तयार करणार? मुळात भविष्यात असे नवनवे भोंदू तयार होऊ नयेत यासाठी काही करायला हवे असे आखाडा परिषदेला वाटते का? की सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आसपासचे साधुसंत, बाबाबापू तेवढे खरे आणि त्या सत्ताधीशांपासून फारकत घेतलेले वा सत्ताधाऱ्यांनी प्रसंगोपात्त दूर लोटलेले मात्र भोंदू अशी ही मांडणी आहे? आणि याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा भोंदू आहे असे एखाद्यास आढळल्यानंतर त्या निष्कर्षांची परिणती ही व्यवस्थेकडून व्हायला हवी. म्हणजे या भोंदूंविरोधात कारवाई आदी करण्याची प्रक्रिया पोलीस वगैरे सरकारी यंत्रणेकडून व्हायला हवी. तसे काही करण्याचा विचार आखाडा परिषद करणार आहे किंवा काय? की तसे काहीच करायचे नाही, शासनमान्य यंत्रणांना दूर ठेवायचे आणि स्वत: एक समांतर व्यवस्था म्हणून उभे राहायचे असा आखाडा परिषदेचा मानस आहे? तसे असेल तर ते आणखीनच धोकादायक. आजारापेक्षाही हा उपचार भयानक अशी ही स्थिती. कारण व्यवस्थेमार्फतच या भोंदूबाबांचा नि:पात होणार नसेल तर उद्या या आखाडा परिषदेची दुकानदारी सुरू होणार नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. म्हणजे उद्याचे बाबाबापू आदी ‘आखाडा परिषद मान्य’ असे बिरुद मिरवणारच नाहीत, याची हमी काय? तसे झाल्यास आपण भोंदू ठरवले जाऊ नये म्हणून या आखाडा परिषदेच्या आश्रयास जाणे श्रेयस्कर असा सोयीचा विचार हे आजचे तनधनलोभस्नेही बाबाबापू करणारच नाहीत असे नाही. आखाडा परिषद हे विश्व हिंदू परिषदेचे उपांग आहे. त्यामुळे या परिषदेने हिंदू धर्मातील भोंदूंनाच हात घातला. पण मग अन्य धर्मातील अशांचे काय?

आणि या सगळ्या बरोबरीने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्माच्या क्षेत्रातील ही भोंदूगिरी थांबावी यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यात एका कायद्याचा घाट घातला गेला. बरीच भवती न भवती झाल्यानंतर, जमेल तितका अडथळा आणला गेल्यानंतर हा कायदा कसाबसा मंजूर झाला. वस्तू आणि सेवा कराच्या मूळ मसुद्यात ज्याप्रमाणे ‘जनहितार्थ’ अनेक बदल केले गेले, त्यातील तरतुदी पातळ केल्या गेल्या त्याप्रमाणे या जादूटोणाविरोधी कायद्याचेही झाले. तरीही त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होते असे नाही. तेव्हा भोंदूपणाबाबत या आखाडा परिषदेस इतकीच जर काळजी असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा हा राष्ट्रीय पातळीवर सर्वधर्मीयांसाठी अमलात आणला जावा असा आग्रह आखाडा परिषदेने धरावा. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सहकार्यदेखील घ्यावे. तसे करणे हे अशी एखाददुसरी भोंदूबाबांची यादी जाहीर करण्यापेक्षा दूरगामी आणि कायमस्वरूपी काम ठरेल. या आणि अशा भोंदूंची पदास रोखणे ही खरी ईश्वरसेवा आहे. तेव्हा आखाडय़ा- आखाडय़ांतील मानपान, रुसवेफुगवे वगरेंनाही या संघटनेने मूठमाती द्यावी. नपेक्षा,

ऐसे कैसे झाले भोंदु। कर्म करोनि म्हणती साधु॥

अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप॥

दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥

तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती॥

हे तुकारामवचन सुमारे ४०० वर्षांनंतरही तितकेच सुसंगत आहे, असेच म्हणावे लागेल.

 

First Published on September 12, 2017 2:21 am

Web Title: anti superstition law black magic issue ram rahim radhe maa asaram bapu
 1. V
  Vachak
  Sep 15, 2017 at 9:35 pm
  आपले नेते बाबांच्या नादी का लागतात? जनता कर्मकांडे का करते? प्रत्येक प्रश्न आपण लोक घासूनपुसून का सोडवत नाही? लोक एकत्र येऊन विचारमंथन का करत नाहीत? समस्येच्या मुळापर्यंत जाऊन समस्या का सोडवत नाही? आणि मग अशा बाबांचे प्रस्थ वाढते.
  Reply
  1. R
   Ranjeet
   Sep 13, 2017 at 9:07 am
   वरील भोंदू या व्याख्येत बरेच प्राद्री व बंगाली बाबाहि नि इस्लामी बाबाहि सामील कारवायास हवे होते. नि हि नोंद निदान लोकसत्ताने तरी आपल्याला लेखा मध्ये उल्लेख करावयास होता.पण जिथे लाभ तिथे आमची प्रत्रकारिता पातळ होते नि त्यास नाइलाज आहे, असो पण गुरमीत सिंगची मखलाशी करण्यात काँग्रेस पण होते नि १० वषे त्याचा खटला कसा रेंगाळत राहील याची काळजी हि काँग्रेसने घेतली, बाजप ने तेच केले असते पण कोर्टच्या दणक्याने तो प्रश्न निकालात निघाला.त्या वेळी एका प्रामाणिक प्रत्रकारची हत्या होऊनही कधी लोकसत्ताने ना मीडिया त्या बाबत आवाज उठवला ना गुरमीत सिंगचे नाव घेतले असे कधी आठवतहि नाही त्या मुळे आखाडा काय किंवा काँगेस किंवा बाजप काय किंवा लोकसत्ता काय सर्वजण आपआपल्या लाभचे पाहतात.
   Reply
   1. J
    JITENDRA
    Sep 12, 2017 at 10:30 pm
    मस्त विनोदजी !!
    Reply
    1. A
     AM
     Sep 12, 2017 at 6:55 pm
     फक्त राजकारण्यांना दोष देण्या पेक्षा तुम्ही सुद्धा पतंजली च्या जाहिराती वर पाणी सोडा , नाही तर आश्रय देणाऱ्या राजकारण्या इतकेच तुम्ही पण जबाबदार आहात...... बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले... हेही संत वचनच आहे......
     Reply
     1. S
      sarvan
      Sep 12, 2017 at 6:08 pm
      "अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राष्ट्रीय पातळीवर मंजूर करवून घेणे, हे भोंदूबाबांची यादी जाहीर करण्यापेक्षा दूरगामी आणि कायमस्वरूपी ठरेल " ...........अतिशय योग्य विचार पण हे मर्कट छाप भक्तांना आणि त्यांच्या गाय छाप सरकारला कळेल काय ?
      Reply
      1. विनोद
       Sep 12, 2017 at 5:54 pm
       unison, हास्यास्पद व्यक्तीची दखल घेतल्याबद्दल आभार ! तुम्हाला माझी प्रतिक्रीया झाेंबावी हाच माझा उद्देश हाेता. दुसर्यांना अपशब्द वापरताना तुम्हाला विकृत आनंद हाेताे. आणी तुम्हा भक्तांच्या कंपूला अपशब्द वापरल्यावर तुमच्या ढुंगणाला मिरच्या झाेंबतात.
       Reply
       1. U
        Unison
        Sep 12, 2017 at 4:45 pm
        विनोद काय हास्यास्पद व्यक्ती आहे...lolwa
        Reply
        1. A
         AS
         Sep 12, 2017 at 4:35 pm
         असंतांचे संत अग्रलेख मागे घेतला होता ह्याच माकडाने....काय ह्याची निर्भीडता.
         Reply
         1. D
          DINESH D.
          Sep 12, 2017 at 3:51 pm
          एक मात्र खरे.... नेहमीच्या प्रतिक्रिया वाचून हे शपष्ट झाली कि काही लोक हे भाडोत्री पद्धतीने प्रतिक्रिया देतात. आज संपादकाने छान लेख लिहला त्यांचे मनापासून अभिनंदन
          Reply
          1. V
           vishal
           Sep 12, 2017 at 3:50 pm
           हे सगळं सोडा आणि तुमच्या लाडक्या राहुल बाबांचे चमत्कार ऐका... सीबीआय, कोर्ट आणि आखाडा परिषद काय ते बघून घेतील.. तुमची फालतू लुडबुड नकोय.. उद्याचा हग्रलेख राहुल बाबावर लिहिलात तर परवा पासून नीट अग्रलेख म्हणेन मी... बघू तुमची हिम्मत!
           Reply
           1. R
            Raj
            Sep 12, 2017 at 3:18 pm
            भोंदूबाबांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही बाबांचे नाव नाही ! कमाल आहे !!! पुरोगामी (?) म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बाबांच्या उपस्थितीत होतो !!! अंधश्रद्धा (?) निर्मूलन कायदा "तत्वतः" अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील कुठल्या बाबांवर आजपर्यंत कारवाई झाल्याचे दिसत नाही. बहुधा सगळ्या बाबांचा "अभ्यास" सरकारी पातळीवर सुरु असेल ! बंगाली बाबा की जय !
            Reply
            1. V
             VIVEK V MANGOLI
             Sep 12, 2017 at 2:47 pm
             आखाडा परिषदेने आपले मत परखडपणे मांडले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावयाचे सोडून त्यांच्यावरच शरसंधान. अजब तर्कट. कदाचित परखडपणा ही फक्त संपादकाची मक्तेदारी असावी. यापेक्षा जास्त काय लिहावे.
             Reply
             1. H
              Hemant Purushottam
              Sep 12, 2017 at 1:36 pm
              संतपीठावरील व्यक्तीने लोकांची फसवणुक करणे किंवा गुन्हेगारी कृत्ये करणे मान्य होणे शक्य नाही. हिंदू आचारसरणीतही फसवणुकीला स्थान नाही. आखाडा परिषदेने काही व्यक्तींची नावे 'भोंदू' म्हणुन जाहिर करताच समाजात आपआपल्या परिने भोंदूगिरी करणारे व हिंदू विचारसरणीला झोडपण्याची संधी शोधणारे पोटात गुदगुल्या झाल्याने कदाचित गुदगुल्यांनी बेचैन झाले असतील. अग्रलेखाचा रोख असा की ज्यांनी कोणी या 'बाबांचे' दर्शन घेतले असेल ते सारेच दोषी आहेत. सध्या पत्रकारीतेतही भोंदूगिरी बळावली आहे. हिंदू संस्कृती व हिंदू संत यांच्यावर टीका करणारी व्यक्ती लगेच 'ज्येष्ठ विचारवंत' , 'गाढे अभ्यासक' याप्रमाणे प्रोजेक्ट केली जाते. अन्य धर्मीयांमध्येही त्या-त्या धर्मातील मुखंड अनेकदा गैरकृत्ये करतात पण केवळ हिंदू संस्कृतीची कुचाळकी करण्यात धन्यता मानली जाते. विचारवंत व अभ्यासक यांच्यासमोर तर सर्व समान असावयास हवे पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. त्यामुळे हिंदू संस्कृती विरोधात ज्यावेळी लिहील्या जाते त्यावेळी हेतुबाबत शंका येते. अनैतीकांची नैतीकता अशा अनेक प्रसंगातुन जाणवते त्यात लिहीलेले मागे घेणे, अंदाज चुकणे इ समाविष्ट आहे.
              Reply
              1. U
               Ulhas
               Sep 12, 2017 at 12:51 pm
               सर्व बऱ्यावाईट बाबींसाठी (अपत्यप्राप्ती सोडून) सरकारकडे बोट दाखवण्याची सवय सर्वाना जडली आहे. जसे फेरीवाले हा विषय सतत चर्चेत असतो. फुटपाथ, पूल इत्यादी ठिकाणी बसणारे फेरीवाले आणि त्यांची दंडेली ह्यावर बोलताना सरकारी बाबू त्यांच्यावर कारवाई करत नाही (भ्रष्टाचार वगैरे) चर्चा तावातावाने होतात. अहो पण त्यांच्याकडून तडाखेबंद खरेदी करून त्यांच्या धंद्याला बरकत आणणारे कोण? ह्या दंडेली करणाऱ्या फेरीवाल्यांकडून जर महिनाभर काही विकत घेतले नाही तर प्रश्न मुळातच सुटणार नाही का? आम्हाला सोयी आणि अधिकार हवेत. थोडेसे कष्ट, गैरसोय सोसण्याची तयारी, शिस्त पाळणे हे नको. बाबा/बुवा ह्यांना मोठे करणारी जनताच असते आणि ते मोठे झाले कि मग सत्तेचे मुंगळे त्यांना लागतात.
               Reply
               1. U
                umesh
                Sep 12, 2017 at 12:17 pm
                संपादकीयात दम नाही कारण केलेले युक्तिवाद बिनतोड असले तरी भाजप मोदी आणि ट्रंपविरोधात लिहिताना लेखणीला जो धारदार कुजकटपणा असतो तो नाही रेयान इंटरनॅशनल शाळेतील प्रकाराबाबत देशभर गदारोळ उठलेला असताना त्या भयंकर प्रकरणाची दखल संपादकीयातून घ्यावी वाटली नाही ख्रिश्चन धर्माचा भडका उडण्याची भीती वाटली असणार शिवाय ख्रिश्चन भडकले तर लाखांचा मोर्चा महाप्याला यायची शक्यता म्हणून आपले सॉफ्ट टार्गेट निवडले हिंदू धर्माला शिव्या घालणे कोणत्याही धर्मातील म्होरक्यांनी असं पाऊल उचललेलं नाही त्याचे स्वागत तोंडदेखलं करणे तर दूरच उलट त्यांनाच कुजकट टोमणे मारायला तयार
                Reply
                1. C
                 Chintamani Chitnis
                 Sep 12, 2017 at 12:05 pm
                 या जमान्यात जे बाबा आहेत त्या सगळ्याची चौकशी का होऊ नये? त्या सगळ्या बाबानी त्यांच्या कडे असलेल्या पैशांची माहिती जाहीर करावी. कायद्यांनी हे करणे शक्य आहे का?
                 Reply
                 1. विनोद
                  Sep 12, 2017 at 12:00 pm
                  कालच्या एका प्रतिक्रीयेत बापट एका लेखकाला (कांचा इल्लया) 'नीच' म्हणतात. एवढी हिन टिका एखादी नीच व्यक्तीच करू शकते. कालची बापटची प्रतिक्रीया वाचून उद्वेगाने त्याचा मी 'हलकट बापट' असा उल्लेख करून प्रतिक्रीया दिली हाेती जी लाेकसत्ताने छापली नाही. परंतु या नराधमास हे शब्दही ताेकडे पडतील एवढी याची विचारसरणी हिन दर्जाची आणी हिणकस आहे. हिंदुत्वाचा खा पांघरून स्वजातीचा स्वार्थ साधण्यासाठी यांनी इतिहासातही कपट-कारस्थाने केली आणी वर्तमानातही तेच करत आहेत.
                  Reply
                  1. S
                   Shriram Bapat
                   Sep 12, 2017 at 11:07 am
                   भोंदू म्हणजे काय रे भाऊ ? भोंदू म्हणजे लबाड, खोटे. भोंदू बाबा म्हणजे काय रे भाऊ ? असे लबाड,खोटे वर्तन करतात ती माणसे. भोंदूंचा आखाडा म्हणजे काय रे भाऊ ? जिथे हे भोंदूबाबा राहतात, भेटतात तो भोंदूंचा आखाडा. एखाद्या माणसाने एका ऍफिडेव्हिटची दोन ऍफिडेव्हिट बनवण्याचा चमत्कार केला तर तो कोण रे भाऊ ? तो भोंदू बाबा. एखाद्या बाबाने कृती स्वतः केली आणि त्यासाठी करोडोंची माया त्याच्या मुलाच्या खात्यात जमा झाली तर तो कोण रे भाऊ ? तो नक्कीच भोंदू बाबा. तो बाबा 'नसलेला भगवा दहशतवाद' तयार करत असेल तर तो कोण रे भाऊ ? तो सफेद लुंगीतला निर्ढावलेला भोंदू बाबा. या भोंदू बाबांचे लिखाण आणि विचार समोरच्या बाकावरून भोंदू-विरोधी अग्रलेखाच्या मांडीला मांडी लावून समोर येत असल्याचे दिसत असेल तर ते काय रे भाऊ ? तो त्या दोघांचा इब्लिसपणा. आता समजले भाऊ...तो तर चिडूबाबा आणि त्याचा आखाडा म्हणजे लोकसत्ताचे अग्रलेखाचे पान. चला आपण भजन करूया. 'चिडूबाबा ,चिडूबाबा, एक्सप्रेस टॉवर तुमचा ढाबा. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकता छान , सर्व ढोंगी बाबात तुम्हीच महान. बोला चिडूबाबाकी जय !
                   Reply
                   1. A
                    Aamod Natu
                    Sep 12, 2017 at 10:58 am
                    खूप छान अग्रलेख. संपादकांचे अभिनंदन. खरंच आहे. परंतु विचार करण्याची गोष्ट हि आहे कि हा आखाडा, ही बाबा मंडळी या सगळ्यांना मोठे कोण करता हे सुद्धा तितुकेच महत्वाचे आहे. मुळात तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ऐसे कैसे झाले भोंदू?, तर त्याचे उत्तर आम्ही जनता त्यांचे अंध अनुकरण करतो असेच द्यावे लागेल. प्रत्येक वेळी सत्ताधारी किंवा विरोधी यांना जबाबदार धरता येणार नाही. मुळात कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा देवाचा प्रचार हा जो पर्यंत स्वतःच्या शोध करता आणि इतरांच्या भल्याकरता होत नाही तोपर्यंत हे अशा बाबांचे चरायचे कुरण असेच फोफावत राहणार. डोळस भक्ती करायला जनतेने शिकले पाहिजे. त्याच बरोबर हे सुद्धा येथे मान्य करायला लागेल की, संपादक महोदय या विषयाबद्दल त्यांचे निर्भीड मत मांडू शकले कारण हे बाबा ज्या धर्माचे व पंथाचे आहेत तो समाज अजूनही िष्णू व इतरांचेही विचार ऐकणारा आहे. जरी अशा बाबांनी कितीही विद्वेषाचा प्रसार केला तरीही. जर संपादक महोदयांना खरोखरीच आसूड ओढायचा असेल तर सर्वधर्मीय भोंदू बाबांवर ओढला पाहिजे असे वाटते. पुढचा या बाबतीतला अग्रलेख अधिक सर्वधर्मसमावेशक असावा हि अपेक्षा.
                    Reply
                    1. N
                     Nitin
                     Sep 12, 2017 at 10:45 am
                     कुबेर ने सगळी मळमळ ओकली येथे, ा आखाडा परिषदेने काही भोंदू चा निषेध केला यात काही वावगे वाटत नाही.. आणि हे ते कधी करू शकतात? जेव्हा कायद्याने ते सिद्ध झाले तर.. याचा अर्थ ते कोणताही कायदा हातात घेत नाही... मग हा निर्बुद्ध कुबेर का बोंब मारतो कि ह्या लोकांना कोणी सर्टिफिकेट द्यायला सांगितले.. ते लोक कायद्याचा सम्मान करून ह्या लोकांना धर्म बाह्य करताहेत.. आधी केले असते तर ते घटनेला धरून नसते. दूर उभे राहून नपुसंक आरडा ओरडा करायचा, उद्या वेळ आली तर चटकन कणी कापायची असे वर्तन असलेली लोकसत्तासारखी माध्यमे ही खरी तर जास्त भोंदू आहेत असे म्हणावे लागेल. आश्रम, भगवी वस्त्रे यामुळे आम्ही बाबांपासून आपोआपच दूर राहतो. पतंजलीची उत्पादने अन्य कॉस्मेटिक कंपन्यांच्या उत् प्रमाणे खरेदी करतो. जी आवडतात ती पुन्हा खरेदी करतो. आम्हाला त्यात कोठेही बनावटगिरी आढळलेली नाही. किमती सुद्धा अन्य कंपन्यांच्या इतक्या किंवा कमी आहेत. पण लोकसत्तामध्ये आम्हाला छुपी भोंदूगिरी आढळते.उदाहरणार्थ वास्तू शास्त्रावरचे लेख, वास्तुशास्त्र (?) तज्ज्ञांच्या जाहिराती, उघड जातीवाचक उल्लेख असलेल्या लग्नाच्या जाहिराती
                     Reply
                     1. V
                      vivek
                      Sep 12, 2017 at 10:39 am
                      इतर वृत्तपत्रांसारखी कुडमुडी बोटचेपी भूमिका न घेता परखड अन कणखर भूमिका घेणाऱ्या लोकसत्ताचे अभिनंदन. बाकी ज्यांना एकाच चष्म्यातून पाहायची सवय झालीय त्यांना ती रुचणार नाही.
                      Reply
                      1. Load More Comments