23 September 2017

News Flash

कणखर की आडमुठे?

मोदी सरकारच्या धोरणामुळे तेथे पुन्हा गोंधळ सुरू झाला..

लोकसत्ता टीम | Updated: May 4, 2017 3:10 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वाजपेयी व नंतर मनमोहन सिंग सरकारने सर्व गटांशी चर्चा सुरू ठेवल्याने १५ वष्रे काश्मीर शांत होते. मोदी सरकारच्या धोरणामुळे तेथे पुन्हा गोंधळ सुरू झाला..

जम्मू काश्मिरातील परिस्थिती अत्यंत विदारक आहे. तेथील तरुणांच्या मनात भारत सरकारविषयी कमालीची निराशा साचली असून सरकार आपली हिंदू मतपेढी दुखावेल या भीतीने काश्मिरींशी चर्चा करणे टाळत आहे, असे ए एस दुलत यांना वाटते. ते कोणी सरकारविरोधी नाहीत की त्यांची संभावना काँग्रेसी दलाल म्हणून करता येईल असेही नाहीत. ते रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग, म्हणजे रॉ या आपल्या गुप्तहेर यंत्रणेचे माजी प्रमुख आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्या सरकारचे काश्मीरविषयक सल्लागार होते. आधी वाजपेयी आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात काश्मिरातील धुम्मस विझली आणि जनजीवन पूर्वपदावर आले. त्याचे मोठे श्रेय या दुलत यांच्या धोरणांस जाते. त्यांची या संदर्भातील मते आजच्या अंकात अन्यत्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुलाखतीतून जाणून घेता येतील. हे इतके नमूद करावयाचे कारण दुलत यांचा या विषयावरील अधिकार अधोरेखित व्हावा. अलीकडे सरकारचा टीकाकार म्हणजे थेट काँग्रेसचा बगलबच्चा वा पाकिस्तानी हस्तक असे मानावयाची प्रथा रूढ झाली असल्याने वरील तपशील देणे आवश्यक ठरते. असो. जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानने केलेल्या घृणास्पद कृत्याच्या पाश्र्वभूमीवर ही मुलाखत वाचायला हवी. मृत सनिकांच्या देहांची विटंबना करण्याच्या या हीन कृत्यामुळे उभय देशांत पुन्हा निर्माण झालेला तणाव लक्षात घेता आपले जम्मू काश्मिरात नेमके काय चुकते हे दुलत यांनी केलेल्या विवेचनातून समजून घेता येईल. ते समजून घ्यावयाचे याचे कारण जम्मू काश्मीरकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणूनच पाहण्याचा निर्बुद्धपणा आपल्यातील बहुसंख्यांकडून सातत्याने केला जात असून त्यावर काही अतिशहाणे ‘राज्य लष्कराच्या हाती द्या, क्षणांत सर्वत्र शांतता पसरेल’, असाही उपदेश करताना दिसतात.

हे सर्व मूर्खाच्या नंदनवनातील रहिवासी. इस्रायल त्यांचा आदर्श. त्या देशाने पॅलेस्टाइन प्रश्नाची ज्या पद्धतीने हाताळणी केली तशीच आपण करावयास हवी, असे त्यांना वाटते. असे वाटणे हाच सत्यापलाप. कारण लष्करी मार्ग हाच हमखास जालीम इलाज असता तर आज इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा प्रश्न सुटलेला असता. तसे झालेले नाही. तेव्हा लष्कर हा मुलकी समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे. आणि जम्मू काश्मीरसंदर्भात दुसरे असे की हे लष्कर हाच तर मोठा रागाचा विषय आहे. तेव्हा जे आजाराचे लक्षण आहे तोच त्या आजारावरचा उतारा होऊ शकत नाही. ज्या वेळी शालेय वा महाविद्यालयीन तरुणी जिवाची पर्वा न करता हातात दगड, विटा घेऊन रस्त्यावर येतात तेव्हा त्यातून व्यक्त होणारा संताप हा गणवेशाविरोधात नसतो. तर राजकीय नेतृत्वाच्या अपयशाविरोधातील संतापाचा तो उद्रेक असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. जम्मू काश्मीरबाबत हे नेतृत्व केवळ स्थानिक नाही. ते केंद्रीय आहे. कारण त्या राज्याच्या कारभाराचे नियंत्रण हे राज्याच्या राजधानीत नाही, तर दिल्लीत आहे. म्हणूनच त्या राज्यातील परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरणे क्रमप्राप्त ठरते. हे केंद्र सरकार राज्य सरकारला जुमानत नाही. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना किंमत देत नाही. स्थानिकांशी बोलणे म्हणजे फुटीरतावाद्यांना महत्त्व देणे असा त्याचा समज आहे आणि इस्लामी नेत्यांशी आपण चर्चा केली तर आपले िहदू पाठीराखे दुखावतील असे या सरकारला वाटते. परिणामी जम्मू काश्मीरची पूर्णपणे कोंडी झाली असून त्याच्याच विरोधातील अंगार हा आता रस्त्यावर सांडताना दिसतो. ही अशी कोंडी होण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांची घटनेतील अनुच्छेद ३७० बाबत अवास्तव भूमिका.

आपण सत्तेवर आलो तर हे अनुच्छेद रद्दच करू, अशा वल्गना सत्ताधारी भाजपने वारंवार केल्या. हे पाकिस्तानचा प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवू असे म्हणण्यासारखेच. तालमीत घुमणाऱ्या पलवानास जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दंडातील बेटकुळ्यांत आहे असे वाटत असते, तसेच इतकी वष्रे विरोधात असणाऱ्या भाजपला वाटत होते. याबाबत सन्माननीय अपवाद अर्थातच अटलबिहारी वाजपेयी यांचा. त्यांनी आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे वगरेची पर्वा न करता काश्मिरातील सर्वाशी बोलणे सुरू केले आणि नंतरच्या मनमोहन सिंग यांनी तीच परंपरा कायम राखली. त्यामुळे जवळपास १५ वष्रे काश्मीर शांत होते. २०१४ साली पुन्हा गोंधळ सुरू झाला. याचे कारण मोदी सरकारचे काश्मीरविषयक धोरण. हुरियतशी आपण चर्चा करायची की करायची नाही, पाकिस्तानला मध्ये घ्यायचे की नाही, स्थानिक नेत्यांना महत्त्व द्यायचे की नाही अशा सर्वच मुद्दय़ांवर हे सरकार पूर्णपणे गोंधळलेले असून त्याचीच परिणती त्यामुळे अखेर स्थानिकांच्या उद्रेकांत होताना दिसते. असे होणे नसíगक म्हणता येईल. कारण सरकारी निष्क्रियतेमुळे काश्मीरवासीयांना सरकार आपल्याविषयी उदासीन आहे, असे वाटू लागले आहे आणि ही भावना अनेकांनी वारंवार व्यक्त केली आहे. आपल्याकडे आसपासचे दुर्लक्ष करीत आहेत असे एखाद्यास वाटत असताना कोणा दूरच्याने त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली तरी तो अशा व्यक्तीस आपलासा वाटू लागतो. जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तान नेमके हेच करीत आहे. भारत सरकार कोणाशी बोलावयास तयार नसताना सक्रिय मदत करणारा पाकिस्तान हा काश्मिरींना जवळचा वाटू लागला तर त्यात आश्चर्य ते काय? तेव्हा अशा वातावरणात टुरिझम की टेररिझम हे असले बालिश प्रश्न विचारून त्यांच्या भावनांशी खेळणे टाळायला हवे होते. ते भान आपल्याला राहिले नाही आणि त्या राज्यातील प्रत्येक नागरिक जणू दहशतवादी वा दहशतवाद्यांना सहानुभूती देणारा आहे, असा समज आपले राज्यकत्रे करून देत राहिले. त्यातूनच काश्मीरची परिस्थिती कमालीची चिघळली. या सगळ्यातून आणखी एक मोठा धोका संभवतो, त्याची आपणास जाणीवच नाही.

तो धोका म्हणजे जम्मू काश्मीर समस्येच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा. २४ तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या माध्यमांच्या काळात जम्मू काश्मीर हा बातम्यांचा मोठा पुरवठादार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. गेल्या आठवडय़ात दगडफेक करणाऱ्या कोवळ्या मुलींचे छायाचित्र जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी प्रसृत केले आणि काश्मिरातील परिस्थिती किती हाताबाहेर जात आहे, त्यावर भाष्य केले. पाकिस्तानला नेमके हेच हवे आहे. या प्रश्नाचे जितके जास्त आंतरराष्ट्रीयीकरण होईल तितके ते पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारे असेल. तेव्हा काहीही संबंध नसताना टर्कीचे अध्यक्ष एर्दोगान भारतात येऊन काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देतात तेव्हा त्यामागील हा उद्देश आपल्या लक्षात यायला हवा. जम्मू काश्मीरचे हे आंतरराष्ट्रीयीकरण भारताच्या लोकशाही दाव्यांवर अविश्वास दाखवणारे असेल हेदेखील आपण लक्षात घेतलेले बरे. तेव्हा या प्रश्नावर आपले सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवते, पण आपल्या काश्मिरींशी मात्र बोलण्यास नकार देते हे चित्र आपल्याविषयी काही बरे सांगणारे नाही.

कणखरपणा हा गुण खराच. पण तो कोठे आणि किती दाखवायचा याचे भान असावे लागते. ते नसलेल्यांस आडमुठे म्हणतात. लवकरच पावले उचलली नाहीत तर आपले सरकार या विशेषणास पात्र ठरेल.

First Published on May 4, 2017 3:10 am

Web Title: atal bihari vajpayee manmohan singh narendra modi kashmir conflict
 1. U
  umesh
  May 8, 2017 at 5:01 pm
  एकूण काय तर कश्मिरी फुटीरतावाद्यांच्या दाढ्या कुरवाळा म्हणजे कश्मीरात सारे आलबेल बाकी यास विरोध करणारे निर्बुद्घ इतकी निर्बुद्ध मांडणी तर विकृत केतकरनीही कधी केली नव्हती वाजपेयी फक्त गोडबोले होते सर्वांशी चांगले राहून आपला मतलब साध्य करणारे अत्यंत चालू पंतप्रधान होते कॉंग्रेसच्या गळ्यात गळे घालत असल्याने संपादकांना त्यांच्या पायाचे तीर्थ घ्यावे वाटणारच
  Reply
  1. A
   abhay
   May 6, 2017 at 10:14 am
   हे जे कोण दुलत आहेत त्याना एक प्रश्न विचारावासा वाटतो १५ वर्षे काश्मीर शांत होते तर मग काश्मीर प्रश्न सुटला नव्हता का ? का अचानक मोदी सत्तेत आल्यावर तो पुन्हा का इतका वाढला ? जखम वर वर बरी झाली वाटली तरी आता जा चिघळत असेल तर हायर डोस घ्यावा लागतो मगच ती बरी होते . काश्मीर प्रश्न मुळातूनच सोडवावा लागेल . त्याकरिता संपूर्ण काश्मीर एकत्र करून तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेता येतीळ . आपण आता फक्त भारत व्याप्त काश्मीर बद्दल बोलत आहे . पाकव्याप्त काश्मीर अजून पाकिस्तान मध्ये आहे. तिथे सर्व आलबेल आहे का ? मुळात काश्मीर प्रश्न अतिविद्वान लोकांनी निर्माण केला आहे .
   Reply
   1. D
    Deepak Shrivastav
    May 5, 2017 at 10:32 pm
    Aapala Agralekh suddha changalach Kankhar Aahe. Manapasun Swagat. Aaple vichar satat asech kankhar aani nishapakshpati rahot. Deepak Shrivastav Niphad Nashik 7507817999
    Reply
    1. G
     ganesh mughale
     May 5, 2017 at 2:59 pm
     Bhartatil itar rajyat kothehi kunihi tiranga petwila nahi,fakt kashmir madhech ase ghadte. asntosh bakicya thikanihi asto mhanun koni stanshi salgi karat nahi. Murhala shavanpanacya ghosti kalat nahit.
     Reply
     1. S
      Susheel
      May 5, 2017 at 2:22 pm
      You suggesting that we should continue to discuss. Can you list few achievements in last so many years by holding discussions? If you are saying that the discussions ensured that there is no violence in the valley, can you substantiate?
      Reply
      1. H
       Hemant Kadre
       May 4, 2017 at 10:40 pm
       जवाहरलाल नेहरू यांना काश्मीर प्रश्नाचे आकलन नीट न झाल्याने त्यांनी सर्वप्रथम काश्मीरचा विचका केला. आजचा पाकव्याप्त काश्मीर भारतीय सैन्य जिंकण्याच्या स्थितीत असतांना काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याचे नेहरूंचे धोरण आजही अनाकलनीय वाटते. शेख अब्दुल्ला देशद्रोहाचे फुत्कार काढीत असतांना नेहरूंनी त्यांना पाठीशी का घातले हे देखील एक कोडेच आहे. काश्मीरी पंडितांची दिवसाढवळ्या हत्या करून त्यांना विस्थापीत करण्यात आले तेंव्हाही त्यावेळचे केंद्रातील काँग्रेस सरकार मुग गिळुन बसले होते.काश्मीर खोऱ्यात एकही हिंदू उरला नाही तेंव्हा काश्मीरचा प्रश्न अधीक जटील बनला. केंद्र सरकारचा काश्मीरात खर्च होणारा पैसा जातो कुठे हा एक वेगळाच मुद्दा आहे. दहशतवाद संपवायचा असेल तर आ न देत न बसता वाघनखे पोटात घुसवावी लागतात असे इतिहास सांगतो. ३७० वे कलम रद्द झाल्यास भारतीयांना काश्मीरात जमीन खरेदी करता येइल, घरे बांधता येतील, कारखाने उभारता येतील. समजुतीच्या गोष्टी सांगणे खूप झाले आता बंदुकीचीच भाषा बोलण्याची वेळ आली आहे. लोकसत्ताकारांना देशहितापेक्षा मोदींवरची टीका महत्वाची वाटते हे दुर्दैव आहे.
       Reply
       1. S
        Shrikant Yashavant Mahajan
        May 4, 2017 at 8:56 pm
        Success has many fathers but failure is always attributed to the concerned, like a crying baby is kept with its mother. Needless to say, Kashmir violence is seasonal - different in winter & summer. Muslims are always unpredictable- they are neither happy Noe make others happy despite even 100 majority. History tells us that Mogul prince always killed his brothers to succeed after death of his King father.
        Reply
        1. S
         Shrikant Yashavant Mahajan
         May 4, 2017 at 8:44 pm
         Success has many fathers but failure is like a crying baby always with mother. Why you media people try to break the ice with constructive suggestion- write to PM directly on his blog, in confidence. Terrorism in Kashmir is seasonal- winter & summer are respectively peaceful & troublesome.
         Reply
         1. U
          uday
          May 4, 2017 at 7:14 pm
          Modi ji, let Mr. Girish Kuber be made Rajyapal of Jammu & Kashmir. You will see the problem of Jammu & Kashmir will end within seconds. Mr. Kuber speaks just like Uddav Thakare - sitting in A.C. and writting on any subject in world giving only advice. Last so many years, discussion with all people in J & K is going on fruitlessly and still Kuber is advising to continue the discussion. J & K is not Istrael & Palestine. Let Military take the charge of J & K and military according to its rule will end the problem and nobody need to feel sorry about it. Now everybody feels, for how many more years - This J & K problem - the other people of India should face ?
          Reply
          1. M
           milind
           May 4, 2017 at 6:50 pm
           Shi kay murkha lekh aahe? 60 varsha charchach kelit na? kay ukhadalet? Tevha muslim matapeddhi vachvalyla kahi kayade lagu kele nahit mag kay honar. Dagad marale , aag lavali tari kahi shiksha nahi pan pelete gun var matra bandi...aase kele tar ka arajak honar nahi. Tevha aapale balish vichar pappu netyanna ikava aamhala murkha naka banavu lekh lihun
           Reply
           1. D
            DINESH D.
            May 4, 2017 at 4:00 pm
            sarkar kashmir prashnavar purnpne gondhalalele aahe he parrikaranni vyakt kelelya vidhanavarun adhich spasht zalele aahe. shivay aata adhi kelelya vinakarnchya badhai chya addverti t anglat yet aahe. BJP kade kashmir sathi dhoran nahich he ajparyant chya vagnukivarun dhaldhalitpane disun yet aahe. BJP SAMARTHAK fakt virodhat bolnaryanna shivya deu shakatat pn mandlelya prashnna na uattare nahiit. jithe ADAAT NAHI HE POHARYAT YENAR KUTHUN....
            Reply
            1. V
             Vinayak
             May 4, 2017 at 3:41 pm
             Vajpeyi ani Manmohan Singh yani 15 varshe charcha keli mhanun Kashmir shant rahile?? Mag aaj parat bhadka udnyache kay karan? Charchemadhe ase kay 'tharte' jyamule dangekhor 'shant' hotat he hi sampadak sangtil kay?? Murkh sampadakiya badbad ya palikade ya lekhachi shunya kimmat aahe.
             Reply
             1. S
              saral
              May 4, 2017 at 3:35 pm
              मर्मावर बोट ठेवणारे विचार आणि हे सगळ्यांना पटेलच असे नाही पण दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही असेच सांगितले आहे.
              Reply
              1. H
               harshad
               May 4, 2017 at 3:21 pm
               हा काय प्रकार आहे? मी कंमेंट्स पोस्ट केल्यावर दिसतात पण थोड्यावेळाने माझे कंमेंट्स काढून टाकले जातात.
               Reply
               1. Y
                yogesh
                May 4, 2017 at 2:14 pm
                गेली ४०-४५ वर्ष लष्कर तेथे आहे,काश्मिरी पंंडीत कुठे गेले हे कुणी पाहीलका? मतासाठी काश्मिर फुटीरवादी गटाशी चर्चा का केली ? पाकीस्तानच्या गोळ्या खायला २३वर्षाचा जवान पाठविण्या ऐवजी स्वतःःच्या मुलांंना का पाठवित नाही? अजुन किती जवान देशा साठी हवे आहेत? काॅॅग्रेसने स्वतःःचे वाटोळे करत देशाचेही वाटोळे केले.५वर्षात ६५वर्षात झालेले नुकसान भरून येणार नाही.
                Reply
                1. V
                 Vijay Shingote
                 May 4, 2017 at 1:54 pm
                 Modi devotee can not understand about article. Every problem can not be solved on gun point. Modi proved to be useless in such scenario. Matured leadership is required to solve problem.
                 Reply
                 1. A
                  AMIT
                  May 4, 2017 at 1:46 pm
                  बापट साहेब, आपले सरकार ज्यांच्या दंगलखोर उचापतींमुळे सत्तेत आले , त्यांनाच दूर ठेवायची भाषा बोलताहेत. याला मराठीमध्ये काय बरे म्हणत असावेत? - कृतघ्नपणा का?
                  Reply
                  1. K
                   Koustubh
                   May 4, 2017 at 1:10 pm
                   sampadak saheb matra aadmuthe!!
                   Reply
                   1. M
                    manoj
                    May 4, 2017 at 12:49 pm
                    2010 ch voilance kuni kela hota......te pan sanga modi ni ka?.... hyach modi chya kalat highest voting percentage ni election zale... te soyiskar pane visarlat...... khari karne sodun dusryala dosh det basu naka...... kashmir one dimensional prashn nahi.... charcha karun sodvta al ast tar ata paryant ka nahi sutla 70 varsh zali..... teva tar modi navate.... n bjp hi.... tumchya sarkhya andh virodhkani ha prashn vadhvun thevlay......
                    Reply
                    1. K
                     Koustubh
                     May 4, 2017 at 12:36 pm
                     15 varsh shantata hoti ki shantatecha aabhas hota sampadak saheb?? Jar 15 varsh kashmir shant asla asta tar lagech toch shant kashmir 2-3 varshant yevdha ashant kasa kai hoto? karan jar mans 15 varsh shant astil tar ti shantata tyachya aat madhe bimbali geli asel na? mag lagech hi shantata sodun ashantata(Bomb,Riots,Guns etc.) lagech patkartat kashi te? Ka ti shantata shantata navtich muli? Dhong hot shantatech? dikhava hota? ani aat madeh vishari karvaya suruch hotya? Ani aata kondi zalyane tras houn kela gelela aakrosh aahe? Mur samjavn sop ahe saheb pn shanpanach dhong gheun murkh agralekh lihnaryanch kai karaych?
                     Reply
                     1. R
                      rmmishra
                      May 4, 2017 at 11:33 am
                      सध्याचे भारत सरकार हे अति शहान्यान्चे सरकार आहे, हे सर्व स्वतः ला तोपचन्द समजतात, एकान्गि धोरनामुले यान्ना समस्येच्या इतर बाजु दिसतच नाही, साध्या कागदाला सुद्धा दोन बाजु असतात, पन या मुर्खान्ना एकच बाजु दिसते। या मूर्खान्मुले काश्मीरचि समस्या कठिन होउन बसलि आहे, मुर्खान्ना निवडुन दिल्यावर दुसरे काय होनार?
                      Reply
                      1. Load More Comments