23 September 2017

News Flash

‘कुमार’संभव

अस्पृश्यता आणि जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.

लोकसत्ता टीम | Updated: May 10, 2017 2:02 AM

आयसीएसएसआरया प्रतिष्ठित संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या कुमार यांची याआधीची मते कोठे जाणारी आहेत?

नरेंद्र मोदी हे असहिष्णुतेचा सर्वात मोठा बळी आहेत आणि ते देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, आपल्या देशात अस्पृश्यतेचा आणि जातव्यवस्थेचा प्रादुर्भाव झाला तो अरब, तुर्क आणि मोगलांच्या आक्रमणामुळे, मार्क्‍सवादी आणि पाश्चात्त्यधार्जिणे मेकॉलेवादी यांच्यामुळे भारताचे बौद्धिक अध:पतन झाले, दिल्लीस्थित जेएनयूतील विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे म्हणजे देशातील राष्ट्रभावना अशक्त करणे इत्यादी इत्यादी. ही आणि अशी मते वेळोवेळी मांडली आहेत ब्रजबिहारी कुमार यांनी. ते कोणी ऐरेगैरे नाहीत. आता भारत सरकार पुरस्कृत समाजविज्ञान संशोधन संस्थेचे नवनियुक्त प्रमुख आहेत हे कुमार. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुखदेव थोरात यांनी भूषविलेल्या पदावर अलीकडेच या कुमार यांची नेमणूक झाली. एकाच वेळी रसायनशास्त्र आणि हिंदी आणि मानववंशशास्त्र अशा क्षेत्रांतील प्रावीण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि संस्कृतिसंवर्धनासाठी स्वत:ची ‘आस्था भारती’ ही स्वयंसेवी संस्था ते चालवतात. याच संस्थेतर्फे ‘डायलॉग’ हे इंग्रजी त्रमासिक काढले जाते. वर उद्धृत केलेली मते ही या त्रमासिकांतील संपादकीयांत कुमार यांच्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. ती संपादकीयांपर्यंत मर्यादित होती तोपर्यंत ती दखलपात्र नव्हती. परंतु कुमार आता अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च- आयसीएसएसआर- या संस्थेचे प्रमुख नेमले गेल्याने त्यांचा समाचार घेणे आवश्यक ठरते. यातील पहिल्या दोन मुद्दय़ांविषयी काही भाष्य करावयाची गरज नाही. ती लेखकाची मते आहेत आणि अन्य कोणाही व्यक्तीप्रमाणे हवी ती मते व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचा आदर राखावयास हवा. प्रश्न आहे तो अन्य मुद्दय़ांबाबत. कारण त्यात वस्तुस्थितीस सोडचिठ्ठी देण्यात आली असून हा सत्यापलाप खपवून घेतला तर या मंडळींचे धाष्टर्य़ अधिकच वाढण्याचा धोका संभवतो.

अस्पृश्यता आणि जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. धर्माच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेतून या व्यवस्थांचाही जन्म झाला, हे सत्य आहे. त्यासाठी भारतावर आक्रमण करणाऱ्या मोगल, तुर्क वा अरबांना बोल लावावयाचे काहीही कारण नाही. देशांतर्गत व्यवस्थेतील सामाजिक अपयशासाठी आपल्याकडच्या एतद्देशीयांतील एका वर्गाने परकीय आक्रमक तसेच इंग्रज यांना बोल लावण्याचा सोपा मार्ग पत्करलेला आहे. कुमार हे या मार्गाने निघालेले दिसतात. तसे केल्याने येथील धार्मिक मुखंडांना आपल्या धर्मातील कमअस्सलाची जबाबदारी घ्यावी लागत नाही. ती घ्यावयाची नसल्याने हे कच्चे दुवे सुधारण्याचाही प्रश्न येत नाही. जातव्यवस्था आणि अस्पृश्यतेसाठी आक्रमकांना दोष देऊन कुमार हेच करीत आहेत. ते स्वत:स मानववंशशास्त्राचे अभ्यासक म्हणवतात. परंतु त्यांच्या लेखी वर्ण, मनू आणि हिंदू धर्मातील रूढी यांना काहीही महत्त्व नाही. आपल्याकडे पहिले आक्रमण झाले ११ व्या शतकात. आधी गझनीचा महंमद आणि त्यानंतर शंभरभर वर्षांनी महंमद घोरी हे आपल्यावर चाल करून आले. इस्लामचा शिरकाव या प्रदेशात यामुळे झाला, हा इतिहास. पण त्याआधी या प्रदेशात हिंदू होते आणि त्यांची जातव्यवस्थाही होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णात या जाती विभागलेल्या होत्या. युरोपियन अभ्यासकांनी त्या वेळी केलेल्या नोंदींनुसार भारतात जातींची संख्या तीन हजार वा अधिक होती. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदूंतील वर्णव्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी करणारी मनुस्मृती ही या सगळ्यापेक्षा हजारभर वर्षे जुनी. काही अभ्यासकांच्या मते मनुस्मृतीचा काळ ख्रिस्तपूर्व. हिंदूंसाठीचे सामाजिक नियम म्हणजे मनुस्मृती, असे ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही मानले. त्यामुळे इतिहासाभ्यसकांचा एक सोयीस्कर वर्ग हिंदू धर्मातील जातीपातींसाठी ब्रिटिशांना बोल लावतो. ही धादांत लबाडी ठरते. कारण मुळात हे सर्व मनूने लिहून ठेवले होते. राजकीय सोयीसाठी इंग्रजांनी ते अमलात आणले आणि त्याच राजकीय सोयीसाठी कुमार यांच्यासारखे इंग्रजांना आज दोष देतात.

तशीच बाब मेकॉले आणि मार्क्‍सवादी वा पाश्चात्त्यप्रेमींना दोष देण्याची. ही भूमी महान होती, या भूमीने आर्यभट्ट दिला, जगास शून्य दिले, सुश्रुत, चरक आदी याच भूमीत निपजले आणि एकेकाळी येथे सोन्याचा धूर निघत होता वगैरे सर्व मुद्दे खरे असले तरी गेल्या दोन हजार वा अधिक वर्षांत ही भूमी मृतवत होती हेदेखील तितकेच खरे. कमालीची जातव्यवस्था, अत्यंत मागास विचारधारा आणि आधुनिक जगाचा वाराही लागलेला नसणे हे ब्रिटिशकालीन भारताचे प्राक्तन होते, हे मान्य करायला हवे. त्यामागील कारणे काहीही असोत. परंतु बव्हंशी ब्रिटिशकालीन भारत हा मागास होता. आयुर्वेदाचा जन्म या देशात झाला हे खरे. परंतु तरीही पटकी वा हगवणीच्या साथीने या देशात गावेच्या गावे नष्ट होत, हेही खरे. खगोलशास्त्र वा गणित या देशाने जगास दिले हे तर खरेच. परंतु त्याच वेळी आधुनिक नकाशे बनवण्याची अक्कल या देशवासीयांना नव्हती हेदेखील तितकेच खरे. या देशातील खगोलाभ्यासकांनी ध्रुव ताऱ्याचे अढळपण दाखवून दिले होते आणि त्याप्रमाणे मार्गक्रमणा करता येते हेदेखील सिद्ध केले होते, हे सत्यच. परंतु तरीही दर्यावर्दी वृत्ती दाखवून जग पादाक्रांत केले ते पोर्तुगीज, स्पॅनिश आदींनी, हेदेखील सत्य. वास्को द गामा वा कोलंबस जगाच्या मुशाफरीवर निघालेले असताना या देशातील हिंदू समुद्र ओलांडणे म्हणजे पाप अशीच कल्पना उराशी बाळगून होते, हे कसे नाकारणार? सध्याच्या काळात पुराणांतील आधुनिक विज्ञानाच्या खुणा टिपणाऱ्यांना पती-निधनानंतर पत्नीस केशवपन करावयास लावणाऱ्या बोडक्या प्रथा का कधी दिसल्या नाहीत? नवरा मेला म्हणून पत्नीस जिवंत जाळणाऱ्या या समाजाला आधुनिक बनवण्याचा पहिला प्रयत्न करणारे राजा राममोहन रॉय वा गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रेरणा काही वेद वा उपनिषदे नव्हती. ती होती इंग्रजी भाषेने दिलेली दृष्टी आणि ती देणारा होता थॉमस मेकॉले. या मेकॉलेने भारतात आणलेल्या इंग्रजीमुळे येथे केवळ सामाजिक सुधारणाच झाल्या असे नाही, तर नुसेरवान नामक पारसी भिक्षुकाच्या पोटी जन्मलेल्या जमशेट टाटा नामक पोरास पूजाअर्चा सोडून व्यापारउदीम सुरू करण्याची प्रेरणाही मिळाली. तेव्हा आपल्या अपयशासाठी ऊठसूट मेकॉलेच्या नावाने बोटे मोडण्यात काहीही शहाणपणा नाही. खरे तर याबद्दल लाज वाटावयास हवी. तात्या टोपे, झाशीची राणी आदींच्या बंडास दोन वर्षेही होत नाहीत तो हा मेकॉले ख्रिस्तवासी झाला होता. याचाच अर्थ सुमारे १६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या या व्यक्तीस आजच्या दुरवस्थेसाठी बोल लावणे हे बौद्धिक दारिद्रय़ाचे ठरते.

कुमार यांच्या लेखनातून या दारिद्रय़ाचा पदोपदी प्रत्यय येतो. एकीकडे देशाला आधुनिक करण्याच्या आणाभाका घ्यायच्या आणि त्याच वेळी आधी दीनानाथ बात्रा आणि आता हे असले कुमार यांना महत्त्वाच्या पदांवर बसवायचे यांत असलाच तर फक्त आणि फक्त विरोधाभासच आहे. इतिहासाचे पुनर्लेखन हे प्रत्येक सत्ताधाऱ्याचे ईप्सित असते हे मान्य. परंतु यातून इतिहासाचा नवीन अर्थ लावणे अभिप्रेत असते. आहे ते वास्तव नाकारणे वा नव्या वास्तवाचा शोध लावणे आणि सत्य दडपणे यात अनुस्यूत नसते. कुमार यांच्यासारखी मंडळी हा उद्योग करीत आहेत. तो तसाच सुरू राहिल्यास  त्या नवीन ‘कुमार’संभवातून जगास सत्ताधीशांचे वैचारिक दारिद्रय़च दिसेल.

 • देशांतर्गत व्यवस्थेतील सामाजिक अपयशासाठी आपल्याकडच्या एतद्देशीयांतील एका वर्गाने परकीय आक्रमक तसेच इंग्रज यांना बोल लावण्याचा सोपा मार्ग पत्करलेला आहे. सध्याच्या काळात पुराणांतील आधुनिक विज्ञानाच्या खुणा टिपणाऱ्यांना पती निधनानंतर पत्नीस केशवपन करावयास लावणाऱ्या बोडक्या प्रथा का कधी दिसल्या नाहीत?

First Published on May 10, 2017 1:41 am

Web Title: braj bihari kumar new icssr chief
 1. A
  Aniruddha Kulkarni
  May 12, 2017 at 12:47 pm
  अस्पृश्यता आणि जातव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. asprushyata khup pramanawar kami jhali ahe. Rural areanmadhe shikshanacha prasar vyavasthit jhalyas hunpan asprushyata pal kadhel. Jatvyavastha ajunpan ahe ani ti rahnarch... fakt hindu dharmatch nave tar saglya dharmanmadhe. ekch karan - Raajkaaran!! Adhicha jatinchi olakh hi baryach pramanawar aarakshanamul tikun asleli diste. Tevdh sampal ki jativyavasthela tade jaanarach.
  Reply
  1. D
   Dr. Ganesh Chaudhari
   May 11, 2017 at 5:22 pm
   स्मृती इराणी , दिनानाथ बात्रा , पहलाज निहलानी , सेठ रामदेव आणि गजेंद्र चौहान यांच्यानंतर मोदींचा भारत देशास अजून एक लखलखता नजराणा .....!!!!
   Reply
   1. S
    Sj
    May 11, 2017 at 11:49 am
    Bharatachi arthawyawasta 16 wya shataka paryant jagatil number 2 chi hoti. 23 takke wata apla hota. Jati vyawasta he profession hote Ani junya Kalat te khup flexible hote. Shudra he kshatriyachi kame karu shakat hota. Pragat arthawyawastet samajatil pratyek ghatakas Samruddhi kami jasta pramanat milat aste. Parkiya akramananni samaj dalmalit jhala Ani pratyek m fakta aplya swarthacha vichar karu lagla. Jati vyawastetil flexibility kami jhali Ani samajat fut padli. Britishachi sagli Kama tyanchya swarthacha Sathi hoti. Apla samaj sudharawa hi aplyatil lokanchich iccha hoti Ani tyatle barech uccha warniya hote.tyana saglyanchi saath labhli. ajahi one book one prophet a lel Dharma apaplyat bhandatana distat. Ani apan ethe apli bhandana kami karaycha prayatna kartoy. Tyancha wegle Dharma chalu Karun ata Tyanna Kahi upayog hotoy asa disat nahi.christian missionarinwar Dharma wachawanyachi wel Ali ahe ani hehe Bharat hech motha market ahe. Tyanni lokanna convert karu naye.
    Reply
    1. S
     Sharad Nikum
     May 11, 2017 at 9:18 am
     अतिशय समर्पक, विवेकशील लेख. भक्त मंडळी लेखाचा आशय न समजताच झुंडीने येऊन कॉंग्रेसी, धर्मविरोधी ठरवणार. नेमणुकांचा अधिकार आहे मग टिका का? असाही सुर आहे. जणु काही सरकारवर टिका करणे हे माध्यमांच्या अधिकारात येत नाही. काही लगेच हिंदु धर्मावरील टिका समजुन हत्यार चालवायला मोकळे. चक्क गांधीजींचा संदर्भ देऊन चातुर्वर्ण्याचीही मखलाशी. समाजविज्ञानाशी फारकत घेतलेल्याची नेमणुक समाजविज्ञान संस्थेच्या सर्वोच्च पदी होणे योग्य आहे काय? या प्रश्नाला मात्र हि झुंड बगल देते. संपादक साहेब विवेकपुर्ण लेखाची परंपरा अशा गदारोळात अशीच चालु ठेवा.
     Reply
     1. भक्ती
      May 11, 2017 at 5:47 am
      'अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकोनी असावे' असे समर्थ का म्हणतात ते समजले. इतका मोठा लेख लिहायला कुबेरांचा काय अभ्यास आहे? साधारण वाचन वेगळे आणि अभ्यास वेगळा..अशी अभ्यास नसलेली माणसे संपादक होतात हे दुर्दैव आहे..लोकसत्ता हे देशविरोधी, कॉंग्रेसप्रणित वृत्तपत्र आहे हे जाणवत होतंच.. आता स्पष्ट झालं. हिंदु धर्माला विरोध वगैरे केला अशी माझी तक्रार नसून या संपादकांचे उद्दिष्ट स्वच्छ नाही हे गेल्या काही काळात स्पष्ट झाले..त्यामुळे आता हे वृत्तपत्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही..
      Reply
      1. A
       Akshay Paitwar
       May 11, 2017 at 12:27 am
       Chela, pandya have expanded their kingdom beyond the ocean and the writer said crossing the sea was the indication of Bad omen, writer have shown that how good was the British ruler and their education but let me remind you the British rule was dangerous of all , writer said that English education have had bring revolution but from my point I view yes for some extent but actually our lacks the leadership and lacks the knowledge because all the educated were with the Britisher and education and were limited to uper cast, democracy, secularism , fraternity, freedom of right were all there in the period of Shivaji Maharaj, what about the people got killed in femine in the range of million during British rule, it's indian culture who is bring us together and look at the life style of westerners they live like a individulistic life. I don't think that every thing is bad about the Britishers but don't underestimate our people and culture, they bring education for their own interest not for u
       Reply
       1. L
        Lokapure C
        May 10, 2017 at 11:32 pm
        What is new in this article. And why are the Nationalist , Patriotic people should feel bad about this stupid article ? Leftist , pseudo seculars ( read Hindu haters) have been writing such biased , cooked up history (?) since past hundres of years. Nothing new in this. Loksatta wants whip the dead horse of caste ism in Hindu religion to increse its TRP. Don't fall for this trap, just ignore it. Let the dogs bark, the Elephant of Hinduism is going to march ahead. Aise Kuber bahut aaye aur e.
        Reply
        1. R
         Rakesh
         May 10, 2017 at 10:21 pm
         This article is totally wrong. It was muslim rules who provoked Shree Ram to kill Shambuka who was a shudra and still performed rituals which he should not have done as per his cast. It was a muslim king, who told Dronacharya to not train Eklavya due to his cast
         Reply
         1. P
          Prasad
          May 10, 2017 at 9:45 pm
          Biased editorial
          Reply
          1. N
           Navanath lokhande
           May 10, 2017 at 6:44 pm
           Kuber sir, I agree with u..... If Hindus were advanced in every field,why were they ruled by others for thousands of years? The feedback of readers prove that they cant face self criticism.....they are perfect...they dont want to wake up... Their knowledge of history origines from wikipidia.... Really bure din for intellectual argument...
           Reply
           1. गोपाल
            May 10, 2017 at 6:43 pm
            तुम्हाला व्यक्त होण्याचा लोकशाही अधिकार एकदम मान्य तसाच सरकारला नेमणुका करण्याच अधिकार आहेच तुमच्या पोटात शूळ झाला तरीही काँग्रेसी नेत्यावर एक नजर जरी टाकली तर कोणत्या लाय्कीने ते आपल्या पदावर आहेत ? लायकी पाहून तर नेहरुनेहि कधी नेमणूक केली नाही ,मोदींनी का करावी तुमचा मोदी द्वेष समजू शकतो पण भारत भाग्य विधात्याने आम्हला जे काश्मीर चीन समस्या देणगीदाखल दिल्या आणि चीन कडून लाथ खाऊन सुधा राजीनामा न देता मरे पर्यंत सत्त्येला चिकटून राहाला त्या पेक्षा वाईट मोदी काय करणार २वर्श्यच अभ्यासक्रम ४ वर्ष्यात पूर्ण न करणारे नालायक गजेंद्र ची लायकी ठरविणार आणि तुम्ही नालायक मना दोलाविणार .आंबेडकरांच्या मताला गांधी/नेहरू नि काय किमत दिली (धर्मांतर करावे लागले न ) समाज सुधारणा प्रथम स्वातंत्र्य नंतर म्हणणाऱ्या आगरकर याचं कुणी ऐकले नेहरू पेक्षा आंबेडकर चांगले पंतप्रधान होऊ शकले असते पण गान्धी चा वशिला होता काय वैचारिक दारिद्र्य पूर्वीपासून आहे ते मोदी ने निर्माण केले नाही अन्यथा एकच घराणे ५० वर्ष तुमच्या छातीवर लोकशाही मार्गाने का होईना कसे बसले असते भक्त इंदिरा नेहरू गांधी चे पण आहेत.
            Reply
            1. प्रसाद
             May 10, 2017 at 3:57 pm
             या अग्रलेखाच्या निमित्ताने हिंदू धर्मातील काही चांगल्या गोष्टींही लक्षात घ्याव्यात असे वाटते. (१) हिंदू धर्म कोणा एका व्यक्ती वा व्यक्तिरेखेवर आधारित नाही. ३३ कोटी देव, त्यांचे वेगवेगळे स्वभावविशेष, यांमुळे धर्माची मूळ संकल्पनाच लोकशाहीला अनुरूप आहे. (२) पूजाअर्चेचे असंख्य प्रकार असले तरी आपले काम मन लाऊन आणि प्रामाणिकपणे करणे हीच सर्वात मोठी पूजा असे हिंदूंच्या धर्मग्रंथात (गीतेत) सांगितले आहे. (३) देवाच्याही हातून झालेल्या चुका, त्यांचे रागलोभ यांची स्वच्छ कबुली हिंदू धर्मात आढळते. माणसातच देव असतो आणि देवाकडूनही सामान्य स्खलनशील माणसाप्रमाणे चुका होतात हे प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे. (४) कुठल्याही समाजात माणसांची उतरंड असतेच हेसुद्धा स्वच्छपणे कबुल केलेलं आहे. शिक्षणाची सोय नसताना ती उतरंड जन्मावर आणि वडिलोपार्जित व्यवसायावर आधारित होती. सध्या ती आर्थिक परिस्थितीवर ठरते. कुठल्याही जातीचा श्रीमंत उद्योगपती वा नेता कुठल्याही जातीच्या माण नोकर म्हणून ठेऊ शकतो.
             Reply
             1. M
              Milind
              May 10, 2017 at 3:44 pm
              Aata Sanjay Sonawani hyansarkhe tatastha lekhak suddha manya kartat ki Mughal yenyapurvi jaati vyavastha evhdi jachak navti. Mhanje Shatakarni Shalivahan ha kumbhar asun Raja zala, Changragupta Maurya, Ashok hey daasi putra asun rajyakarte zale. Pan Mughal aale ani dushkaal hyat swa-sanwardhanakarta jaat vyavastha ajun kadak zali.. Pan tumhi hey khulya manane sweekar kele pahije na... jey tumhala shakya nahi
              Reply
              1. M
               milind
               May 10, 2017 at 3:30 pm
               आपल्या धर्म नि संस्कृतीला शिव्या घालत इतरांची घाणाही चांगली वाटते संपादकांना. हिंदूंमाधे जाती ही वाईट प्रथा आहे पण ह्या प्रथा मुस्लिम ख्रिस्ती वा इतर ही सर्वा धर्मात आहेत. राजाराम मोहन राय यांनी आनेक चुकीच्या चाली बंद केल्या पण तीन तलाक बंद का नाही झाले? दर्यवर्दि जग पदक्रांत करणारे पोर्चुगीज़ डच इंग्रज हे मुख्यारुपे समुद्री चाचे, हत्यारे नि जोर जबरदस्तीने धर्मांतर करणारे ही होते हे ही लिहा की मग? मग समुद्र पार नाकारता घरी बसणारे बरे का समुद्रा पार करून गुलाम बनवणारे? केशवापण नि सती ह्या चाली मुस्लिम शासन काळात आल्या कारण हे लोक बलात्कार करून नंतर गुलाम म्हणून विकायचे. या काळात राजपूत बायका जौहर करायच्या. (ऑनलाइन विकी वाचा) तुम्ही फक्ता मोदि नि हिंदू विरोध चालवला आहे. नाही म्हणजे जे वाईट आहे त्याबद्दल ते चुकच आहे ते लिहा पण इतर धर्मांकडून जे आपराध झाले तेही मान्या करा ही त्यांनी ती घाण केली.
               Reply
               1. M
                milind
                May 10, 2017 at 3:02 pm
                आपल्या धर्म नि संस्कृतीला शिव्या घालत इतरांची घाणाही चांगली वाटते संपादकांना. हिंदूंमाधे जाती ही वाईट प्रथा आहे पण ह्या प्रथा मुस्लिम ख्रिस्ती वा इतर ही सर्वा धर्मात आहेत. राजाराम मोहन राय यांनी आनेक चुकीच्या चाली बंद केल्या पण तीन तलाक बंद का नाही झाले? दर्यवर्दि जग पदक्रांत करणारे पोर्चुगीज़ डच इंग्रज हे मुख्यारुपे समुद्री चाचे, हत्यारे नि जोर जबरदस्तीने धर्मांतर करणारे ही होते हे ही लिहा की मग? मग समुद्र पार नाकारता घरी बसणारे बरे का समुद्रा पार करून गुलाम बनवणारे? केशवापण नि सती ह्या चाली मुस्लिम शासन काळात आल्या कारण हे लोक बलात्कार करून नंतर गुलाम म्हणून विकायचे. या काळात राजपूत बायका जौहर करायच्या. (ऑनलाइन विकी वाचा) तुम्ही फक्ता मोदि नि हिंदू विरोध चालवला आहे. नाही म्हणजे जे वाईट आहे त्याबद्दल ते चुकच आहे ते लिहा पण इतर धर्मांकडून जे आपराध झाले तेही मान्या करा ही त्यांनी ती घाण केली.
                Reply
                1. S
                 Swapnil
                 May 10, 2017 at 2:27 pm
                 "ल्या दोन हजार वा अधिक वर्षांत ही भूमी मृतवत होती हेदेखील तितकेच खरे. कमालीची जातव्यवस्था, अत्यंत मागास विचारधारा आणि आधुनिक जगाचा वाराही लागलेला नसणे हे ब्रिटिशकालीन भारताचे प्राक्तन होते, हे मान्य करायला हवे. त्यामागील कारणे काहीही असोत. परंतु बव्हंशी ब्रिटिशकालीन भारत हा मागास होता. " are mag asha deshat british kaay khul khula wajawayla aale hote ka? aata tumhala bheetee rahileli nahi...wattel te kharadata ka?
                 Reply
                 1. M
                  Mayur
                  May 10, 2017 at 1:30 pm
                  ......Cont from 1....to 2 This world is full of differences. In west there is racism, in every part of globe there is difference between “haves” and “haves not”. Even if you go to Middle East black people cannot kiss hands of black Muslims (Sudanis) even though it is their custom. Can writer allow his daughter to marry a boy who is not as educated as his daughter is and from very poor family? If answer of this question is no then It is evident that writer is also believes in some kind of “ism” which may not be based on cast but based on other parameters like education and money. Then why criticize to only Hindus only. Hindus are more liberal and open. Instead focus on Muslims and try to elevate them otherwise this w world will be doomed along with these backward race.
                  Reply
                  1. M
                   Mayur
                   May 10, 2017 at 1:29 pm
                   This is the classic example of how this writer is still a slave of English people and western culture. Yes it is true that sanatan dharma has "varna vyavashta" but not "jati vyavashta". This cast based system was not a part of sanatan dharma and became a part of our culture due to Muslim invaders. Rajput women used do Johar to save themselves from Muslim Invaders. From there this Hindu custom started. However now a days no body is supporting this sati pratha. Have writer find any reference of sati pratha in 18 puranas, 4 vedas, Ramayan and Mahabharat? No. then on what basis write is claiming that it is part of the Hindu culture since from the beginning? All our universities, their libraries were destro by these muslim barbaric invaders and now writer is asking how all such knowledge is gone. To maintain such knowledge it should be preserved and it is preserved through books and knowledgeable people who were killed and destro by Muslims. .........Cont....2
                   Reply
                   1. J
                    jit
                    May 10, 2017 at 11:24 am
                    Till Rahul hi is in Congress, BJP is going to come in 2019 election. Hence write article what corrective action must take for the Congress improvisation instead of hatred articles.
                    Reply
                    1. J
                     jit
                     May 10, 2017 at 11:21 am
                     Gita says "Varna Gun: karm vibhage" -- means Varnas are not by birth but by virtues. But in western British Cultural humans were sold by official agreement, racism to the world is given by British.
                     Reply
                     1. J
                      jit
                      May 10, 2017 at 11:14 am
                      खगोलशास्त्र वा गणित या देशाने जगास दिले हे तर खरेच. परंतु त्याच वेळी आधुनिक नकाशे बनवण्याची अक्कल या देशवासीयांना नव्हती हेदेखील तितकेच खरे. -- ic statement. India well before BC 600 was having Jan-padas, gram, and well defined boundaries. Huge temples from ancient time Konark, Madurai, Tanjavur Bruhadeshwar temples are spread over acres of land, is that without maps?
                      Reply
                      1. Load More Comments