23 September 2017

News Flash

एक पाऊल मागे, पण..

डोकलाममधून चीनची कथित माघार आपण साजरी करणे उतावीळपणाचे ठरेल.

लोकसत्ता टीम | Updated: August 29, 2017 2:53 AM

भारतीय लष्करप्रमुखांनी दिलेला इशारा लक्षात घेता, डोकलाममधून चीनची कथित माघार आपण साजरी करणे उतावीळपणाचे ठरेल.

भारताला दणका द्यायचा, हादरवून टाकायचे आणि मग माघार घेत चर्चा करायची असा सल्ला माओ झेडाँग यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना १९६२ साली दिला होता. तेव्हापासून आजतागायत चीनच्या भारतविषयक प्रत्येक चालीत हे दिसून येते. आताही डोकलाम येथील तणातणीतून समेट काढत असताना चीनच्या याच धोरणाचे प्रत्यंतर येते. आज चीन आणि भारत यांनी या डोकलाम प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याचे जाहीर केले. या ‘यशा’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. काही संघर्षांत पराभूत न होणे हाच विजय असतो. डोकलामचा मुद्दा हा असा होता. भूतान, भारत आणि चीन या तीन देशांतील सीमेत विभागल्या गेलेल्या या जमिनीच्या तुकडय़ावरून गेले दीड महिने संघर्ष निर्माण झाला होता. या परिसरातून चीनला रेल्वे आणि महामार्ग उभारायचा असून तसे करू दिल्यास चीनचे संकट थेट भारताच्या दारावरच येऊन ठाकणार आहे. म्हणून आपला या प्रकल्पास विरोध आहे आणि तो रास्तही आहे. खेरीज ही भूमी ना चीनची ना आपली. ती आहे भूतानची. आपण आणि भूतान यांच्यातील नैसर्गिक संबंध आणि ऐतिहासिक करार लक्षात घेता तिचे रक्षण करणे आपले कर्तव्यच ठरते. मोदी सरकारने हे कर्तव्य नीट पार पाडले. परिणामी भूतानच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेलगत चीन आणि भारत यांच्यातील फौजा एकमेकांसमोर ठाकल्या आणि आता युद्ध घडते की काय, अशी शक्यता निर्माण झाली.

त्यामागे केवळ चीनची युद्धखोरी होती. भारताच्या डोक्यावर मोठा फौजफाटा गोळा करून ठेवला की भारत डगमगेल असा चीनचा होरा असावा. तो खोटा ठरला. त्यामागे जसा नरेंद्र मोदी सरकारचा निर्धार आहे तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणही आहे, ही बाब महत्त्वाची. जगाच्या राजकारणात सध्या चीन जवळपास एकटा पडल्यागत आहे. अमेरिकेशी त्या देशाचे व्यापार युद्ध सुरू आहेच. पण त्याचबरोबर दक्षिण आशियाई समुद्रातील कृत्रिम बेटांवर दावा सांगण्याची चीनची आगलावी कृतीदेखील आहे. ही बेटे चीनने मुद्दाम तयार केली. हेतू हा की तेथे लष्करी तळ उभारल्यास जपानला धमकावता येते आणि त्या परिसरातील सागरी ऊर्जा मार्गावर नियंत्रण राहते. त्याचप्रमाणे फिलिपीन्स आदी देशांवरही वचक राहतो. ही चीनची भूमिका थेट अमेरिकेस आव्हान देणारी आहे. आधीच चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युआन या चिनी चलनाच्या एकतर्फी दरवाढ वा कपातीमुळे त्रस्त आहे. त्यात ही कृत्रिम बेटांची डोकेदुखी. त्यामुळे चीनविरोधात आंतरराष्ट्रीय वातावरण तापलेले आहे. तशात चीनने अकारण भारताविरोधात आगळीक केली. यातील लक्षात घेण्याजोगा भाग म्हणजे या काळातील चीन आणि भारताची भाषा. डोकलाम परिसरात घुसखोरी केल्यानंतर चीन आणि विशेषत त्या देशातील सरकारपुरस्कृत माध्यमे सातत्याने भारताविरोधात मस्तवाल बलाप्रमाणे डुरकावत राहिली. आम्ही भारताला धडा शिकवू, भारत आगीची परीक्षा पाहतोय वगरे. परंतु या काळात भारताने ब्रदेखील काढला नाही. काही ‘कमांडो कॉमिक’ वृत्तवाहिन्या सोडल्या तर भारताने  याबाबत मौन बाळगणेच पसंत केले. या संपूर्ण काळात चीन एखाद्या अस्वस्थ, नवथर, नुकत्याच व्यायामशाळेत जाऊ लागलेल्या तरुणाप्रमाणे दंड बेटकुळ्या सतत तपासून पाहणारा दिसत गेला तर भारत प्रौढ शांततावादी. भारताने ना युद्धखोरीची भाषा केली ना आपले सैन्य मागे हटवले. दरम्यान, चीनने आम्ही अन्य प्रांतांतही घुसखोरी करू शकतो वगरे भाषा केली. पण त्यावरही अधिक काहीही भाष्य न करता आपण आपला बंदोबस्त वाढवला. तेव्हा गेले दीड महिने डोकलाममध्ये जे काही सुरू होते ती केवळ खडाखडी होती. ती कोंडी फोडून भारताला नामोहरम करायचे तर चीनसमोर एकच पर्याय होता.

युद्ध करणे. परंतु एका रस्ते/ रेल्वे प्रकल्पासाठी या क्षणी युद्ध ओढवून घेणे शहाणपणाचे नाही, असा विचार चीनने केला असणे शक्य आहे. तसे असेल तर या शहाणपणामागे काही कारणे संभवतात. एक म्हणजे चीनचा स्तब्ध असलेला आर्थिक विकास, चीनमध्ये पुढच्याच आठवडय़ात होऊ घातलेली ब्रिक्स देशांची परिषद आणि दुसरे म्हणजे लवकरच होऊ घातलेली चिनी सत्ताधारी पक्षाची परिषद. आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता यातील पहिले आव्हान हे चीनसाठी मोठी डोकेदुखी आहे. प्रचंड प्रमाणावर स्वस्तात उत्पादन करून जगाच्या बाजारपेठा भरून टाकणे हे चीनचे धोरण. आपल्याकडील काही स्वघोषित स्वदेशीवाद्यांच्या बडबडीने त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. तरीही त्यात बदल झालाच असेल तर तो जगाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा. आज मितीला जगातील अनेक देशांच्या बाजारवाती मंदावलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारही क्षीण झालेला आहे. निर्यातीवर भिस्त असलेल्या चीनसमोरचे हे मोठे संकट. दुसरा मुद्दा पुढच्याच आठवडय़ात चीनमध्ये होऊ घातलेली ब्रिक्स परिषद. २०११ नंतर पहिल्यांदाच चीन ब्रिक्सच्या परिषदेचा यजमान आहे. चीन वगळता ब्राझील, रशिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका या देशांचे प्रमुख तीत सहभागी होणे अपेक्षित आहे. मात्र मोदी यांच्या सहभागाविषयी अनिश्चितता होती. याचे कारण डोकलाम. एका बाजूला युद्धसदृश वातावरण असताना शेजाऱ्यास पाहुणचाराविषयी बोलावणे आणि त्याचे येणे अनुचित ठरले असते. तेव्हा या परिषदेआधी डोकलामप्रश्नी तोडगा निघेल अशी अटकळ होतीच. ती खरी ठरली. तिसरा मुद्दा ऑक्टोबरात होऊ घातलेल्या चिनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाचा. या अधिवेशनात अध्यक्ष क्षी जिनिपग आपल्या नेतृत्वाचा खुंटा हलवून अधिकच बळकट करून घेणार यात शंका नाही. आपल्या राजकीय विरोधकांना जिनिपग यांनी याआधीच हतप्रभ करून टाकले आहे. तेव्हा त्यांच्या नेतृत्वास आव्हान देणारे तूर्त तरी कोणी नाही, हे उघड आहे. अशा वेळी डोकलाम तणावाचे गालबोट लावून घेण्याची काहीच गरज नाही, असा विचार चिनी सत्ताधीशांनी केला नसेलच असे नाही. याचे कारण डोकलाममध्ये चीनला शाबीत करावे असे काही नाही. ती खेळी केवळ आंतरराष्ट्रीय दबावाच्या राजकारणाचा भाग आहे.

तेव्हा डोकलाममधून चीनची कथित माघार आपण साजरी करणे उतावीळपणाचे ठरेल. विशेषत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दोनच दिवसांपूर्वी दिलेला इशारा लक्षात घेता डोकलाममध्ये जे काही घडले त्यात आपण विजय मानणे योग्य नव्हे. डोकलाम येथे चीनने जे काही केले ते वरकरणी दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर आहे, चीनकडून असे प्रकार भविष्यात वारंवार होतील, असे उद्गार जनरल रावत यांनी पुण्यात काढले. चीनचा इतिहास लक्षात घेता त्यात तथ्य आहे. चीन उघड युद्ध करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाच्या राजकारणातून उभय देशांतील सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न करेल, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. डोकलाममधील घडामोडींतून तेच दिसून येते. १९६२ साली भारताचे नाक कापल्यानंतर चीनने चर्चात भारतास पादाक्रांत केलेला सर्व प्रदेश परत केला. हे चीनचे धोरण जे त्या वेळी माओ यांनी बोलून दाखवले आणि त्यानंतर ५५ वर्षांनी क्षी जिनिपग यांनी त्याचीच प्रचीती दिली. आताही चीनने आपली भूमिका जाहीर करण्याआधी भारतास समेटाची घोषणा करायला लावली. आपल्यानंतर दोन तासांनी चीनने या संदर्भात भाष्य केले. ते करताना आपल्या रस्ते वा रेल्वे प्रकल्पाचे भवितव्य काय, हे मात्र चीनने गुलदस्त्यातच ठेवले आहे. ही बाब महत्त्वाचीच. म्हणून डोकलाममधील सौहार्द हे चीनचे एक पाऊल मागे घेणे असले तरी त्या देशाची लवकरच दोन पावले पुढे पडू शकतात.

First Published on August 29, 2017 2:53 am

Web Title: china stops road construction at doklam
 1. U
  Uday
  Aug 31, 2017 at 9:27 am
  चीन हरला असा प्रसार माध्यम सोडली तर कोणीही म्हणत नाही आहे किंवा भारताचा विजय झाला असा वेडा आशावाद कुठेच दिसत नाही. भारता ने संयमीपणे जी कणखर भूमिका घेतली ते जास्त महत्वाचे होते. लष्कर प्रमुखांनी सांगितले आणि सरकार त्यांचे ऐकते आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागगर आहेत ते ही सरकारला सांगतीलच तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका सरकार ने कुठेही उन्माद दाखवलेला दिसत नाही. लखू रिसबुडांनी जास्त डोक्याला ताण देऊन इशारा वगैरे देऊ नये. चीन जगात एकटा पडला आहे ती चूक चीनची आहे त्यात भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा कमीपणा कसा हे काही समजले नाही. सगळ्यावेळी भारत कुठेतरी कमी आहे त्याने कणखर धोरण घेऊ नये असे इशारे देऊ नका.
  Reply
  1. D
   Dattahari Ramrao
   Aug 30, 2017 at 10:17 am
   लेख आवडला, आपण ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या हे आपल्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.अभिनंदन
   Reply
   1. R
    Ranjeet
    Aug 30, 2017 at 8:54 am
    १९६२ लष्करी अधिकाऱ्यांना दोष देण्या पेक्षा षंढ नेहरूला दोष द्या.याच्या उलट मोदी परदेश वारी करत असताना कुबेर व काँग्रेस रंडकीच्या विलाप करत होते.
    Reply
    1. S
     Suraj More
     Aug 29, 2017 at 10:40 pm
     Tumchi Potdukhi Nehmichich aahe
     Reply
     1. D
      Dattahari Ramrao
      Aug 29, 2017 at 8:22 pm
      अभ्यासपूर्ण मांडणी,पण ा असे वाटते आज जगात कोणालाच युद्ध परवडणारे नाही.कारण आता आंतरराष्ट्रीय राजकारणात हार्डपावरला काही मूल्ये नाही . आजच्या जगात स्वाप्ट पावर जागतिक राजकारणाला प्रभावीत करते.भारतीय डायस्पोरा स्वयंप्रेरीत आहे तर चीन चा दंडसत्ता प्रेरीत आहे.डोकलाममधील सौहार्द हे चीनचे एक पाऊल मागे घेणे असले तरी त्या देशाची लवकरच दोन पावले पुढे पडू शकतात.तेव्हा भारताने संयमाने,मागचा अनुभव लक्षात घेऊन सतर्क राहावे हा इशारा अगदी योग्य​च .... म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण उपयुक्त मांडणीस सलाम.
      Reply
      1. M
       Madan Jain
       Aug 29, 2017 at 5:12 pm
       कुबेर गुर्जी तुमच्या लाडक्या काँग्रेस प्रकाशने पार राष्ट्र नीती कधीच आखली नाही. १९६२ मध्ये जवाहर ने लोटांगण घाले. वायुदलाच्या वापर करायला नकार दिला. कृष्णा मेनन ने पूर्व सीमा कमजोर केली. हे सरकार अगोदरचंच खरकटं साफ करून प्रगती करत आहे. तुमच्या पूर्व दूषित वृत्तीला हे समजत नाही. दुर्दैवाने तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध आहे म्हणून असले लेख लिहीत आहेत.
       Reply
       1. V
        Vinayak
        Aug 29, 2017 at 3:30 pm
        "त्यामागे जसा नरेंद्र मोदी सरकारचा निर्धार आहे तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणही आहे, ही बाब महत्त्वाची. " हे काबुल करा कि आंतरराष्ट्रीय राजकारण बदलण्यात मोदींचा मोठा हात आहे. तुम्ही त्यांच्या परदेशवारी टिंगल टवाळी केलीत पण त्याच परदेशवाऱ्यांचं हे फलित आहे.
        Reply
        1. K
         Kanchan Hardikar
         Aug 29, 2017 at 3:12 pm
         अग्रलेख छान वाटला.
         Reply
         1. S
          satya
          Aug 29, 2017 at 1:47 pm
          भक्तांची मांदियाळी रामरहिम प्रकरणात खूप पाहीली. चिकित्सा करणे म्हणजे यांच्यासाठी अडथळा वाटतो.
          Reply
          1. C
           CA Sandesh
           Aug 29, 2017 at 1:24 pm
           कमाल केलीत गिरीश कुबेर आज ... खूप दिवसांनी मोदी बद्दल गरळ ना ओकता लोकसत्ताच्या पूर्व इतिहास प्रमाणे संतुलित लेख लिहिलात.. असेच लिहीत राहिलात तर कदाचित परत लोकसत्ता लावायला हरकत नाहीये आमची !
           Reply
           1. R
            Rajeev
            Aug 29, 2017 at 1:11 pm
            ही नक्की उभयपक्षी डिस-एन्गेजमेण्ट(च) आहे काय? >>> "भारतीय सैन्य डोकलाममधून माघारी परतले आहे. मात्र चिनी सैन्याकडून डोकलाममध्ये गस्त घालण्याचे काम सुरूच राहिल’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले" (डोकलाममधून सैन्य माघारी, पण गस्त सुरूच- चीन लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 28, 2017 2:46 PM)
            Reply
            1. U
             Ulhas
             Aug 29, 2017 at 12:54 pm
             मंदार सरांची प्रतिक्रिया अफलातूनच.
             Reply
             1. p
              phatakshashi@rediffmail
              Aug 29, 2017 at 12:42 pm
              सढया जरी डोकलाम मधून चीन ने माघार घेतली असली तरी मोदींनी बेसावध राहू naye. चीन आणि Pakistan एक नंबरचे कपटी aahet. मोदींनी आपले सैन्य मागे घेऊ naye. परत महिन्यभारत चीन नवी चढाई karel. जर डोकलांम इथे जागरूक ना राहिल्यास तो Pradesh आणि Bhutan , सिक्क्म चीन गिळंकृत karel. आता चीन आपला होरा अरुणाचल प्रदेश आणि आसाम कडे केंद्रित karel. . आपण Nehru सारखे दीले धोरण स्वीकारले तर येत्या २५ वर्षात चीन दिल्ली पण हस्तगत karel.
              Reply
              1. V
               vishal
               Aug 29, 2017 at 12:39 pm
               रोजच्या हाग्रलेखांपेक्षा थोडा बरा लिहिलेला आजचा हाग्रलेख परत कधी घेणार ते कळेल का?
               Reply
               1. V
                vivek
                Aug 29, 2017 at 12:24 pm
                प्रत्यक्ष युद्ध कोणालाच परवडणारे नाही हे चीन जाणून आहे त्यामुळे सायबर वॉर व्यापारात कुरघोडी साम दाम दंड भेद याचा वापर तो आपल्या शेजारील देशांवर तो करतो. श्रीलंका पाक नेपाळ बांगलादेश म्यानमार या देशांना पैशाच्या जोरावर त्याने कवेत घेतलेच आहे. भारतावर मात्र मानसिक दबाव दंडनीती याचा वापर करायचा प्रयत्न करतो कारण भारतच भविष्यात त्याला आव्हान देऊ शकतो. असे प्रसंग अनेकदा येणार
                Reply
                1. D
                 DADA
                 Aug 29, 2017 at 11:16 am
                 काहीही होऊ दे श्रेय मोदींना नको जायला , काय मस्त अजेंडा ..
                 Reply
                 1. J
                  jai
                  Aug 29, 2017 at 11:05 am
                  योग्य विश्लेषण आणि योग्य व्यक्तींचे अभिनंदन पण केलेलं आहे..असल्या प्रश्नावर सर्व देश एक होईल या बाबत शंका नाही..काहीही झाले तरी हि पाकिस्तान आणि चीन आपले मित्र कधीच होणार नाहीत..त्यांच्या बाबत सावध राहणे हीच आपली रन नीती असली पाहिजे..
                  Reply
                  1. S
                   sarang kulkarni
                   Aug 29, 2017 at 10:29 am
                   मोदींचे नाव कुठेही येऊ नये म्हणून काय सॉल्लिड शाब्दिक कसरत केली
                   Reply
                   1. S
                    Shriram Bapat
                    Aug 29, 2017 at 10:25 am
                    कण्हत कुंथत का होईना पण लोकसत्ताने मोदींचे डोकलाम प्रकरणी अभिनंदन केले हे स्वागतार्ह आहे. कोणतीही गोष्ट आपल्या बाजूने घडल्यास लगेच उन्मादाने साजरी करू नये हे याच प्रकरणी नव्हे तर सर्वच प्रकरणांसाठी योग्य आहे मग त्यात सर्जिकल स्ट्राईक सुद्धा आले. पण या स्वताच्या शिस्तीसाठी पाळायच्या संयमाचा व्यत्यास असा आहे की एखाद्या प्रकरणात भान न ठेवता प्रमाणाबाहेर कटू अशी टीका सुद्धा करू नये. त्याबाबत मात्र लोकसत्तामध्ये आनंद आहे असेच म्हणावे लागेल. भांडताना संपूर्ण चाळ किंवा झोपडपट्टी गोळा करून वसा वसा ओरडायचे ही लोकसत्ताचीं पद्धत आहे, आणि सध्या सत्तेतून पायउतार झालेले, शेतकर्तानी नेतृत्व नाकारलेले पुढारी रोजगार हमी योजनेत लोकसत्ताच्या बाजूने कचा कचा भांडायला उभे राहतात. या गँगमध्ये आता अहंमन्य न्यायमूर्ती सुद्धा सामील झाले आहेत. अर्थात शिवसेना भाजपवर वेडीवाकडी टीका करते ते भाजपच्या पथ्यावर पडते तसेच लोकसत्तासंकटच्या सर्वच माध्यमांची टीका भाजपाला फायदेशीर ठरते कारण अशी टीका करून सर्व मराठी माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे.
                    Reply
                    1. R
                     ravindrak
                     Aug 29, 2017 at 10:21 am
                     भारतीय लष्करप्रमुखांनी दिलेला इशारा लक्षात घेता, डोकलाममधून चीनची कथित माघार आपण साजरी करणे उतावीळपणाचे ठरेल.( कोण उतावीळपणा करतंय?? केला असता तर दोन महिन्यात दिसला असता,जनता शहाणी आहे ...) ( तेव्हा या परिषदेआधी डोकलामप्रश्नी तोडगा निघेल अशी अटकळ होतीच???? म्हणजे यात सरकारचे काहीच कर्तृत्व/नेतृत्व नाही का???)
                     Reply
                     1. G
                      Ganeshprasad Deshpande
                      Aug 29, 2017 at 10:18 am
                      तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. चीनला पुढचे पाऊल टाकू दिले नाही, याव्यतिरिक्त आपला विजय म्हणावा असे डोकलाममध्ये काहीही नाही. 'जागते रहो'च्या आरोळ्या देणाऱ्या चाटुकारांकडे लक्ष न देणेच बरे. (त्यांच्या अकारण नेहरूद्वेषाला कधी शहाणपणा सुचणार देवच जाणे.) आपण रस्त्याचे-रेल्वेचे काम पुढे न रेटण्याचे आश्वासन चीनकडून मिळवू शकलेलो नाही. काश्मीर आणि डोकलाम यांची चीनने केलेली तुलनाही अशीच अस्थानी आहे. डोकलाम जरी ानचा असला तरी तिथे चीनचे येणे हे पूर्वोत्तर भारतापासून तोडण्याच्या श्रीगणेशासारखे आहे. काश्मीरचे तसे स्थान नाही. सुदैवाने सैन्याला आणि नेतृत्वाला या समस्येच्या सर्व पैलूंची जाण आहे असे दिसते. त्यामुळे ना सैन्याने आपली पाठ थोपटून घेतली ना नेतृत्वाने 'मोदी कूट नीतीने संकट सोडविल्याची' डिंग मारली. कारण संकट टळलेले नाही, फक्त पुढे गेले आहे एवढे सर्वांना कळते आहे. आपण या समस्येचा चीनला बाजूला ठेवून काही उपाय शोधू शकतो काय याचा विचार व्हायला हवा. ते अशक्य नाही. कुणीतरी करायला पाहिजे इतकेच. तूर्त तरी सरकारचे सावध अभिनंदन!
                      Reply
                      1. Load More Comments