19 September 2017

News Flash

मेरिटशाहीचे मेरुमणी

वैद्यक डॉक्टर बनण्यासाठीचे कोटींचे आकडे..

लोकसत्ता टीम | Updated: May 13, 2017 2:53 AM

आपल्या विद्यापीठांतील अध्र्याहून अधिक पीएचडी पदव्या बोगस तर दुसरीकडे वैद्यक डॉक्टर बनण्यासाठीचे कोटींचे आकडे..  हे सर्वच  चिंता वाढवणारे आहे..

दुसऱ्याने खाल्ले तर शेण आणि आपण खाल्ली तर श्रावणी हे तत्त्व समाजात एकदा दृढमूल झाले, की नैतिकता, प्रामाणिकपणा, शिष्टाचार यांच्या व्याख्याही सहजच डोक्यावर उभ्या केल्या जातात. राजकीय नेत्यांचा वा उद्योगपतींचा उजेडात आलेला भ्रष्टाचार तेवढाच भ्रष्टाचार म्हणून गणला जातो आणि बाकीचे सारेच सावसज्जन ठरतात. हे सध्याचे सामाजिक वास्तव. या सज्जनांतील काही सज्जन समाजात बुद्धिजीवी म्हणून वावरत असतात. त्यातील काहींची गणना हळूहळू विचारवंतांमध्ये होऊ  लागते. ते समाजाला विचारांचे डोस देऊ  लागतात. अशा काही विचारवंत तज्ज्ञांचे पितळ नुकतेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीरपणे उघड केले. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन. तेही दुहेरी.

ते अशासाठी की, त्यांनी यातून दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. एक तर ‘डॉक्टर’ या उपाधीमागील काळोखी त्यांनी उजेडात आणली आणि दुसरी बाब म्हणजे हे सारे त्यांनी भारती विद्यापीठाच्या व्यासपीठावरून केले. भारती विद्यापीठ म्हणजे भिलवडीचे ऑक्सफर्ड. आधुनिक गुरुकुलच ते. पूर्वीच्या आणि या गुरुकुलांत फरक इतकाच की पूर्वी तेथे विद्यार्थ्यांना श्रम करून ज्ञान संपादावे लागत असे. येथे शिक्षक श्रमतात, निवडणुकीच्या काळात तर अधिकच श्रमतात आणि विद्यार्थ्यांना पदव्या मिळतात. अशी गुरुकुले महाराष्ट्रात फोफावली आहेत. धनसंपदा हीच गुणवत्ता मानणारी ही गुरुकुले आणि ती उभारणारे शिक्षणमहर्षी यांच्या नावाने आजवर महाराष्ट्रातील गावगन्ना गुणवंतांनी पाथरवटासारखे खडे फोडले. हा सर्व शिक्षणव्यवहार टीकास्पदच आहे यात शंका नाही. परंतु या व्यवसायाला एक दुसरीही बाजू आहे. ती मात्र नेहमीच अंधारात राहिली आहे. ही बाजू आहे या अशा विविध शिक्षणसंस्थांमधील शिक्षक आणि प्राध्यापकांची. पोटासाठी त्यांना तेथे नोकऱ्या कराव्या लागतात, त्याचसाठी प्रसंगी शिक्षणसंस्था मालकांची धुणीभांडी करावी लागतात, ही बाब समजून घेता येईल. आपल्या व्यवस्थेचे ते अपयश म्हणता येईल. परंतु तमाम नीतिमूल्ये डोक्याला गुंडाळून तेथे शिकवत असलेल्या आमच्या अनेक बुद्धिजीवी आचार्याचे काय? पीएचडी या पदवीने आचार्य ही उपाधी प्राप्त होते त्यांना. परंतु शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या विद्यापीठांतील असे अध्र्याहून अधिक आचार्य बोगस आहेत, भ्रष्टाचार्य आहेत. याचे कारण अध्र्याहून अधिक पीएचडी या ‘कॉपी-पेस्ट’ असतात. म्हणजे ही प्रतिष्ठित पदवी मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रबंधांत उचलेगिरी करण्यात आलेली असते. अन्य कुणाच्या प्रबंधातील मजकुराची चोरी केलेली असते. खरे तर वाङ्मयचौर्य ही नीचतम अशी चोरी. ते इतरांच्या बुद्धिसंपत्तीचे अपहरण असते. केवळ वेतनवाढ, पदोन्नती मिळविण्यासाठी वा नावापुढे डॉक्टर ही प्रतिष्ठित पदवी लावता यावी यासाठी ही चोरी केली जाते. राज्यातील प्रत्येक विद्यापीठातून सरासरी ३०० ते ४०० जणांना ही पदवी दिली जाते. म्हणजे दहा विद्यापीठांतून वर्षांकाठी सुमारे तीन ते चार हजार डॉक्टर तयार होतात. त्यातील अनेक जण अत्यंत कष्टपूर्वक संशोधन, अभ्यास करून आपले प्रबंध सादर करतात असे गृहीत धरले तरी चोऱ्या करून, नियमांना हरताळ फासून पीएचडी मिळविणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. तावडे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडील पीएचडी प्रबंधांपैकी अवघ्या १.३ टक्के प्रबंधांचे संदर्भ वापरले जातात. ही मोहनदास पै समितीने दिलेली आकडेवारी आहे. यावरून पीएचडीसाठी सादर होणारे प्रबंध काय लायकीचे असतील हे लक्षात येते. आणि तरीही विद्यापीठांकडून त्यांना पदवी दिली जाते. ‘लोकसत्ता’ने गतवर्षी प्रसिद्ध केलेली ‘नियमभंगाची पीएचडी’ ही विस्तृत वृत्तमालिका ज्यांनी वाचली असेल त्यांना हे कसे होते, त्यात कोणाकोणाचे हात बरबटलेले आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठांतील एक भ्रष्ट साखळीच त्यासाठी तयार झालेली आहे. यातून पुढे आलेली मंडळीच अनेकदा गुणवंतशाहीचे – मेरिटोक्रॅसीचे – गोडवे गाणाऱ्यांत पुढे असते हा त्यातील आणखी एक वैचारिक भ्रष्टाचार. असाच भ्रष्ट आचार दिसतो तो अन्य डॉक्टरांबाबत. त्याचाही संबंध पुन्हा शिक्षण क्षेत्राशी आणि गावगन्ना गुरुकुलांशीच आहे.

हे डॉक्टर म्हणजे तुमच्या-आमच्या आरोग्याचे प्रहरी. त्यांतील स्व-कष्टाने, स्व-बुद्धिमत्तेच्या जोरावर वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेऊन ते शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आपणांस येथे बोलायचे नाही. आपणांसमोर आहेत ते ‘कोटय़ा’तून प्रवेश घेणारे गुणवंत. एरवी राखीव जागांबद्दल अनेक जण नेहमीच तावातावाने बोलत असतात. अखेर सर्वाना समान संधी उपलब्ध असणारा, उच्च-नीचता नसणारा समाजच असे बोलणाऱ्यांना अभिप्रेत असतो असे मानून त्यांच्या बोलण्याचा आदर केला पाहिजे. दुसऱ्या प्रकारच्या राखीव जागांकडे ते सहसा डोळेझाक करतात त्या नेत्रदोषाकडेही सहानुभूतीने पाहिले पाहिजे. कारण ‘आपली ती श्रावणी’ हे तत्त्व येथेही लागू होते. तर राखीव जागांचा हा दुसरा प्रकार आहे तो आर्थिक स्वरूपाचा. त्याचे शिष्टसंमत नाव व्यवस्थापन आणि अनिवासी भारतीय कोटा. वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा दुभत्या क्षेत्रांमध्ये या कोटय़ाला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणमहर्षीसाठी आपल्या व्यवस्थेने सोडलेले हे चराऊ रानच. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता हा कोटा थोडाथोडका नव्हे, तर एकूण जागांच्या ५० टक्के आहे. यंदा त्यासाठी ५० ते ८७ लाख शुल्क आकारण्यात येत असल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर याकडे अनेकांचे लक्ष गेले. शासनाच्या म्हणण्यानुसार खासगी संस्थाचालकांना या राखीव जागांसाठी असे शुल्क आकारण्याचा अधिकारच आहे. तेव्हा सरकारमान्यतेचा प्रश्न मिटला. उरला तो एवढे पैसे मोजल्यानंतर या गडगंज गुणवंतांना मिळणाऱ्या सेवेचा. त्याची काळजी अर्थातच शिक्षणसंस्थांनी घेतलेली असते. अनेक ठिकाणी तर एवढय़ा शुल्कासमवेत या भावी विशेषज्ञ डॉक्टरांना खास पॅकेज उपलब्ध करून दिले जाते. त्यात उत्तीर्णतेची हमीही असते. ती नसेल, तर एवढय़ा गडगंज गुणवत्तेचा उपयोग तो काय? पीएचडी मिळविण्यासाठी प्राध्यापकांना चोऱ्यामाऱ्या कराव्या लागतात, येथे कॉप्या पुरविल्या जातात. त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या या महाराष्ट्राला नव्या नाहीत. मुद्दा असा, की अशा प्रकारे धनधनाटाच्या जोरावर बाहेर येणारे हे वैद्यकीय डॉक्टर रुग्णांकडून काय अपेक्षा करीत असतील आणि अशा प्रकारे चोऱ्यामाऱ्या करणारे पीएचडीधारक प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवीत असतील? गुणवत्तेला पोषक असे वातावरण असलेला, गुणवंतशाही असलेला समाज यातून खरोखरच निर्माण होऊ शकेल? की गुणवंतशाही हेच एक मिथक आहे?

यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ज्या वर्गाने याविरोधात आवाज उठवायचा तोच मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग या भ्रष्ट व्यवस्थेला सामील आहे. दुसऱ्या कोणाच्या बुद्धिमत्तेवर डल्ला मारून आचार्य म्हणून मिरवणारे प्राध्यापक काय किंवा पैशाच्या थैल्या ओतून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी काय, हे याच बुद्धिजीवी वर्गाचे घटक आहेत. उद्या तेच स्वत:ला मेरिटशाहीचे मेरुमणी म्हणून मिरवणार आहेत. ही सारी सामाजिक नासलेपणाचीच चिन्हे. विनोद तावडे यांच्यासारख्या मंत्र्याने त्यावर बोट ठेवले. परंतु त्यात या राज्यकर्त्यां वर्गाचाही मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही. तेव्हा आता केवळ आजाराचे निदान सांगून टाळ्या घेण्यात अर्थ नाही. त्यावर इलाज काय करणार हे सांगायला हवे. नाही तर मग सरकारनेच अशा काही प्राध्यापकांचे पाठय़पुस्तक मंडळ नेमून त्यांच्याकडून नैतिकता, प्रामाणिकपणा, शिष्टाचार यांचे नवे धडे लिहून घेतले पाहिजेत..

 

 

First Published on May 13, 2017 2:53 am

Web Title: fake doctors and phd holder in maharashtra
 1. S
  Suhas
  May 17, 2017 at 4:11 pm
  It is simple logic, when you have few seats and merit alone is considered, quality of professionals passing out is highest. Today we have engineering and medical colleges at every nook and corner of the country which churn out carbon copies unfit for employment. The pity is most of these ins utions are owned by the politicians OR their stooges. Accredition is another big scam. As long as reservations on the basis of caste & religion continue, one cannot expect any improvement in the quality of ins utions. Just see the quality of doctors engineers in pre-independence era when merit was the sole criterion for admissions and compare this with the post independence era the picture is crystal clear. As long as importance is given to mere qualification and not experience and knowledge of a person the present lacuna will plague our system for years to come. A social revolution is the only answer which the present young generation is capable of and need of the hour
  Reply
  1. J
   jai
   May 16, 2017 at 11:54 am
   "Bhilwadi che oxford " ..like it..good one
   Reply
   1. S
    shrikrishna vaidya
    May 15, 2017 at 7:18 am
    वास्तव तर याहूनही बिभत्स आहे. तथाकथित गाईड लोक जेवणावळी मागतात निर्लज्जपणे. धंदा करतात काही लोक . हे गाईड किती लायकीचे आहेत हे तपासावे विद्यापीठाने अगोदर. नैतिकतेचे plagiarism software विकसित करून यांची तपासणी करण्यात यावी. बौद्धिक दिवाळखोरीचे पाईक असणार्‍या अशांना हुडकून नोकरीतून बेदखल केले पाहिजे. पण त्यातही पैसे देवघेव झाली नाही म्हणजे मिळवले !!!
    Reply
    1. U
     umesh
     May 15, 2017 at 2:14 am
     आरक्षणामुळे वकूब नसलेले डॉक्टर होऊन भारताची लोकसंख्या कमी व्हायला हातभार लावतील हा उल्लेख संपादकांनी का बरे टाळला असावा? तसेही संपादक सवर्णद्वेष्टे आहेतच त्यामुळे हा उल्लेख राहून गेला असावा
     Reply
     1. D
      Dilip Natekar
      May 14, 2017 at 1:30 pm
      NEET has as ensured that MBBS and BDS admissions are on merit.Why BAMS admissions are not under NEET ?If BAMS stands for Bachelor Of Ayurvedic Medicine & Surgery how can they practice allopathic medicines? Are they taught allopathy ,pharmacology to dispense allopathic medicines? Are they eligible to carry out surgery? Are they taught basic simple surgeries and do they ever practice surgeries? Same about BHMS homeopathic degree holders. They should practice only homeopathic medicines.
      Reply
      1. R
       rohan
       May 14, 2017 at 12:49 pm
       ....मग नंतर राग येतो ह्या व्यवस्थवेवर....मग चीड येते....आणि शेवटी असा विचारही येतो की थंड डोक्याने ह्या सगळ्या व्यवस्थेला तैयार केलेल्या तिच्या हितसंबंधातील मधल्या व्यक्तींना गोळ्या घालून असल्या भ्रष्ट विचारांना नष्ट करावे... नाही तर उलटे बांधून ओल्या बांबूचे फटके द्यावेत... वैद्यकीय व्यवस्था जी सर्वात पारदर्शक आणि क्लीन पाहिजे होती तीच सर्वात जास्त भ्रष्ट कसं काय होत आहे... जर तिची प्रवेश प्रक्रिया एवढी खालच्या पातळीवर राबवली जात असेल तर तर समाज म्हणून आपण डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे हे कसे सांगणार... खरंच एवढी वैचारिक भ्रष्टात आणि दिवाळखोरी ह्या क्षेत्रात येत असेल तर पुढे जाऊन तेच गुणवंत डॉक्टर ह्या समाजाला वेठीस धरणार...
       Reply
       1. R
        rohan
        May 14, 2017 at 12:41 pm
        खरंय.... Literally वैद्यकीय शिक्षणात खूप घोळ झाला आहे... आणि ह्याला कोर्ट पासून ते सरकार...प्रशासन....आणि संस्था हे सर्व कारणी आहेत... कोर्टाने दार महिन्यात निर्णय द्यायचे....त्यामुळे जुने निर्णय बदलणार....आणि मग सरकार तर आधीच गुंगीत असते....आणि त्याच फायदा प्रशासन घेते आणि संस्था मोकतपने आपले काम करतात... ह्यावर्षीची neet pg 2017 ची common counsel एवढी बोगस आणि तत्वाला हरताळ फासणारी आहे की सगळे मुद्दाम नियोजन करून गोंधळ नीतिमान करण्याचे ठरले होते असेच दिसत आहे.... साधी गोष्ट आहे एखाद्या विद्यार्थ्याला मेरिट नुसार एखादे खाजगी कॉलेज भेटले असेल आणि त्याची mangament ची फीस ही 50 लाख/वार्षिक असेल तर जरी त्याचे कडे neet मधून आलेले मेरिट असले तरी तो कसा काय एवढी फीस भरणार...?आणि ते पण कशाच्या नावावर तर इतर सीटस ला क्रॉस सबसिडी द्यायची म्हणून आणि ती सबसिडी असलेली सीट कितील तर वार्षिक 7-10 लाख रुपये...म्हणजे तिथे पण घोळ...मग ह्या सर्वात मेरिट कुठे आहे... आपल्या राज्याने आणि त्याच्या competant ऑथोरिटी ने तर इतका बोगस पण आणि घोळ केला आहे प्रवेश प्रक्रियेत की दुःख होते हे बघून
        Reply
        1. P
         pravin
         May 13, 2017 at 8:06 pm
         महाराष्ट्रातील जहागिरदारीची मानसिकता असलेल्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी शिक्षणव्यवस्थेचे पार दिवाळे वाजवले. पण ह्या पक्षाला पूर्ण दाेष देण्यात काही अर्थ नाही. इथल्या मध्यम वर्गात राजकीय व्यवस्था चालवण्याचा वकुब कधीच नव्हता.आपल्या लायकीप्रमाणे नेते आपल्याला मिळाले हे सत्य आपण. स्विकारले पाहिजे. प्रवीण म्हापणकर.
         Reply
         1. U
          umesh
          May 13, 2017 at 5:32 pm
          या सगळ्या नासाडीची सुरुवात त्या हलकट आणि चौथी पास वसंतदादा पाटलाने केली त्याने खासगी महाविद्यालयांचे चराऊ कुरण कॉंग्रेसी राजकारण्यांना खुले केले तेथूनच महाराष्ट्राचा शैक्षणिक ऱ्हास सुरु झाला कॉंग्रेसी नेते यास जबाबदार आहेत त्यांच्यावर थेट टीका करताना संपादकांची कॉंग्रेसनिष्ठा आडवी आली असावी ज्या राज्याचा मुख्यमंत्री चौथी पास इतका उच्चशिक्षित असू शकतो ते राज्य काय लायकीचे असेल हे काय सांगायला हवे?
          Reply
          1. अनामिक
           May 13, 2017 at 4:37 pm
           सत्य आहे सर अशाच एका इंजिनीरिंग कॉलेज च्या अशाच नकली PhD असलेल्या प्रिन्सिपॉल ने Thursday च स्पे thirstday लिहिल्याचे मी बघितले आहे
           Reply
           1. H
            harshad
            May 13, 2017 at 2:35 pm
            Tawade Chya degree baddal pan bolalya pahije
            Reply
            1. B
             Balmohan, USA
             May 13, 2017 at 1:26 pm
             I do not know the impact of recent PhDs on the society but if what is described about the medical Doctors in India -if true, should be a cause of alarming concern as these folks make a living on treating masses of sufferers with health issues. Just shocking!
             Reply
             1. A
              Annika Surana
              May 13, 2017 at 12:21 pm
              This is the kind of clear thinking we need in this country. It is not mere criticism but real concern that goes into such insightful writing.
              Reply
              1. H
               Hemant Kadre
               May 13, 2017 at 10:35 am
               महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रात जी अधोगती झाली आहे ती अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचा परिपाक आहे. काँग्रेस पक्षाने सत्तास्थानांचे वाटप करण्याकरिता शिक्षण संस्था, कारी बँका, कारी साखर कारखाने, सरकारी महामंडळांचे संचालक पद यासारखे क्षेत्र निवडले. यातुन समाजाचा, देशाचा विकास हे उद्दीष्ट नव्हते तर खा, खा आणि अगदी अजीर्ण होइस्तोवर खा असे अलिखीत धोरण ठरले. पैसे फेकले की माणसे विकत घेता येतात व पैशाकरिता माणसे लाचारी पत्करतात असे चित्र निर्माण झाले. समाजासमोर आदर्श दिसणे धुसर झाल्यावर समाज सैरभैर झाला. स्वत:च्या तीन संस्था काढायच्या. त्या तीन संस्थांनी एकमेकांशी आर्थीक व्यवहार करायचे व त्यात स्वत:चे उखळ पांढरे करायचे असे नॅशनल धोरण उघडपणे राबविल्या गेले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनीही वैचारीक बांधीलकी ऐवजी पैशाशी बांधीलकी स्वीकारली. शैक्षणीक क्षेत्राला लागलेली कीड खूप खोलवर आहे. ही कीड घालविण्याकरिता अनेक वर्षे लागतील अशी स्थिती आहे. विनोद तावडे यांनी या विषयाला तोंड फोडले याचे स्वागतच करायला पाहिजे.
               Reply
               1. आदित्य अंकुश देसाई
                May 13, 2017 at 10:18 am
                शिक्षण महर्षी आणि शिक्षण सम्राट या दोन शब्दांमध्ये अर्थभेद आहे. सम्राट हा समाजातील हुकूमशाहीचे प्रतिनिधीत्व करीत असतो. तर ऋषीं तपसाधनेचे... शिक्षण सम्राट ही संकल्पना महाराष्ट्रात रूढ करून प्राथमिक ते पदवी पातळीवर शिक्षणाचा धंदा सुरू झाला. सरकारला सर्व शिक्षा अभियान राबवायचे आहे पण दुसरीकडे विनाअनुदानित व्यवस्था निर्माण करून हात झटकून मोकळे व्हायचे आहे. एकीकडे नाक दाबल्याचा आव आणायचा पण दुसरीकडे उघडलेल्या तोंडात घास भरवायचा... किती शिक्षण संस्चाथाचालक उच्च शिक्षित आहेत... याचेही एक सर्वेक्षण करा मग कळेल की पाणी कुठे मुरते आहे.... एकूणच आंधळ दळतंय नि.... विद्यापीठ खातंय.
                Reply
                1. S
                 Surendra Belkonikar
                 May 13, 2017 at 9:59 am
                 सदरहू लेख फ्रम करून शिक्षण मंत्र्याच्या कक्षात टागावा
                 Reply
                 1. S
                  Shreekant Tare
                  May 13, 2017 at 9:52 am
                  पी एच डी शिक्षक म्हणजे चांगला प्राध्यापक हा फार मोठा गैरसमज आहे. १०० टक्के गुणवान पी एच डी मिळवलेला शिक्षक अत्यंत रटाळ शिकवू शकतो. त्यामुळे एकूणच पी एच डी ची अनिवार्यता हा धूर्त आणि बुद्धीचा कंत्राट घेतलेल्या लोकांनी केलेला बनाव आहे. आणि मग हे ऐच्छिक असेल तर फक्त गुणवान लोकांना पुढे येता येईल. सामान्य शिक्षकाचं काय हो, ते तर बैल आहेत ओझ्याचे.
                  Reply
                  1. P
                   Prashant
                   May 13, 2017 at 9:11 am
                   ज्या क्षेत्रात राजकारण्याचा शिरकाव ते क्षेत्र नासलेच म्हणून समजा. समाजसेवा, शिक्षण, बांधकाम व्यवसाय, अर्थ, वैद्यक, क्रिडा (ही यादी खूप मोठी आहे.) सर्वांची वाट लावलेली आहे. आजकाल राजकारणी नावाच्या प्राण्याकडे सामान्य माणूस संशयास्पद नजरेने बघत असतो.
                   Reply
                   1. R
                    rmmishra
                    May 13, 2017 at 9:11 am
                    उच्च वर्गाचा दाम्भिकपना उघडकिस आननारा उत्तम अग्रलेख। अजुनहि या देशाला गुणवत्तेच्या मार्गावर बराच लाम्ब पल्ला गाठायचा आहे
                    Reply
                    1. S
                     Shriram Bapat
                     May 13, 2017 at 8:29 am
                     काय हे विनोदराव ? तुम्हाला "तिळा तिळा दार उघड" मंत्र कळला तर गपचूप कुणी पाहत नाही हे बघून अधून मधून गुहा उघडायची, हवे तेवढे धन घ्यायचे आणि दरवाजा बंद करायचा तर तुम्ही सगळ्यांना बोंबलून तो मंत्र सांगताय. म्हणजे फुटलेली प्रश्नपत्रिका हातात आली तर एकट्याने भरपूर मार्क मिळवण्याऐवजी तुम्ही झेरॉक्स काढून ती मित्रात वाटणार ? हे बरे नाही. आता त्या तीस्ताबाईचे धवल चारित्र्य किंवा नोटबंदीचे ढीगभर तोटे हे पुस्तक वाचल्यावरच कळणार. तेव्हा ते पुस्तक वाचून त्यातले सर्व आपल्याला आधीच माहिती होते असा आव आणायचा असतो एवढंही तुम्हाला कळेना ? उद्या ट्रम्पवर खरमरीत हल्ला करायचाय तर त्याची माहिती असायला तो काय माझा शेजारी आहे. मग ट्रम्पवर डूख असणारा तिकडच्या एखाद्या पत्रकाराचे लेखन वाचायला लागणारच. त्याचे नाव लेखात देण्याची काय गरज आहे? अशाने भारतातले सगळेच थोर्थोर संपादक Ph D इन CP (कटिंग पेस्टींग ) ठरतील ना ?
                     Reply
                     1. B
                      Bharat Shevkar
                      May 13, 2017 at 7:36 am
                      Would Mr Kuber mind to educate Loksatta readers on National Herald, Young Indian, Indian National Congress, hi Family and the case filed by Dr Subramaniun Swami. Why the court directed investigation, why hi Family avoiding investigation...
                      Reply
                      1. Load More Comments