23 September 2017

News Flash

भेदाभेद भ्रम.. कसले काय?

गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे.

लोकसत्ता टीम | Updated: September 9, 2017 2:14 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

 

वाद सोवळ्या-ओवळ्याचा असला, तरी तो केवळ वैयक्तिक धर्मपालनाच्या स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही..

फसवणूक हा गुन्हाच आहे. तो कोणी आणि कशासाठी केला याला काही महत्त्व नाही. गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे. याबाबत आपण सारेच सहमत आहोत. कारण आपण देशाची राज्यघटना मानतो, येथील कायदे आपणांस प्रमाण आहेत आणि आपण कायदाप्रेमी देशप्रेमी नागरिक आहोत. पुण्यातील ‘त्या’ घटनेबाबत बोलताना सुरुवात करायची तर ती येथूनच झाली पाहिजे. परंतु त्या आधी एक बाब समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे खरोखरच ती घटना चर्चेला घ्यावी अशी आहे का? तेवढे महत्त्व तिला द्यावे का? की दोन व्यक्तींमधील ते एक छोटेसे भांडण म्हणून त्या घटनेकडे दुर्लक्ष करावे? तसे पाहिल्यास ती घटना खूपच छोटीशी आहे. एका ब्राह्मण महिलेची अब्राह्मण महिलेने फसवणूक केली. जात लपवून तिचे सोवळे मोडले. त्याबाबत जाब विचारला असता त्या दोघींत भांडण झाले. प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनाही त्यात काय करावे हे समजेना. त्यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर तक्रार नोंदविली. आता याला किती महत्त्व द्यायचे? खासगी भांडण म्हणून ही बाब सोडून देता येणार नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. हे भांडण वैयक्तिक असले, तरी ही बाब खासगी नाही. वाद सोवळ्या-ओवळ्याचा असला, तरी तो केवळ वैयक्तिक धर्मपालनाच्या स्वातंत्र्यापुरताच मर्यादित नाही. कोणी तरी कोणाची फसवणूक केली हीच त्याची लक्ष्मणरेषाही नाही. त्यापलीकडे जाऊन आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जातीय अस्मिता बाजूला ठेवून या संपूर्ण प्रकरणाकडे पाहावे लागेल. कारण या घटनेचा संबंध आपणांस नेमकी कोणती समाजव्यवस्था अभिप्रेत आहे याच्याशी आहे.

हिंदुस्थानच्या इतिहासात वर्णव्यवस्था कधी आली आणि अस्पृश्यता, जातिव्यवस्था कधी सुरू झाली याबाबत इतिहासतज्ज्ञांनी वाद घालावेत. वर्ण कोणत्या पुरुषाच्या कोणत्या अंगातून निर्माण झाले याबाबत तोंड फुटेपर्यंत चर्चा कराव्यात. वर्णभेद हे गुणकर्मानुसार होते अशी पांघरुणेही खुशाल घालावीत. मुद्दा आजचा आहे. काहींच्या म्हणण्यानुसार इसवीसनाच्या चौथ्या शतकापूर्वी भारतात अस्पृश्यता होती. जातिप्रथा दृढ झालेली होती. त्या जातिप्रथेच्या साखळ्या आजच्या काळात सैल झालेल्या आहेत की नाहीत हा खरा आजचा प्रश्न आहे. पुण्यातील त्या घटनेने तो उपस्थित झाला आहे. याचा अर्थ तो नव्हता किंवा त्याची चर्चा होत नव्हती, असे नाही. तो प्रश्न कायमचा आहे. आपले सारे सुधारक जातिअंताची लढाईच तर लढत होते. ते सुधारक गेले. लढाई कायम आहे. परंतु आपल्या, म्हणजे शहरी उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षितांच्या दृष्टीने हा जो जातिअंताचा वा खरे तर जातिभेदाचा मुद्दा आहे तो सध्याच्या काळात राहिलेला नाही. त्यातही आपण थोडे अधिक पुरोगामी असू, तर असे म्हणू की त्याची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्याची सत्यता पटवून देण्यासाठी आपल्याकडे दाखल्यांची कमतरता नसते. आपले मित्र खालच्या जातीतील असतात. ते आपल्या घरी सत्यनारायणालाही येत असतात. त्यांच्यासाठी काही आपण वेगळी भांडी ठेवत नसतो वगैरे. आपल्याला हा जातीयवाद भेडसावतो तो दोनच ठिकाणी. त्यातील एक ठिकाण निवडणुकीचे आहे आणि दुसरे आरक्षणाचे. या दोन घटनांमुळेच जातीचे राजकारण वाढले आहे. मंडल आयोगामुळेच तर जातिभेद वाढला आहे असे आपले म्हणणे असते. त्याही पुढे जाऊन, आता या आरक्षणाची आवश्यकताच नाही. कारण की आता जातिभेद वगैरे काही राहिलेला नाही. ‘त्यांच्यातले’सुद्धा आता पुढारले आहेत, असे आपण एकमेकांना सांगत असतो. त्यासाठीचे खंडीभर पुरावे आणि युक्तिवादही आपल्याकडे तयार असतात. पुण्यातली ती घटना यासाठी महत्त्वाची, की तिने आपल्या भोवतीचे हे सगळे छान छान हवामानच बिघडवून, विस्कटून टाकले. एक कोट रचला होता आपण आपल्या मनाभोवती. जातीय अत्याचाराच्या घटना आपल्या काळजापर्यंत पोहोचूच नयेत याची मोठी खबरदारी घेतली होती आपण. त्यामुळे कुठे कुणाची गाढवावरून धिंड निघाली, कुठे कोण मंदिरात प्रवेश केला म्हणून मेला, कुठे कुणाच्या विहिरींत विष्ठा टाकण्यात आली, ही आपल्या दृष्टीने फार फार तर साधी गुन्हेगारी कृत्येच ठरत असत भारतीय दंडविधानाच्या कलमांतली. कुठे आहे जातिभेद, असे म्हणण्यासाठी ती कलमे यापूर्वी उपयोगीही पडली आहेत. पुण्यातील त्या घटनेने मात्र ती सोयही ठेवलेली नाही. अतिवृष्टीने आलेल्या पुरानंतर अवघी गटारघाण रस्त्यावर यावी, त्याप्रमाणे त्या घटनेमुळे आपल्या मनातील जातीय भावनांचे झाले आहे. पेठापेठांतील गप्पांतून, समाजमाध्यमांतून त्याचा कचरा स्पष्टपणे तरंगताना दिसत आहे. आपली सगळी तर्कबुद्धी, आपले सगळे वकिली शहाणपण पणाला लावून आपण आज ती जातीयवादाची घाण झाकण्याचा प्रयत्न करीत आहोत.

खरोखरच सोवळे-ओवळे पाळणे हा ज्याचा-त्याचा खासगी प्रश्न आहे? ज्यांना वाटते की तसा तो आहे, त्यांनी स्वत:च्याच मनास विचारावे, की ‘ज्याचा-त्याचा खासगी प्रश्न’ ही कल्पना आपणास पूर्णत: मान्य आहे का? ही वैयक्तिक स्वातंत्र्याच्या, खासगीपणाच्या अधिकाराच्या जवळ जाणारी कल्पना. आपण इतरांना तो अधिकार देण्यास तयार आहोत का? ज्याने-त्याने आपल्या घरात हवे ते खावे-प्यावे, हवे तसे – हवे तर ‘लिव्ह इन’ पद्धतीने – राहावे, अशा गोष्टी आपण मान्य करण्यास तयार आहोत का? त्याला मात्र आपला विरोध असतो. हा दुटप्पीपणा झाला. परंतु तो मान्य केला आणि जोवर आपले सोवळ्याचे धर्मस्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याआड येत नाही, तो घरगुतीच मामला असतो, तोवर ते अयोग्य नाही असे मानले, तरी त्यातून जो स्पृश्यास्पृश्यतेचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, जातिभेदाचा मुद्दा समोर येतो त्याचे काय, हा प्रश्न आहेच. सोवळे पाळणे ही काही कोण्या पोकळीतून उगवलेली बाब नाही. तिला जेवढे धार्मिक संदर्भ आहेत, तेवढेच सामाजिकही आहेत. ते संदर्भ हटवून पुण्यातील त्या घटनेकडे कोणी पाहात असेल, तर ते आपल्या पारंपरिक दांभिक वृत्तीला शोभेसेच होईल. त्यामुळे सोवळ्या-ओवळ्याची कल्पना आणि अस्पृश्यता यांचा संबंध काही तुटणार नाही. मुळात जन्मजात विषमतेच्या कल्पनेच्या पायावर हे सोवळे उभे आहे. आपल्या अनेक संतांनी त्याचा धिक्कार केला आहे. सुधारकांनी त्याविरोधात रान उठवले आहे. हा इतिहास असल्याने अलीकडे या अशा मूढ धार्मिक कल्पनांना विज्ञानाचा झगा नेसवला जातो. सोवळ्याने स्वयंपाक करणे हे कसे स्वच्छतेशी, आरोग्याशी निगडित आहे असे हल्ली बजावून सांगितले जाते. मनूने कधी तरी सांगितले की, रज:स्वलेची दृष्टी पडलेले अन्नही ब्राह्मणाने वर्ज्य मानावे. त्यामागे किती तरी मोठे शास्त्र आहे असे सांगणारे लोक आज आहेत. ‘विटाळशी’च्या शरीरातून कसलेसे किरण बाहेर पडत असतात. ते अन्नात गेले की ते विष बनते अशी काहीही भंपकबाजी केली जाते. स्त्रियाही त्यापुढे माना डोलावताना दिसतात.. स्वच्छतेला कोणाची ना असणार? ती हवीच. त्याचे सोवळ्याशी नाते जोडणे, स्वयंपाकासाठी विधवा नको, तर ‘सुवासिनी’च हवी असे मानणे, यातून मात्र आपण केवळ अवैज्ञानिकतेलाच खतपाणी घालत नसतो, तर मानवी प्रतिष्ठेचाच अपमान करीत असतो. जी व्यक्ती विधवेला अपवित्र मानते ती धार्मिक भलेही असेल, तिला सुसंस्कृत कसे म्हणणार?

ही असुसंस्कृतता खरे तर कोण्या एका समाजगटाची मक्तेदारी नाही. आज एका ब्राह्मण महिलेशी संबंधित घटना घडली म्हणून सगळे ब्राह्मण जातीयवादीच अशी झोड कोणी उठवीत असेल, तर त्याच्याहून जातीयवादी अन्य कोणी नाही. जातिश्रेष्ठत्वाची भावना हीसुद्धा आज कोण्या एका जातीची मक्तेदारी राहिलेली नाही. ही बाब लक्षात घेऊनच, पुण्यातील त्या घटनेकडे पाहावे लागेल. तसे पाहणे शक्य नसेल, तर मात्र आपल्यासमोर दुसरा पर्याय आहेच. त्या घटनेकडे केवळ फसवणुकीचे प्रकरण म्हणून दुर्लक्ष करण्याचा. आता त्यात कोणाला दांभिकता दिसेल. पण त्याला नाइलाज आहे. तसे एरवीही ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ वगैरे भजने म्हणत आपण छानपैकी जातिभेद पाळत असतोच.

First Published on September 9, 2017 2:14 am

Web Title: former pune imd director medha kolhle files cheating case against her cook for hiding caste
 1. D
  Durgesh Bhat
  Sep 13, 2017 at 8:36 pm
  जोवर देशात जातीपातीचे राजकारण, जातीवरून आरक्षण (शिक्षण, नोकरी आणि नोकरीतील बढती) टिकेल. आणि जोवर सामान नागरी कायदा येत नाही. तोवर जाती जातीमध्ये मतभेद कायमच राहणार. उच्चं नीच भेदही राहणार. तुम्ही कितीही सेक्युलर सेक्युलर बॉम्ब मारल्यात तरीही काहीही उपयोग होणार नाही. अरे एकीकडे सेक्युलॅरिसम च्या बॉम्ब मारायच्या आणि मतपेट्या भरण्यासाठी धर्म आणि जातीचे राजकारण करायचे. गेली ७० वर्षे हाच खेळ राहिला आहे.
  Reply
  1. P
   Prasad Sutar
   Sep 11, 2017 at 7:35 pm
   मा.खोले म्याडम, धन्यवाद ! तुम्ही फार चांगलं काम केलं ! हवामान खात्याच्या माजी संचालिका 'उच्चजातीय' मेधाताई खोले यांनी 'कनिष्ठजातीय' निर् ाताई यादव यांच्यावर देव बाटविल्याचा व जात लपविल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला आहे.त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो व तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.झोपी गेलेल्या एका मोठ्या समाजाला तुम्ही थोडीफार का होईना ते शूद्र असल्याची व ब्राम्हणाच्या लेखी त्यांची कवडीचीही किंमत नाही हे दाखवून दिल्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा.२५ वर्षापासून आम्हीही हेच सांगत होतो की ब्राम्हण समाज मराठ्यां ीत संपूर्ण बहुजन समाजालाच अतिशय नीच आणि कनिष्ठ समजतो.वरुन जरी ते तसे दाखवित नसले तरी तरी मनातून माञ त्यांची हीच भावना असते याचा अनुभव शेकडो वर्षापासून आपल्या सर्वच महामानवांनी अनेकदा घेतलेला आहे.मेधाताईंनी पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम.ताई,यामधे तुमची काहीच चूक नाही.तुमच्या जातीमधे बहुजन समाजाबद्दल जे आचार, विचार,भावना आहे ते तुम्ही जाहीरपणे व्यक्त केले एवढीच तुमची एक चूक झाली.
   Reply
   1. M
    milind
    Sep 11, 2017 at 12:35 pm
    म्हणाल तर चूक गोष्ट आहे पण संविधानाने धर्माचे आचरण स्वतंत्र दिले आहे. त्यामुळे काहींना हलाल अन्न लागते तर काहींना सोवळे. पण शाळे पासून नोकरी पर्यंत जात दाखवून फायदे जर चुकीची जात दाखवल्या मुळे रद्द होऊन जेलहि होऊ शकते तर मग धार्मिक कार्यात काही विशिष्ट कामासाठी फसवणूक केली तर गुन्हा दाखल होणे बरोबरच आहे. जाती प्रथा बंद करायची तर सर्वच करायला हवी. निवडक नाही. मी धर्म शास्त्रानुसार पाळत नाही ना जात पण कोणीही त्यांच्या घरात धर्म पालन करत असेल तर त्याला माझा विरोध नाही, पण घरा बाहेर केला तर चूकच म्हणेन.
    Reply
    1. M
     mayur tambe
     Sep 11, 2017 at 10:50 am
     कुठला गुन्हा, जातीभेद करणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे. मात्र काही अतिउत्साही व सत्तेमुळे हा पोटात दडून ठेवलेला बॉम फुटला आणि एक मात्र उघड झाले, समजलं कि मराठ्यांना ब्राम्ह्मण समाज उचनिचतेत पाळतो त्याला शूद्र समजतो.स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना दुखवत नव्हता पण जशी सत्ता आली तसा आपला विषारी वर्णव्यवस्तेचा फणा बाहेर काढला. म्हणजे बौद्ध समाज सोडला तर इतर समाजाला हे आपल्या तालावर नाचवित होते आणि हे नाचत होते. मग मराठा समाज कुणाच्या सांगण्यावरून बौद्ध समाजाला दुखवत होता. शूद्र समजत होता.सोवळे-ओवळे पाळणे या घटनेचा संबंध आपणांस नेमकी कोणती समाजव्यवस्था दाखवते. जातिश्रेष्ठत्वाची भावना हीसुद्धा आज कोण्या एका जातीची मक्तेदारी राहिलेली नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मानवी प्रतिष्ठेचाच अपमान आहे हा.
     Reply
     1. J
      Jaat nirmulak
      Sep 11, 2017 at 10:19 am
      तुम्हाला जाती चा एवढा प्रॉब्लेम असेल तर निवडणुकीत जागा राखीव का ठेवता. सगळी कडे जात पहिली जातेच.
      Reply
      1. B
       Baman
       Sep 10, 2017 at 11:34 pm
       या लेखात तुकाराम महाराजांचा अपमान करणयात आलाय...बामटयांनो सुधरा... नाहीतर गायब करु...
       Reply
       1. S
        Shrikant Yashavant Mahajan
        Sep 10, 2017 at 11:08 pm
        खोलेबाई तुम्ही चुकलात, या देशात नाहीरे/अल्पसंख्य/गरीब आर मोअर इवल, हे तुम्हाला समजलं कसं नाही
        Reply
        1. S
         Shrikant Yashavant Mahajan
         Sep 10, 2017 at 10:49 pm
         एक वरील प्रसंगाला समर्पक अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे- रस्त्यावर अपघात झाला तर त्या मध्ये असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये जो श्रीमंत त्याचीच नेहमी चूक मानली जाते, उदाहरणार्थ स्कूटरवाला व कारवाईला यांच्या अपघातात कारवाल्याचीच चूक गृहीत धरली जाते, कारण घटना घडल्यानंतर पुराव्यानिशी सिद्ध करणं अवघडच. असाच एक दुसरा प्रकार-सरकार भले उसने अवसान आणत म्हणते की, धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या जीवाची जबाबदारी घरमालकाची.पण, de facto condition- बिल्डिंग धोकादायक असताहि ती सोडायची झाली तर सरकारने पर्यायी निवासव्यवस्थाही करायची, हे न झाले व इमारत पडली तर मृत व्यक्तिच्या वार ४-४ लाखांची भरपाई सरकारने द्यायची, विशेष करून हे रहिवासी अल्पसंख्य समाजातील असतील तर.संपादक मंडळीमात्र, उगाच शाहबानो, आझाद मैदानावरील उच्छाद इत्यादी वेळी आपली लेखणी झिजवत नाहीत, हा या देशाचा न्याय आहे, या देशाची परंपरा आहे.आरक्षणाचा जोर वाढेल तसा जातीयवाद वर्धित होणार हे नक्की, हे सत्य बाबासाहेब आंबेडकरांनी जाण्याने त्यांनी १०वर्षांची मर्यादा घातली होती.अशा १००० लोकशाही देशाचा भविष्यकाल उज्वल आहे.
         Reply
         1. P
          Prasad Sutar
          Sep 10, 2017 at 7:47 pm
          मराठ्यांच्या हातून खाल्यावर धर्म हीचा बाटला ! कुंभाराच्या हातचा गणपती देव्हाऱ्यात कसा थाटला ? या कुणब्याने शेतीत पिकवले तेच हिने घरात शिजवले आम्ही अक्षदा न त्यात तू म भात खाल्ला आता नाही का बाई धर्म तुझा बाटला ? काय तर म्हणे तू शूद्र नाही तू बामन जात तुझी मराठा मोठी आफिसर ना बाई ग तू हा तर लोकशाही वर वरवंटा ! वाटलं होतं नोकरी सरकारी असेल विचारांना विज्ञानाची धार पण तू तर नुकतीच शिकली पण दिसते मात्र अडाणीच फार देवाच्या मुखातून आली म्हणते ना तू देवावर तरी विश्वास असावा जर त्याने जातीव्यवस्था बनवली असती तर जन्मतःच शिशु वर का जातीचा जन्मखून कोरलेला नसावा ? पण तू एक फार बर केलंस सोहळ तुझं वाटलं म्हणत आमच्या येड्या गबाळ्या लोकांना शहाणं केलं आता तरी मराठा उघड डोळे काढ खोट्या प्रतिष्ठेचे चष्मे या जातीव्यवस्थे चे अनुभव कुणालाच नाही चुकले शिवरायांचा राज्याभिषेक असो किव्हा शाहू महाराजांचा वैदिक प्रकरण जातीमुळे शूद्र म्हणून यांनी सगळ्यांचे केले चारित्र्यहनन
          Reply
          1. P
           Prasad Sutar
           Sep 10, 2017 at 7:46 pm
           मराठ्यांच्या हातून खाल्यावर धर्म हीचा बाटला ! कुंभाराच्या हातचा गणपती देव्हाऱ्यात कसा थाटला ? या कुणब्याने शेतीत पिकवले तेच हिने घरात शिजवले आम्ही अक्षदा न त्यात तू म भात खाल्ला आता नाही का बाई धर्म तुझा बाटला ? काय तर म्हणे तू शूद्र नाही तू बामन जात तुझी मराठा मोठी आफिसर ना बाई ग तू हा तर लोकशाही वर वरवंटा ! वाटलं होतं नोकरी सरकारी असेल विचारांना विज्ञानाची धार पण तू तर नुकतीच शिकली पण दिसते मात्र अडाणीच फार देवाच्या मुखातून आली म्हणते ना तू देवावर तरी विश्वास असावा जर त्याने जातीव्यवस्था बनवली असती तर जन्मतःच शिशु वर का जातीचा जन्मखून कोरलेला नसावा ? पण तू एक फार बर केलंस सोहळ तुझं वाटलं म्हणत आमच्या येड्या गबाळ्या लोकांना शहाणं केलं आता तरी मराठा उघड डोळे काढ खोट्या प्रतिष्ठेचे चष्मे या जातीव्यवस्थे चे अनुभव कुणालाच नाही चुकले शिवरायांचा राज्याभिषेक असो किव्हा शाहू महाराजांचा वैदिक प्रकरण जातीमुळे शूद्र म्हणून यांनी सगळ्यांचे केले चारित्र्यहनन
           Reply
           1. S
            S.P.Surwade
            Sep 10, 2017 at 3:54 pm
            हा लेख फक्त खोलें साठीच लिहला आहे का साहेब ? यात दुसरी बाजू दिसत नाही लेख सुंदर लिहलाय पण, दोनी बाजू आल्या असत्या तर बरं झाले असते असो शेवटी लिखाण स्वातंत्र्य आहे हे हि तितकेच खरे
            Reply
            1. S
             Sanjay Totawar
             Sep 10, 2017 at 1:50 pm
             अजून किती काळ आपण ह्या अमानुष रूढींना कवटाळून राहणार ? त्यातल्या काही रूढींना आपण सर्व, समाज म्हणून ,धर्म म्हणून व काळाची गरज म्हणून तिलांजली देऊन नव्याने सुसूत्रपणे अंगीकार करणार कि एकमेकांच्या दहशतीत राहणार ?
             Reply
             1. R
              rohan
              Sep 10, 2017 at 1:09 pm
              ....तो असा होता की त्या आजीने त्या घरातील पाण्याच्या आणि इतर गोष्टीना हाथ लावायचा नाही....कारण जात भेद... ा त्यावेळेस हे वाटले की त्यांनी हाथ पाय धुतले होते...तरी पण त्या तिथे भांडे घेऊन फक्त हापाशीला हाथ लावून पाणी घेण्यास घाबरत का होत्या...ते पण तिथे कुणीही दुसरे व्यक्ती नसताना...पण त्याचा अर्थ नंतर मोठा झाल्यावर कळला.... Its a clear case of social discrimination....हे घडले असेल 20 वर्षे पूर्वी जवळपास.... पण आता त्याच वाड्यात कोणतीही व्यक्ती बिनधास्त पाणी घेते...हा हापशी नाही पण मोटार चालू करून... कदाचित बदलत्या हापशी जाऊन मोटार येणाच्या काळात हा थोडा फार सामाजिक बदल झालेला दिसत आहे तिथे...असा नाही आहे की तो 100 बंद झाला आहे... पण अश्या दैनंदिन गोष्टी मधून तरी तोच कमी होत आहे.... वेळ तर लागणारच कारण तो बदल आहे...क्रांती नाही....फरक हाच की तो शाश्वत असेल...क्रांती सारखा अजून एक नवीन व्यवस्था निर्माण करणारा नसेल....पण हे असे काही वाचनात आले की वाटते...अजून पुणेच मागास आहे तर बाकी भागांना तेवढा तरी वेळ द्यायला पाहिजे...हा बदल स्वीकारण्यास....
              Reply
              1. R
               rohan
               Sep 10, 2017 at 12:56 pm
               जात भेद समाजात आहे हे सांगायला प्रयोगशाळेतील मायक्रो स्कोप ची गरज नाहीच... पण जरी ती सामाजिक प्रथा असली तरी शेवटी रोजच्या दैनंदिन जीवनात आपण ती किती पाळतो त्यावर तिचे अस्तित्व असते किंवा नसते....ते पण एखादा जात मानत माजी असे म्हणणारा तो सगळ्या वेळी सगळ्या परिस्थिती मध्ये तसेच वागेल ह्या शास्वती नाहीच... मी स्वतः लहानपणी...अगदी 12 वि पर्यंत असताना आमच्या गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जात होतो.तिथे 6-7 वर्गात असताना असाच एक सुट्टीत आमच्या वाड्याच्या आत मधील मागच्या बाजूस एक पिण्याचा पाण्याचा हापास होता....तिथे दुपारी वासरांना बादलीने पाणी पाजणे हा सुट्टीतला एक दैनंदिन आवडते काम करत होतो...तेव्हा गोठा साफ करणारी एक आजी हापशी जवळ आली आणि ा हाक मारून म्हणाली की मालक पाणी द्या पण हापसून प्यायला...मी वासराजवल होतो....म्हटले घ्या की आज्जी....तर ती म्हटली की नाही आम्हाला हाथ लावता येत नाही हापशी ला...पाण्याला... ा तेव्हा ते कळले नाही पी तिला पाणी काढून दिले... नंतर घरी विचारले तरी तिथून उत्तर क्लिअर नाही आले... मग जसे सगळे मोठे होतात वयाने...विचाराने तास झालो तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ कळला
               Reply
               1. E
                Ek Maharashtrian
                Sep 10, 2017 at 12:49 pm
                लेख उत्तम लिहिले आहे. अभिनंदन . ा फक्त एकच विचारायचे आहे, जर तक्रार करणारी महिला हार्ट अटैक ने मरणासन्न अवस्तेथ पडून असती तेव्हा तिने याच महिलेला मदतीची विनवनी केली असती की आधी सोवले बघितले असते. मानुस म्हणून बघायला हव, आणि मानुसकि हीच जात म्हणून मिरवायला हवि,,,,,
                Reply
                1. S
                 Shivram Vaidya
                 Sep 10, 2017 at 12:48 pm
                 डॉ. मेधा खोलेंसारख्या सुशिक्षित विदुषींनी अशा प्रकारची तक्रार करावी हे योग्यच नव्हते. मात्र काही अतिउत्साही आणि टीआरपी ला वखवखलेल्या (बे)जबाबदार प्रसिद्धी माध्यमांनी या प्रकरणाला जातीय रंग देऊन, तो एक राष्ट्रीय मुद्दा बनवला आणि ब्राम्हण विरोधी वातावरण निर्मिती करून, इतर जातीच्या बंधू-भगिनींकडून ब्राम्हण ज्ञातीची बदनामी करवून घेण्याची हौस फेडून घेतली हे ही काही गोमटे झाले नाही. असो. काहीही असले तरी दोन्ही बाजूंनी सलोख्याचा मार्ग निघाला हे चांगलेच झाले
                 Reply
                 1. A
                  Aniket Gandhi
                  Sep 10, 2017 at 12:24 pm
                  सोवळे ओवळे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्या स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या बाईला डाॅ. मेधा खोलेंची अट माहिती होती तर त्यांनी ते काम स्वीकार करायला नको होते. तरीही हा जातीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेल्याने या घटनेचा मी निषेध करतो.
                  Reply
                  1. D
                   Durgesh Bhat
                   Sep 10, 2017 at 9:59 am
                   आमच्या घरात माझे वडील, आई आणि पत्नी हे तिघेही सोवळे मानणारे आहेत, मी देवाची रोजची पूजा देखील करत नाही, माझ्या मते देवाला नुसता हात जोडून नमस्कार केला तरी चालेल. परंतु घरातील ३ जणांच्या भावना जर सोवळे पाळण्याच्या असतील तर निदान त्यांची इच्छा म्हणून जर मी सोवळे पाळले तर त्यात अवैज्ञानिक, मूर्खपणाचे किंवा व्यक्तिस्वातंत्र्यावर आघात असे काही नाही. काही गोष्टीचा विचार संपादकांनाही करावा, चपला घालून आपण देवळाच्या गाभाऱ्यात जाऊ का? सत्यनारायणाला मुद्दाम मटण बिर्याणीचा नैवेद्य दाखवू का? आठवडाभर अंघोळ न करता घरच्या देवांची पूजा करू का? देवळात जात असता चुकून गटारात पडलात तर तर तसेच देवळात जाल कि पुन्हा अंघोळ कराल?
                   Reply
                   1. D
                    Durgesh Bhat
                    Sep 10, 2017 at 9:50 am
                    आज हाच विषय आपल्या अग्रलेखात येईल याची खात्री होती. तुम्ही कितीही म्हणालात हा विषय चर्चेसारखा नाही तरीही या विषयाची चर्चा व्हायलाच हवी. फसवणूक हा एक मुद्दा आहेच पण धर्मस्वातंत्र्य हा हि एक मुद्दा आहे. माझ्या धर्माचे पालन मी कसे करायचे याचा अधिकार ा आहे. ा माझ्या घरात सोवळे पाळायचे असेल तर त्याला कोणीही नावं कसे ठेऊ शकतो. मी माझा धर्म माझ्यापुरता मर्यादित ठेवला आहे, तो मी इतरांवर लादत नाही, परंतु माझ्या घरात, माझ्या देव्हाऱ्यात किंवा माझ्या स्वयंपाकघरात कोणी आणि कसे वावरावे, सोवळे पाळावे कि ना पाळावे याचा अधिकारही ा नसेल तर काय उपयोग घटनेत लिहिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा? तास पहिलं तर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना २२ का २४ शपथ दिल्या आहेत हा देखील व्यक्तिस्वातंत्र्यावर बघताच आहे असे मी म्हणेन. ते स्वतःपुरती शपथ घेऊ शकत होते.
                    Reply
                    1. S
                     Saurabh
                     Sep 10, 2017 at 8:28 am
                     If the same thing happens in govt job then govt files FIR and remove that person from job . Just same thing happen here . We do not discriminate among us , govt teaches us discrimination by providing several schemes to certain category and others , India is the only nation where one exam has 6 to 7 cut off , even they don't fees for the education , they get admission in reputed colleges with less marks . There are nothing facilities for the general candidate . Till class 10 th we don't know to which category our friend belongs we share tiffin's with them and are best friend . But when same friend gets good college at lower marks without fees than us then at that time discrimination starts . Taxpayers pay taxes for development not for the welfare of the other castes . India is the only country where politics is based on castes . Reservation policy ruin the education system in India . See the cut off for IIT admission for those categories you will see differences. Really incredibleIndia
                     Reply
                     1. शरद
                      Sep 9, 2017 at 7:01 pm
                      'गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे.' आणि यासाठी पोलीसतक्रार करावीच लागणार. म्हणून या सर्वाला जातीय रंग द्यायचे कारण काय हे सुज्ञांस वेगळे सांगावयास नको.
                      Reply
                      1. Load More Comments