25 September 2017

News Flash

अगतिकतांची कणखरता

ओबोर परिषदेस येण्यासाठी काही मुद्दय़ांवर चर्चा व्हावी

लोकसत्ता टीम | Updated: May 15, 2017 3:25 AM

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग

ओबोर परिषदेस येण्यासाठी काही मुद्दय़ांवर चर्चा व्हावी, ही आपली मागणी चीनने मानली नाही. मग परिषदेवर बहिष्कार टाकणे, हाच पर्याय आपल्यासमोर उरला..

सुमारे २९ देशांचे प्रमुख, ६५ देशांतील उच्चपदस्थ, अन्य अनेक देशांतील अधिकारी, अभ्यासक अशा अनेकांच्या साक्षीने रविवारी चीनमधे One Belt One Road – OBOR – ही अत्यंत महत्त्वाची परिषद सुरू झाली. साधारण ४४० कोटींच्या जनसंख्येस हा प्रकल्प स्पर्श करणार असून पुढील दशकभरात १ लाख कोटी डॉलर.. सुमारे ६५ लाख कोटी रुपये.. इतकी महाकाय रक्कम यावर खर्च करण्याची तयारी चीनने केली आहे. चीनला साजेशा भव्य पद्धतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून जगभरातील सारी प्रसारमाध्यमे या परिषदेतील प्रत्येक घडामोडी आणि तिचे संभाव्य परिणाम यांचा वेध घेण्यासाठी सरसावून आहेत. या परिषदेचे महत्त्व इतके की आंतरराष्ट्रीय संबंधांत प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेलादेखील या परिषदेकडे दुर्लक्ष करण्याचा आपला निर्धार सोडावा लागला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील ज्येष्ठ संचालक या परिषदेत शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत. तसेच अमेरिकेचा दुसरा प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाचे तर साक्षात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेच जातीने या परिषदेस हजेरी लावत आहेत. या शतकातील प्रचंड महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पावर या परिषदेत ऊहापोह होऊन त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. परंतु आपल्यासाठी ही परिषद इतकी महत्त्वाची की आपल्या शेजारी देशातील या घडामोडीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारला घ्यावा लागला. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी आपले अन्य शेजारी देश या परिषदेत उत्साहाने यजमान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या हातास हात लावून मम म्हणत असताना भारताची या परिषदेतील अनुपस्थिती या परिषदेचे महत्त्व आणि आपली अगतिकता अधोरेखित करणारी आहे. आपल्या भविष्याचा आणि भूगोलाचाही आकार बदलण्याची क्षमता असणाऱ्या या परिषदेचे महत्त्व म्हणूनच समजून घेणे आवश्यक ठरणारे आहे.

या भूतलावर अगडबंब आकार असणारे देश दोन. पहिला रशिया आणि दुसरा चीन. कोरिया ते मंगोलिया ते कझाकस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान ते नेपाळ, म्यानमार, भारत अशा अनेक देशांना सीमेवर घेणाऱ्या चीनची जागतिक महत्त्वाकांक्षा रशियाप्रमाणेच लपून राहिलेली नाही. परंतु आकाराने महाकाय, अर्थव्यवस्थेच्या आकाराने अमेरिकेखालोखाल असूनही चीनला ‘जी ७’ या प्रगत गटांच्या देशात स्थान नाही. ती मक्तेदारी पाश्चात्त्य देशांचीच. अशा वेळी अन्य मार्गाने जागतिक राजकारणातील प्रस्थापितांच्या या वर्चस्वास आव्हान देत त्यांच्यावर आघाडी घेण्याच्या उद्देशाने चीनने ओबोर हा कमालीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून त्याद्वारे एकीकडे युरोप तर दुसऱ्या दिशेला आफ्रिका खंडापर्यंतचा सर्व टापू रस्ते वा जलवाहतुकीने जोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यात अर्धा डझन रेल्वेमार्ग, अतिजलद रस्ते महामार्ग आणि बंदरे उभारली जातील. गेल्याच आठवडय़ात चीन आणि लंडन यांना जोडणारी रेल्वे सुरू झाली. तेव्हा अशा प्रकल्पासाठी लागणारा दमसास चीनमध्ये किती आहे, ते यातून दिसून आले. आपला आर्थिक विकास पुढील टप्प्यावर नेऊ इच्छिणाऱ्या चीनसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून जिनपिंग यांचे हे पाऊल जागतिक आर्थिक मुत्सद्देगिरीतील मोठे धोरणात्मक बदल मानले जाते. चीनचा दावा असा की या प्रकल्पाचा फायदा एकटय़ा चीनलाच मिळणार नसून या टप्प्यांतील सर्वच देशांतील व्यापार-उदिमास त्यामुळे गती येईल. आशिया, प्रशांत महासागर परिसरात चीनच्या आव्हानास तोंड देईल इतकी ताकद अन्य कोणत्याही देशात नाही. यात भारताचाही समावेश होतो. तेव्हा या प्रकल्पाचा आकार, ताकद आणि परिणाम लक्षात घेऊन पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना त्यात सहभागी होण्याचा मोह न आवरता तरच नवल. यामुळे आपली अधिकच कोंडी झाली आहे. वास्तविक नेपाळसारखा देश इंधन ते पायाभूत सोयीसुविधा या साऱ्यांसाठी भारतावर अवलंबून आहे. तरीही भारताच्या नाराजीची पर्वा न करता या देशाने या परिषदेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तीच गत श्रीलंकेची. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याच आठवडय़ात या देशास भेट देऊन आले आणि कोलंबो वाराणसी विमानाची घोषणा करताना श्रीलंकेबरोबरील संबंध अधिक दृढ कसे होणार आहेत, हेदेखील त्यांनी सांगितले. परंतु श्रीलंकेने भारताबरोबरच्या या मैत्रीची पर्वा न करता ओबोर या परिषदेत हजेरी लावली आहे. तरीही या महत्त्वाच्या घडामोडीकडे दुर्लक्ष करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय भारतासमोर राहिलेला नाही.

याचे कारण या प्रकल्पातील China Pakistan Economic Corridor-  CPEC- हा चीनला पाकिस्तानशी जोडणारा महामार्ग. यासाठी चीन आपल्या पाकिस्तान या शत्रुराष्ट्रात ५४०० कोटी डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक करणार असून यासाठी उभारला जाणारा महामार्ग हा थेट पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. पाकिस्तानातील ग्वादार बंदरास याच अंतर्गत चीनकडून आर्थिक मदत मिळत असून हे बंदर लवकरच चीनशी जोडले जाईल. तसेच गिलगिट, बाल्टिस्तान आदी प्रदेशांच्या विकासासाठीही चीनने करारमदार केले असून हे सारे भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान देणारे आहे, अशी आपली भूमिका आहे. पाकिस्तान आणि आपण यांतील रक्ताळलेला काश्मीरकेंद्रित इतिहास आणि वर्तमानात चीनची भूमिका ही कायमच पाकिस्तानची तळी उचलणारी राहिलेली आहे. तेव्हा ओबोर प्रकल्पातील चीन पाकिस्तान महामार्ग हे थेट भारतालाच आव्हान मानले जाते आणि त्यात काही गैर नाही. असलेच तर ते इतकेच की या प्रश्नावर नव्याने चर्चा करण्याची भारताची साधी विनंतीदेखील चीनने मानलेली नाही. ओबोर परिषदेत भारताने सहभागी व्हावे यासाठी चीनचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. आपली त्यात सहभागाची तयारी होती. आपले म्हणणे इतकेच होते की याआधी ओबोर, चीन पाकिस्तान महामार्ग आणि भारताच्या सार्वभौमतेस असलेला संभाव्य धोका याविषयी चीनने स्वतंत्रपणे आपल्याशी चर्चा करावी. ही विनंती चीनने अव्हेरली नाही. परंतु चिनी मुत्सद्दीपणा असा की ती शेवटपर्यंत मान्यही केली नाही. परिणामी परिषदेच्या उद्घाटनास काही तासांचा अवधी उरलेला असताना या परिषदेवर बहिष्कार घालण्याची भूमिका आपल्याला जाहीर करावी लागली. यातून हसे झाले ते आपलेच. शिवाय हा बहिष्कारही प्रामाणिक म्हणता येणार नाही. याचे कारण भारतीय अभ्यासक, तज्ज्ञ अशांचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झालेले आहे. तेव्हा यातून दिसून आला तो आपला सावळागोंधळच. कारण ही परिषद कशाविषयी आहे, याबाबत चीनने कधीही संदिग्धता बाळगलेली नाही. याचा अर्थ पहिल्या दिवसापासून या परिषदेत काय होणार आहे, याची आपल्याला कल्पना होती. तसेच पाकिस्तान आणि चीन महामार्गाची उभारणीदेखील याआधीच सुरू झालेली आहे. तेव्हा या परिषदेवर आपणास बहिष्कारच घालावयाचा होता तर तो याआधीच जाहीर करता आला असता. ती हिंमत आपण दाखवली नाही. परिणामी आपले पाणी पूर्ण जोखलेल्या चीनच्या साध्या उच्चायुक्ताने या परिषदेत भारताला एकटे पाडू अशी दर्पोक्ती केली. त्यानंतर आपणास जाणीव झाली आणि जमेल तितक्या कडक शब्दांत आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आणि बहिष्कार जाहीर केला.

परंतु यामुळे चीन आणि अन्य देशांच्या व्यापारी हितसंबंधांवर काहीही परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. बराक ओबामा यांच्याप्रमाणे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भले मोदी यांचे मित्र असतील आणि गांधीनगरातील साबरमतीकाठी दोघांनी एकत्र झोपाळ्यावर झोके घेतले असतील. परंतु चीन.. आणि अन्य देशदेखील.. भारतीय भूमिकेस कसे खुंटीवर टांगतात हेच यातून दिसून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेवटी महत्त्व असते ते आर्थिक ताकदीस आणि त्याबाबत चीन आपल्यापेक्षा पाचशे टक्क्यांनी मोठा आहे. तेव्हा चीनसमोर उभे राहायचेच असेल तर अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे. अगतिकांच्या कणखरतेस काहीही किंमत नसते हे तरी यातून आपणास कळावे.

First Published on May 15, 2017 3:25 am

Web Title: india absent one belt one road conference obor
 1. R
  ravindra mane
  Jul 4, 2017 at 1:42 am
  जर इंडिया ओबोर मध्ये सामील झाला असता तरीही कुबेर ने मोदी पॉलिसी ला नाव ठेवले असते.म्हणजे काहीही करा,मग ते चांगले असो किंवा वाईट आम्ही विरोध करणारच.चीन हा असा देश आहे कि तो सक्ती ने वागणाऱ्यांपुढेच नमेल,कमजोरांना तो कोणतीच किंमत देत नाही. हे १९६२ मध्ये आपण पहिले आहे.
  Reply
  1. R
   RJ
   May 22, 2017 at 1:34 am
   chinmadhye dharmik swatantry nahi he kadvyanchya manat bharvle tar parasparach sunthivachun khokla jau shakel. mutsaddipananech don shatrunchya maitrivar upay karava lagel.
   Reply
   1. U
    uday
    May 17, 2017 at 11:15 pm
    Even if Mr Kuber is biased,his perception of international politics and India's position cant be neglected.good people take criticism positively...but how can we expect this from Indians who are self declared Jagdguru ...dont be panic because miles to go before we sleep........
    Reply
    1. S
     Sandeep
     May 16, 2017 at 1:35 pm
     Sagle bhakt kuber Sir na murkh samjtat tar mag loksatta ch ka vachtat karan sarv modi bhakt bjp chya IT cell che pagari majur ahet kuberana badnam karnyacha pagar milto tyanna
     Reply
     1. J
      jai
      May 16, 2017 at 12:08 pm
      India is huge market economy about to surp china very soon.no one can ignore it now or in near future..we will servive in any case..question is should we entertain our enemies in current scenerio.
      Reply
      1. R
       Ramdas Bhamare
       May 16, 2017 at 11:16 am
       चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे पाय मोदींसमोर लटलटू लागले आहेत . त्यांच्या घशाला कोरड पडली आहे , कारण भाजप २६ मे ते १५ जूनपर्यंत मोदी फेस्टिव्हल साजरा करणार आहे. देशभरात आणि विदेशात हा उत्सव थाटात साजरा केला जाईल. १५ दिवसांत १० कोटी एसएमएस केले जातील आणि दोन कोटी प्रतिनिधी बांधा बांधावर जाऊन मोदी यांचा जयजयकार करणार आहेत . हे आजपर्यंत कुठल्याच देशाला ज े नाही . मोदींची लोकप्रियता जगात प्रचंड वाढणार आहे . त्यामुळे घाबरून जाऊन क्षी जिनपिंग यांनी ओबोर परिषदेचा कट रचला आहे आणि या कटात सगळे देश सामील झाले आहेत . आपण वेळीच हा कट ओळ्खल्यामुळे या कटात सामील झालो नाही हे कुबेर यांच्यासारख्या अज्ञानी माण कसे समजणार ?
       Reply
       1. वनदेव
        May 16, 2017 at 8:19 am
        आपण काय गमावले व काय कमावले याचे तंतोतंत विश्लेषण हे या संपादकीय लेखाची महत्ता आहे.
        Reply
        1. आदित्य अंकुश देसाई
         May 15, 2017 at 5:26 pm
         चीनच्या ड्रॅगनने मेक इन इंडिया च्या लायनची धस्की घेतल्याचा परिणाम दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय सिंहाचे अस्तित्व हे केवळ आभासी नाही. आता प्रतिकांचे युद्ध सुरू होणार हे निश्चित. .. आशियातील शक्ती निश्चित करण्यासाठी सर्व जग या स्थितीकडे राजकीय डावपेच म्हणूनच पाहणार आहे... आर्थिक उलाढाली तर होतच राहतात पण राजकीय मुस्स्देगीरीनेच अर्धी लढाई जिंकली जाते. भारतीय धोरण यात नेहमीच उजवे ठरलेले आहे... आता पाहू चीनचे डावे काय खेळी खेळतात..
         Reply
         1. U
          umesh
          May 15, 2017 at 5:18 pm
          चीनच्या ताकदीबद्दल फारच अतिशयोक्ती केली आहे एवढी शक्ती असेल तर परिषदेची गरजच काय? जिनपिंग यांनी कुबेरांना महाप्याच्या कार्यालयात येऊन आपल्या ताकदीची माहिती दिलेली दिसते अत्यंत मूर्खपणाचा आणि हास्यास्पद लेख आहे
          Reply
          1. S
           S. Dole
           May 15, 2017 at 5:18 pm
           चिनी राजकीय खेळी नेहमीच डबल गेम राहीली आहे. अगदी पं. नेहरूजींच्या काळात सुध्दा चीनी राजकारणी असेच खेळले. एवढा कालखंडा वर खरेतर भाजपाच्या हाय कमांडने खोल अभ्यास करायला हवा. परंतु सत्ता हातात येण्यासाठी फक्त आश्वासनं दिली तर चालेल, या गैरसमजातून आता वेगळी परिस्थिती निर्माण झाली. आता जबाबदारी झटकली तरी अंगलट आणि गुंता सुटत ही नाही. निव्वळ परदेश दौरे करून चालत नाही, त्यासाठी मुत्सद्दीपणा जबरदस्त स्थायीभाव अनिवार्य आहे. पेशवे काळात मुत्सद्दीपणाचा कस निघायचा. त्याचा सखोल अभ्यास करा अन् नंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारण खेळावं.
           Reply
           1. B
            bhakti
            May 15, 2017 at 4:45 pm
            पर राष्ट्र नीती म्हणजे काय AC मध्ये बसून लिहिण्या इतकीव सोपे नाही कुबेर काका !! अभ्यास करा नीट मग लेख लिहा.. पुतीन वरचा पुस्तक लिहिलं म्हणून सगळं रशिया आणि चीन तुम्हाला कळले असे नाही!
            Reply
            1. A
             Aniruddha
             May 15, 2017 at 4:21 pm
             कणखरांची अगतिकताचे उत्तम उदाहरण म्हणजे “असंतांचे संत” मागे घेणे.
             Reply
             1. A
              Aniruddha
              May 15, 2017 at 4:20 pm
              अगतिकांची कणखरताचे उत्तम उदाहरण म्हणजे “असंतांचे संत” मागे घेणे.
              Reply
              1. A
               ad
               May 15, 2017 at 3:59 pm
               Jase lok tashi sarkar tashi tyanchi policy. So jo hota hai hone do
               Reply
               1. J
                jaydeep
                May 15, 2017 at 3:18 pm
                obor var keleli guntavnuk ani tyatun honara fayda yachi akadevari hatat yeu paryant ha mahamarg kharach faydyacha ahe ki nivval pandhara hatti he tharavine kathin ahe
                Reply
                1. K
                 Koustubh
                 May 15, 2017 at 2:55 pm
                 Mr.Girish Kuber can you please tell me how many objections has been made by manmohan govt on this issue? It looks like you are giving specious information to your readers. CPEC project was established in may-2013(1 year before Modi Govt) and as per this trusted called 'Wikipedia'(I dont know whether you know about it or not) which gives factual information rather than biased views, India has raised many objections on this issue.On Modi's visit, Foreign minister Sushma swaraj has strongly condemned china on this issue. To ALL READERS OF LOKSATTA(especially who are reading this editorial) WHO WANTS TO KNOW FACTS ON THIS ISSUE, PLEASE REFER THIS- s: en.wikipedia /wiki/China E2 80 93 stan_Economic_Corridor#Indian_objections . Mr. Kuber tumhi tar agatik tar ahatch pn durdaiva he ki tumhi dhongi kankhar ahat. Apli shakti kevahi china peksha kami ahe he manyach pn mhanun maan zukvayche dhande Bharat Sarkar karat nahi he Stutya ch.
                 Reply
                 1. प्रसाद
                  May 15, 2017 at 2:46 pm
                  जगभरात स्वदेशीचे वारे वाहू लागलेले आहेत. इतर देशांचा माल आणि श्रमशक्ती असे दोन्हीही नकोत अशी विचारसरणी वाढत असताना हा रस्ता नक्की कुठल्या मालाची वाहतूक कुठून कुठे करणार असा प्रश्न पडतो. पाकिस्तानातून येणाऱ्या रस्त्यावरून काय काय येते हे युरोपीय देशांना वेगळे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. अशांत प्रदेशांतून जाणारा हा रस्ता पर्यटनाकरता कोणी वापरेल ही शक्यता कमीच. याला सामरिक महत्व आहे म्हणावे तर भावी काळात युद्धे अंतराळात आणि इंटरनेटवरच कशी लढली जातील याची चुणूक जगाने परवाच पाहिली. पाश्चात्य उद्योगांना त्यांचे उत्पादन स्वतात करून देणारी बेटे चीनमध्ये आहेत असे म्हणतात. संपूर्ण अर्थव्यवस्था उत्पादन निर्यात करण्यावर आणि स्वस्त माल जगात टाकत राहण्यावर अवलंबून असल्यामुळे चीन अशा रस्त्याच्या प्रयत्नात असावा असे वाटते. पण प्रत्यक्षात त्याने किती फायदा होईल याची वरील कारणांमुळे शंकाच वाटते.
                  Reply
                  1. B
                   Bharat Shevkar
                   May 15, 2017 at 2:44 pm
                   Kuberji two days back there was some important news about National Herald and Young Indian, write an editorial on this as well so that we understand the matter well that how important these transactions were in national interest...
                   Reply
                   1. D
                    dhananjay
                    May 15, 2017 at 1:49 pm
                    when kuber comments on any idea of government i take it as a positive comment and feels as government is on right track
                    Reply
                    1. S
                     sanjay telang
                     May 15, 2017 at 1:44 pm
                     THODAKYAT KAAY TAR PARISHADELA JAA ANI CHINCHYA PAAYASHI LOLAN GHYA. AAPALA DESH VIKA. CHIN NE MASOOD AZAHAR, HAFIZ SAIDLA 'UN' MADHE AADKATHI KELI TARI CHINCHE TALAVE CHAATA. HYALA MHANATAT HUSHARI.
                     Reply
                     1. A
                      aniruddha wagh
                      May 15, 2017 at 1:12 pm
                      One Belt One Road cha fayada bhartala kay jhala asta samaja apan tyat sahbhagi jhalo asto tr te sangitla asta tr amhala modi ni kelela chuk ki barobar he judge karayala madat jhali asti tumhi nakki virodh kra pn barobar kay tehi sanga ani urale shejarche desh sahabhagi jhale tr tyat chukicha kay pratek desh swatacha fayada pahtp mg to konakdun hi milo apan nahi ka america ani russia dogha kadun madat gheto mg te chukicha ahe ka foreign policy ekte pm modi tharawat nastil foreign policy tharavanyana majhya mate editor peksha adhik budhi tr nakkich asel
                      Reply
                      1. Load More Comments