21 September 2017

News Flash

नवे मालक, नवी वटवट

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीच.

लोकसत्ता टीम | Updated: May 18, 2017 3:46 AM

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीच. परंतु तिचे नतिक निकष भिन्न. याविषयी खरे तर भाजपने काही भाष्य करावयास हवे.

कोणताही भ्रष्टाचार वाईटच. धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय वगरे कोणत्याही क्षेत्रात तो झालेला असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्यामुळे चिदंबरम पितापुत्र, लालूप्रसाद यादव आदींच्या आर्थिक भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याचे धाडस नरेंद्र मोदी सरकारने दाखवले त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. चिदंबरम यांचे करते चिरंजीव कार्ती हे भांडवली बाजारातले बडे खेळाडू तर लालूप्रसाद यादव सत्ताकारणातले. चारा ते जमीन असे एकही क्षेत्र नाही जेथे लालूप्रसाद आणि कुटुंबीयांचा भ्रष्ट स्पर्श झालेला नाही. चिदंबरम पुत्राने वडिलांचा प्रभाव वापरीत भांडवली बाजारातून बरीच माया केली असे बोलले जात होते आणि लालू पुत्र आणि कन्या वडिलांच्या प्रभावाचा कसा दुरुपयोग करीत आहेत, याबाबतदेखील गेली कित्येक वष्रे सांगितले जात होते. कार्ती यांच्याबाबत कुजबुजीपलीकडे काही झाले नाही. परंतु खुद्द लालूंचे तसे नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भ्रष्ट ठरविले जाण्याचा लौकिक त्यांच्या नावावर असून तुरुंगाची हवा खाण्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निवडणूक लढविण्यास मनाई केल्या गेलेल्यांतील लालू हे एक देशातील महत्त्वाचे नेते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलालेकींना राजकारणात आणले आणि आपण जे काही करीत होतो ते त्यांच्याकरवी करवून घेण्याचा मार्ग पत्करला. तेव्हा भ्रष्टाचार या मुद्दय़ावरून लालूंविषयी सहानुभूती बाळगावी असे एकही कारण नाही. तथापि या निमित्ताने चर्चा करावी असा एक मुद्दा मात्र समोर आला आहे.

निवडक नतिकता हा तो मुद्दा. चिदंबरम आणि लालू यांच्या विरोधात केंद्रीय गुप्तचर यंत्रणा वा आयकर, सक्तवसुली संचालनालय यांनी हा कारवाईचा घाट घातल्याचे सांगितले जाते. यामागे काहीही राजकीय हेतू नाही, असाही दावा सरकारतर्फे केला जातो. तो खरा मानून सरकारवर विश्वास ठेवायचा तर काही प्रश्नांना भिडण्याची िहमत सरकारने दाखवावी. भाजपतील अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी बंद होत असताना विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात मात्र एकापाठोपाठ एक कारवाई करण्याचा सपाटा केंद्रीय यंत्रणा लावतात, हा काय केवळ योगायोग मानायचा का, हा यातील पहिला महत्त्वाचा प्रश्न. ज्यांना एके काळी न्यायालयाने अहमदाबादेतून तडीपार केले होते त्या अमित शहा यांच्या चौकशीत गुप्तचर यंत्रणांना काहीच सापडले नाही. म्हणजे त्याआधी त्यांच्यावर झालेली तडीपारीची व अन्य कारवाई खोटीच असणार. तसे असेल तर नतिकांचे अधिष्ठान असणाऱ्या भाजपने अमित शहा हे या प्रकरणातून निष्कलंक बाहेर निघावेत यासाठी काय केले? किंवा केंद्रीय गुप्तचरांना शहा यांच्या संदर्भात काहीच कसे पुरावे सापडले नाहीत, असा प्रश्न कधी भाजपला वा मोदी सरकारला का पडला नाही? या सरकारचा स्वच्छतेचा आग्रह लक्षात घेता खरे तर सरकारने अमित शहा यांच्या विरोधातील प्रकरणदेखील चौकशीस नव्याने खुले करायला हवे होते आणि त्या वेळी ते मिटवून टाकणाऱ्या गुप्तचर अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करावयास हवी होती. तसे झाले असते तर फक्त विरोधी पक्ष नेत्यांचीच जुनी प्रकरणे सरकार उकरून काढते असा आरोप झाला नसता. असेच प्रश्न मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याबाबतही विचारता येतात. त्यांचे सरकार व्यापम घोटाळ्याच्या काळ्या सावलीखाली बराच काळ होते. मध्य प्रदेश सरकारच्या व्यावसायिक परीक्षा मंडळ, म्हणजे व्यापमतर्फे सरकारी नोकरभरतीसाठी अनेक परीक्षा घेतल्या जातात. त्यात राजकारणी, नोकरशहा आदींच्या सहभागातून अनेक वष्रे भ्रष्टाचार सुरू होता. सन २००० मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुढची नऊ वष्रे यात काहीही घडले नाही. परंतु २००९ साली इंदूरमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत योगायोगाने या प्रकरणाची व्याप्ती समोर आली आणि त्यात राज्यातील शिक्षणमंत्र्यांसह अनेक उच्चपदस्थ गुंतलेले असल्याचे समोर येऊ लागले. या प्रकरणाचे गांभीर्य इतके की दोन हजारांपेक्षाही अधिकांना या घोटाळ्यात अटक झाली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. परंतु यथावकाश ते शांतही झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे राष्ट्रीय राजकारणात दिल्लीला जातील अशी शक्यता व्यक्त होत असतानाच व्यापम घोटाळा बाहेर येणे आणि ती शक्यता मावळल्यानंतर हे प्रकरण मागे पडणे यांचा काहीही संबंध नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही. वास्तविक लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याप्रमाणे हे प्रकरणदेखील पूर्ण बंद झालेले नाही. परंतु चारा घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू होते आणि व्यापम घोटाळ्याविषयी चकार शब्द काढला जात नाही, हे अतक्र्यच. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीच. परंतु तिचे भिन्न नतिक निकष याविषयी खरे तर भाजपने काही भाष्य करावयास हवे.

कारण सध्या भाजपला देश काँग्रेसमुक्त करण्याचे वेध लागले आहेत. देशास या जुनाट, भ्रष्ट अशा राजकीय पक्षापासून मुक्त करण्याचा भाग म्हणून अनेक काँग्रेसजनांना पवित्र करवून घेण्याचा घाट सध्या भाजपने घातला आहे. हे होत असताना या मंडळींच्या भ्रष्टाचाराचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. बिछान्यात नोटा कोंबून त्यावर पहुडणारे माजी दूरसंचारमंत्री सुखराम, सहस्रचंद्रदर्शनानंतरही आपली पितृत्व क्षमता सिद्ध करणारे घोटाळेबहाद्दर नारायण दत्त तिवारी, माजी परराष्ट्रमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री एस एम कृष्णा असे एके काळचे काँग्रेसी नामांकित भाजपवासी झाले. महाराष्ट्रात माजी शिवसेना मुख्यमंत्री, माजी काँग्रेसमंत्री नारायण राणे हे आपल्या दिव्य चिरंजिवांसह भाजपच्या वाटेवर आहेत. केंद्रात आणि अनेक राज्यांतही सत्ताधारी असल्याने अनेकांना सध्या भाजप हा आपला पक्ष वाटू लागला आहे. तेव्हा यातील नवभाजपीयांच्या भ्रष्टाचारांची चौकशीदेखील इतक्याच हिरिरीने केली जाणार का? या संदर्भात खरे तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर खुलासा करायला हवा. विविध पक्षांतून आमच्या पक्षांत येऊ पाहणाऱ्या वा आलेल्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर करावे. कर्नाटकातील भाजपचे वजनदार नेते येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आणि त्यांना सत्ता आणि पक्षही सोडावा लागला. पुढे त्यांचे भाजपत पुनरागमन झाले. तूर्त ते कर्नाटकाचे मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. केंद्रीय गुप्तचर खाते त्यांचीही फेरचौकशी करणार काय?

हेच गुप्तचर खाते एके काळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामागे हात धुऊन लागले होते. त्या वेळी भाजपकडून गुप्तचर खात्यावर राजकीयीकरणाचा आरोप सातत्याने झाला. काँग्रेसने गुप्तचर यंत्रणेस विरोधकांवर सोडले तेव्हा ते या खात्याचे राजकीयीकरण होते आणि आता सत्ताधारी भाजप आताच्या विरोधकांवर त्याच गुप्तचरांना सोडत असताना त्याचे वर्णन वेगळे कसे करणार? परत यातही फरक असा की जे जे विरोधक भाजपमध्ये येण्याची प्रागतिकता दाखवतात त्यांना गुप्तचरांकडून अभय मिळते, हे कसे? म्हणजे उद्या लालू वा चिदंबरम आदी भाजपमध्ये आले तर या कारवाईचे काय? याचा अर्थ इतकाच की आधीच्या काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही गुप्तचर यंत्रणा राजकीय हेतूनेच वापरावयाची आहे. आणि या यंत्रणेने तर आपले िपजऱ्यातील पोपटपण मान्यच केलेले आहे. तेव्हा ही भ्रष्टाचाराची कारवाई हे ऐतिहासिक, निर्णायक पाऊल आहे वगरे सांगितले जाते, ते निव्वळ थोतांड आहे. जुन्याच पोपटाने नव्या मालकांच्या इशाऱ्यानुसार केलेली नवीन वटवट म्हणजे ही कारवाई.

First Published on May 18, 2017 3:46 am

Web Title: intelligence bureau amit shah bjp corruption
 1. V
  vasant
  Jun 8, 2017 at 6:06 pm
  लोकसत्ता टीम अरे तारीख मे आठ आहे तुम्ही तारीख अठरा मे टाकली आहे . काय हे . इतक्या बारीक चुका करू नका
  Reply
  1. S
   Sudhir Karangutkar
   May 22, 2017 at 6:20 pm
   अगदी बरोबर पूर्वी जे काँग्रेसने केले तेच आता भाजप करत आहे पण काँग्रेस करीत होती तेव्हा मीडिया वाले चिडीचूप होते त्यात त्यांना काही वावगं नव्हतं त्यावेळी मोठी मोठी पत्रकार मंडळी काँगेसच्या दावणीला होती लिहला तर विरोधी पक्षाचेच वाभाडे काडत काँग्रेस कशी देश चालविते आणि काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही इतका ओरपून धोटपून भ्र्रष्टचार पूर्वीच्या काँगेस सरकारातील वाटेकरूनी करून देखील त्याबद्दल काहीच बोलायचे नाही आता असेही म्हणत आहे भाजप ने देखील केलं मग याना वेगळा न्याय का ? पण हेच काँग्रेस करीत होती तेव्हा असे म्हणायची टापनव्हती न्यायालयीन सुनावणीत दोषी ठरले म्हणजे काँगेस बरोबर अगदी अलीकडील इशरत जहाँ प्रकरण असो किंवा जेएनयू मधील देशद्रोही घोषणा असो किंवा याच लोकांनी चालविलेली पुरस्कारवापसी असो सगळं फज्जा झाला तरी यांची काँगेसची मोट काही सुटत नाही
   Reply
   1. N
    Niru
    May 22, 2017 at 3:05 pm
    They are at least parrot but you reporters writing these articles are Dogs of Congress. Whatever Congress was doing was right and BJP is doing is wrong? How is it. This Congress people enquired continuously 24 hours to NAMO when he was CM of Gujrat. NAMO is honest person and doing something for country. BJP will win forever. But you people are barking dogs of congress only supports corruption of Congress/ UPA. Please do not write such useless and so called paid articles. People will not take seriously as everyone knows your reality. So Stop writing against our PM and our Govt.
    Reply
    1. R
     raj
     May 21, 2017 at 2:13 pm
     जे पेराल तेच उगवेल. लक्षात ठेवा. काँग्रेस संपली. तुम्हीही नवीन मालक शोधा.
     Reply
     1. सौरभ तायडे
      May 20, 2017 at 11:07 pm
      being an indian i should not chose what is happening but i should really care what will happend after that
      Reply
      1. U
       Uday
       May 20, 2017 at 4:45 pm
       some times i feel we should make editor prime minister. may be we could see raam rajya.
       Reply
       1. S
        Sandeep
        May 20, 2017 at 10:45 am
        Congress ekpat ani BJP duppat chor ahet Modi ne tar amhala zopditun rastyavar ch anlay
        Reply
        1. गोपाल
         May 18, 2017 at 7:55 pm
         जवाहरलाल नेहरू महात्मा गांघी यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस जवळ नैतिक मूल्य मोठे असावे कि मोदी च्या पक्षाजवल ५०/६०/वर्ष सत्ता भोगणाऱ्या जवळ कि आत्ताच सत्तेची चव चाखणाऱ्या जवळ दुसर्याला नितीमत्ता चे शहाणपण शिकवितांना आपल्या जवळ ती कितीसी आहे ह्याचा तपास घेतला असता तर लक्षात आले असते कि मोदी वर पोपट सोडलेत त्या वेळी तर आपल्याला गुदगुल्या झाल्या होत्या मग आता मिरची का बर झोंबली शिवराज सिंग वर तर सरळ आरोप पण झाले नाहीत २००४ ते २०१४ पर्यंत १० वर्ष पोपट कोण जवळ होता भ्रष्टाचार नकोच पण तुमचा नैतिक भ्रष्टाचार .....Freedom to write हाहा sss अशे असतेच नाही का लोक अमान्य ,धनशक्ती !!!
         Reply
         1. R
          Rakesh
          May 18, 2017 at 5:14 pm
          @Shreeram Bapat, if the current government is really concerned about taking the culprits head on, why they have allowed ND Tiwari in BJP, who has brought pros utes to Rajbhavan? Is this the culture they want to promote? Why the probe for 50 murders in Vyapam scam was started when Shivrajsinh had aspirations and why it has stopped now? There are lot of questions asked here, but you cannot answer those as you like to see these people eating the same sh it which earlier govt. did. Two wrong things never make each other right is something taught in Indian culture.
          Reply
          1. S
           Suresh Raj
           May 18, 2017 at 4:36 pm
           खांग्रेसी लोकांशी काय देनेघेणे आहे ते ह्यांच्या अग्रलेखातून स्पष्ट केले आहे, खांग्रेसी कधी पासून जवलिक झाले, ज्या पक्ष्या ने पूर्ण हिन्दुस्थान ओरबडून काढला त्यानचे गुण गाण कां म्हणून।
           Reply
           1. H
            harshad
            May 18, 2017 at 3:17 pm
            You forgot to mention Dr. Vijaylkumar Gawit, Rajasthan CM Raje, Chhatisgarh CM Raman Sing and Gadkari. List is too long. Take a example of Nitin Gadkari, Sfurti scam. Money Laundering cases have been registered against him. He threatened to investing officer also.Same with mr. Vijaykumar Gawit. BJP had disturbed state embly section and mooted Gawit corruption issues many times in past. But same Dr. Vjaykumar Gawit is become Mr. Clean or Valmiki when he elected on lotus symbol. BJP has changed definition of corruption.
            Reply
            1. P
             pankaj
             May 18, 2017 at 2:49 pm
             बालिश लेख
             Reply
             1. U
              uday
              May 18, 2017 at 12:51 pm
              Correct
              Reply
              1. M
               Mahesh Gauri
               May 18, 2017 at 12:11 pm
               At least this is abeginning. The present government has started with some top thives. In due course Pawars, Tatkare, and others will follow! What the common person wants to know is how much money or favours team Loksatta is getting from anti Modi group. Sadly you are very partisan. Your editorial is mockery of principles of independent journalism. Chage the le Loksatta to Congress/Cmmunist/Pseudosecular mukhabat.
               Reply
               1. J
                jit
                May 18, 2017 at 9:57 am
                Same thing also reflects in LOKSATTA paper - ALL EDITORIAL are against BJP : नवे मालक, नवी वटवट ; योगी आणि टोळी ; बुडत्या बँका, खंक महाराजा ; अगतिकतांची कणखरता; ‘कुमार’संभव; बँकबुडी अटळच ; पडझडीचे स्वगत; व्यत्यय हाच विकास; कणखर की आडमुठे?; अवलक्षण; छप्पन इंचाचा कस; संकुचिततावाद हे उदारमतवादाच्या मर्यादांवरील उत्तर नव्हे; धोरणचकव्याचे बळी; गोंधळाचा सुकाळ; क्षमस्व, तात्याराव! I CHALLENGE LOKSATTA EDITOR/READER TO PROVE THAT THIS IS NOT CONGRESSI PAPER, EVERY EDITORIAL ARTICLE RATE PER 10000/-
                Reply
                1. S
                 Shriram Bapat
                 May 18, 2017 at 9:37 am
                 लोकसत्तासकट सर्व मराठी वृत्तपत्रे आणि वाहिन्या रडीचा डाव खेळून चिदंबरम-लालूंना हुतात्मा बनवू पाहत आहेत याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण त्यांचा डावीकडचा झुकाव त्याला कारणी आहे.एकमेव उजवे वृत्तपत्र सामना मोदींनी शिवसेनेला लोकसभेत एवढा फायदा मिळवून दिला हे विसरून वैयक्तिक आकसापोटी भाजपवर तुटून पडत आहे . पण या सर्वांची चालबाजी आता उपलब्ध असलेल्या सामाजिक माध्यमातून उघड होत आहे. उलट जेवढी अन्यायी टीका तेवढाच भाजपचा प्रगती आलेख वर जात आहे. केंद्रातील सत्ता आणि पिंजऱ्यातील तपासयंत्रणा यांचा वापर करून काँग्रेसने मोदी-शहांविरुद्ध अनेक डाव रचले पण त्यात तथ्य नसल्याने काहीही सिद्ध करू शकले नाहीत. भाजपने कायदेशीर लढाया, लोकभावना आणि मतपेट्या या तीन माध्यमातून सत्तांतर घडवले. डोळे पांढरे करणाऱ्या भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशातून काँग्रेस अजूनही जुने मालक राहून सर्व माध्यमे मॅनेज करत त्यांना वटवट करायला लावत आहे आहे पण पत्रकारांनी निष्पक्षता सोडली तरी जनता भाजपाला भरभरून मतदान करत आहे. बरखादत्त किंवा सुमार 'सेट'कर चेष्ठेचे विषय झाले आहेत. ये जो पब्लिक है वो सब जानती है.
                 Reply
                 1. P
                  Prashant
                  May 18, 2017 at 8:50 am
                  अतिशय बालिश लेख लिहिलात! एखाद्या लहान मुलानी चोरून चोकलेट खाऊन नंतर दुसऱ्या कडे बोटे दाखवल्या सारखे वाटत आहे. याच CBI नी २००२ ते २०१४ मोदींच्या मागे चौकाश्यांचे शुक्ल काष्ठ लावले होते तेंवा तुम्ही असे काही लिहिल्याचे ऐकिवात नाही. सर्वोच्च न्यायालयांनी क्लीन चीट दिली पण तुम्ही मुग गिळून गप्पा बसलेलात! तेंव्हा तुमच्या मालकांचा कुत्रा होता म्हणून भुंकला तरी फरक पडत नव्हता नाही का? निदान आता मान्य तरी करता कि तेंव्हा कॉंग्रेस नी या यंत्रणेचा गैर वापर केला होता. तर मग आता हे देखील मान्य करा कि तुम्हा प्रेश्यानी त्याच काळामध्ये मोदींच्या बाबतीत वाचकांची तद्दन दिशाभुल केलीत!
                  Reply
                  1. S
                   Somnath
                   May 18, 2017 at 8:47 am
                   जुन्या नावाजलेल्या वृत्तपत्राचे नव्या संपादकांनी मालकांच्या इशाऱ्यानुसार खरडलेला लेख (जुनीच वटवट) म्हणजे ही वाचकांना भ्रमित करण्याची कारवाई. चिदंबरम यांनी सर्व सरकारी यंत्रणाच येथेच्छ वापर केला तो सूडबुद्धीतून कारण त्यांचे सरकार असताना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.अमित शहांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही ते ह्या महाशयांनी इशरत प्रकरणात कसे फेरफार केले हे तमाम जनतेला माहित आहे.स्वतःच्या मुलाला १५००० डॉलर कन्सल्टन्सी फी दिली जाते तेही स्वतःच्या बापाची व मौनी पंतप्रधानाची नुसती भेट घालून दिल्याची.पीटर आणि इंद्रायणी मुखर्जी प्रकरणाचे धागेदोरे थेट कीर्तिवंत पुत्रापर्यंत पोहचले.यांच्या भ्रष्टाचार करण्याच्या आयडिया बघितल्यातर तोंडात बोटे जातील असे प्रताप यांनी केले आहे.उगाच संपादक साहेबानी आग दिसू नये म्हणून फक्त धूर काढण्याचे काम केले.लोकसत्ताला पाटी टाकणारा नुसता दुसऱ्याला उपदेशाचे ढोस पाजून किती बनेलगिरी करतो हे तमाम जनतेला कधीच कळून चुकले आहे.लालू प्रकरण काय चीज आहे हे सांगायलाच नको.
                   Reply
                   1. R
                    Rakesh
                    May 18, 2017 at 8:43 am
                    Now this will be defended by bhakt saying that even earlier governments did this selective actions. It is like defending shi__t eating saying that if others can eat shi__t even they (current govt) can do the same. Funny thing is that when these people were in opposition these people use to baby cry about selective action. Now they are doing the same. There is no difference in life of common Indians.
                    Reply
                    1. उर्मिला.अशोक.शहा
                     May 18, 2017 at 8:28 am
                     VANDE MATARAM- SUCH EDITORIAL INTELEGENCE WAS NEVER EXPRESSED BY MEDIA WHEN CONGRESS WAS LEVE FALSE CHARGES LEGAL PROCESs TAKES TIME BUT YOU ARE SO EAGER TO HANG BJP LEADERS YOUR EDITOR INTELEGENCE ONLY WORKS AGAINST HINDUS AND BJP PLEASE HAVE SOME PATIENTS BJP GOVT WILL HANDLE THESE MATTERS WITH CARE. MR EDITOR KEYS OF KEY BORD CAN BE PRESS ONE AT TIME YOU HAVE NOT WRITTEN ANY CONCERNS WHEN FALSE CHARGES WERE LEVELED AGAINST BJP LEADERS PEOPLE HAVE TRUSTED MODI AS TIME HAVE TELL THE DIFFERANCE JAGATE RAHO
                     Reply
                     1. A
                      arun
                      May 18, 2017 at 7:57 am
                      नितीश विरुध्द लालू लोकल मोदींना ( सुशीलमाराना ) सामील झाले तर सगळी शस्त्र परत भात्यात जातील. कॉंग्रेसच्या काळात भरपूर खादाडी केलेल्यांना हात लावायचा ठरवलं तर महाराष्ट्रात भरपूर वाव आहे, पण इथले आर्थिक गुन्हेगार राखीव मध्ये ठेवले आहेत. कधी शिवसेनेला कटवायचा प्रश्न आला तर उपयोगी पडतील अशांना हात लागणार नाही. सगळीच नाटकं. अटलबिहारींच्या काळात पक्षाध्यक्ष वेगेळे होते, हा मोठा फरक आहे.
                      Reply
                      1. Load More Comments