23 September 2017

News Flash

मागचे शहाणे

संकुचिततावाद हे उदारमतवादाच्या मर्यादांवरील उत्तर नव्हे

लोकसत्ता टीम | Updated: April 27, 2017 5:11 AM

कडव्या डाव्यांच्या हिंसाचाराने २४ एप्रिल या दिवशी भारत हादरलेला असताना त्याच वेळी फ्रान्समधील कडवे उजवे पराभूत होत होते.

संकुचिततावाद हे उदारमतवादाच्या मर्यादांवरील उत्तर नव्हे, हे फ्रेंचांनी जाणले आणि तेथील मेरीन ली पेन यांचे आव्हान तूर्त टळले.. 

जागतिकीकरणोत्तर अर्थव्यवस्थेत आहे रे वर्गातच ‘अधिक आहे रे’ आणि तुलनेने ‘कमी आहे रे’ असा वर्ग तयार झाला असून यांच्यातील लटका संघर्ष जणू वर्गसंघर्षच आहे असे मानले जाऊ लागले आहे. याचे परिणाम अमेरिका, ब्रिटन व भारतात दिसले, तसे फ्रान्समध्येही घडू शकले असते..

कडव्या डाव्यांच्या हिंसाचाराने २४ एप्रिल या दिवशी भारत हादरलेला असताना त्याच वेळी फ्रान्समधील कडवे उजवे पराभूत होत होते. या दोन घटनांचा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसला तरी त्यातून सध्याच्या अस्वस्थ जागतिक वर्तमानातील दुभंग रेषा उघड होतात आणि फ्रान्समधील निकालामुळे त्या मिटू शकतात अशी आशाही निर्माण होते. फ्रान्समध्ये दोन आठवडय़ांत अध्यक्षीय निवडणुका होतील. या निवडणुकांची पहिली फेरी सोमवारी पार पडली. सर्वसाधारण परिस्थितीत या पहिल्या फेरीची दखल घेतली गेली असतीच असे नाही. परंतु सध्याची परिस्थिती सर्वसाधारण नाही. अलीकडच्या काळात इस्लामी दहशतवादाला केविलवाणा बळी पडत असलेला फ्रान्स या निवडणुकीत टोकाचे उजवे वळण घेईल अशी भीती व्यक्त होत होती. याचे कारण गेल्या वर्षभरात आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, कमालीच्या उजव्या मेरीन ली पेन यांनी जनमानसात मारलेली मोठी मुसंडी. या बाई सध्या सर्वत्र लोकप्रिय होत चाललेल्या आक्रस्ताळी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. ब्रिटनप्रमाणे फ्रान्सनेदेखील युरोपीय संघातून बाहेर पडावे, आपल्या देशातील सर्व स्थलांतरितांना – त्यातही विशेषत: इस्लामींना – मायदेशी परत पाठवावे, परकीय कंपन्यांना आपल्या देशात प्रवेश देण्याऐवजी स्वदेशीवादाचा अंगीकार करावा असे या बाई मानतात आणि त्या मतांचा पुरस्कार करणारे जनमत फ्रान्समध्ये तयार होताना दिसत होते. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. बहुसंख्य मतदारांनी या ली पेन बाईंच्या उन्मादात सहभागी होण्याचे टाळले आणि परिणामी मध्यममार्गी पक्षाचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्याने आघाडी मिळाली. फ्रेंच निवडणुकीची ही पहिली फेरी असली तरी लवकरच ते फ्रान्सचे अध्यक्ष होतील.

मॅक्रॉन अवघे ३९ वर्षांचे आहेत. इतक्या लहान वयात फ्रान्ससारख्या देशाचे नेतृत्व करावयाची संधी याआधी एकाच व्यक्तीस मिळाली. त्याचे नाव नेपोलियन. त्यानंतर हे मॅक्रॉन. ते उच्चविद्याविभूषित आहेत आणि अभिजनांसाठीच्या शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. व्यवसायाने ते बँकर आणि विचाराने उदारमतवादी. या अशा वर्गाविरोधात अलीकडे एक विचित्र भावना व्यक्त होते. अभिजन वा उच्चविद्याविभूषित म्हणजे शोषण करणाऱ्या वर्गाचे प्रतीक असा खुळचट समज तयार करून देण्याची जणू स्पर्धाच जगात सुरू असून त्या विरोधात बोलणारे स्वत:स शोषितांचे प्रतिनिधी मानतात. ही अशी मांडणी नेहमीच लोकप्रिय होते. याचे कारण कोणत्याही व्यवस्थेत ती कितीही कल्याणकारी असली तरी स्वत:ला शोषित मानणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठी असते आणि आपल्यावरील अन्यायाचे परिमार्जन करणाऱ्याच्या शोधात असा समाज असतो. एके काळी ही विभागणी  ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ अशी होती. परंतु जागतिकीकरणोत्तर अर्थव्यवस्थेत आहे रे वर्गातच ‘अधिक आहे रे’ आणि तुलनेने ‘कमी आहे रे’ असा वर्ग तयार झाला असून यांच्यातील लटका संघर्ष जणू वर्गसंघर्षच आहे असे मानले जाऊ लागले आहे. या नव्या व्यवस्थेची बौद्धिक मांडणी अद्याप झाली नसल्याने याचे परिणाम राजकीय व्यवस्थेवर होताना दिसतात. उदाहरणार्थ अमेरिका वा त्या आधी ब्रिटन. किंवा भारतदेखील. या सर्व देशांत यथास्थित आहे रे वर्गाचे सर्व लाभ घेऊन याच व्यवस्थेविरोधात छाती पिटणारे राजकीय नेतृत्व उदयास आले. हे सर्व नेतेगण हे जागतिकीकरणाची फळे यथास्थितपणे पदरात पाडून घेणारे. तरीही त्यांनी जागतिकीकरणास खलनायक ठरवले आणि जनमताचा मोठा प्रवाह आपल्या मागे ओढून नेला. तो तसा ओढला गेला कारण प्रगतीची संधी मिळालेल्यांपेक्षा न मिळालेल्यांची संख्या कधीही जास्तच असते. हे संधी हुकलेले व्यवस्थेला दोष देतात आणि त्या व्यवस्थेविरोधात पोपटपंची करणारे लोकप्रिय होतात. तथापि व्यवस्थेचे नेतृत्व करावयाची संधी मिळाल्यानंतर हे सर्व नवलोकप्रिय नेते जुन्यांचीच री ओढतात. हे असे होणे अपरिहार्यच असते. परंतु जनमानसास याचे भान नसल्याने देशोदेशांत एक मोठाच उन्माद तयार होतो. तसा तो फ्रान्समध्ये झाला होता. अलीकडच्या काळात फ्रान्सला जागतिक इस्लामी दहशतवादाचे तडाखे वारंवार मिळाले. त्यात अर्थव्यवस्थाही यथातथाच. तेव्हा आपल्या दुरवस्थेसाठी मोठय़ा प्रमाणावर येणारे स्थलांतरित जबाबदार असून युरोपीय संघातून बाहेर पडल्याखेरीज आपणास तरणोपाय नाही, अशी भूमिका घेणाऱ्या ली पेन या कमालीच्या लोकप्रिय होत होत्या. त्यात शेजारील ब्रिटनने ब्रेग्झिटची तुतारी फुंकल्याने फ्रान्सदेखील त्याच सुरात सूर मिसळणार अशी लक्षणे होती. ते दु:स्वप्नच ठरले आणि बहुसंख्य फ्रेंचांनी शहाणपणाने मतदान केले. हे आश्वासक आहे.

अशासाठी की ज्या युरोपने रेनेसाँच्या काळात जगास पुढे नेले आणि मानवी प्रज्ञेने जगाचे नेतृत्व केले तो युरोप अलीकडच्या काळात उलटय़ा दिशेने जातो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. ऑस्ट्रिया, नेदरलॅण्ड, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन अशा एकापाठोपाठ एक देशांत कडव्या उजव्यांची जमात फोफावू लागली होती. या मंडळींचे उजवेपण आर्थिक मुद्दय़ांपुरतेच मर्यादित राहिले असते तर ते स्वागतार्हच ठरले असते. परंतु वास्तव तसे नाही. अत्यंत टोकाचा धार्मिक विद्वेष, जागतिकीकरणाचे लाभ पदरात पाडून घेतल्याने आलेला स्वदेशीचा पुळका आणि यामागे दडलेला वर्णविद्वेष असे या नवउजव्यांचे स्वरूप आहे. अमेरिकादी देशांतील राजकीय यशाने या मंडळींची भीड चेपली असून आपले विचारच किती बरोबर हे ठसवण्याची जणू त्यांच्यात अहमहमिकाच लागलेली दिसते. परिणामी या संकुचिततावादाचा विस्तार होतो की काय असे चित्र निर्माण झाले. फ्रान्समधील निकालाचे महत्त्व आहे ते या पाश्र्वभूमीवर. या निवडणुकांत ली पेन या विजयी ठरल्या असत्या तर त्याचे परिणाम युरोपपुरतेच नव्हे तर साऱ्या जगभर दिसले असते. फ्रान्सपाठोपाठ जर्मनीत निवडणुका होऊ घातल्या असून तेथेही कडव्या उजव्यांचे प्राबल्य कमालीचे वाढले आहे. विद्यमान अध्यक्षा अँगेला मर्केल आणि जर्मनीतील एकंदरच उदारमतवादी विचारासमोर या कडव्या उजव्यांचे मोठेच आव्हान निर्माण झाले असून यांना रोखायचे कसे, या प्रश्नाने समग्र युरोप खंडच ग्रासलेला आहे. फ्रान्सपाठोपाठ जूनच्या पहिल्या आठवडय़ात ब्रिटनमध्ये निवडणुका होतील. ब्रिटनला ब्रेग्झिटसाठी उद्युक्त करणाऱ्या युकीप म्हणजे युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टीने तेथे उच्छाद मांडला आहे. ली पेन यांच्या विजयाने या सर्वाना बळ मिळणार होते. ते तूर्त टळले.

तूर्त अशासाठी म्हणावयाचे की स्पर्धेतून मागे पडल्या असल्या तरी ली पेन यांना पडलेली मते कमी नाहीत. मॅक्रॉन यांना ६० टक्के मते मिळाली हे खरे असले तरी तब्बल ४० टक्के जनता ली पेन यांच्या मागे अद्यापही आहे हेदेखील तितकेच खरे. तसेच शहरी आणि ग्रामीण ही तफावतदेखील या निवडणुकीने अधोरेखित केली. पॅरिससारख्या शहरात ली पेन यांना अवघी ५ टक्के मते मिळाली. फ्रान्सचा ग्रामीण भाग प्राधान्याने त्यांच्या मागे उभा राहिला आणि शहरे मॅक्रॉन यांच्या. अशा वेळी उदारमतवादाविरोधातील हे ग्रामीण आणि ग्राम्य लोण शहरांत पसरणार नाही, याची काळजी मॅक्रॉन यांना घ्यावी लागेल. त्यासाठी महत्त्वाची ठरतील ती त्यांची अर्थधोरणे. विद्यमान जगास मुक्त आर्थिक विचाराखेरीज तरणोपाय नाही, हे त्यांना सिद्ध करून दाखवावे लागेल. कारण आर्थिक असमाधान हे राजकीय विचारांतील बदलामागे असते. आपल्याकडेही जे झाले त्यामागे आर्थिक असमाधानच होते. तेव्हा असमाधानाचा हा प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच उदारमतवाद्यांना कंबर कसावी लागेल. संकुचिततावाद हे उदारमतवादाच्या मर्यादांवरील उत्तर नव्हे. अमेरिकादी उदाहरणांनी हे दाखवून दिले आहे. त्या आणि अन्य देशांतील जनकौलाने पुढच्यास ठेच या उक्तीनुसार फ्रेंचांना शहाणे केले. म्हणून या शहाणपणाचे स्वागत.

First Published on April 27, 2017 5:11 am

Web Title: marine le pen french presidential election 2017 emmanuel macron
 1. S
  Somnath
  May 8, 2017 at 10:41 am
  संकुचिततावाद तुम्हाला अमेरिका, ब्रिटन व भारतात दिसलाच होता (काँग्रेस हरल्यामुळे) त्यात भारताचे नाव जोडून दिले.आता खरडा उद्यासाठी अग्रलेख आपल्या बुद्धीचा कस लावून आणि तमाम भारतीय मतदारांना अशिक्षित,गावंढळ पणाची विशेषणे न लावता.
  Reply
  1. N
   Niraj
   Apr 29, 2017 at 10:55 pm
   अत्यंत टोकाचा धार्मिक विद्वेष, जागतिकीकरणाचे लाभ पदरात पाडून घेतल्याने आलेला स्वदेशीचा पुळका आणि यामागे दडलेला वर्णविद्वेष असे या नवउजव्यांचे स्वरूप आहे. - Blatant lies! She has very clearly mentioned in her multiple interviews she does not hate muslims she hates the fanatics who treat sharia law above french law. Getting out of EU is not equivalent to opposing globalization, why paint the wrong picture? Demographic situation of france is catastrophic and you still want france to accept more migrants? Why? why exactly? She accurately describes the asylum seekers are economic migrants. Quote from her 'UN grants asylum to anyone who is percuted by their host country/government for expressing their views not because of war' ! I am getting a strong feeling that you belong to the globalist camp. Only through that angle your articles makes sense.
   Reply
   1. N
    Niraj
    Apr 29, 2017 at 10:53 pm
    जागतिकीकरणोत्तर अर्थव्यवस्थेत आहे रे वर्गातच ‘अधिक आहे रे’ आणि तुलनेने ‘कमी आहे रे’ असा वर्ग तयार झाला असून - But this is absolutely not a problem of globalization and it's the people not the system, right !? या नव्या व्यवस्थेची बौद्धिक मांडणी अद्याप झाली नसल्याने - Awesome! Orwell would really be proud of you! Who didn't do this? and why? लीकडच्या काळात उलटय़ा दिशेने जातो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. - Why exactly do you say that europe going backwards? Because the nationalists are rising? Why is resurrection of nationalism considered as almost a sin!
    Reply
    1. N
     Niraj
     Apr 29, 2017 at 10:46 pm
     What blatant lies and biases! Now I am kind of getting you... you are the 'globalist' types, isn't it? So even though Hollande was absolutely pitiful and have got 4 vote now, you don't see a need to write anything on him. But you do see the need to malign marine le pen? So far there is not even ONE credible policy statement coming from Macron and he is stil your favorite? On what basis? What exactly has he done in his 39 years that makes him eligible for the president role? Marine Le Pen comes with huge experience from his father and has single handedly marhced national front at the door step of the being the largest party and possible herself a president! "अभिजनांसाठीच्या शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात." wah kya baat hai ! For the rest ordinary folks what his means is he is educated from a school whose kids always enters high finance or politics post schooling!
     Reply
     1. A
      AMIT
      Apr 29, 2017 at 3:26 pm
      सुदैवाने अमेरिकेतल्यासारखं इलेक्टॉरल कॉलेज फ्रांस मध्ये नसल्याने पहिल्या फेरीतील निकाल हा जनतेचा मतप्रवाह जास्त चांगल्या पद्धतीने जोखतो.
      Reply
      1. R
       RJ
       Apr 27, 2017 at 9:53 pm
       एकाने दुसऱ्यांच्या धर्मस्थळांना हात लावला तर तो दहशतवाद अशी व्याख्या असेल तर दुसरा जेव्हा पहिल्याच्या धर्मस्थळांबाबत तेच कृत्य करतो तेव्हा ते कृत्य 'धर्मादायी' हक्क कसे काय ठरू शकते ते कुणीतरी समजावून सांगावे.
       Reply
       1. समीर देशमुख
        Apr 27, 2017 at 2:12 pm
        संपादक महाशय आता सध्या पहीलीच फेरी झालीये. तेव्हा एवढ्य् उड्या मारू नका. अमेरिकन निवडणूकीच्या वेळी तुम्ही तोंडावर आपटले होतात त्यासाठी आता पण लहान लेकरा सारखे रडत असता. उगाच इथ पण असच झाल तर तुमची अवस्था फारच अवघड होईल.
        Reply
        1. H
         Hemant Kadre
         Apr 27, 2017 at 1:14 pm
         अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लोकसत्ताकारांच्या आकलनाने सपशेल आपटी खाल्यानंतर आता फ्रांसच्या निवडणुकीत आपण अंदाज वर्तवित आहात. फ्रांसमध्ये मुस्लीम दहशतवाद्यांनी घातापात घडवुन आणल्यावर फ्रांसमध्ये त्याविरोधात प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. आपल्याकडेच "दहशतवादाला धर्म नसतो" यासारखी बोटचेपी भूमीका घेतली जाते मात्र तियाचवेळी मृत दहशतवाद्यांचे दफन केले जाते. स्वत:च्या देशाच्या अस्मीतांचा अभिमान बाळगणे हा संकुचितवाद होउ शकत नाही तसेच दहशतवादी मुस्लीम असतील तर गुळमुळीत भूमीका घेणे हा उदारमतवाद असू शकत नाही. लोकशाही खोलवर रूजलेल्या अमेरिकी नागरिकांनी ट्रंप यांची अध्यक्षपदी केलेली निवड म्हणजे अमेरिकी नागरिकांना ठेच बसली आहे हे देखील मान्य होण्यासारखे नाही.
         Reply
         1. R
          ravindrak
          Apr 27, 2017 at 1:03 pm
          जागतिकीकरणोत्तर अर्थव्यवस्थेत आहे रे वर्गातच ‘अधिक आहे रे’ आणि तुलनेने ‘कमी आहे रे’ असा वर्ग तयार झाला असून यांच्यातील लटका संघर्ष जणू वर्गसंघर्षच आहे असे मानले जाऊ लागले आहे. याचे परिणाम अमेरिका, ब्रिटन व भारतात दिसले,( purnpane chukiche mat !!!) bharatat bhrashtachari shasanala hatavale, ajun tumhala 3 varshatil pharak disat nasel tar tyala kay mhanayach ????
          Reply
          1. H
           Hemant Joshi
           Apr 27, 2017 at 12:05 pm
           जागतिकीकरणोत्तर अर्थव्यवस्थेत आहे रे वर्गातच ‘अधिक आहे रे’ आणि तुलनेने ‘कमी आहे रे’ असा वर्ग तयार झाला असून यांच्यातील लटका संघर्ष जणू वर्गसंघर्षच आहे असे मानले जाऊ लागले आहे. याचे परिणाम अमेरिका, ब्रिटन व भारतात दिसले, तसे फ्रान्समध्येही घडू शकले असते.. Hya pahilya vakyatil sandarbha bharatachya bab kasa lagu hoto he kahi kalale nahi. Sampadak mahashayancha vidyaman sarkarvarcha akas mahit ahe. Pan bharatat asa abhinivesh kuthe di te kahi kalale nahi
           Reply
           1. प्रमोद तावडे
            Apr 27, 2017 at 11:37 am
            “अभिजन वा उच्चविद्याविभूषित म्हणजे शोषण करणाऱ्या वर्गाचे प्रतीक.” या गृहितकाला खोटे ठरवणारी अनेक उदाहरणे आढळतात. मात्र तरीही ते सगळे अपवाद म्हणावे लागतील. कारण बहुसंख्येच्या निकषावर हे गृहीतक मान्य करावेच लागेल.
            Reply
            1. J
             jit
             Apr 27, 2017 at 10:05 am
             By hook or crook, write every editorial against BJP that is motto of this paper. But don't worry! till Rahul-Baba is president of congress, he will help BJP.
             Reply
             1. S
              Shriram Bapat
              Apr 27, 2017 at 9:43 am
              'ज्याचे जळते त्याला कळते' या उक्तीप्रमाणे फ्रान्समध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी हिंसाचाराला सुरुवात केली असेल तर या उदार असलेल्या देशात सुद्धा प्रतिक्रिया उमटणारच. तेव्हा अश्या प्रतिक्रियांतून पुढे येत असलेल्या नेतृत्वावर अती उजवे असा शिक्का मारून भारतातील डाव्या पत्रकारांनी त्यावर टीका करणे आणि अश्या नेतृत्वाचा तात्कालिक पराजय झाला म्हणून आनंद मानणे योग्य नाही. कारण अश्या पराजयामुळे तेथील सुरक्षा दलांना चुकीचा संदेश जाऊन मुस्लिमांविरुद्धच्या कारवाईत शैथिल्य येण्याची शक्यता आहे. राजकीय दृष्ट्या मुस्लिम आणि इतर यांचे ध्रुवीकरण होत असेल तर त्यात इतरांच्या बाजूने उभे राहणे आपल्या हिताचे आहे कारण भारत सुद्धा पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांना साहाय्य करणाऱ्या येथील मुस्लिमांच्या कारवायांचा बळी ठरत आहे.
              Reply
              1. R
               Raj
               Apr 27, 2017 at 7:35 am
               "संधी हुकलेले व्यवस्थेला दोष देतात आणि त्या व्यवस्थेविरोधात पोपटपंची करणारे लोकप्रिय होतात. तथापि व्यवस्थेचे नेतृत्व करावयाची संधी मिळाल्यानंतर हे सर्व नवलोकप्रिय नेते जुन्यांचीच री ओढतात. हे असे होणे अपरिहार्यच असते. परंतु जनमानसास याचे भान नसल्याने देशोदेशांत एक मोठाच उन्माद तयार होतो." अगदी बरोबर!
               Reply
               1. P
                Pramod
                Apr 27, 2017 at 6:17 am
                The edit seems to be bit premature. The final election between the two topmost candidates in the race is scheduled to be held on the 7th of May, 2017. We don't know outcome as of now.
                Reply
                1. Load More Comments