24 September 2017

News Flash

नरेंद्रबाबांचे अर्थशास्त्र

निश्चलनीकरणामुळे आर्थिक फायदा सोडाच, उलट सरकारचा तोटाच झाला

लोकसत्ता टीम | Updated: September 1, 2017 9:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित छायाचित्र )

निश्चलनीकरणामुळे आर्थिक फायदा सोडाच, उलट सरकारचा तोटाच झाला, हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालातूनही दिसले..

इतिहास घडवण्याची एखाद्याची हौस एक वेळ समजून घेता येईल. पण इतिहास घडवायचा आहे म्हणून दोन पायांवर चालणाऱ्यांच्या जमावात एखादा दोन हातांवर चालू लागला तर ते फार फार तर लक्षवेधी ठरेल, ऐतिहासिक नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चलनीकरणाचा निर्णय हा असा हातावर चालून दाखवण्यासारखा होता. त्याने केवळ लक्ष वेधले गेले. मोदीभक्तांचे या कौशल्यदर्शनाने डोळे दिपले. पण त्याने अर्थव्यवस्थेचे एका पैशानेही भले झाले नाही. तसे ते होणारच नव्हते. आम्ही हे वास्तव ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री निश्चलनीकरणाची घोषणा झाल्यापासून सातत्याने मांडत आहोत. अखेर दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रिझव्‍‌र्ह बँकेनेदेखील आपल्या वार्षिक अहवालात ही बाब मान्य केली. आपण काही फार मोठे क्रांतिकार्य करीत आहोत अशा थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या रात्री ही निश्चलनीकरणाची घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार या निश्चलनीकरणामुळे आधी बनावट नोटांचा नायनाट होणार होता, मग काळा पैसा दूर होणार होता, पुढे जम्मू-काश्मीर सीमेपल्याडच्या पाकिस्तानातून दहशतवाद्यांना होणारी आर्थिक रसद बंद होणार होती, नंतर रोखचलन वापरात कपात होणार होती आणि अखेर या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेच्या अच्छे दिनाची पहाट होणार होती. निदान आपल्याला तसे सांगितले तरी गेले. एकंदरीत बेताची अर्थसमज असणाऱ्या आपल्या समाजात नरेंद्र मोदी यांच्या या कथित शौर्यकृत्याची लोणकढी बराच काळ खपून गेली. अखेर रिझव्‍‌र्ह बँकेनेच सत्य उजेडात आणले. या निश्चलनीकरणामुळे आर्थिक फायदा सोडाच, उलट सरकारचा तोटाच काय तो झाला, हेच यातून दिसते. म्हणजे अर्थतज्ज्ञ गेले काही महिने जे ओरडून सांगत होते त्यालाच यामुळे दुजोरा मिळाला. पण त्यामुळे भक्तांच्या विचारशक्तीवरील आंधळेपणाचे कवच दूर होण्याची शक्यता धूसरच. तथापि या अंध भक्तांकडे दुर्लक्ष करून विचारशक्ती शाबूत असणाऱ्यांसाठी तरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालाचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते.

या अहवालातील पृष्ठ क्रमांक १९५ निश्चलनीकरणाचे फलित सांगणारे आहे. त्यानुसार ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा या कागज का टुकडा असतील असे जाहीर केल्यानंतर १५ लाख ४४ हजार कोटी किमतीच्या नोटा रद्द झाल्या. ज्यांच्याकडे या नोटांत रोकड होती, त्यांना ती रक्कम ३० डिसेंबपर्यंत बँकांत भरण्याची मुभा देण्यात आली. हेतू हा की प्रामाणिक नागरिकांचे नुकसान होऊ नये. त्यानुसार अडीच लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम भरणाऱ्यांना कोणत्याही चौकशीस सामोरे न जाता ही रक्कम आपापल्या बँकांत भरता आली. हा पैसा किती होता, या काळात किती पैसा बँकेत जमा झाला या एका प्रश्नाचे उत्तर रिझव्‍‌र्ह बँक सातत्याने टाळत गेली. रिझव्‍‌र्ह बँकेचे वागणे हे दिवाभीतासारखे का होते, याचे उत्तर या ताज्या अहवालातून मिळेल. यातील तपशिलानुसार ३० जूनपर्यंत सरकारदरबारी जमा झालेल्या नोटांचे मूल्य १५ लाख २८ हजार कोटी रुपये इतके आहे. याचा अर्थ रद्द झालेल्या नोटांतील ९९ टक्के पैसा परत बँकेत आला. सरकारची अपेक्षा होती किमान तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयांच्या नोटा निश्चलनीकरणात रद्द होतील. म्हणजे तितका निधी आपल्याला उपलब्ध होईल आणि मग तो गरिबांच्या जनधन खात्यांत वितरित करून त्यांचे आशीर्वाद घेता येतील असा सरकारचा मनसुबा. तो किती अज्ञानमूलक होता, हे ताज्या आकडेवारीवरून समजून आले. कारण निश्चलनीकरणात जेमतेम एक टक्के नोटाच रद्द झाल्या. प्रचंड काळा पैसा बाहेर येईल ही अटकळ होती, तसे काही म्हणजे काहीही झाले नाही. याचाच दुसरा अर्थ असा की जो काही कथित काळा पैसा होता तो पांढरा करून घेण्याची सोय सरकारनेच उपलब्ध करून दिली. अडीच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर काहीही प्रश्न विचारले जाणार नाहीत अशी सोय असल्याने अनेकांनी इतरांच्या नावांवर इतकी रक्कम भरून आपला पैसा पांढरा केला. बनावट नोटा आणि दहशतवाद्यांकडील पैसा असे एक कारण या संदर्भात दिले गेले. या संदर्भात रिझव्‍‌र्ह बँकेचा अहवाल सांगतो की निश्चलनीकरणाच्या उद्योगात पाच लाख ७३ हजार ८९१ इतक्याच बनावट नोटा आढळून आल्या. रद्द झालेल्या एकंदर नोटांची संख्या आहे २४०० कोटी. त्यात बनावट फक्त पाच लाख. म्हणजे एक टक्कादेखील नाही. त्याआधीच्या आर्थिक वर्षांत, म्हणजे एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात, चार लाख चार हजार ४९४ इतक्या बनावट नोटा बँकांत आढळून आल्या. याचा अर्थ असा की निश्चलनीकरणाचा हास्यास्पद उद्योग न करतादेखील बनावट नोटा आढळून येतच होत्या. निश्चलनीकरणाने त्यात कोणतीही लक्षणीय भर पडली नाही. म्हणजे काळा पैसा हुडकून काढणे आणि बनावट नोटा शोधणे हे दोन्ही दावे उत्तमपणे यातून फोल ठरतात. राहता राहिला मुद्दा अर्थव्यवस्था रोकडरहित करण्याचा. रिझव्‍‌र्ह बँकेचाच अहवाल सांगतो की चलनाचा पुरवठा जसजसा सुरळीत होत गेला तसतसे नागरिकांचे रोख रक्कम वापरण्याचे प्रमाण पूर्ववत झाले. निश्चलनीकरणामुळे डिजिटल पेमेंट पद्धती काही प्रमाणात निश्चितच लोकप्रिय झाली. पण ती तशी लोकप्रिय करण्यासाठी सगळ्याच नोटा रद्द करणे हा मार्ग विनोदी आणि सरकारच्या आर्थिक बुद्धीबाबत संशय निर्माण करणारा होता. त्यातून केवळ पेटीएम आदी कंपन्यांचे तेवढे उखळ पांढरे झाले. त्यांचे भले करणे हाच मोदी सरकारचा उद्देश होता का?

दुसरा मुद्दा या उद्योगामुळे रिझव्‍‌र्ह बँकेस पडलेल्या भुर्दंडाचा. रद्द झालेल्या नोटांइतक्या नोटा पुन्हा चलनात आणण्यासाठी नव्या नोटांच्या छपाईवर आठ हजार कोटींहून अधिक रक्कम बँकेस खर्चावी लागली. त्याचे काय? खेरीज अद्यापही सहकारी बँकांकडून रिझव्‍‌र्ह बँकेत जमा झालेल्या नोटा मोजल्या गेलेल्या नाहीत. ही रक्कम साधारण १० हजार कोटी इतकी असावी. म्हणजे कथित काळ्याचे पांढऱ्यात रूपांतर झालेली रक्कम अधिकच फुगणार. वर परत नव्या नोटा छापण्याचा खर्च. याच्या जोडीला ८६ टक्के चलन बाजारातून गेल्यामुळे नागरिकांना सोसावे लागलेले हाल, अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यांचे काय? या निश्चलनीकरणाच्या धक्क्यातून देश अद्यापही सावरलेला नाही. एका व्यक्तीच्या एका झटक्याची ही किंमत कोण आणि कशी मोजणार? की हा अकारण आणि अनावश्यक झालेला खर्च आता राष्ट्रभक्तीच्या नावे भारतमातेच्या खात्यावर जमा करायचा?

आणि तरीही पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात निश्चलनीकरणातून तीन लाख कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत आल्याचे सांगणार. ते खरे असेल तर ते रिझव्‍‌र्ह बँकेला कसे काय माहीत नाही आदी प्रश्नांची उत्तरे खरे तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तरी द्यायला हवीत. निश्चलनीकरणाचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर करण्याआधी आपल्याला याची कल्पना होती का, हेदेखील जेटली यांनी सांगायला हवे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालानंतर निश्चलनीकरण म्हणजे काय, हे विरोधकांना कळलेच नाही, असे जेटली म्हणतात. मुळात त्यांना तरी ते कळले का, हा प्रश्न आहे. कळले असेल तर त्यांनी ते जनतेस सांगून अज्ञ जनतेच्या ज्ञानात भर घालावी. मराठीत ग्यानबाचे अर्थशास्त्र असा एक शब्दप्रयोग आहे. निश्चलनीकरणाच्या निमित्ताने नरेंद्रबाबांचे अर्थशास्त्र असा नवीन शब्दप्रयोग जन्मास येण्यास हरकत नसावी. अर्थशास्त्राचे व्हायचे ते होईल, पण यामुळे निदान भाषेत तरी नवीन भर.

First Published on September 1, 2017 2:45 am

Web Title: narendra modi reserve bank of india currency demonetisation total flop show
 1. K
  KK
  Sep 5, 2017 at 10:12 am
  मोदींनी बारावी चे मॅक्रो-ECONOMICS NCERT वाचावे. त्यामुळे त्यांचे अर्थशाश्त्राचे संकल्पना समजतील.
  Reply
  1. K
   kad
   Sep 4, 2017 at 7:12 pm
   Are pan khotya nota jya chalanar hotya khup mothya pramanat tya tar bad zhalya ka nahi.tyacha hisheb RRB kade kasa asael
   Reply
   1. K
    kad
    Sep 4, 2017 at 7:11 pm
    j
    Reply
    1. G
     ganesh b
     Sep 2, 2017 at 11:52 pm
     Gappa marun, mithya marun, style hanun desh bhakti karnarya pradganana he mahit kaa nahi ki.... Rymchya songapai.. Shetkari kamgar... Poranna kaam nahi....ajun doan varsh economy market halnar nahi..... Lokanni kaai jaraych..... Petrol che bhav padlet international markets madhe... Mhanun yaana bare divas alet.... Desh khadddyat gelay......Ragul la bhik maagaychi suddha akkkal nai.. Ani naarbala gappa marachich akkal ...... Kuberji tumhi lihit raha...... Satya. Samaja samor yayala pahije...
     Reply
     1. S
      sanjay
      Sep 2, 2017 at 9:12 pm
      प्रसाद आपण अगदी बरोबर उत्तर दिले आहे ! नोटबंदी निर्णय हा काही एकाच पर्याय नसून ,२०१४ नंतर बरेच निर्णय घेतले जे काळ्या पैशा विरोधात आणि देशात जी एक समांतर अर्थव्यवस्था सुरु होती( कॅश) त्याला बर्यापैकी आळा बसला आहे आणि आजून पुढे हि समांतर अर्थव्यवस्था कमी होणार आहे !! आणि त्याचेच सगळ्यात जास्त दुःख काही लोकांना झाले आहे - कुबेर साहेब असल्या लोकांचे कट्टर समर्थक आहेतानी त्यांच्याच पगारावर गेल्या कित्येक वर्षांपासून आपली लेखणी घासताहेत .करू द्या बापड्यांना - मोदीजी त्यांच्या लक्षापासून जराही विचलित होणार नाही हि खात्री बाळगा -आणि हे सर्वांच्या चोरांना समजून चुकलंय तेव्हा त्यांची हे सर्व कोल्हेकुई वाढेल -काळजी नसावी -(ज्योत मालवण्यापूर्वी मोठी होते!!!!)
      Reply
      1. R
       Ravindranath Mantri
       Sep 2, 2017 at 4:36 pm
       You seems to be only interested in qriting against Narendra modi come what may.....shame on the publication. Why dont you show you knowledge and uprightness in Mather Teresa editorial withdrawl case...LokBaba
       Reply
       1. V
        vaachak
        Sep 2, 2017 at 11:56 am
        अर्धवट लोकांनी थातुर मातुर लेख लिहू नयेत असे आम्ही आधी पासूनच सांगत आलो आहोत. त्यामुळे वर्तमानपत्राचा दर्जा आणि विश्वासार्हता कमी होते हे संपादकीय टीम ने विचारात घ्यावे.
        Reply
        1. J
         jayant kolhe
         Sep 2, 2017 at 11:18 am
         बनावट नोटा किती होत्या हे तुम्ही सांगू शकाल ? कशाच्या आधारे ? जर तुम्हाला माहित असेल तर ते पोलिसांकडे का नाही दिली
         Reply
         1. M
          Madan Jain
          Sep 1, 2017 at 11:33 pm
          कुबेर हा इसम लोकसत्ता सारख्या ठिकाणी का नोकरी करतो? मौनी सिंग प्रमाणे यांची पण काही मज ी असेल. खरे तर हा माणूस इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, मॉर्गन स्टॅनली, मेरील लिंच , स्विस बँक, अमेरिकन फेडरल बँक अशा ठिकाणी मोठ्या पदावर असायला हवा होता. भारतात सडतो आहे बिचारा.
          Reply
          1. S
           SG Mali
           Sep 1, 2017 at 10:35 pm
           म्हणजे काळा पैसा नव्हताच मुळी. याचाच अर्थ देशात भ्रष्टाचार वगैरे काही झालेच नाही असा होतो. नोटा बंदीविषयी संपादाकानी इतके खरड खरड खरडले आहे तर मग कलमाडी, कन्निमोली, राजा, सुब्रतो राय इ.इ. याना तुरुंगात कोणी आणिविनाकारण का पाठवले. याबद्दल आपल्या संपादाकानी स्वत:च्या कुशाग्र बुद्धीचा कस लावून एखादा विद्वत्ताप्रचूर असा अग्रलेख प्रस्तुत केल्यास लोकांचे अद्न्यान दूर करण्याचे महापूण्य पदरी पडेल आणित्या उपकारापोटी लोकसंपादकाना नक्कीच मनापासून धन्यवाद देतील. .
           Reply
           1. U
            utkarsha
            Sep 1, 2017 at 9:39 pm
            आधी नारायण मूर्तींना किर किर करणारा म्हातारा , आता पंतप्रधानांना नरेंद्रबाबा ....अहो कुबेर साहेब हि मंडळी स्वकर्तुत्वाने उत्तुंग झाली आहेत. शून्यातून "निर्माण" केलाय त्यांनी. आपण स्वतः नावाचेच कुबेर आहात आणि वास्तवात एक सामान्य चाकरमानी संपादक आहात हे विसरू नका असली अर्वाच्य भाषा वापरतांना.
            Reply
            1. विनोद
             Sep 1, 2017 at 9:01 pm
             सलीमपंत, तुमचे खरे नाव आणी आडनाव काय आहे ?
             Reply
             1. r
              r.d.shinde
              Sep 1, 2017 at 8:38 pm
              पंतप्रधान ,अर्थमंत्री ,आणि रिझर्वब्यांक यांच्यात ताळमेळ का नाही .प्रेत्येकजण उलटसुलट मते मांडून साऱ्या देशाला संभ्रमात टाकत आहे .लांबत जाणारी नोटा मोजणी ,मुंबई विध्यापिठाचा न लागणारा निकाल सारखाच .
              Reply
              1. J
               jay ray
               Sep 1, 2017 at 8:23 pm
               नारोबाचे अर्थशास्त्र !
               Reply
               1. P
                prasad
                Sep 1, 2017 at 7:43 pm
                निश्चलीकरणाचे काही फायदे - (१) ५६ लाख नवीन करदाते (२) बँकांतील deposit ३ लाख करोडने वाढले (३) ४४० बोगस कंपनी बंद, ८४० बोगस कंपनी बंदीच्या मार्गावर (३) ३७००० हवाला घोटाळे, ४०० बेनामी व्यवहार (८००० करोड चे) (४) १६००० करोड काळ पैसे जाहीर, २९२१३ करोड संपत्ती उजेडात/व्यवहारात (५) १ लाख बोगस कंपन्यांचे नोंदणी बंद (6) नोटबंदीमुळे सुमारे १४ लाख कोटींचा समांतर अर्थ व्यवस्थेतील पैसा मुख्य आर्थिक प्रवाहात आला . त्यामुळे व्यवस्थेबाहेरील आर्थिक व्यवहार थांबले . हा मोठा दीर्घकालीन फायदा झाला. दीर्घकालीन फायद्यासाठी थोडा अल्पकालीन तोटा सोसवाचं लागतो. इंजेकशन टोचते म्हणून गंभीर दुखण्यावरही उपाय न करणे मूर्खपणाचे असते. ज्यांचा मुख्य आर्थिक व्यवस्थेबाहेर असलेला व्यवहार ठप्प झाला असेच लोक नोटबंदी विरोधात बोलत आहे. कोणीही सामान्य व स्वच्छ माणूस नोटबंदी विरोधात बोलत नाही. वाईच कळ काढा. आजही जे काळे धंदे करतायत त्यांची घटिका हळूहळू भरतेय. ज्या उद्योगात काळा पैसे होता ती 'GST व RERA मुळे GDP कमी करतायत, तुम्हालाही मनोमन हे माहितीय म्हणून वर्षानु वर्षे चिखलात असणारे 'हात ' 'कमळ' तोडायला आतुर आहेत.
                Reply
                1. S
                 Sadashiv Potadar
                 Sep 1, 2017 at 6:59 pm
                 भारतीय RESERVE बँक पूर्व गव्हर्नर shri रघुराम राजन याचे मत आपण विचारात घ्यावे. सत्य हे कटू असते. देशाला जरूर भासेल तेव्हा त्यांनी भारतात आपले योगदान देण्याचे वाचन दिलेले आहेच.
                 Reply
                 1. J
                  JaiShriRam
                  Sep 1, 2017 at 6:01 pm
                  उर्मिला शहा ताई ह्या उच्चप्रतीच्या भक्त दिसतात ....असे कितीही पगारी लबाड भक्त निर्माण झाले तरी सत्य लपत नाही............तेव्हा अश्या बिनडोक भक्ताच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे....
                  Reply
                  1. S
                   sarvan
                   Sep 1, 2017 at 5:55 pm
                   जुन्या नोटा छापायचा खर्च नव्या नोटा छापायचा खर्च विकास , हा विकास खर्च मोदीभक्तांकडून उपटून काढा ..... विकासाच्या नावाखाली नुसत्याच मर्कटलीला चालल्या आहेत ......आम्ही पे केलेल्या टॅक्स मधून...अश्या बोंबा मारणारे आता कुठे आहेत ....ते मोदीसरकारला जाब का विचारात नाहीत ?
                   Reply
                   1. अनामिक
                    Sep 1, 2017 at 5:34 pm
                    किसीं के पिछे आख मुंद कर चलना भी एक प्रकारकी गुलामी है।
                    Reply
                    1. V
                     vikas mundhe
                     Sep 1, 2017 at 5:03 pm
                     लोकसतेचा दर्जाचं असल्या लेखकांमुळे घसरलाय हा पेपरच वाचणे नको.
                     Reply
                     1. A
                      Adesh
                      Sep 1, 2017 at 4:56 pm
                      सुंदर . पण भक्त मानणार नाहीत !!
                      Reply
                      1. Load More Comments