21 August 2017

News Flash

पिंजऱ्यातले पोथीनिष्ठ

जगात डाव्यांना पहिल्यांदा निवडणुकांना सामोरे जावे लागले ते केरळात.

लोकसत्ता टीम | Updated: August 8, 2017 2:10 AM

उजवे आणि डावे या दोघांच्याही पराकोटीच्या निष्ठांमध्ये सहिष्णुतेला स्थान नाही..

अर्थ/संरक्षणमंत्री अरुण जेटली आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एकाच दिवशी पण वेगवेगळ्या ठिकाणी केलेली वक्तव्ये देशातील टोकाचे डावे आणि उजवे यांचे नक्की चुकते कोठे याचे अचूक दिग्दर्शन करतात. जेटली यांचे वक्तव्य केरळ येथील आहे तर उपराष्ट्रपती अन्सारी यांचे कर्नाटकातील. सध्या मार्क्‍सवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांच्यातील हिंसाचाराने केरळ ग्रासले असून तेथे डाव्यांच्या हिंसाचारात बळी पडलेल्याच्या कुटुंबीयास जेटली यांनी भेट दिली. अन्सारी हे बेंगळूरु येथे राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या समारंभात बोलत होते. उपराष्ट्रपती या नात्याने अन्सारी यांचे हे शेवटचे भाषण. केरळात जे काही घडत आहे तसे काही भाजपशासित राज्यात घडले असते तर पुरस्कारवापसीची लाट आली असती असे जेटली यांना वाटते. तर उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या मते सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अंतिमत: अत्यंत संकुचित, असहिष्णू ठरतो आणि त्यातून केवळ गर्विष्ठ, आत्मकेंद्री असे देशभक्तीचे ठेकेदार तयार होतात. या दोघांचेही प्रतिपादन महत्त्वाचे असून सांप्रतच्या राजकीय वातावरणात त्यांची दखल घेणे आवश्यक ठरते.

जगात डाव्यांना पहिल्यांदा निवडणुकांना सामोरे जावे लागले ते केरळात. तोवर हे मार्क्‍सवादी निवडणुका, मतपत्रिका आदी मानत नव्हते. परंतु केरळच्या भूमीत त्यांना आपल्या डावेपणास मुरड घालावी लागली आणि लोकशाहीचे नियम मान्य करावे लागले. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय.  गेली सुमारे चार वा पाच दशके संघाचे स्वयंसेवक या राज्यात स्वत:स गाडून घेऊन काम करीत असून परिणामी डाव्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक हे आव्हान ही जशी डाव्यांची समस्या आहे तशीच ती संघाची मर्यादादेखील आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतक्या वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही संघ आणि म्हणून त्यानंतर भाजप यांस या राज्यात म्हणावे तसे आणि तितके यश मिळालेले नाही. यामागील कारण म्हणजे अर्थातच केरळातील नागरिक रचना. मुसलमान, ख्रिश्चन आणि हिंदू यांचे अनोखे मिश्रण त्या राज्यात पाहायला मिळते. या मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातही परत पाठभेद आहेत. मोपले या नावानेही या राज्यातील मुसलमान ओळखले जातात आणि त्यांच्यातील एक शाखा पश्चिम आशियातील वाळवंटातल्या इस्लामइतकीच जुनी आहे. तीच बाब ख्रिश्चनांचीदेखील. व्हॅटिकन येथील पोप यांस समांतर अशी सीरियन ख्रिश्चन यांची संख्याही केरळात लक्षणीय आहे. केरळात मुसलमानांचे प्रमाण २६ टक्के  इतके आहे तर ख्रिश्चन आहेत १८ टक्के. या दोन्हीही धर्मानुयायांची इतकी मोठी संख्या असल्याने अर्थातच या राज्यात संघ हवा तितका रुजू शकलेला नाही. या राज्यातील काँग्रेसची पीछेहाट वा त्या पक्षाचे न रुजणे हे नेहमीच डाव्यांना अनुकूल राहिलेले आहे. परंतु म्हणून ते दुटप्पी नाही, असे म्हणता येणार नाही. एरवी भाजपच्या नावे बोटे मोडणाऱ्या आणि भाजपस धर्माध ठरवणाऱ्या डाव्यांनी केरळातील सत्तेसाठी बेलाशकपणे मुस्लीम लीगशीदेखील हातमिळवणी केली. डाव्यांनी प्रसंगी काँग्रेसलादेखील जवळ केले. तेव्हा भाजपचा सारा खटाटोप आहे तो त्यांच्या मते ही अभद्र युती तोडण्यावर. परंतु त्यात त्यांना लक्षणीय असे यश मिळालेले नाही. केरळ आणि त्रिपुरात भाजपचा प्रसार झाला तर मी स्वत:ला यशस्वी मानेन असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांना वाटते ते याचमुळे. केरळाप्रमाणे त्रिपुरातदेखील डाव्यांचे प्राबल्य असून तेथेदेखील भाजप यशापासून मैलोगणती दूर आहे. अशा वेळी या राज्यातील जनतेच्या मनात आपल्याविषयी इतकी साशंकता का आहे, याचा विचार खरे तर भाजपने करावयास हवा. तसा तो न करता या राज्यांतील राजवटींना दूषण देणे हा भाजपचा पलायनवाद झाला. केरळातील डावे नृशंस आहेत हे गृहीतच धरले तरी इतक्या रक्तपातानंतरही तेथील जनतेच्या मनात भाजपविषयी सहानुभूती का नाही, हा खरा प्रश्न आहे.

त्याचे उत्तर पाहू जाता उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या वक्तव्यास महत्त्व येते. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात भाजपचा उल्लेख केला नाही. परंतु त्यांचे सारे वक्तव्य भाजप आणि त्याहीपेक्षा अतिरेकी हिंदू संघटनाप्रणीत आक्रमक राष्ट्रवादाचा समाचार घेणारे होते. हिंदुत्ववाद्यांना इस्रायल आणि यहुदींचे नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात इस्रायली विदुषीचाच दाखला दिला. येल तामिर हिने इस्रायल, यहुदी आणि राष्ट्रवाद यांचा साकल्याने अभ्यास केला असून त्या विषयावरील त्यांचा अधिकार वादातीत आहे. स्वत:च्या संस्कृतीचा आदर करीत असताना इतरांच्या संस्कृतीविषयीदेखील तितकाच आदर बाळगणे, हे तामिर यांचे मत उपराष्ट्रपतींनी उद््धृत केले. असा स्वत:च्या संस्कृतीचा उत्सव करणारे मानवी हक्क, स्वातंत्र्य, समानता आदी मूल्यांनाही तितकेच महत्त्व देत असतात, असे तामिर नमूद करतात. या मूल्यांच्या अभावी वा अनुपस्थितीत सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे हे असहिष्णू, संकुचित आणि अहंकारी देशभक्तीस जन्म देतात, हे ताहिर यांचे निरीक्षण. तेव्हा हे सर्व टाळावयाचे असेल तर अन्य धर्मीयांच्या अधिकारांवर, त्यांच्या संस्कृतीवर गदा येणार नाही अशाच पद्धतीने आपल्या समाजातील सांस्कृतिक बहुविविधता जपायला हवी, हे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन प्रस्थापित व्यवस्थेच्या वैगुण्यावर बोट ठेवणारे आहे. विद्यमान राष्ट्रवादी वातावरणात देशप्रेम, लष्करी ताकद यांचे प्रदर्शन मोठय़ा अभिमानाने केले जाते. हे किती बालिश आणि तितकेच धोकादायक आहे हे नमूद करताना उपराष्ट्रपतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या वचनाचा आधार घेतला. लष्करी ताकदीचा वृथा अभिमान हा नेहमीच स्वातंत्र्याचा संकोच करणारा ठरतो असे वॉशिंग्टन म्हणत. तेव्हा या संदर्भातही उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन मननीय ठरते.

उपराष्ट्रपती नमूद करतात त्या दुर्गुणांचा शिरकाव केवळ उजव्या राजवटीतच दिसून येतो, असे नाही. तर कमालीच्या डाव्या राजवटीदेखील तितक्याच असहिष्णू आणि मानवतेला कलंक ठरल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहास आणि वर्तमानात आढळतात. मग ती सोव्हिएत रशियातील स्टालिन आदींची कारकीर्द असो किंवा उत्तर कोरिया वा व्हेनेझुएला या देशांतील. डाव्यांच्या असहिष्णुतेची उदाहरणे कमी नाहीत. तेव्हा जेटली यांच्या विधानांत तथ्य असले तरी ते पूर्णसत्य नाही. या पूर्णसत्याच्या जवळ जाण्याची त्यांना इच्छा असेल तर उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या विवेचनाचा त्यांनी मुक्त मनाने स्वीकार करावयास हवा. तो केला तर त्यांच्या परिवारातील अतिरेक्यांकडून सध्या गोवंश हत्याबंदीपासून नैतिकता लादण्यापर्यंत जो काही आचरटपणा सुरू आहे तो त्यांना बंद करावा लागेल. वैयक्तिक आयुष्यात जेटली यांना हे अमान्य होण्यात अडचण नसावी. कारण ते विचाराने आधुनिक आहेत आणि भाजपतील सहिष्णूंचे ते प्रतिनिधित्व करतात. हाच मुद्दा डाव्यांतील अनेकांना लागू होतो. वैयक्तिक आयुष्यात ते विचाराने आणि आचाराने आधुनिक आणि अहिंसकही असतात. परंतु पक्ष म्हणून ते उभे राहिले की त्यांच्यातील कर्मठपणा जागा होतो आणि केरळात जे काही घडते ते घडू लागते.

याचा अर्थ इतकाच की हे टाळावयाचे असेल तर उभय बाजूंना आपल्या विचारधारेत सहिष्णुतेस स्थान द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणाने-  मग तो डाव्यांचा असो वा उजव्यांचा- कोणाचेच भले होत नाही. सोव्हिएत रशिया आणि हिटलरकालीन जर्मनी ही याची जिवंत उदाहरणे. हे या मंडळींना कळत नाही असे नाही. परंतु त्यांची पंचाईत ही की ही अंध पोथीनिष्ठा त्यांनी सोडली तर या दोन्हीही पक्षांचे चेहरेच हरवतील. गोमाता, धर्म आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद वगळता भाजप हा काँग्रेससारखाच दिसेल आणि भांडवलशाहीचा विरोध सोडल्यास डावे हे समाजवाद्यांसारखे दिसतील. ही खरी या दोघांची अडचण आहे. अतिरेकी पोथीनिष्ठेचा शेवट हा नेहमीच पिंजऱ्यातच होत असतो.

 • केरळ राज्यातील जनतेच्या मनात आपल्याविषयी इतकी साशंकता का आहे, याचा विचार खरे तर भाजपने करावयास हवा. केरळातील डावे नृशंस आहेत हे गृहीतच धरले तरी इतक्या रक्तपातानंतरही तेथील जनतेच्या मनात भाजपविषयी सहानुभूती का नाही, हा खरा प्रश्न आहे.

First Published on August 8, 2017 2:10 am

Web Title: rss worker killed kerala arun jaitley visits rss worker home bjp
 1. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:55 pm
  Harshad ((२) युती केल्यावर जसे सर्व विचार मान्य होत नाहीत तसे Kanhaiya ह्याला पण मान्य नसतील त्याच्या संघटनात लोकांचे विचार. ज्या अफझल गुरु ला शाहिद म्हटले त्याच्या बरोबर युती करता मग दुसऱ्याला काय bolayache अधिकार आहे?)) एखाद्या पक्षासोबत युती करणे व त्या पक्षाचा सदस्य असणे यात खुप फरक असतो. आता एवढीही समज नाही म्हणल्यावर अवघड आहे. आता भाजपची शिवसेनेसोबतची युती आहे. शिवसेना हा महाराष्ट्रवादी आहे. शिवसेनेच्या मतानुसार महाराष्ट्रात मराठी माण च सर्व सुविधा मिळायला हव्या. आता भाजप जो राष्ट्रीय पक्ष आहे तो अशी भुमिका तर नाही ठेऊ शकत. हा काॅमन सेन्स आहे.
  Reply
 2. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:33 pm
  Harshad ((खडसे विरोधात आयोग च्या नियमाखाली chaukashi फेटाळली. का? कोइ नाही chaukashi चालू आहे.)) राजकारणी आहे. त्यातही मोठा नेता आहे. त्याविरोधातील चौकशीचे असेच असते. त्याला कोणताच पक्ष अपवाद नाही. जर खडसेंनी फडणवीस यांना जास्त विरोध केला नसता तर अस प्रकरण पण उघड नसते झाले.
  Reply
 3. H
  harshad
  Aug 11, 2017 at 3:38 pm
  खडसे विरोधात आयोग च्या नियमाखाली chaukashi फेटाळली. का? कोइ नाही chaukashi चालू आहे.
  Reply
 4. H
  harshad
  Aug 11, 2017 at 3:36 pm
  Deshmukh तुमच्या आंधळ्या भक्तीला नमस्कार. सन्मानार्थ बोलायचे म्हणून गुरु म्हणायचे. गुरु चे महत्व काय असते हे हिंदूंना माहित नाही? २) युती केल्यावर जसे सर्व विचार मान्य होत नाहीत तसे Kanhaiya ह्याला पण मान्य नसतील त्याच्या संघटनात लोकांचे विचार. ज्या अफझल गुरु ला शाहिद म्हटले त्याच्या बरोबर युती करता मग दुसऱ्याला काय bolayache अधिकार आहे? सत्तेसाठी कुठल्याही Tharakan जातात. थोडक्यात कसे आम्ही खाल्ली तर श्रावणी आणि दुसर्याने खाल्ले तर शेण. जर कानैहाय्य बद्दल कोर्ट काय म्हटले हे एवढे महत्वाचे असेल तर त्याच कोर्ट नि बाजप अध्यक्षाला तडीपार केले होते पण Kanhaiya ला जमीन दिला. हा फरक आहे. ( देशद्रोह सारखा गुन्हा असताना जमीन मिळतो kon चुकीचे?)जर रोहित वर मर्डर ची कोइ होती मग त्याच्या तपासाची ऑर्डर का दिली नाही? मर्डर case आहे म्हणून हॉस्टेल मधून काढले जाते? एवढीच शिक्षा? प्रधानसेवकांनी अश्रू गळाले कि माँ ने आपण भेट खो दिया म्हणून. मग ते असेच बडबडले?
  Reply
 5. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:46 am
  Harshad ((जर एवढे देशप्रेमी आहेत तर अफझल गुरु ला शाहिद म्हणणाऱ्या बरोबर युती कशी काय? मग ते पण कानय्या सारखे देशद्रोही होत नाहीत का? माणसाप्रमाणे न्याय बदल तो का?)) एखाद्यासोबत युती कलणे म्हणजे त्याचे सर्व विचार स्वीकारणे असा विचार केवळ बालबुद्धिच करू शकतात. मी पण भाजप-पीडीपी यूतीविरोधात आहे. तिथे खर तर भाजप काँग्रेस युती व्हायला पाहिजे जेणेकरून कलम 370 हटविण्यासाठी प्रयत्न करता येतील.
  Reply
 6. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:43 am
  Harshad ((कन्हय्या वर १/२ वर्षे झाले आरोपपत्र पण दाखल करू शकले नाहीत मग दोषी कोण?)) कन्हैया जर निर्दोष आहे अस नशेखोरांना वाटत असेल तर एकदा या देशद्रोहीला जामीन देताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा राणी यांनी काय म्हणल होत ते पण वाचून घ्या. त्यातून सर्व क्लिअर होईल. केवळ विद्यार्थी (30-35 वर्षाचा का असेना) असल्याने त्याचे करिअर बरबाद होऊ नये म्हणून त्याविरोधात कठोर कारवाई केली जात नाहीये.
  Reply
 7. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:40 am
  Harshad ((जर रोहित दोषी असेल तर खडसे पण तेवढे दोषी पाहिजे. वेगवेगळा न्याय का)) रोहीत वर हिफ मर्डर ची केस होती. त्यामुळे त्याला वशतीगृहातून हाकलले होते. तु अर्धवट माहिती काढत असशील पण मी नाही. त्याने व त्याच्यासारख्या इतर गुंडांनी अभाविपच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला होस्टेलमधून काढले होते. आणि खडसेविरोधात पण केस चालू आहे हे माहिती नाही का?
  Reply
 8. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:36 am
  Harshad ((ज्या नेत्याबद्दल बोलत आहात त्या नेत्याला तर PM. ने गुरु मानले आहे/ मग गुरु तास चेला)) बऱ्याचदा सभेत व एखाद्याच्या सन्मान समारंभात काही गोष्टी बोलाव्या लागतात. त्या सर्व खऱ्याच असतात असा विचार केवळ एक बालबुद्धिच करू शकतो.
  Reply
 9. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:34 am
  Harshad ((गोमांसाच्या निर्यातीच्या बंदीवरचे काय? ते तर केंद्राच्या हातात आहे ना? मग का करत नाहीत?)) या मुद्द्याशी मत.
  Reply
 10. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:33 am
  Harshad (एकीकडे मान्य करता कि Christian व युरोपियन लोक म्हशीचे मास खात नाहीत मग परिकर म्हशीचे व रेडयांचे मास का आयात करत आहेत?) मराठी समजत नसेल तर शाळेत जा. आधी मी दिलेल्या प्रतिक्रिया नीट वाच. मी ख्रिस्ती आणि यूरोपीयन चा विषयच काढलेला नव्हता. कदाचित गांजाच्या नशेत तुला तस वाटत असेल.
  Reply
 11. समीर देशमुख
  Aug 11, 2017 at 5:31 am
  Harshad (श्यामाप्रसाद मुखर्जी च्या पत्रावर चुप्पी साधली.) गांजा मारून नशेत प्रतिक्रिया देऊ नये. जिथे तु मुखर्जी यांच्याबद्दल बोलला होतास तिथे मी त्याबद्दल लिहीलय. आणि तु कोणी फाल मोठा लागून नाही गेलास की तुझ्यासारख्या अर्धवटरावच्या प्रत्येक प्रश्नाचे मी उत्तर देईल.
  Reply
 12. संदेश केसरकर
  Aug 10, 2017 at 9:00 pm
  एकांगी लेख आहे. पटत नाही. असे लेख लिहून लोकसत्तेची ब्रांड इक्विटी खाली आणू नये.
  Reply
 13. H
  harshad
  Aug 10, 2017 at 2:08 pm
  deshmukh- श्यामाप्रसाद मुखर्जी च्या पत्रावर चुप्पी साधली. एकीकडे मान्य करता कि Christian व युरोपियन लोक म्हशीचे मास खात नाहीत मग परिकर म्हशीचे व रेडयांचे मास का आयात करत आहेत? हिंदूना खाण्यासाठी? गोमांसाच्या निर्यातीच्या बंदीवरचे काय? ते तर केंद्राच्या हातात आहे ना? मग का करत नाहीत? राजस्थान मध्ये २०० गाईंचा गोशाळेमध्ये मृत्यू झाला मग तेथे का हल्ला केला नाही? ज्या नेत्याबद्दल बोलत आहात त्या नेत्याला तर PM. ने गुरु मानले आहे/ मग गुरु तास चेला. जर रोहित दोषी असेल तर खडसे पण तेवढे दोषी पाहिजे. वेगवेगळा न्याय का? कन्हय्या वर १/२ वर्षे झाले आरोपपत्र पण दाखल करू शकले नाहीत मग दोषी कोण? जर एवढे देशप्रेमी आहेत तर अफझल गुरु ला शाहिद म्हणणाऱ्या बरोबर युती कशी काय? मग ते पण कानय्या सारखे देशद्रोही होत नाहीत का? माणसाप्रमाणे न्याय बदल तो का?
  Reply
 14. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:42 am
  Harshad रोहीत हा देशद्रोहीच होता. जो माणूस 300 हून अधिक निरपराध लोकांच्या मृत्युस कारणी आहे व त्याचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने साबीत केला आहे त्याच्या फाशीला विरोध करणे म्हणजे या 300 निरपराध लोकांच्या खुनाला पाठिंबा देणे होय. आणि कन्हैया कुमार यासाठी दोषी आहे कारण अफजल गुरू सारख्या अतिरेक्याची जयंती जेएनयू मध्ये होत असताना पण विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून त्याने हे रोकले नाही.
  Reply
 15. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:39 am
  Harshad जर राजकारण कळत नसेल तर त्यावर बोलु नये मग. खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. आणि ते फडणवीस यांना त्रासदायक ठरत हौते म्हणून त्यांना बाजूला केले गेले. आणि महाराष्ट्रातील एक मोठा नेता तर या साठी प्रसिद्ध आहे की त्याने दाऊद आत्मसमर्पन करण्यास तयार असताना पण ते करू दिले नाही. आणि भोपाळ गॅस दुर्घटना झाल्यानंतर युनियन कार्बाइडच्या अँडरसन ला स्वतःच्या हेलिकॉप्टर मध्ये सोडणारा नेता कोण होता? त्याबद्दल चाटु काहीच बोलत नाहीत.
  Reply
 16. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:33 am
  Harshad जर व्हिआयपी आहात तर तुम्हाला प्रोटोकॉल पाळावाच लागतो. राहुल गांधी अर्थात पप्पूजी यांना नियम पाळायला अडचण येते. राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की खानग्रेसचे अतिशहाणे युवराज यांनी गेल्या दोन वर्षात 100 हून जास्त वेळेस हा प्रोटोकॉल तोडलाय. मग जर प्रोटोकॉल नाही पाळले तर SPG प्रोटेक्शन कशाला घ्यायचे? प्रत्येक गोष्टीत नियम काहीतरी कारणामुळे तयार केलेले असतात. ते तोडल्यानंतर होणाऱ्या नुकसानाला केवळ तो नियम तोडणारा जबाबदार असतो नियम बनवणारा नाही. आणि जरी तो हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याला विकत घेणे फार मोठी गोष्ट नाही.आजकाल आमदार, खासदार पण विकले जाऊ शकतात तिथे एका सामान्य कार्यकर्त्याची काय गोष्ट?
  Reply
 17. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:26 am
  Harshad हाहा हा. सर्वात मोठ्या पक्षाला तेव्हाच बोलावतात जेव्हा कोणीच सत्तास्थापनेसाठी तयार नसेल. 2014 कोणत्याच एका पक्षाला बहूमत नसायचे मग काय एका एका पक्षाला बोलवत बसणार का? जर राज्यघटना माहीत नसेल तर कशाला उगाच स्वतःच्या अर्धवट ज्ञानाचे प्रदर्शन करताय? सुप्रीम कोर्टाने पण गोवा आणि मणिपुर बद्दल काय निर्णय दिला हे माहिती नाही का? सत्तास्थापनेसाठी बहुमत लागत असते. सर्वात मोठा पक्ष असल्याने तुमचा सत्तास्थापनेवर अधिकार होत नाही.
  Reply
 18. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:23 am
  Harshad किरण रिजीजू म्हणाले होते की मी पण बीफ खातो. नाॅर्थ इस्ट मध्ये त्यावर बंदी नाही. आणि बीफ ची व्याख्या काय हे जरा नीट पाहून घ्या. तुमच्या फाॅल्टी ्शनरीत त्याचा अर्थ केवळ गाईचे मांस असाच दिलाय जो अर्धवट आहे.
  Reply
 19. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:21 am
  Harshad मी हे कोठेच बोललो नाही की ख्रिस्ती व यूरोपीयन लोक म्हैस व रेड्याचे मांस खातात म्हणून. मी म्हणलो की बीफ मध्ये म्हैस व रेड्याचे मांस पण येते. आणि Goa, Daman and Diu Prevention of cow slaughter 1978 Act नुसार या भागात गायींच्या हत्येवर बंदी आहे. आणि कर्नाटक मध्ये पण केवळ रोगी व वृद्ध गाय कापता येते. 2010 मध्ये यावर पण बंदी आणण्यासाठी प्रपोझल आले होते. कदाचित जर तिथे भाजपचे राज्य आले तर तिथे पण गोहत्याबंदी कायदा लागु होईल. आणि मनोहर पर्रिकर बीफ आयात करू असे म्हटले होते. आता तुमच्या ्शनरीत बीफ म्हणजे केवळ गाईचे मांस हा अर्थ असेल तर तो तुमचा प्राॅब्लेम आहे.
  Reply
 20. समीर देशमुख
  Aug 10, 2017 at 10:12 am
  Harshad प्रशांत पुजारीला मारणारे गोतस्करच होते. तो त्यांच्या धंद्यात बाधा बनत होता म्हणून त्याला संपवले गेले. असेच कितीतरी गोरक्षक जे गोतस्करी जो कायद्याने अपराध आहे ते रोखताना मारले गेले पण ते एका खास जमातीचे वा धर्माचे नसल्याने या विषयावर कोणी चर्चा करत नाही. बिहारमध्ये भाजप-जदयु सरकार येऊन अजून उणापुरा एक आठवडा होईल. तर लगेच हे हल्ले वाढले याचा साक्षात्कार तुम्हाला झाला. राहीली गोष्ट पहलु खानची तर त्याच्या सोबत जे झाले ते चुकच. पण त्याचा आधार घेऊन गोतस्करी करणाऱ्या अपराध्यांना मोकाट सोडायच का? आणि राहीली गोष्ट इतरांच्या जीवाची तर त्यांनी गोतस्करी करू नये. मग कशाला कोणी तुम्हाला कोणी मारेल?
  Reply
 21. K
  Kumar
  Aug 9, 2017 at 8:00 pm
  परिवाराचे अतिरेकी???? डोक ठिकानावर आहे ????
  Reply
 22. Load More Comments