18 August 2017

News Flash

आयसिसीकरणाकडे..

नाहीद आफरीन व भन्साळी या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे..

लोकसत्ता टीम | Updated: March 18, 2017 2:30 AM

सध्या सर्वच माध्यमांमधून गाजत असलेल्या नाहीद आफरीन व भन्साळी या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे.. ते म्हणजे सामाजिक सेन्सॉरशिपचे..

या सामाजिक सेन्सॉरवाल्यांचा विरोध वरवर पाहता एखाद्या गाण्याला, एखाद्या चित्रपटाला वा पुस्तकाला आहे असे दिसत असले, तरी त्याच्या खोलात वेगळीच विकृती असते. ती असते धर्म वा इतिहासाच्या खोटय़ा गौरवाची, नव्या कल्पनांना, सुधारणांना विरोधाची आणि विवेकी बुद्धिवादाला नाकारण्याची..

आसाममध्ये सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली गायिका नाहीद आफरीन हिच्याविरोधात ४६ मुस्लीम मौलवींनी काढलेले पत्रक आणि संजय लीला भन्साळी या सुमार चित्रपटकाराच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविरोधात राजस्थानातील कुठल्याशा फुटकळ संघटनेने सुरू केलेले आंदोलन हा तर्कबुद्धीविरोधात सध्या सुरू असलेल्या जिहाद वा धर्मयुद्धाचाच एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांपासून हा संघर्ष सुरू आहे. त्यात आजवर तरी बुद्धिवादाचा विजय झाल्याचे दिसले. तो झाला नसता, तर आज आपणास दिसते ती प्रगती, तो विकास हे स्वप्नच राहिले असते. कधी काळी आपल्या पूर्वजांनी बुद्धीने विचार करून काही शोध लावले. निसर्ग समजून घेतला, विज्ञानाचे नियम जाणून घेतले, समाजाचे शास्त्र शोधले, त्यातून संस्कृतीचे इमले बांधले. हे सारे विवेकी बुद्धिवादाने केलेल्या संघर्षांतून साध्य झाले आहे. त्यांची ही लढाई नेहमीच रूढी आणि परंपरांशी होती, समाजाच्या भावनाशरण वृत्तीशी होती. गेलेले दिवस नेहमीच गोड भासतात. जुने ते सोने असेच वाटते. त्यामुळे होते आणि आहे ते तसेच राहावे, असे समाजातील अनेकांना कायमच वाटत असते. परंतु त्याच समाजातील काही जण उठतात. ते विचार करू लागतात. त्यांना जाणवते, की सगळा समाज ज्याला डोक्यावर घेऊन भजतो आहे तो धर्म म्हणजे तर काहींच्या हातातील हत्यार बनला आहे. या जाणवण्यातून मग एखादे नामदेव, एखादे तुकाराम पुढे येतात. कोणास वाटते की ज्याच्यापुढे सारे आपल्या माना तुकवत आहेत, वतनाच्या लोभापायी तलवारी गहाण ठेवत आहेत ती राज्ये, राज्ये नसून यातनायंत्रे आहेत. गुलामगिरीचे कारखाने आहेत. त्या विचारांतून मग शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष घडतात. धर्मसुधारक, वैज्ञानिक, समाजसुधारक यांच्या कार्यालाही अधिष्ठान असते ते तर्कबुद्धीचेच. त्यांत भावनांना स्थान नसते असे मुळीच नाही. पण भावनांमधून फार फार तर वेडात मराठे वीर दौडले सात असे होते. तिला विचारांचा लगाम असेल, तरच त्यांतून राज्य निर्माण होऊ  शकते, तरच त्यांतून नवे शोध लागू शकतात वा नवा समाज निर्माण होऊ  शकतो. आज मात्र बहुधा साऱ्या समाजालाच पुढे जाण्याचा कंटाळा आला असावा, असे दिसते. कारण असा बश्या आजार झाल्याशिवाय समाज विचार करण्याचे सोडून देत नाही. तो बुद्धिवादाविरोधातच संघर्ष पुकारत नाही. समाजातील बुद्धिवादी, विचारी, सुधारणावादी यांची टिंगलटवाळी करीत बसत नाही. ही टवाळखोरी म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असते. पण भावनांच्या आहारी गेलेल्या समाजाला याचेही भान राहात नसते. आज आपल्याकडे हीच भानरहितता मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. नाहीद आफरीन वा भन्साळी प्रकरण हा त्याचाच एक भाग आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे ते सामाजिक सेन्सॉरशिपचे. ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाचा अपलाप केला आहे. त्यात अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावती किंवा पद्मिनी यांच्यातील प्रेमप्रसंग दाखविण्यात आला आहे. हे सारे आमच्या भावना दुखावणारे आहे, असे राजस्थानातील काही लोकांचे म्हणणे आहे. त्यांना तमाम हिंदुत्ववाद्यांचा सहर्ष पाठिंबा आहे. चुकीचा इतिहास कोणीही मांडता कामा नये ही त्यांची भूमिका . ती अत्यंत योग्य अशीच आहे. प्रश्न फक्त काय चुकीचे आणि काय बरोबर याच्या मापनाचा आहे. या भावनाशीलांच्या मते त्यांच्या सोयीचा आहे तोच इतिहास तेवढा बरोबर. बाकीचा सारा इतिहास चुकीचा. आधी ब्रिटिशांनी, नंतर येथील सुधारकांनी आणि आता डाव्या बुद्धिवाद्यांनी हिंदूंचा मानभंग करण्यासाठी मुद्दाम तो तसा लिहिला. खरोखरच कोणाचे असे मत असेल, तर त्यांना तसे वाटण्याचा पुरेपूर अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी पुरावे द्यावेत, पुस्तके लिहावीत आणि डाव्या इतिहासकारांना खोडून काढावे. हीच प्राचीन भारतीय परंपरा आहे. पण गाडे अडते ते पुराव्यांपाशी. सोयीचे तेवढेच लोकांसमोर मांडायचे ही पुरावे देण्याची रीत नसते. परंतु एकदा तर्कबुद्धीशी वैर घेतले की तेही चालून जाते. पद्मावतीबाबत हेच घडलेले आहे. एक तर या चित्रपटात तो प्रेमप्रसंग आहे याला अजून तरी पुरावा नाही. खुद्द भन्साळी आणि मंडळींनी हे सारे स्पष्टपणे नाकारले आहे. तेव्हा सारा विरोध ‘आम्हांला तसे वाटते’ याच पायावर उभा आहे. याहून दुसरी गोष्ट म्हणजे यात इतिहासाचा अपलाप होण्याची शक्यताही शून्य आहे. कारण या कथेतील पद्मावती हे पात्रच मुळी ऐतिहासिक नाही, असा निर्वाळा बहुतेक इतिहासकारांनी दिलेला आहे. अर्थात ऐतिहासिक वास्तव काय आहे यापेक्षा समाज केवळ भावनेच्या आधारे ऐतिहासिक वास्तव कशाला मानतो हेच अलीकडे महत्त्वाचे ठरत आहे. त्यातून आम्ही सांगतो तोच इतिहास तुम्ही सांगितला पाहिजे अशी हिंसक सक्ती होत आहे. सभ्य समाजात अशी सक्ती बेकायदेशीर आणि म्हणून दंडनीय ठरू शकते. झुंडशाही प्रबळ झाली की मात्र तसे होत नाही. तेथे झुंडीची सेन्सॉरशिप चालते. हे आपण ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाच्या वेळी पाहिले. तेव्हा शिवसेनाप्रमुख सामाजिक सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख बनले होते. आता ‘पद्मावती’ चित्रपटाने करनी सेना या संघटनेचे सेन्सॉर प्रमाणपत्र घ्यावे असे राजस्थानातील एक मंत्रीच सुचवीत आहेत. हे मंत्रिमहोदय आणि धर्माध मुल्लामौलवी यांच्यात प्रयत्न करूनही फरक करता येणार नाही. आसामातील त्या गायिकेच्या विरोधात पत्रक काढणाऱ्या मुल्लामौलवींचे म्हणणे तरी काय वेगळे होते? गाणेबजावणे, जादूचे प्रयोग यांसारख्या गोष्टी इस्लाममध्ये हराम आहेत. त्या शरियतविरोधी आहेत. तेव्हा त्यांवर बंदी घालावी असे त्यांचे म्हणणे आहे. ही केवळ याच ४६ मुल्लामौलवींची भूमिका नाही. तिला मुस्लीम समाजातील अनेक धर्मनिष्ठांचा पाठिंबा आहे. त्यांना खरोखरच असे वाटत असते, की  शरियतने ज्याला मनाई केलेली आहे त्या सर्व गोष्टी समाजाकरिता घातक आहेत. हे सारे चिंताजनक आहे. कारण या सर्व सामाजिक सेन्सॉरवाल्यांचा विरोध वरवर पाहता एखाद्या गाण्याला, एखाद्या चित्रपटाला वा पुस्तकाला आहे असे दिसत असले, तरी त्याच्या खोलात वेगळीच विकृती असते. ती असते धर्म वा इतिहासाच्या खोटय़ा गौरवाची, नव्या कल्पनांना, सुधारणांना विरोधाची आणि विवेकी बुद्धिवादाला नाकारण्याची. इस्लाममधील सुधारक बुद्धिवादी हे नेहमीच अल्पसंख्य राहिलेले आहेत, त्याचे कारण हेच. तेथे बुद्धीची मर्यादा धर्मग्रंथापर्यंतच. त्यापुढे जाऊ  पाहणाऱ्यांना तेथे स्थान नाही. हा तालिबानी विचार झाला. खेदाची बाब हीच की तो आता सर्वच धर्मातील अतिरेक्यांना शिरोधार्य वाटू लागला आहे. सध्या सर्वत्र विवेकी तर्कबुद्धीविरोधातील जिहाद वा धर्मयुद्ध दिसत आहे ते त्यामुळेच.

हे खरे अधर्मयुद्धच. आज त्यात सनातनी शक्तींचा विजय होताना दिसत आहे. आयसिसला मिळत असलेला पाठिंबा असो वा अमेरिकेतील ट्रम्पोदय, ही त्याची मोठी उदाहरणे. आयसिसचे दहशतवादी समाजातील बुद्धिजीवींना वेचून ठार मारत असतात. ट्रम्प यांच्यासारखे नेते विवेकी नागरिकांची हिंस्र टिंगलटवाळी करून त्यांना नेस्तनाबूत करू पाहात असतात. त्यांचे रस्ते वेगळे. साध्य मात्र एकच असते. वैचारिक बश्या आजार झालेल्या समाजात हे असेच होत असते. या रोगावर इलाज एकच असतो. तो म्हणजे कोणाच्याही पायी गहाण पडलेली डोकी सोडवून घेण्याचा. पण आज अनेकांना डोके गहाण ठेवणे हाच डोके सुरक्षित ठेवण्याचा उत्तम मार्ग वाटताना दिसतो. यात चिंतेची बाब एवढीच, की याच वाटेने समाजाचे आयसिसीकरण होत असते.

First Published on March 18, 2017 2:30 am

Web Title: singer nahid afrin is not afraid of fatwa
 1. N
  Niraj
  Mar 21, 2017 at 11:18 pm
  No point in having any arguments with you.
  Reply
  1. N
   Niraj
   Mar 20, 2017 at 10:35 pm
   विनोद ने प्रबोधनकार ठाकरेंचे वक्तव्य लिहिलेय....त्याच्या विषयी बोला ना... argument नसेल तर लगेच वैयक्तिक टीका !?
   Reply
   1. P
    pavan tenkale
    Mar 18, 2017 at 9:26 am
    कुबेरजी म्हणतात -"नाहीद आफरीन व भन्साळी या दोन्ही प्रकरणांमध्ये एक गडद साम्य आहे.. ते म्हणजे सामाजिक सेन्सॉरशिपचे." पण दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. पहिल्या केस मध्ये कुराणातील काही गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला जात आहे (मिस इंटरप्रेटेशन), तर दुसऱ्या केस मध्ये चुकीचाच इतिहास दाखवण्याचा अट्टहास आहे . .उगीचच कशाचा संबंध कशाशी लावू नये
    Reply
    1. प्रसाद
     Mar 18, 2017 at 4:09 am
     खाजवून खरुज काढावीच का?पद्मिनी आणि खिलजी यांच्यातील कथित प्रेमप्रसंग दाखवल्याने भावना दुखावतील म्हणून बंदी आणि गाणे / जादूचे प्रयोग यांना सरसकट बंदी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पद्मिनी होती याला जसा पुरावा नाही तसाच ती नव्हती यालाही पुरावा नाही. अशावेळी लोक लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतले असतील व त्याचा इतरांना त्रास नसेल तर त्यात आक्षेपार्ह काय? प्रसिद्धीकरता नेमक्या त्याच भावनांना डिवचणे, देवतांची नग्न चित्रे काढणे, हाच खोडसाळपणा आहे. त्याला आक्षेप आयसिसीकरण कसे?
     Reply
     1. R
      ravindrak
      Mar 18, 2017 at 4:51 am
      इसीसीकरण फक्त मुसलमानात होते हा इतिहास ,वर्तमान आहे.हिंदू संस्कृती मुळे, हा धर्म इथे वाढू शकला नाही पण गेल्या साठ वर्षात काँग्रेस,स - माजवादी मुळे (तुष्टीकरणामुळे )त्यांच्यात बदल न होता ( quality ) फक्त लोकसंख्या वाढली ( quany)हेच जगात घडत आहे. त्यांना धर्म परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही....
      Reply
      1. S
       Sachin
       Mar 21, 2017 at 6:11 pm
       जोकर..तू तुझे म्हणणे मांड..तुझे काय मुद्दे असतील तर ते लिही..प्रबोधनकारांचा दाखल कशाला देतोस. आणि आता काही संबंध नसताना कशाला एका जातीला टार्गेट करतोस. तुझं काळं तोंड घेऊन दुसरीकडे गेल्यावर लाथा बसतात मग निदान इथे तोंड लपवायला तरी जागा मिळते हेच नशीब. खरोखर हिंदू इतके अिष्णू असते आणि गोष्टींना धर्मबाह्य ठरवून विरोध करायचा ठरवलं तर कोणाची हिम्मतच झाली नसती असा विकृत चित्रपट काढायची. भन्साळी खोटा इतिहास लिहिणार आणि त्याच्या वर पुरावा देऊन तो खोडून काढायचा. कोणी सांगितले हे नसते उद्योग करायला.
       Reply
       1. S
        Sandesh Sankhe
        Mar 18, 2017 at 12:38 am
        ह्या दोन गोष्टींमधला एक विरोध अजूनही स्युडो सेक्युलर लेखकाच्या लक्षात आलेला दिसत नाही.मुल्ला मौलवींचा विरोध हा गाणी गायला नसून दुसऱ्या धर्माची भक्तिगीते गीते हि त्यांची पोट दुखी आहे.तर भन्साळी प्रकरण असे आहे कि आज लेखकही मान्य करतो कि पद्मावतीचे पूर्ण प्रकरणच काल्पनिक आहे परंतु ते हे विसरतात कि भारताची ज्याने अपरिमित हानी केली त्या खलनायक खिलजीला इथे नायकत्व दिले जात आहे.शेवटी संजमाध्यमातून मंडल जाणारा हा खोटा इतिहासच अधिकृत म्हणून समाजाच्या लक्षात राहतो.व त्यातून चुकीच्या प्रेरणा घेतल्या जातात
        Reply
        1. S
         Sudhir Karangutkar
         Mar 18, 2017 at 10:20 am
         खरोखरच अजूनही ढोंगी समाजवादाचा विजय होत असतो समाजवाद किंवा सेकुलर वाद म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू ची भूमिका चुकीची आणि मुसलमानांची ती अनादी काळापासून चालत आलेली म्हणजे बरोबर संपादकांनी सुमार चित्रपट पध्यवतीची विटंबना करून मौलवींना ानी अर्पण करताना हाच ढोंगी समाजवाद कुरवाळला आहे अजूनही मुस्लिमाना त्यांच्या चुकीच्या गोष्टीची जाणीव करून देण्यास हे तथाकथित भोंदू समाजवादी का अजूनही कचरतात हेच समाजात नाही त्यांच्या मतांसाठी पत्रकारांना कोणी जबरदस्ती केली आहे पण काँगेसशी डाव्यांच्या गुलामगिरीची आहे
         Reply
         1. S
          Shriram
          Mar 18, 2017 at 7:31 am
          स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या वाचकांवर आयसिस प्रमाणे भाजप विरोधी मतांचा भडीमार करणे, मोदींच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविरुद्धच्या भाकडकथा-अफवा यांना प्रसिद्धी देत राहणे अशी फॅसिस्ट वृत्ती संपादक दाखवत आहेत. प्रत्यक्ष शस्त्रापेक्षा लेखणी अधिक धारदार आणि घातक असते हे वचन खरे असेल तर लोकसत्ताची संपादकीय नीती ट्रम्प किंवा आयसिस पेक्षा अधिक धोकादायक आहे असे म्हणावे लागेल. त्यांनीच अशी भाषा वापरून अग्रलेख लिहिणे हास्यास्पद आहे.
          Reply
          1. S
           Surendra
           Mar 29, 2017 at 12:27 pm
           लोकसत्ता म्हणजे पुरोगामी दहशतवादी. ह्यांचं हिंदूंनी काय घोड मारलाय? हेच जाणे. मुस्लिमही क्रूरतेवर पांघरून टाकायची ह्यांनी मक्तेदारी उचलली आहे. हाय रे भारतभूमी...
           Reply
           1. उर्मिला.अशोक.शहा
            Mar 18, 2017 at 2:12 am
            वंदे मातरम- सुंदर विचार प्रवृत्त करणारे संपादकीय.अभिनंदन.या लेखा द्वारे धर्मांध शक्तीवर प्रहार करण्या चे का टाळले? आसाम मधील मुलगी किंवा कर्नाटक मधील मुलगी स्वर साधना करीत होत्या या दोघीना मुस्लिम धर्माच्या ठेकेदारांनी फतवे काढून आपल्या रानटी पण चा,जंगलीपणा चा जो परिचय दिला आहे त्यावर आपल्या कडून सविस्तर संपादकीय अपेक्षित होते निव्वळ फिलॉसॉफी सामान्य जनते च्या गळी उतरत नसते या युगात असे जन्गली विचार पोसणे आणि प्रमाणित करण्या चे प्रयत्न करणारे हे समाज चे मानवते चे शत्रूच आहेत जा ग ते र हो
            Reply
            1. विनोद
             Mar 18, 2017 at 4:12 am
             आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्ेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्याप्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. - प्रबाेधनकार ठाकरे
             Reply
             1. विनोद
              Mar 18, 2017 at 3:47 am
              दुष्काळानें कोट्यवधि लोक देशांत अन्नान करून मेले, तरी देवळांतल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभातचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रज्युएट तरुण उदरभरणासाठीं भया भया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचें जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगड धोंड्यांचा श्रृंगारथाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्याचढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही. -प्रबोधनकार ठाकरे
              Reply
              1. विनोद
               Mar 18, 2017 at 2:37 am
               बुद्धीवादाचा विजय झाला आहे हे पूर्ण सत्य नाही !आजही पत्रिकेत मंगळ असल्यावर लग्न जमणे कठीण हाेऊन बसते !गर्भनिदान या वैद्न्यानिक शाेधाचा दुरूपयाेग करून स्त्रीभ्रुणहत्या केल्या जातात !जिवंतपणी ज्यांना लाथाडले त्यांच्या आत्म्याला मेल्यावर पितृपक्षात खाऊ घातले जाते !उत्सवांमध्ये जल-वायु-ध्वनी प्रदुषण केले जाते !
               Reply
               1. विनोद
                Mar 18, 2017 at 3:44 am
                हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरीवर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली इत्यादि इत्यादि वगैरे वगैरे आरडाओरड करण्यांतच राजकारणी अकलेच्या कवायती करणा-या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होतां, लुच्चा लफंग्या चोर जार ऐदी हलकटांच्या चैनीसाठीं कसा होत आहे. इकडे आतां कसोशीनें लक्ष देण्याची वेळ आली आहे. - प्रबोधनकार ठाकरे
                Reply
                1. विनोद
                 Mar 18, 2017 at 3:51 am
                 हिंदुस्थानांत देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारातच बिनचुक सापडतो. नंतर इसवी सनाच्या ७-८ व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधि लोकांना मसणवटींत पार धुडकावले.या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीहि हिराऊन घेण्यात आली. - प्रबाेधनकार ठाकरे
                 Reply
                 1. विनोद
                  Mar 18, 2017 at 12:57 am
                  हिंसकता, कट्टरता आणी सटलेपण हे मध्यपूर्वेतील मातीचे दुर्गुण आहेेत !ज्यु, आर्य, इस्लाम या धर्माचे/वंशाचे मूळ याच मध्यपूर्वेतले !हे लाेक जगात कुठेही गेले तरी कर्मठपणा साेबत नेतात !मध्ययुगीन मानसिकतेचे असतात !हिंसक कारवायांनी आपल्या वंशाचे/धर्माचे श्रेष्ठत्व निर्माण करून इतर लाेकांना गुलाम बनवणे हे यांचे ध्येय असते !जगाचा विनाश हाेण्यास मध्यपूर्वेतील लाेकांची धर्मांधता कारणी हाेईल !
                  Reply
                  1. विनोद
                   Mar 21, 2017 at 3:09 pm
                   प्रबाेधनकार तुमची प्रतिक्रीया वाचायला हयात नाहीत !त्यामूळे तूमची व्यथा निष्फळ आहे !
                   Reply
                   1. विनोद
                    Mar 21, 2017 at 3:05 pm
                    फारच चिडचीड हाेते आहे का ?मुद्दे अडचणीचे आहेत काय ?'हरिश जाेशी' नावाचा त्याग केलात आणी देशमुख नाव धारण केलेत !पण विचारसरणी मात्र नाही बदलली !
                    Reply
                    1. विनोद
                     Mar 18, 2017 at 12:32 pm
                     `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योरणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हालाधरायला नको. सभोंवार परिस्थितीचा जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं.- प्रबाेधनकार ठाकरे
                     Reply
                     1. विनोद
                      Mar 18, 2017 at 12:15 pm
                      आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्ेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्याप्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. - प्रबाेधनकार ठाकरे
                      Reply
                      1. Load More Comments