23 September 2017

News Flash

पाहुणा कलाकार

जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून

लोकसत्ता टीम | Updated: September 14, 2017 3:11 AM

राहुल गांधी

जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले..

परदेशी मातीत काय गुण आहे कळत नाही. परंतु तेथे गेल्यावर आपल्याकडील अनेकांना प्रामाणिकपणाची सुरसुरी अनावर होते असे दिसते. राहुल गांधी हे त्याचे उदाहरण. तसेच, इतके दिवस आपल्याकडे उच्चपदस्थ राजकारण्यांनी महत्त्वाच्या वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी जाणे हा प्रघात तसा सर्वमान्य आहे. परंतु गेली दोन वर्षे एक नवीनच पायंडा पडू लागला आहे. तो म्हणजे मायदेशाविषयी भाष्य करण्यासाठी आपल्या नेत्यांनी मायभूपेक्षा परभूला पसंती देणे. याचेही उदाहरण राहुल गांधी हेच. अर्थात देशातील अलीकडच्या अनेक महत्त्वाच्या प्रथांप्रमाणे याचेही श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यावे लागेल. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून ते २०१४ पर्यंत काहीही भरीव प्रगती झाली नाही, आपल्या देशातील व्यवस्था भ्रष्टाचारानेच बरबटलेल्या आहेत, आपला देश नेहमी भिकेचा कटोरा घेऊनच हिंडत असतो आणि परदेशात आपल्याला भारतीय म्हणवून घेण्यास लाज वाटते हे सत्य आपणास कळले ते पंतप्रधान मोदी यांच्या परदेशभेटीनेच. परदेशी धूळ मस्तकी लावली गेल्यामुळे असेल परंतु मोदी यांना आपल्या देशाविषयीचे इतके मोठे सत्य- किंवा अनेक सत्ये- जाणवली हे खरे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे याबाबतदेखील पंतप्रधान मोदी यांच्या वाटेनेच निघालेले दिसतात, असा संशय घेण्यास बरीच जागा आहे. याचे कारण त्यांचे अलीकडचे परदेश दौरे. गडी भारतात थांबायलाच तयार नाही. अर्थात कंटाळाही येत असेल म्हणा येथे थांबण्याचा. तेच ते पोट, तोंड आणि डोळेही सुटलेले, पांढऱ्या कपडय़ातले, तोंडदेखले हसणारे आणि तेच ते बोलणारे सहकारी ते तरी किती काळ सहन करणार. तेव्हा या वातावरणातून थारेपालटासाठी का असेना परदेशात गेलेले बरे असेच त्यांना वाटत असणार. तर अशाच अमेरिका दौऱ्यातील राहुलवचने सध्या वादाचा विषय बनली असून त्यामुळे अनेक स्मृती जाग्या झाल्या आहेत.

भारतीय संस्कृतीत घराणेशाही आहे असे मान्य करीत राहुल यांनी अमेरिकी विद्यापीठामधील भाषणात स्वत:पासून सुरुवात करीत अखिलेश यादव ते अभिषेक बच्चन अशी अनेक उदाहरणे दिली. आपण हे बदलण्याचा प्रयत्न केला असेही ते म्हणाले. याच्या जोडीला त्यांनी आणखी एक कबुली दिली. ती म्हणजे काँग्रेसच्या अलीकडच्या सत्तेची दशकपूर्ती जवळ आली असताना त्या पक्षाचे नेते सुस्त आणि मगरूर झाले होते, असेही राहुल गांधी म्हणाले. या दोन्हीही बाबी खऱ्या आहेत यात तिळमात्रही शंका नाही. परंतु हे सत्य कथन करीत असताना आपण स्वत:लाच हास्यास्पद केले आहे हे राहुल गांधी यांना ध्यानातही आलेले दिसत नाही. हे त्यांच्या खुशालचेंडूपणास साजेसेच. या तुलनेद्वारे त्यांनी स्वत:ला अखिलेश वा अभिषेक वा अंबानीपुत्रांच्या पातळीवर आणून बसवले. वैयक्तिक आयुष्यात हे तिघे गुणवान असतीलही. परंतु त्यांच्या गुणांना कोणत्याही यशाची झळाळी अद्याप मिळालेली नाही. तसेच हे तिघेही आपापल्या कर्तृत्ववान वडिलांच्या सावलीतून अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. म्हणजे अखिलेश यादव यांच्यापेक्षा आजही मुलायमसिंग यांच्याच शब्दास वजन आहे, अभिषेक बच्चन यांच्यापेक्षा पिताश्री अमिताभ हेच अधिक व्यग्र दिसतात आणि अंबानीपुत्र आयपीएल नामक तमाशा वा जिओ सोहळ्यास उपस्थिती लावण्याव्यतिरिक्त अन्य काही सर्वसामान्यांच्या डोळ्यात भरेल असे करताना अजून दिसावयाचे आहेत. पण आपणही या अशा पुढच्याच पिढीच्या पंगतीत बसण्याच्या योग्यतेचे आहोत, असे राहुल गांधी आपल्या निवेदनातून अप्रत्यक्षपणे सूचित करतात. आतापर्यंतचा राहुल गांधी यांचा प्रवास लक्षात घेता त्यांच्या या निवेदनात सत्य असले तरी या सत्यकथनाचे स्थल, काल आणि प्रयोजन काय हा प्रश्न पडू शकतो. निदान काँग्रेसजनांना तरी तो पडला असावा. याचे कारण २०१४ च्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी यांचे सरकार अलीकडे कधी नव्हे इतके संकटात आलेले असताना त्यावर टीकेच्या तोफा डागून स्वपक्षीयांना उभारी द्यायची की भारतीयांना माहीत असलेल्या सत्याचीच कबुली द्यायची हे राहुल गांधी यांना अजूनही कळलेले दिसत नाही. त्यामुळे, सतत गेले तीन महिने होत असलेली चलनवाढ, भडकलेले इंधनदर, शून्यावर आलेली रोजगारनिर्मितीची गती आणि नोटाबंदीचे सणसणीत अपयश या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचा धोरणघोळ उघडा पाडण्याऐवजी राहुल गांधी कडकलक्ष्मीप्रमाणे स्वत:च्याच पाठीवर आसूड ओढताना दिसतात. हे त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया अधिक लांबणीवर टाकणारे आहे. तसेच, आपल्या या असल्या अनावश्यक भाष्याचा फायदा काँग्रेसपेक्षा सत्ताधारी भाजपलाच अधिक होतो, हे अजूनही त्यांच्या गावी नाही. त्यांच्या भाषणावर ज्या प्रमाणे भाजपतर्फे स्मृती इराणी यांनी प्रतिहल्ला केला त्यावरून तरी त्यांना हे ध्यानात यायला हवे. राहुल गांधी हे घराणेशाहीचे अपयशी वारसदार आहेत, असे स्मृतीबाई म्हणाल्या. त्याचप्रमाणे भाजपमध्ये कसे गुणवत्तेलाच महत्त्व दिले जाते, असा दावादेखील त्यांनी केला. यातील पहिल्याची उठाठेव त्यांना करण्याचे कारण नाही. तीदेखील अनावश्यकच. कारण राहुल गांधी हे जर इतके अपयशी आहेत तर मुळात प्रचंड ‘यशस्वी’ (म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टीकाकार ते त्यांच्या विश्वासू सहकारी असा प्रवास करून दाखवणाऱ्या) स्मृतीबाईंनी त्याची दखल घेण्याची गरजच नव्हती. आणि दुसरे म्हणजे भाजपत घराणेशाही नाही हा दावाही त्यांनी करणे अनावश्यक होते. जयंत यशवंत सिन्हा, पीयूष वेदप्रकाश गोयल हे मंत्रिमंडळातील सहकारी, उत्तर प्रदेशातील पंकज राजनाथ सिंग, गोपाल लालजी टंडन, संदीप कल्याण सिंग किंवा महाराष्ट्रातील पंकजा गोपीनाथ मुंडे, संतोष रावसाहेब दानवे पाटील आदी अनेकांकडे त्यांनी नजर टाकली असती तरी आपण घराणेशाहीचा आरोप इतरांवर करणे तितकेसे योग्य नाही, याची जाणीव स्मृती इराणी यांना निश्चित झाली असती. असो. मुद्दा तो नाही. तर राहुल गांधी काय, कोठे आणि का बोलले हा आहे.

वास्तविक हे प्रश्न पडणे हीच काँग्रेसजनांची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी. विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्यासाठी सध्या इतकी सुवर्णसंधी शोधूनही सापडणार नाही. अशा वेळी आपल्या पक्षाचा नेता हा पाय रोवून उभे राहण्याऐवजी परदेशात क्षुल्लक कार्यक्रमांत वेळ घालवतो याचे नाही म्हटले तरी वैषम्य काँग्रेसजनांना वाटत असणारच. त्याच्या जोडीला गांधी घराण्याचा डिंक नसला तर एकत्र जमवून घेण्याची सवय काँग्रेसजनांना नाही. त्यामुळेही त्यांना राहुल गांधी यांची आवश्यकता भासत असणार. अशा वेळी स्वपक्षीयांना भेटण्यास महत्त्व देण्याऐवजी बर्कले विद्यापीठातील चर्चेस स्वत:ला उपलब्ध करून देणे राहुल यांनी टाळावयास हवे होते. आणि ते जरी टाळता येणे अवघड होते तरी निदान आपण काय बोलतो याचे तरी भान त्यांनी राखणे गरजेचे होते. हे दोन्हीही झाले नाही. परिणामी जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले. हा बोलण्याचा विवेक अंगी बाणवत नेता म्हणून समोर यायचे की अशा बडबडीत वेळ घालवायचा, हे त्यांनी ठरवण्याची वेळ आली आहे. कारण चिंता काँग्रेसचे काय होणार याची मुळीच नाही. ती देशातील लोकशाहीच्या जतनासाठी समर्थ विरोधी पक्ष उभा राहणार की नाही, ही आहे. त्यासाठी राहुल गांधी यांना आपली राजकारणातील पाहुणा कलाकार ही भूमिका सोडावी लागेल.

First Published on September 14, 2017 3:11 am

Web Title: smriti irani slams rahul gandhi over berkeley speech
 1. V
  vikas
  Sep 21, 2017 at 1:12 pm
  हा काँग्रेस समर्थक संपादक आहे पहिला खप पैसे भेटायचं आता मोदी काही देत नाही नुसता विरोध करत बसायचं ह्याला लवकर च लोकसत्ताने बाहेर काढलं पाहिजे नाहीतर सगळ्यांना घेऊन बुडणार . अरे काँग्रेस राहिलीय कुठे त्याबद्दल पण लिहू thod
  Reply
  1. A
   AJIT YADKIKAR
   Sep 15, 2017 at 4:57 pm
   ह्या अंध मोदीविरोधक संपादक महाशयांना आता लोकसत्ता ने नारळ द्यावा हेच उत्तम. काही बिनडोक मोदीविरोधाची कावीळ झालेले लोक सोडले तर कुणीही यांची साथ देत नाही .
   Reply
   1. K
    Kamalakaant Chitnis
    Sep 15, 2017 at 9:06 am
    राजीव गांधी यांच्या अभिनंदनाचा लेख लिहून त्याच्यावरची शाई वाळण्यापूर्वी हा लेख लिहिण्याची नामुष्की लोकसत्तावर ओढवली आहे! राहुल गांधींनी मोदींची केलेल्या स्तुतीची दखल त्यांनी दाखल करून घेणे सोयीस्कररीत्या टाळले! लोकसत्ताची आट्यापाट्या खेळण्याची हौस पुरती भंगलेली दिसत नाही. राजीव गांधींनी जे बोलायलात नको ते बोलले यावर लोकसत्ताकार न थांबता चापलुसी करताना त्यांनी ताळतंत्र न सोडायचे पथ्य पाळले आहे , मोदी सरकारच्या अपयशाची मोठी यादी वाचण्याचे भान त्यांना कसे राहिले नाही याचे सुस्कारे त्यांनी टाकले आहेत. याउलट त्यांनी बोलण्यासारखे काय काय होते याची जंत्री पडेल चेहेर्याने वाचलीय. लोकसत्ताशी कींव करावी की समजूत घालावी याची विवंचना वाटते!
    Reply
    1. M
     Mahendra
     Sep 15, 2017 at 1:16 am
     आता अगदीच समर्थन करता येत नाही म्हणून "गरज नव्हती तिथे आणि तेव्हा गेले आणि नको ते बोलून बसले", हीच वाक्य दोन-चार वेळा वेगवेगळ्या प्रकारे बोलून कुबेरांनी आपली "टीका" आवरती घेतली. बाकीचा अग्रलेख पुण्य नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, भाजप यांच्यावरच केंद्रित होता, आणि राहुल गांधींपेक्षा अभिषेक बच्चन, अखिलेश यादव, अंबानी पुत्र हेच कसे नालायक आहेत याचाच जास्त ऊहापोह केला आहे. स्मृती इराणींनी टीका का केली आणि ती कशी अनावश्यक आहे हे सांगून शेवटी "तो मुद्दा नाहीच" असा साळसूदपणा दाखवला आहे. थोडक्यात राहुल गांधींना वळसा घालून शेवटी मोदींच्या "खांबाच्या आश्रयालाच" ही स्वारी गेली.
     Reply
     1. V
      vishal
      Sep 14, 2017 at 11:12 pm
      Maa. Naa. Vinod.. jya diwashi tujhi jamaa ala ek hi manushya rastyavar thunknar nahi tya diwashi ithe pratikriya dyayla ugawa.. tula pagar sam"padak" detat te ata aakhya duniyela thavuk aahe..
      Reply
      1. R
       Raj
       Sep 14, 2017 at 10:41 pm
       लोकसत्ता या टिनपाट फडतूस पगारीसेवकांच्या प्रतिक्रिया ना चुकता कसे काय छापत ? एकच पगारीसेवक पिसाळल्यासारखे वेगवेगळ्या नावानी भिकारचोट प्रतिक्रिया देतात आणि त्या तुम्ही न चुकता सकाळपासून छापता याचे आश्चर्य वाटत. पगारीसेवकांनी लोकसत्तामध्ये घुसखोरी केलेलीदिसतंय आणि मॉडरेटरलाच विकत घेतलीय असं वाटतंय.
       Reply
       1. S
        Shrikant Yashavant Mahajan
        Sep 14, 2017 at 8:57 pm
        आपला तो बाळ्या, दुस-याचे ते कार्ट, या पध्दतीने आपण राहूल गांधीना हळूवार झोडपलंय. आणि ते साहजिकच होते, अपना आदमी, अपना ख्याल करने वाला
        Reply
        1. S
         sumant
         Sep 14, 2017 at 8:03 pm
         Bjp मध्ये जरी काही नेत्यांची मुले पुढे राजकारणात आली तरी ती राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे पक्षाची सर्वोच्च नेते कधीच नाही होणार . संपादक कुबेर घराणेशाही वर अग्रलेख लिहिताना उद्धव ठाकरे यांना विसरले आणि फक्त राहुल गांधी च target झाले
         Reply
         1. S
          Somnath
          Sep 14, 2017 at 7:58 pm
          पाळलेलं काँग्रेसी खरूज व कुजकट कुबेरी कजकर्ण झालेलं विनोदी श्वान किती हलकट आणि नीच दर्जाच्या प्रतिक्रिया देत. ह्या टिनपाटने काही दिवसापूर्वी वाचकांच्या ढुंगणाचा वास घेण्यापर्यंत मजल मारली कारण घाणीत राहण्याची अंगवळणी पडलेली सवय वराह कधी सोडत नाही.अकलेचा लवलेश नसलेलं पृथीतलावरच एकमेव उदाहरण.
          Reply
          1. S
           sumant
           Sep 14, 2017 at 7:52 pm
           सध्या देशाला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. आणीबाणी विरोधात ज्याप्रमाणे लेखक, पत्रकार, आणि समाजसेवक संघटना एकत्र येऊन हुकूमशाही एकाधिकारशाही विरोधात लढा दिला त्याप्रमाणे आता कुबेर आणि संजय राऊत यांनी पप्पू रा.गा. सोबत राजकारणात जावे. विरोधी पक्षाच्या विरोधाला नव्हे तर विनोदाला खूप उधाण येईल. त्या साठी रा.गा. ची काँग्रेस आणि उद्धट सेनेला एकत्र यावे लागेल
           Reply
           1. V
            vip
            Sep 14, 2017 at 6:57 pm
            सध्या देशाला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठी कुबेरजी तुम्ही राजकारणात यावे हि विनंती. इतर सर्व पक्ष फक्त मतांच्या राजकारणात आणि बिनडोक हमरीतुमरी करण्यात व्यस्त आहेत. कोणताही विरोधक नसल्यामुळे भाजप मध्ये जी मग्रुरी आली आहे तिला वेळीच लगाम घालायला पाहिजे. काँग्रेस ने ६० वर्ष लुटले हे माहिती आहे पण जी मग्रुरी काँग्रेस ला ६० वर्षाच्या सत्तेस आली ती भाजप ला ३ वर्षातच आलेली दिसतेय. सरकारच्या अनेक लोकप्रिय पण दिशाभूल करणाऱ्या निर्णयांमधला फोलपणा तुम्ही दाखवून दिला आहे. त्यासाठी कुबेरजींसारखा अभ्यासू विरोधक असल्यास त्यांचं स्वागतच होईल.
            Reply
            1. S
             Shivram Vaidya
             Sep 14, 2017 at 6:45 pm
             ..२..असे तो म्हणाला आहे. याचा अर्थ हा देश गांधी-नेहरू घराण्याची जागीर आहे असा त्याचा अजूनही समज असेल तर कोण काय करणार? ५) मी आता खांग्रेसचे धनुष्य पेलायला तय्यार आहे असे त्याने सांगितल्यापासून एकाही खांग्रेसी नेत्याला झोप आली नसेल ! जेथे राहुल गांधी तेथे खांग्रेससाठी आंधी, जेथे पप्पु तेथे टप्पु, जेथे पोगो तेथे नो गो, याचा अनुभव खांग्रेसने अनेकदा घेतला आहे. मात्र हा अनुभव पूढेही घेण्याची कोणाचीही तयारी नसेलच, एक खांग्रेसमधील गांधी-नेहरू खानदानाचे पूजक सोडून !
             Reply
             1. S
              Shivram Vaidya
              Sep 14, 2017 at 6:45 pm
              उत्तम,लेख ! राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जे काही केले त्याला भाषण म्हणावे का असा प्रश्न पडला आहे. त्याच्या भाषणातील हे बघा काही नामी किस्से ! १) आमच्या देशात घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे असे सांगून त्याने राजकारणातील घराणेशाहीचे समर्थन केले. २) कलाकाराचा मुलगा कलाकार होतो यासाठी त्यांनी अभिषेक बच्चनचे उदाहरण दिले मात्र अभिषेक बच्चनला कलाकार म्हणून जनतेने डोक्यावर बसवून घेतलेले नाही हे सांगायचे तो विसरला. ३) राजकारणातील घराणेशाहीसाठी त्याने अभिषेक (पुन्हा अभिषेक!) यादवचे उदाहरण दिले. मात्र उत्तर प्रदेशामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेने सपा ला भंगारात विकून टाकले हे सांगायचेही तो विसरला. ३) आमच्या देशामध्ये २०१२ पासूनच विजन नव्हते आणि त्यामुळे २०१४ मध्ये खांग्रेस सूपडा साफ झाला, असे त्याने सांगितले. पण २०१२ मध्ये येथे खांग्रेसचे राज्यच होते आणि तरीही त्याने हे सांगणे योग्य आहे काय? मात्र असे बोलून त्याने तत्कालीन संतप्रधान मनमोहनसिंगांच्या चेहऱ्यावर आणखी चिंता आणली आहे (आधीच उल्हास अन त्यात फाल्गूनमास) ! ४) घराणेशाही प्रत्येक ठिकाणी असल्याने आता ा टारगेट करू नका असे तो ..२...
              Reply
              1. S
               Shivram Vaidya
               Sep 14, 2017 at 6:43 pm
               राहुल गांधी, घराणेशाही ही राजेशाहीमध्ये ठीक होती कारण तेथे जनतेपूढे त्या राजघराण्यातील माण स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि कोणताही "पप्पु" राजा बनू शकत होता. मात्र लोकशाहीमध्ये घराणेशाही असली तरी त्या घराण्यातील कोणाला निवडायचे की नाही हे आता जनतेच्या हातात असते. म्हणूनच जनतेने खांग्रेसी नेत्यांना स्पष्टपणे नाकारले आहे याचा प्रत्यय तुझ्याहून चांगला कोणाला आला आहे? लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदही मिळू नये एवढी जनतेने तुमची वाईट हालत केली आहे तरीही तुझी मस्ती कमी झालेली नाही. तरीही तुझा हा "इनोदी" ऐकून भारतीय नागरीकां , तेथील अमेरिकन नागरीकांचीही चांगलीच करमणूक झाली असेल यात शंकाच नाही.
               Reply
               1. R
                Rajesh
                Sep 14, 2017 at 6:40 pm
                द्वेष , घृणा , तिरस्कार पसरवून ह्या भक्तांनी भारताची शांती पार भंग केली आहे. ह्या संकुचित, बालिश लोकांपासून कधी भारताची सुटका होईल देव जाणो....
                Reply
                1. J
                 JaiShriRam
                 Sep 14, 2017 at 6:35 pm
                 उर्मिलाताई आज शेण खाऊन जोरजोराने भुंकत आहेत .........सडक्या मेंदूचा सोम्या..विकृत बापट , उमेश नेहमी प्रमाणे आपले सडके विचार मांडत आहेत ....हे बालिश भक्त मोदींना बुडवूनच शांत होणार .......
                 Reply
                 1. S
                  sanjay telang
                  Sep 14, 2017 at 6:14 pm
                  सरंजामशाही, जमीनदारशाही, मोघलांची बादशाही, हुकूमशाही, लोकशाही, घराणेशाही - सगळ्याच भीतीदायक, कारण ह्या सगळ्यात एक सुप्त सत्तेचा माज असतो. ज्याच्या हाती सत्ता तो राजा, तो खेळतो सट्टा, लोकांच्या जीवनाशी. त्यास जनतेला हव्या अशा सुविधांशी, कायदे कानुनशी काही देणे घेणे नसते. सत्तेत तो जेवढा मग्रूर असतो तेवढाच तो विरोधात मग्रुरी करतो. नावे फक्त बदलतात, कोण म्हणतो इंदिरा, तर कोण मोरारजी, कोण म्हणतो राजीव तर कोण म्हणतो विश्वनाथ प्रताप, कोण म्हणतो मोदी तर कोण राहुल. वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहावेत आणि लोकांनी ते उचलावीत अशी परिस्थितीच नाही. पण खप वाढायला आणि बातम्यांचे रकाने भरायला, कोणाला तरी धरा आणि झोडा किंवा खोटे कौतुक करा. असे अग्रलेख आणि बातम्यांमुळे, २० ते ३० वयातील मुले वृत्तपत्रांना हात तरी लावत असतील का शंकाच आहे??
                  Reply
                  1. S
                   surendra
                   Sep 14, 2017 at 5:41 pm
                   लालकृष्ण अडवाणी साहेबांनी सुध्दा परदेश भूमीवर बॅरिस्टर जीनां बद्दल असेच उदगार काढले होते . खरोखर विरोधी नेत्याची गरज असताना असे एैते कोलीत हातात देणे हे दुर्देवी !!
                   Reply
                   1. विनोद
                    Sep 14, 2017 at 5:33 pm
                    बुलेट ट्रेन फुकट आहे बरं का ? आता मुंबईतील सर्व मराठी बांधव या ट्रेन ने गुजरातला जाऊन व्यापार करतील ! ट्रेन फुकट मिळतेय म्हणजे प्रवा ी फुकटच करावा किंवा कसे यावर भक्तांनी प्रकाश टाकावा !
                    Reply
                    1. Y
                     yogesh
                     Sep 14, 2017 at 4:15 pm
                     ऐक गोष्ट मात्र खरी की परदेशात गेल की प्रामाणीक पणाची सुरसुरी येते, राजकीय व घराणेशाही हेतर पंंडीत नेहरुन भारताच्या गळ्यात बांंधलेल लोढ आहे. नुकसान झाले तर सरकार मुळे,फायदा झाला तर माझ्यामुळे.परदेशात जाऊन स्वतःःचा अभ्यासुपणा दाखवण्याचा मुर्खपणा यानंंतर करु नये.
                     Reply
                     1. K
                      KSN Murthy.
                      Sep 14, 2017 at 4:10 pm
                      कुबेर साहेब आपण अगदी काँग्रेस पक्षाचे भाट असल्यासारखे वागत आहेत आज काल. आपल्याला सशक्त विरोधी पक्षाची नाही तर काँग्रेस ची जास्त काळजी दिसतेय.
                      Reply
                      1. Load More Comments