26 July 2017

News Flash

लांडगे आणि कोल्हे

भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही.. वास्तव हे वेगळेच आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 17, 2017 2:49 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही.. वास्तव हे वेगळेच आहे.

माणसाने आनंदी असावे, हे मान्य. परंतु आनंदासाठी काही कारण असावे लागते. आनंदी आनंद गडे असे विनाकारण ज्यांना वाटते ते सच्चे आध्यात्मिक असतात किंवा वास्तवाचे भान नसलेले मनोरुग्ण. या दोन सदानंदी वर्गात आणखी एकाची भर घालता येऊ शकेल. तो म्हणजे झरझर वेगात वर जात असलेला भारतीय भांडवली बाजार. म्हणजे स्टॉक मार्केट. सध्या या बाजारात दररोज सरत्या दिवसाच्या निर्देशांकास मागे टाकण्याची स्पर्धा सुरू आहे की काय असे वाटावे. आज काय व्याज दरकपातीच्या शक्यतेने बाजार खुलला. निर्देशांकाचा उच्चांक. उद्या काय परकीय गुंतवणुकीचे दालन अधिक खुले होणार म्हणून बाजार आनंदी. निर्देशांकाचा उच्चांकी उच्चांक. अशी अनेक कारणे सांगता येतील. अलीकडे शहरांत ठिकठिकाणी हास्यमंडळांचे खूळ वाढू लागले आहे. त्यात सामील होणारे पाचपन्नास स्त्री-पुरुष भल्या सकाळी काहीही कारण नसताना खो खो हसताना दिसतात. काहीही करून आपण हसायचेच असा त्यांचा अट्टहास. सध्या आपल्या भांडवली बाजार हा असा हास्यगटात सामील झाला आहे की काय अशी शंका येते. अर्थात वैयक्तिक पातळीवर उगाचच किरकिर करणाऱ्यांपेक्षा उगा हसणारे परवडतात हे जरी खरे असले तरी असा उदारमतवादी दृष्टिकोन गंभीर गुंतवणूक व्यवहारासंदर्भात बाळगणे धोक्याचे असते. कारण येथे प्रश्न काहींच्या कष्टाच्या पैशाचा असतो. काहींच्या असे म्हणावयाचे कारण सर्वच गुंतवणूकदार केवळ चूष म्हणून या व्यवहारात असतात असे नाही. पारंपरिक गुंतवणूक मार्गात रोडावलेल्या परताव्यातून दैनंदिन खर्च निघत नाहीत. म्हणूनही अनेक जण आपली कष्टाची कमाई भांडवली बाजारात लावीत असतात. त्यांना या वाढत्या निर्देशांकाने दिलासा मिळत असला तरी तो सच्चा असायला हवा. तसा तो नसेल तर त्या वाढीस बुडबुडा असे म्हणतात. आपल्या भांडवली बाजारात तसा तो होतो किंवा काय हे आता तपासून बघावे लागणार आहे.

याचे कारण आपल्या ३० समभागांच्या भांडवली निर्देशांकाने  १३ जुलै रोजी, म्हणजे गेल्या गुरुवारी, ३२ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम आहे. याचा अर्थ आपला बाजार इतका उचंबळलेला कधीच नव्हता. गेले काही दिवस हा भांडवली बाजार विक्रमी वेगाने वाढत असून  १३ जुलैस तर त्याने कहरच केला. यामुळे आपल्या भांडवली बाजाराचे बाजारमूल्य त्या दिवशी २ लाख कोटी डॉलर्सवर जाऊन पोहोचले. वरकरणी ही बाब आनंददायी असली तरी हे बाजारमूल्य आणि आपली सांपत्तिक स्थिती यांचा काही संबंध आहे काय हे अशा वेळी तपासून पाहावे लागते. याचे कारण या उच्चांकाने आपल्या या बाजाराची स्थिती ही कॅनडा अथवा जर्मनी या देशांच्या भांडवली बाजाराच्या बाजारमूल्याइतकी झाली. हे दोनही देश श्रीमंत या सदरात मोडतात. किंबहुना जर्मनी ही तर आजमितीला युरोपातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था. म्हणजे आपल्या भांडवली बाजाराने या दोन देशांच्या बाजारमूल्यांचा टप्पा गाठला. परंतु आपली अर्थव्यवस्था सद्य:स्थितीत या दोन देशांशी तुलना व्हावी इतकी सक्षम आहे काय या प्रश्नाचे उत्तर कोणतीही किमान शहाणी व्यक्ती होकारार्थी देणार नाही. अभिक बर्मन या अर्थविश्लेषकाने दाखवून दिल्यानुसार प्रत्येक जर्मन नागरिकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ४१,९०१ डॉलर्स इतके आहे. कॅनडियन नागरिक वर्षांला सरासरी ४२,२१० डॉलर्स कमावतो. आणि त्यांच्या भांडवली बाजाराशी बाजारमूल्याची स्पर्धा करणाऱ्या भारतीयाचे वार्षिक उत्पन्न मात्र १७२३ डॉलर्स इतकेच असते. वास्तवात ही इतकी तफावत असताना, म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या अन्य अंगांना जरत्कारू स्वरूप आलेले असताना एकटय़ा भांडवली बाजारानेच शड्डू ठोकावेत हे अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. याचाच अर्थ भांडवली बाजाराची ही आनंदयात्रा कोणाच्या जिवावर सुरू आहे, असा प्रश्न पडायला हवा.

या प्रश्नाचे तार्किक उत्तर हे परदेशी वित्तसंस्था आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधिप्रवाहात दडलेले आहे. जागतिक पातळीवर अमेरिकी अर्थव्यवस्थेत आता कुठे धुगधुगी निर्माण होऊ लागली आहे. परंतु चीनचे नक्की काय सुरू आहे, हे कळण्यास मार्ग नाही. जगातील दुसऱ्या क्रमांकाची आपल्या शेजारील देशाची अर्थव्यवस्था हे भलतेच गूढ प्रकरण आहे. पलीकडच्या जपानचीही अर्थव्यवस्था कुंठित. तो देश चलनघटीने बेजार. तिकडे कंबरडे मोडलेला युरोप अजून काही सरळ उभा राहण्यास तयार नाही. तर उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराने ब्राझील पूर्ण गांजून गेलेला. माजी अध्यक्ष लुईझ लुला डिसिल्वा यांना भ्रष्टाचारासाठी न्यायालयाने १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली, नंतरच्या डिल्मा रूसुफ ऑलिम्पिक्सनंतर महाभियोगात पदच्युत झालेल्या आणि राजकीय वातावरण तापलेले. अशा देशांत कोण गुंतवणूक करणार? अशा वेळी जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचे एकमेव आशास्थान फक्त भारतच. म्हणून परकीय वित्तीय गुंतवणूकदारांनी भारतीय समभाग बाजारात गेले काही महिने मोठय़ा प्रमाणात मोठय़ा आशेने गुंतवणूक केली. परंतु नवी रोजगारनिर्मिती हरवून बसलेला, बुडणाऱ्या बँका कृत्रिमरीत्या तगवत असलेला आणि खड्डय़ात गेलेल्या सरकारी महामंडळांचे न पेलणारे ओझे वागवणारा भारत आर्थिकदृष्टय़ा बदलण्यास तयार नाही असे स्पष्ट झाल्यावर या गुंतवणूकदारांनी भारतीय समभाग तितक्याच मोठय़ा प्रमाणावर विकले. म्हणजेच वर गेलेल्या भांडवली बाजारात नफा कमावला. आकडेवारी दर्शवते की यंदाच्या एप्रिल महिन्यापासून जवळपास २०० कोटी डॉलर्सचे समभाग परकीय गुंतवणूकदारांनी विकले. हे विकणे डोळ्यावर आले असते तर बाजार कोसळला असता. तसे झाले नाही. याचे कारण भारतीय बाजारातून काढता पाय घेणाऱ्या परकीय गुंतवणूक संस्थांकडचे हे समभाग देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विकत घेण्यास सुरुवात केली. आयुर्विमा महामंडळ आदींचा यात समावेश होतो. या संस्था वरकरणी स्वायत्त भासल्या तरी त्यावर सरकारचे नियंत्रण असते हे वास्तव लक्षात घेतल्यास त्यांनी ही खरेदी का केली हे समजून घेता येईल. म्हणजे या केंद्रनियंत्रित संस्थांनी ही खरेदी केली नसती तर बाजार कोसळला असता. तसे झाले असते तर अर्थातच काही आभाळ खाली आले नसते. कारण सव्वाशे कोटींच्या या भारतात भांडवली बाजारातील गुंतवणूकदार जेमतेम चार कोटीदेखील नाहीत. तरीही या भांडवली बाजारात काय होते यास महत्त्व दिले जाते. कारण तो देशातील एकंदर आर्थिक वातावरणाचा प्रतीक मानला जातो.

आणि कोणतेही सरकार प्रतीकात्मकतेलाच महत्त्व देणारे असल्याने कोसळत्या बाजारातून परावर्तित होणाऱ्या नकारात्मक संदेशास ते घाबरत असते. म्हणून बाजार चढता राहिलेला बरा. कारण बाजार ही एक नशा आहे. सच्चा नशेकरी एका नशेतून बाहेर आल्यावर दुसऱ्या नशेच्या शोधात असतो. बाजाराचे तसे असते. अलीकडेच गाजलेल्या ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या भयपटातील एक पात्र या नग्न सत्यास सामोरे जाताना म्हणते : ‘‘भांडवली बाजाराचा पहिला नियम.. तू वॉरन बफे किंवा अन्य कोणीही असलास तरी लक्षात ठेव. तो म्हणजे समभाग वर, खाली, डावीकडे, उजवीकडे का जातात हे कळण्याइतकी अक्कल कोणाकडेही नसते. गुंतवणूक दलालांकडे तर नसतेच नसते. पण तरीही आपल्याला ती आहे हे प्रत्येकाला दाखवावेच लागते. कारण बाजाराचे हित त्यातच असते.’’ थोडक्यात भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. वास्तव वेगळे आहे. पण ते दिसू न देण्यात बाजारास लागलेल्या कोल्हे-लांडग्यांचे हितसंबंध असतात. सुशिक्षितांनी ते समजून घ्यायला हवे, इतकेच.

First Published on July 17, 2017 2:49 am

Web Title: stock market in india
 1. संदेश केसरकर
  Jul 21, 2017 at 12:44 am
  भांडवली बाजार व देशाची आर्थिक स्थिती ह्याचा बादरायणही संबंध नसतो हे जरी खरे असले तरी LIC इंडिया ने कुठल्या परकीय कंपन्यांचे समभाग विकत घेतले हे उद्यक्त व्हावयास हवे होते. माझ्या माहितीप्रमाणे LIC ने TCS , NTPC , INFOSYS इ.इ.भारतीय कंपन्यांचे ११०० कोटीचे समभाग घेतलेत. जर पब्लिक सेक्टरने प्राव्हेट सेक्टरचे समभाग विकत घेतले तर बिघडले कुठे? एका पब्लिक सेक्टरने दुसऱ्या बुडीत गेलेल्या पब्लिक सेक्टरचे ( जी आज पंचतारांकित धर्मशाळा झाल्या आहेत) समभाग घेणाय पेक्षा प्राव्हेट सेक्टरचे समभाग घेणे हा नक्कीच स्वागतार्य निर्णय आहे. आणि त्य्यामुळे जर भांडवली बाजार वधारला असेल तर नक्कीच आनंदाची बातमी आहे.
  Reply
 2. S
  Sharang
  Jul 18, 2017 at 11:49 am
  वरील अग्रलेखाचे वर्णन फक्त आणि फक्त अत्यंत उथळ असाच करावा लागेल. एका अग्रणी दैनिकाचे संपादक म्हणून लिहिताना काहीतरी जबाबदारी असते ह्याची जाणीव विद्यमान संपादक विसरले आहेत असं वाटत. शेयर बाजार जरी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असला तरी शेयर बाजार नेहेमीच भविष्याचा वेध घेत असतो हे लक्षात ठेवणं आवश्यक वाटतं.
  Reply
 3. R
  raj
  Jul 18, 2017 at 11:39 am
  परखड आणि स्पष्ट लेख ... ज्यांना काही विषयाचा गंध नाही तेपण फुकटचे कमेंट करतात म्हणजेच संपादकांचा लेख जिव्हारी लागला.
  Reply
 4. V
  vijay
  Jul 18, 2017 at 11:11 am
  "नणंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला,भवानी आई रोडगा वाहीन तुला" ह्या जुन्या भारूड गीताचे माननीय संपादक ,लोकसत्ता यांनी मोदी सरकारसाठी खास बनवलेले उल्हासनगरी रीमिक्स म्हणजे हा लेख!
  Reply
 5. V
  Vinay
  Jul 18, 2017 at 10:57 am
  कुबेरने आज खूपच चाटलेली दिसतेय. खूपच उसळलाय.
  Reply
 6. R
  raj
  Jul 18, 2017 at 10:54 am
  चुकीची माहिती, नागरिकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न बघताना कॅनडियन व जर्मनी पेक्षा भारताची लोकसंख्या बघा.
  Reply
 7. V
  Vinay
  Jul 18, 2017 at 10:51 am
  कुबेर ने आज खूपच चाललेली दिसतेय. त्यामुळे एकचं उसळलाय.
  Reply
 8. K
  Kiran
  Jul 18, 2017 at 8:13 am
  तीर्थी धोंडा पाणी.. ह्या संपादकीय वरील एक हि कंमेंट आम्हा वाचकांची का दिसत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे तुम्ही आमच्या प्रतिक्रिया का उघड करत नाही.
  Reply
 9. P
  Prasad
  Jul 17, 2017 at 8:16 pm
  एक बार एक आदमीने गाँव वालों से कहा कि वो 100 रु. में एक बन्दर खरीदेगा, ये सुनकर सभी गाँव वाले नजदीकी जंगल की ओर दौड़ पड़े और वहां से बन्दर पकड़ कर 100 रु. में उस आदमी को बेचने लगे कुछ दिन बाद ये सिलसिला कम हो गया और लोगों की इस बात में दिलचस्पी कम हो गयी फिर उसने कहा की वो एक एक बन्दर के लिए 200 रु. देगा , ये सुनकर लोग फिर बन्दर पकड़ने में लग गये लेकिन कुछ दिन बाद मा ा फिर ठंडा हो गया अब उस आदमी ने कहा कि वो बंदरों के लिए 500 रु. देगा , लेकिन क्यूंकि उसे शहर जाना था, उसने इस काम के लिए एक असिस्टेंट नियुक्त कर दिया 500 रु. सुनकर गाँव वाले बदहवास हो गए , लेकिन पहले ही लगभग सारे बन्दर पकड़े जा चुके थे इसलिए उन्हें कोई हाथ नहीं लगा तब उस आदमी का असिस्टेंट उनसे आकर कहता है "आप लोग चाहें तो नमो सर के पिंजरे में से 400 -400 रु. में बन्दर खरीद सकते हैं , जब सर आ जाएँ तो 500-500 में बेच दीजियेगा।" गाँव वालों को ये प्रस्ताव भा गया और उन्होंने (100-200 रु. में बेचे ) सारे बन्दर 400 - 400 रु. में खरीद लिए अगले दिन न वहां कोई असिस्टेंट था न ही कोई सर बस बन्दर ही बन्दर ये है शेयर मार्केट
  Reply
 10. A
  Ashutosh Kanthi
  Jul 17, 2017 at 7:21 pm
  The Wolf of Wall Street was the black comedy crime movie. That was not horror film !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! For your reference - s: en.wikipedia /wiki/The_Wolf_of_Wall_Street_(2013_film)
  Reply
 11. S
  sarang kulkarni
  Jul 17, 2017 at 6:27 pm
  अहो कुपमंडुक संपादक साहेब, तुम्ही हा विचार करा की कॅनडा आणि जर्मनी पेक्षा आपले दरडोई उत्पन्न 1/20 असून आणि फक्त 3-4 नागरिकांचा प्रत्यक्ष भाग असून शेअर बाजार अर्थव्यवस्थेत एवढे महत्व ठेवतो.. उद्या हे प्रमाण दहापट बदलेल तेव्हा तर तुम्हाला वेड्यांचया रुग्णालयात दाखल कराव लागेल
  Reply
 12. C
  Chandramohan
  Jul 17, 2017 at 4:50 pm
  संपादक महाशयांचे भांडवल बाजारात गुंतवलेले पैसे योग्य समभागात गुंतवले नाहीत म्हणून बुडालेले दिसतात ! संपादक आहेत म्हणून काय झाले ? वॉरन बफे तर नाहीत !
  Reply
 13. K
  ketkar
  Jul 17, 2017 at 3:57 pm
  तसे असेल तर लोकसत्तेतील वालिम्बेचे सादर बंद करा ...तो पण तज्ज्ञ असल्याचा आव आणतो..तद्यानांना काही काळात नाही असे तुम्हीच म्हणता ...
  Reply
 14. S
  Saurabh
  Jul 17, 2017 at 3:42 pm
  कृपया खालील लिंक वर क्लिक करून लोकसत्ताच्या संपादक मंडळाने स्वतःच खात्री करून घ्यावी. एप्रिल २०१७ पासून परकीय वित्तीय गुंतवणूकदारांनी ११.५ हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक विविध समभागांमध्ये केलेली आहे आणि ६४ हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक कर्जरोख्यांमध्ये केलेली आहे. कृपया माहिती चुकीची असेल तर माझे अज्ञान दूर करावे. : moneycontrol /stocks/marketstats/activity.php?flag FII month 201704201706
  Reply
 15. U
  umesh
  Jul 17, 2017 at 2:59 pm
  संपादक मोदी द्वेषाने प्रचंड आंधळे झाले आहेत आता त्यांना शेअर बाजाराची चढणही खुपू लागली कॉंग्रेसच्या काळात म्हणजे संपादकामच्या लाडक्या मौनीबाबाच्या काळात शेअरलबाजार इतका अशक्त होता की बारा हजारावर आला होता तेव्हा त्याच्या अशक्तपणाबद्दलही संपादकांनी मनमोहन यांना दोष दिला नव्हता आता बाजाराने उसळी घेतली तर मोदींना दोष? कॉंग्रेसच्या लोचटपणाची ही परिसीमा आहे पत्रकाराने कसे एकांगी आणि निष्पक्षपाती असू नये याचा कुबेर हा उत्तम नमुना आहे मोदी आणि ट्रंप यांना हटवणे हा यांचा वैयक्तिक अजेंडा आहे असे दिसतेय
  Reply
 16. A
  AMIT PENDHARKAR
  Jul 17, 2017 at 2:53 pm
  मा संपादक यांस तुम्ही म्हंटल्याप्रमाणे LIC सारख्या तत्सम सरकारी संस्था या भांडवलीबाजारातून FII लोकांनी विकलेले समभाग खरेदी करतात म्हणून share market वर जात आहे, तुम्ही एक गोष्ट विसरत आहात सध्या MUTUAL FUND च्या मार्फत ४००० करोड महिना SIP मार्फत येत आहे त्यामुळे हि तेजी येत आहे, यालाच Market मध्ये liquidity rally म्हणतात. Share Market मधल्या Fundamental Analyst ना हे मान्यच आहे कि हि रॅली Valuation दृष्ट्या बरोबर नाही, पण liqudity ही गोष्ट मार्केट मध्ये राजा असते. पण केंव्हा ना केंव्हा मार्केट हे त्याच्या Fundamental वर येते. दुसरी गोष्ट तुमच्या लेखाप्रमाणे शहाण्या माणसाने शेयर बाजारात गुंतवणूक करू नये कारण यात सगळेच manage असते, पण असे जर असते तर Warren Buffet, Ramdeo Agarwal यासारख्या माणसांनी Wealth बनवली नसती. शेयर मार्केट हा बुद्धिबळाचा खेळ आहे ज्याला समजला तोच यात जिंकतो हा जुगार नाही. त्यामुळे कृपया बुद्धिभेद करू नका.
  Reply
 17. K
  Koustubh
  Jul 17, 2017 at 2:45 pm
  वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट हा भयपट आहे????.....वा कुबेरजी! रोज नवीन नवीन काळात आम्हाला, धन्यवाद.(आणि बरका लोकसत्ता टीम-कंमेंट delete करणं लोकशाही वर फ्रीडम ऑफ स्पीच च्या विरुद्ध आहे हे धान्यात असू दे!)
  Reply
 18. S
  Swapnil
  Jul 17, 2017 at 2:44 pm
  छान विश्लेषन. "सव्वाशे कोटींच्या या भारतात भांडवली बाजारातील गुंतवणूकदार जेमतेम चार कोटीदेखील नाहीत. तरीही या भांडवली बाजारात काय होते यास महत्त्व दिले जाते. कारण तो देशातील एकंदर आर्थिक वातावरणाचा प्रतीक मानला जातो." स्वप्नील कदम
  Reply
 19. A
  A.A.houdhari
  Jul 17, 2017 at 2:06 pm
  काही का असेना भांडवली बाजाराने उसळी घेतली हे खरे कि नाही . सारखे ह्याच्यात उसळून जाण्याचे कारण नाही . ते अशाने असेल, ते तशाने असेल हे विवेचन खूप ऐकवले. नेहमी पडती बाजूच का सांगायची? आणि कशावरून ह्या संधीचा पूर्ण फायदा घेऊन काही जण धडाडीने पुढे जाऊन आपला फायदा पण करून घेतील.भांडवल बाजार नेहमीच जोखमीचा असतो हे आता सर्वानाच माहित आहे .
  Reply
 20. M
  Manoj
  Jul 17, 2017 at 1:32 pm
  "भांडवली बाजाराचा पहिला नियम.. तू वॉरन बफे किंवा अन्य कोणीही असलास तरी लक्षात ठेव. तो म्हणजे समभाग वर, खाली, डावीकडे, उजवीकडे का जातात हे कळण्याइतकी अक्कल कोणाकडेही नसते. " संपादक: हे तुम्हाला पण लागू होते हे लक्षात घ्यावे आणि असे फडतूस लेख लिहीने बंद करावे. जरा इंदू सरकार वर लिहा. का तिकडे बघायला मालकानी मनायी केली आहे?
  Reply
 21. S
  Shriram Kulkarni
  Jul 17, 2017 at 1:31 pm
  थोडक्यात काय तर शेअर बाजार हा एक जुगार आहे .. हे आपणच काय शेअर बाजारातील कोणीही मान्य करणार नाही. आणि खरंच जर हा जुगार असेल तर मग बंदी का नको? यावर बंदी हवीच हवी. उद्या काँग्रेस सत्तेवर आले तर तुम्ही हिरीरीने हा मुद्दा मांडाल काय? आर्थिक बाजूने सर, आपण लिहा, मोदी आज आहेत उद्या नाहीत देश तर राहणारच आहे, तुम्ही आणि आह्मी नसलो तरी. या लेखात मोदी कावीळ जास्त वाटते.
  Reply
 22. Load More Comments