19 September 2017

News Flash

धोरणचकव्याचे बळी

देशातील किमान आठ राज्यांत नक्षलवादाची समस्या आहे.

लोकसत्ता टीम | Updated: April 26, 2017 3:20 AM

छायाचित्र प्रातिनिधीक

 

नक्षल-हिसाचाराची ५० दिवसांतील दुसरी मोठी घटना घडून गेल्यानंतर तरी, काही प्रश्न उपस्थित होणे आवश्यक आहे..

नक्षलवाद्यांचा हिंसाचार असो वा काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीची साथ, याला आपण अंतर्गत सुरक्षेचे अपयश मानणार आहोत की नाही? नक्षलविरोधी कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी बैठका का होत नाहीत? भाजपशासित राज्यांत केवळ उद्योग आणायचे ठरवून नक्षलवाद संपतो का? बाहू फुरफुरवणाऱ्या घोषणांना धोरणांचे पाठबळ नसेल तर जवानांचे प्राण वाचतील का?

नक्षलवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलाच्या २५ जवानांचे हत्याकांड केले, त्याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. बरोबर ४० दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील याच भागात नक्षलवाद्यांनी १३ जवानांना ठार केले होते. आज ज्या प्रकारच्या शोकसंतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशातून उमटत आहेत, तशाच तेव्हाही उमटल्या होत्या. तेव्हाही राष्ट्रवादाचे ढोलताशे अशाच प्रकारे बडविण्यात आले होते. आणि त्या आवाजात, सुरक्षा दलाच्या जवानांवर अशी वरचेवर शहीद होण्याची वेळ का येते, हा सवाल बुडून गेला होता. एकदा कशाची झिंग चढली, की मग काहीही दिसेनासे होते. अतिरेकी राष्ट्रवादी भावनेमुळे संपूर्ण देशाचे असेच झाले आहे. परिणामी कोणाला प्रश्नच पडत नाहीत, पडले तरी ते विचारले जात नाहीत. यातून हानी देशाचीच होत आहे. ती टाळायची असेल, तर सोमवारी झालेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने काही प्रश्न विचारावेच लागतील.

त्यातील पहिला प्रश्न म्हणजे नक्षलवाद्यांचा हिंसाचार असो वा काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीची साथ, याला आपण अंतर्गत सुरक्षेचे अपयश मानणार आहोत की नाही? या समस्यांची जबाबदारी मागील सरकारांवर ढकलणे, परकी हाताकडे बोट दाखविणे हे करणे येथे सहजसोपे आहे. तसेच करायचे असेल, तर प्रश्नच मिटला. पण जर खरोखरच या समस्येच्या मुळांशी जायचे असेल, तर अंतर्गत सुरक्षेला ही खिंडारे कशामुळे पडत आहेत हे पाहिले पाहिजे. त्याची मुख्य जबाबदारी आहे ती अर्थातच केंद्र सरकारची. ती केंद्राने पार पाडली का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये, नक्षलवादाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू अशी गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना या समस्येची हाताळणी नेमकी कशी करायची याचे साधे धोरणही गेल्या तीन वर्षांत आखता आलेले नाही. याआधी, खासकरून पी. चिदम्बरम यांच्याकडे केंद्रीय गृह खाते असताना, सुरक्षा आणि विकास या दोन तत्त्वांचा आधार घेत या प्रश्नाला कसे भिडता येऊ शकते हे मनमोहन सिंग सरकारने दाखवून दिले होते. पण मोदींनी सत्तेत येताच तेही गुंडाळून ठेवले. नक्षलग्रस्त भागातील विकासाच्या प्रक्रियेचे स्वरूप बहुआयामी असावे लागते. त्यात स्थानिकांचा सहभाग व विश्वास महत्त्वाचा ठरतो. याच सूत्राने आधीच्या सरकारने विशेष पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखल्या. या भागांना निधी दिला. यातून अनेक कामे झाली. मोदी सरकारने त्या योजनाच बंद केल्या. योजना नाही, त्यामुळे आढावाही नाही. गेल्या तीन वर्षांत या प्रश्नाचा आढावा घेणारी एकही बैठक पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली नाही. हीच गोष्ट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची. मार्चच्या हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाने एकही बैठक घेतली नाही. त्या हल्ल्यानंतर नक्षलवादी त्याच भागात पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी गृह खात्याला दिला होता. त्याची साधी दखलही घेतली गेली नसल्याचे सांगण्यात येते. ज्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना शहीद व्हावे लागले, त्या दलास मार्चपासून पूर्णवेळ महासंचालकही नाही. विकासकामांना सुरक्षा पुरवताना हालचालीत येणारा तोचतोचपणा टाळावा, गस्तीमध्ये सातत्य दिसणार नाही याची काळजी घ्यावी या सुरक्षा दलांसाठीच्या मानक कार्यपद्धतीतील काही बाबी. पण सुरक्षा दलाचे जवान ही मानक कार्यपद्धती गांभीर्याने घेत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा चुका टळाव्यात म्हणूनच उच्च पातळीवर नियमित आढावा गरजेचा असतो. सरकारकडून तो घेतलाच जात नाही. असे का, हा यातील दुसरा प्रश्न आहे. तो विचारावाच लागेल, कारण अशा बेपर्वाईमुळेच िहसाचाराची व्याप्ती वाढत आहे.

देशातील किमान आठ राज्यांत नक्षलवादाची समस्या आहे. त्यातील पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार या राज्यांतील नक्षलकारवायांमध्ये गेल्या तीन वर्षांत कमालीची घट झाली. त्या तुलनेत भाजप सत्तेत असलेल्या छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्रातील कारवाया वाढल्या. महाराष्ट्रात मनुष्यहानी कमी झाली असली तरी हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. असे का झाले हा प्रश्न कोणाला आवडो न आवडो, विचारणे आवश्यक आहे. नक्षलवाद्यांना स्वत:च्या प्रभावक्षेत्रात विकासकामे नको आहेत. ती करण्याचा चंग सरकारने बांधला आहे. त्यातून हा संघर्ष तीव्र झाला, असे यावर म्हणता येईल. परंतु ते अर्धतथ्य झाले. जोखीम क्षेत्रातील विकासकामे करताना आधी स्थानिकांशी संवाद साधावा लागतो. त्यांना विश्वास द्यावा लागतो. नेमके तेथेच राज्य व केंद्र सरकारच्या घोडय़ांनी पेंड खाल्ली आहे. मोदींनी बस्तरच्या पहिल्याच दौऱ्यात हजारो कोटींच्या उद्योग प्रकल्पांची घोषणा केली होती. परंतु त्यातही स्थानिकांचे प्राधान्यक्रम दुर्लक्षिले गेले. त्याचीच री भाजपशासित अन्य राज्यांनी ओढली. महाराष्ट्रातील सुरजागड हे त्याचे उत्तम उदाहरण. तेथे स्थानिकांचा विरोध डावलून उद्योगांसाठी खनिज उत्खनन करण्यात येत आहे. त्यातून निर्माण झालेला असंतोष हे तर नक्षलवाद्यांचे इंधन. मोदी सत्तेत आले तर भांडवलदारांचे फावेल व यामुळे उपेक्षित वर्ग आपसूकच आपल्याकडे वळेल हे निरीक्षण नक्षलवाद्यांनी २०१४ मध्ये नोंदवून ठेवले होते. ते किती अचूक ठरले याचे दर्शन या हिंसाचारातून होत आहे. सामाजिक संतुलनाकडे लक्ष देण्याऐवजी सरकार केवळ एका घटकाची तळी उचलून धरते तेव्हा समाजातील उपेक्षित घटक विरोधात जातो. मध्य भारतातील भाजपशासित राज्यांमध्ये हिंसाचार का वाढतो आहे या प्रश्नाचे उत्तर हे आहे. काश्मीर प्रश्नाला अन्य अनेक आयाम असले, तरी तेथेही संवाद, विश्वासाचा अभाव ही समस्या आहेच. सोमवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आपल्या जवानांना एकेक करून टिपत असताना, तिकडे काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालयांतील मुली सुरक्षा दलांवर दगड भिरकावण्यात अग्रेसर होत्या. या नक्षलवाद्यांना मदत करणारे गावकरी, दगडफेक करणाऱ्या या मुली यांना राष्ट्रद्रोही म्हणणे हे अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर. त्यातच ज्यांना रस आहे त्यांनी त्याचा प्रचार करावा. इतरांनी मात्र हे गावकरी वा त्या मुली या देशाच्याच नागरिक आहेत. त्यांची मने कलुषित का झाली याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न हे केवळ लष्करी कारवायांनी सोडविता येत नसतात. त्या समस्यांची झळ पोहोचणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घ्यावे लागते. हे केंद्राचे काम आहे. ते मोदी सरकारने केले का हा खरा प्रश्न आहे.

अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांकडे राजकीय फायद्यातोटय़ाच्या भूमिकेतून पाहण्याचे धोरण मते मिळवून देईलही कदाचित, परंतु त्यामुळे देशातील हिंसाचारात वाढच होईल आणि त्यात अशा प्रकारे जवान शहीदच होत राहतील, हे विसरता कामा नये. अशा हल्ल्यांनंतर राष्ट्राची मन:स्थिती व्याकूळ, संतप्त झालेली असते. अशा वेळी नागरिकांनी व्यर्थ न हो बलिदान वगैरे प्रतिक्रिया दिल्या तर त्या स्वाभाविकच म्हणता येतील. सरकारने आणि त्यातील मंत्र्यांनी मात्र त्यापलीकडे जायचे असते. अशा प्रश्नांना भिडण्यासाठी र्सवकष धोरण आखायचे नाही, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर उडणाऱ्या सावळ्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचे आणि अशी दु:खद घटना घडली की बाहू फुरफुरवणाऱ्या घोषणा द्यायच्या यातून पक्षीय मतपेढीचे समाधान होईल. त्याने जवानांचे प्राण मात्र वाचणार नाहीत. धोरण-कार्यवाहीची सरकारी शक्ती राजकीय चकव्यातच अडकलेली असल्याचे युद्धक्षेत्रातील जवानांच्या, हिंसाचार सोसणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येत नसेल असे मानणे हा दूधखुळेपणा झाला. मोदी सरकारकडून तशा धोरणचकव्याची अपेक्षा नाही.

First Published on April 26, 2017 3:20 am

Web Title: sukma naxal attack 25 crpf jawans killed maoists issue in india anti naxal policy union home minister rajnath singh
 1. G
  Gajanan Pole
  May 28, 2017 at 6:01 pm
  Ya sambandhatil dhoran w amalbajawaniche arak hade guptatene keli jaw it as watate.prashasanik guptatewar sashay watato.
  Reply
  1. G
   Govind
   Apr 30, 2017 at 1:02 pm
   नक्षलवादाचा प्रश्न कीसरशी सोडवू अशी गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना या समस्येची हाताळणी नेमकी कशी करायची याचे साधे धोरणही गेल्या तीन वर्षांत आखता आलेले नाही. देशातील किमान आठ राज्यांत नक्षलवादाची समस्या आहे. त्यातील पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार या राज्यांतील नक्षलकारवायांमध्ये गेल्या तीन वर्षांत कमालीची घट झाली. त्या तुलनेत भाजप सत्तेत असलेल्या छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्रातील कारवाया वाढल्या. महाराष्ट्रात मनुष्यहानी कमी झाली असली तरी हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. असे का झाले हा प्रश्न कोणाला आवडो न आवडो, विचारणे आवश्यक आहे.
   Reply
   1. S
    satish mahewar
    Apr 29, 2017 at 9:23 pm
    This is all about the NAXALISM'S VOICE AGAINST CAPITALISTIC MODI GOVT.
    Reply
    1. S
     saral
     Apr 28, 2017 at 4:06 pm
     s man can never become a states man is being proved again and again and people of this nation are suffering. Thanks to the fourth pillar of democracy to awaken to understand the root cause.
     Reply
     1. D
      Dwarkanath Phadkar
      Apr 27, 2017 at 5:37 am
      at present consider reasons for this not been able to protect themselves by CRPF force which was on duty of road construction workers 1 why features dominating road were not occupied by establishing small parties 2 why 100 yds area on both sides of the road under construction was not made free from growth of shrubs and gr 3 lunch break should have been observed in turns and not all together 4 in depth reasons could be 1 inadequate training 2 civil administration has not won the confidence of local po tion 3 senior posts being not filled by departmental promotions 4 extra pay and allowances cannot be subs ute for able junior commanders 5 establishing army cantonments in naxal disturbed areas is same as calling army for support 6 army should not be used let the force under home ministry do their job .
      Reply
      1. N
       Nishikant Mane
       Apr 27, 2017 at 1:57 am
       sundar aani parkhad lekh
       Reply
       1. k
        kishor samant-advocate
        Apr 27, 2017 at 12:02 am
        The game of action and reaction must ended from both the sides.. Resumption of dialogue is very necessary. As people's power the government enjoys, it must be utilized for people's welfare completely. So long as the state sponsored facility will not be extended, confidence of people could not be gained... So one must see the another end. That's all.
        Reply
        1. P
         punekar
         Apr 26, 2017 at 8:47 pm
         aho pan mag itaki warshe ha prashn ka wadhala hyache uttar dya. kasmir madhil mulinchi mane kalu ka jhali hyapekhsa tethun hindu visthapit jhale tyanchi mane janun ghyaycha vichar kara.
         Reply
         1. उर्मिला.अशोक.शहा
          Apr 26, 2017 at 8:04 pm
          vande mtaram- mr managment express group-Loksatta how many more days we have to type in english for marathi articles??? we love marathi and loksatta and always eager to express our coments in Marathi only what happen to you that you are friqwantly changing softwear please sort out this problem as early as possiable thanking you Urmila Shah and Ashok Shah
          Reply
          1. समीर देशमुख
           Apr 26, 2017 at 7:29 pm
           @amit : माझ्यावर झालेल्या संस्कारांबद्दल शेखुलरांनी बोलायची गरज नाही. मुळात नक्षलवाद आता केवळ उपेक्षित वर्गाचा संघर्ष वगैरे काही राहिलेला नाही तर ती एक चीनकडून खेळली जाणारी चाल आहे हे सर्वसामान्य व्यक्तीला ज्याला परराष्ट्र संबंध कसे असतात त्याला समजते. पण या संपादकाला ते समजत नाही. कदाचित अग्रलेख लिहीणे म्हणजे केवळ ट्रम्प आणि मोदी यांच्यावर काहीही करून टिका करणे असाच अर्थ अग्रलेख वापस घेणारे संपादक महाशय करत असावेत. त्यामुळे अशा व्यक्तीला तिच्या चुकांची जाणीव त्याच्याच शब्दात करून देणे म्हणजे घरचे संस्कार दाखविणे नसते. साहजिकच शेखुलर तेवढे िष्णू नाहीत त्यामुळे त्यांना ते झोंबणारच. त्यात माझा नाईलाज आहे. आणि नक्षल्यांची सशस्त्र ब्रिगेड व निशस्त्र ब्रिगेड (कम्युनिस्ट पक्ष, उधारमतवादी, इ.) यात फरक करून उपयोग नाही. कम्युनिस्ट पक्ष कसा आहे ते त्याने 1962 च्या युद्धात चीनला पाठिंबा देऊन आणि वेळोवेळी नक्षलींना पाठिंबा देऊन दाखवून दिलेच आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच आहे. मग ते काही लोकांना झोंबते त्यात माझा नाईलाज आहे. आणि काश्मीर प्रश्न हा एका खास धर्मामुळेच आहे हे पण सत्य आहे.
           Reply
           1. A
            AMIT
            Apr 26, 2017 at 5:50 pm
            समीर देशमुख : आपल्यावर झालेले संस्कार स्पष्ट दिसत आहेत. बाकी भक्तांना हे कळत नाही आहे कि त्यांचे सरकार सध्या बैठक सुद्धा घेत नाही. तर प्रश्न कसा सुटणार? अंतर्गत प्रश्नाचे खापर विरोधक आणि काश्मीरचे खापर पाकिस्तान वर फोडून आपली जबाबदारी टाळायची चाल न समजायला जनता दूधखुळी नाही. नुसती मन कि बात न करता, निवडणूक प्रचार पेक्षा जनतेचे काम सुद्धा करण्यावर भर दिला पाहिजे.
            Reply
            1. A
             AMIT
             Apr 26, 2017 at 5:49 pm
             समीर देशमुख : आपल्यावर झालेले संस्कार स्पष्ट दिसत आहेत. बाकी भक्तांना हे कळत नाही आहे कि त्यांचे सरकार सध्या बैठक सुद्धा घेत नाही. तर प्रश्न कसा सुटणार? अंतर्गत प्रश्नाचे खापर विरोधक आणि काश्मीरचे खापर पाकिस्तान वर फोडून आपली जबाबदारी टाळायची चाल न समजायला जनता दूधखुळी नाही. नुसती मन कि बात न करता, निवडणूक प्रचार पेक्षा जनतेचे काम सुद्धा करण्यावर भर दिला पाहिजे.
             Reply
             1. J
              jit
              Apr 26, 2017 at 5:32 pm
              I wish that Congress Govt shall come, then what this Kuber write I want to see.....
              Reply
              1. M
               mandar
               Apr 26, 2017 at 1:36 pm
               dila.. punha ekda bhaktanchya shepativar paay dila..chavtil aata..
               Reply
               1. समीर देशमुख
                Apr 26, 2017 at 12:37 pm
                अजून या अकलेने भिकारी असलेल्या, अग्रलेख वापस घेण्यात पटाईत असणाऱ्या मुर्ख संपादकाने काश्मीर बद्दल पण स्वतःची नसलेली अक्कल पाजळली आहे. काश्मीर मध्ये अशांततेचे मुख्य कारण हे काश्मीरी मुसलमानांचा धर्म आहे हे मान्य करेपर्यंत प्रश्न सुटणार नाही. या लोकांना धर्मापुढे काहीच महत्वाचे नाही, त्यात देश, माणुसकी, नातेवाईक, इ. सर्व आले. हा अकलेने भिकारी असलेला कुबेर नामक संपादक सर्व काही बरळतो पण जी महत्त्वाची गोष्ट आहे ती नाही बोलत. साहजिकच असंताचे संत प्रकरणात जो अनुभव आला त्याची पुनरावृत्ती होईल अशी भीती या संपादकास वाटत असावी. या काश्मिरींना दगडफेक करण्यासाठी पैसे भेटतात हे पण काही लपून राहीलेले नाही. त्यामुळे यांना प्रेमाने वागवून अर्थ नाही. यांना पेलेट गनने आंधळे बनवा किंवा मग सरळ सरळ गोळ्या घाला तेव्हाच हे शांत बसतील त्याशिवाय नाही.
                Reply
                1. समीर देशमुख
                 Apr 26, 2017 at 12:30 pm
                 हा हल्ला किंवा काश्मीर मधील दगडफेक म्हणजे केवळ विकासाचा अभाव वगैरे अस म्हणून अकलेचे तारे तोडणाऱ्या व अग्रलेख वापस घेण्यातच निष्णात असणाऱ्या संपादक महाशयांनी नेहमीप्रमाणे 'चपटी' मारून हा अग्रलेख(?) लिहीलाय अस दिसतय. मुळात नक्षल्यांना कम्युनिस्टांचा अनौरस बाप असणाऱ्या चीनकडून मदत मिळते हे जगजाहीर सत्य आहे. आपल्यात असणारे कम्युनिस्ट, तथाकथित मानवाधिकार वाले हे या नक्षलींची 'निशस्त्र' विंग आहे हे जोपर्यंत आपण मान्य करणार नाही तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार. कोणतेही सरकार जेव्हा या नक्षल्यांविरूद्ध पाऊल उचलते तेव्हा हे चीनच्या पैशावर जगणारे कुत्रे भुकायला सुरूवात करतात. नक्षली, अतिरेकी हे माणसे नसतात त्यामुळे मानवाधिकार यांना लागु होत नाहीत. नक्षली तर क्रुरतेमध्ये आयसिस च्या पण पुढे आहेत हे आपण आदिवासींना हे लोक ज्या पद्धतीने तडपून मारतात त्यात पाहीलेच आहे. तेव्हा यांच्यावर दयामाया न दाठवता यांना अत्यंत क्रुरतेने चिरडावे. यात जर कोणी निशस्त्र विंग वाला मध्ये येत असेल तर त्याला पण एन्काउंटर मध्ये संपवावे. तेव्हाच असा प्रश्न सुटु शकतो.
                 Reply
                 1. S
                  Shriram Bapat
                  Apr 26, 2017 at 12:27 pm
                  It is difficult to understand how patriotism or nationalism will bring down the level of alertness of the security forces ? Such stupid statements and Modi bashing for any incident is disliked by the people and the results of such foolish actions by media in general is reflected in the elections where people overwhelmingly vote for BJP.o
                  Reply
                  1. R
                   rohan
                   Apr 26, 2017 at 11:48 am
                   Crpf ला पूर्णवेळ महासंचालक नाही...असून के फायदा....जर review मीटिंग झाल्या नाहीत तर... आणि पुनः गृहमंत्री म्हणणार थंड डोक्याने केलेल्या हत्या... हे तर त्यांचे नातवंड पण सांगतील...त्यात काय नवीन... तुम्ही पदावर आहात... आता झाले ना 3 वर्षे...तुमच्या अनुभव पात्रते एवढे तरी काम दाखवा... ह्यांच्यापेक्षा ते आदित्यनाथ परवडले...नवीन कार्यसंस्कृती तैयार करण्याचा प्रयत्न तरी करत आहेत....ती होईल की नाही ते पुढे काळ सांगेल....पण efforts तर honest आहेत त्या व्यक्तीचे...
                   Reply
                   1. M
                    makarand
                    Apr 26, 2017 at 11:17 am
                    aaj jar girish rao arshya samor ubhe rahilat tar tumhala arshyat tumcha jyeshtha bandhu nirlajja shiromani digvijay cha chehera disel.
                    Reply
                    1. U
                     uday
                     Apr 26, 2017 at 10:50 am
                     jagatil sarv mahatvachya padavar girish kuber yana basavata yeil ka?? yachi chachpani keli pahije....uda. sarnyayadhish, pantpradhan, rashtrapati, America adhyaksha, vividh nakshal grasta rajyanche mukhyamantri......ani tari jar jagachya adachani sodavlya gelya nahi tar world president navache apan navin pad taryar karu...!!!
                     Reply
                     1. P
                      Prashant Gadekar
                      Apr 26, 2017 at 10:11 am
                      नक्षलवादी का जन्माला आले याचे चिंतन झाले पाहिजे?ते कोणी परकीय नाहीत नाही हि आतंकवादी नाहीत.ते भारतीय आहेत.
                      Reply
                      1. Load More Comments