कुठलाही चाटचा पदार्थ म्हटला की तो पुदिन्याशिवाय होत नाही. पुदिन्याची हिरवीगार पानं पदार्थाची नुसती सजावटच करीत नाहीत, तर त्यांना एक ताजा सुगंध देतात. पुदिन्यात भरपूर अ आणि क जीवनसत्त्व आहे, लोह तसेच मँगनीज आहे. पुदिन्याचा अर्क पोटाच्या अनेक विकारांवर अतिशय गुणकारी ठरतो. पुदिन्यापासून मेंथॉल तयार होतो. त्याच्या वासाने गात्रे उत्तेजित होतात. भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधात मेंथॉलचा वापर केलेला असतो. स्वादासाठी पुदिन्याची २-३ पानंसुद्धा पुरेशी होतात.

पुदिना पराठा

साहित्य : २ वाटय़ा कणीक, १ वाटी पुदिन्याची पाने, १/२ चमचा चाट मसाला, १/२ चमचा लाल तिखट, ३ मोठे चमचे तेल, चवीला मीठ, १ मोठा चमचा तीळ,

कृती : पुदिन्याची पाने बारीक चिरावी, कणीक, २ मोठे चमचे तेल, मीठ, चाट मसाला पुदिन्याची पाने एकत्र करून त्यात लागेल तसे पाणी घालावे आणि कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने त्याचे पराठे लाटून तव्यावर भाजावे. भाजताना थोडे तेल सोडावे.

वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com