20 September 2017

News Flash

देशद्रोही कोण?

माध्यमे म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचे काम करणारे कारखाने बनले आहेत.

लोकसत्ता टीम | Updated: July 13, 2017 4:16 AM

समाजमाध्यमांतून वावरणाऱ्या अनेकांना हे माहीत नसेल, अनेकांना त्याची कल्पना असेल आणि बाकीच्यांचा त्यात प्रत्यक्ष हात असेल, पण आजकाल ही माध्यमे म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचे काम करणारे कारखाने बनले आहेत. त्यावरील संदेश खरे की खोटे याची शहानिशा करण्याइतका वेळ आणि क्षमता सगळ्यांकडेच असते असे नाही. त्यामुळे हे संदेश वणव्यासारखे पसरतात. सामान्य नागरिकांच्या या मानसिकतेचा फायदा देशविघातक शक्तींनी घेतला नसता तर नवलच. तो कसा घेतला गेला आणि घेतला जात आहे याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. पश्चिम बंगालमधील दंगल हे त्यातील एक ताजे प्रकरण. या प्रकरणामध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असून, त्यातील काही भाजपचे प्रतिष्ठित नेते आहेत. त्यातील एकाला प. बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाने  नुकतीच अटक केली. हा नेता म्हणजे भाजपच्या आसनसोल जिल्हा माहिती-तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख. देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये भाजपचे आयटी सेल असून, समाजमाध्यमांतून पक्षप्रचार करणे, टीकाकारांचा समाचार घेणे हे त्याचे एक महत्त्वाचे काम असल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी हा सेल एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आला होता. मध्य प्रदेशातील एका आयटी सेलमधील ध्रुव सक्सेनानामक भाजप-नेता पाकिस्तानी आयएसआयसाठी काम करीत होता. देशाची गोपनीय माहिती तो आयएसआयला पुरवीत असल्याचा संशय आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे प. बंगालमधील भाजप नेताही अशाच प्रकारच्या देशद्रोही कारवाया करीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सीआयडीने त्याला अटक केली. या कारवाया म्हणजे दंगल भडकवण्यासाठी खोटय़ा बातम्या प्रसृत करणे. ही दंगल मुस्लीम अतिरेक्यांनी सुरू केली. ती फेसबुकवरील एका छायाचित्राने त्यांच्या भावना दुखावल्या म्हणून. या दुखऱ्या भावना ही एक मोठीच सामाजिक डोकेदुखी बनली आहे. पण ती राजकारणासाठी उपयुक्त. त्याचा फायदा तेथील मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी घेतला. त्यात तेल ओतण्याचे काम हिंदू मूलतत्त्ववाद्यांनी केले. हिंदू स्त्रियांवर कसे अत्याचार होत आहेत हे दाखविण्यासाठी एका भोजपुरी चित्रपटातील दृश्य समाजमाध्यमांतून पसरविण्यापासून गुजरात दंगलींची जुनी चित्रे ही प. बंगालमधील असल्याचे भासविण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. ज्या मुलाने फेसबुकवर वादग्रस्त चित्र टाकले होते, त्याच्या आई-बापाचे रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रही अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरविले. ते अर्थातच खोटे होते. त्या मुलाची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि ते छायाचित्र २०१६ सालचे आणि बांगलादेशातील होते. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी तर कहरच केला. गुजरात दंगलीतील छायाचित्र प. बंगालमधील म्हणून पसरविले. त्याचे सत्य उघडकीस आल्यानंतरही त्यांनी ना ते हटविले, ना त्याबद्दल खेद व्यक्त केला. हे करणारे केवळ हिंदूूच आहेत असे नाही. अनेक सुशिक्षित निर्बुद्धही त्यात सहभागी होताना दिसतात. जल्पकांच्या झुंडी तयार होतात त्या या परपीडक निर्बुद्धांतूनच. या सगळ्यांचा वापर प. बंगालमध्ये पद्धतशीरपणे करण्यात आला तो तेथील धार्मिक फाळणीसाठी. पूर्वी कुजबुज स्वरूपात असाच प्रोपगंडा केला जाई. आता त्या कुजबुज आघाडय़ा समाजमाध्यमांवरून सक्रिय आहेत. तो प्रचार धार्मिक कट्टरतावाद्यांच्या हिताचा आहेच. पण देशहिताचा मात्र नक्कीच नाही. अशा बेजबाबदार लोकांकडे आपण देशद्रोही म्हणून पाहणार की नाही की उलट असे म्हणणाऱ्या विवेकाच्या आवाजालाच दाबण्याचा प्रयत्न करणार हा खरा प्रश्न आहे. कोणताही पक्ष-पात न करता तो विचारलाच पाहिजे..

 

First Published on July 13, 2017 4:13 am

Web Title: bjp leader arrested by cid in west bengal riots case
 1. प्रशांत
  Jul 17, 2017 at 7:34 pm
  आज फक्त धर्म मोठा आहे सर्वांसाठी बाकी (देशहित, माणसे) दुय्यम आहेत .
  Reply
  1. समीर देशमुख
   Jul 17, 2017 at 4:45 pm
   अमित, काश्मीरमधून कश्मीरी पंडीतांनी स्वतःच स्वखुशीने स्वतःची स्थावर मालमत्ता वगैरे सोडून स्थलांतर केले, कैरानातून पण (राष्ट्रीय मानवी हक्क आयोग पण हेच म्हणतोय) हिंदुंनी स्वतःच्या मर्जीनेच स्थलांतर केल, बंगालमध्ये पण तेच होतय, बरोबर ना! साहजिकच स्थलांतर करणारे हिंदु आहेत आणि ज्या देशद्रोही व अमानुष जमातीमुळे स्थलांतर होतय ते एका खास जमातीचे आहेत जिच्या विरूद्ध शेखुलर, कम्युनिस्ट लोक बोलत नाहीत. म्हणून तुम्ही लोक गप आहात. इतरांना सल्ले देण्या आधी डोळे उघडून जग पहायला शिका. तुमच्यासारख्यांच्या वाह्यात विचिरसरणीमुळेच भारताचे क्षेत्रफळ आकसत गेले. तिथे आज इस्लामी राजवटी आहेत (उदा. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, इ.) आणि इथे प्रतिक्रिया देण्याआधी शुद्धिवर येत चला.
   Reply
   1. A
    AMIT
    Jul 17, 2017 at 1:58 pm
    किती हा विखार भरलाय काही लोकांच्या मनात. व्हाट्सअँप आणि फेबु मधून खऱ्या जगात या आणि डॉक्टरांना दाखवून घ्या - डोक्यावर परिणाम झालाय आपल्या.
    Reply
    1. समीर देशमुख
     Jul 17, 2017 at 12:37 pm
     अमित, अच्छा म्हणजे बंगालात काहीच घडत नाहीये अस म्हणायच का महाशय? माल्डा मध्ये या देशद्रोही जमातीची इथपर्यंत मजल गेली की यांनी बीएसएफ च्या छावणीवर हल्ला केला होता. धुलागड, कालियाचक, इ. ठिकाणी झालेले हिंदुविरोधी दंगे ममता बेगम ने झाकुन टाकले. आणि आता या ठिकाणी झालेला दंगा पण झाकायला पाहत आहे. जर सर्व काही ठिक आहे तर भाजपच्या तीन खासदारांना का रोखले? आणि राहीली दंगलींची गोष्ट तर तिथे बंगाल मध्ये लोकांचे जीव जात आहेत पण मरणारे हिंदु असल्याने तुमच्यासारखे जयचंद व खंडोजी खोपडे गप बसून आहेत. आणि आधी मी काय लिहीलय ते शुद्धिवर राहून वाचा. मी मुद्देसूदच लिहीलय, पण ते समजण्यासाठी माणुस शुद्धित पाहीजे.
     Reply
     1. A
      AMIT
      Jul 17, 2017 at 11:22 am
      अरे वाह समीर.. म्हणजे खोट्या नाट्य बातम्या पसरवून सत्ता मिळवायची प्रयत्न केल्याची कबुली देताय कि आपण. सत्तातुरणाम ना भयं ना लज्जा. साहेब आहेतच काही झाले कि वाचवायला. रझाकारांनी तेंव्हा शेण खाल्ले तर आपण सुद्धा त्याच्या वरताण हवे हा विचार घातक आहे. बंगालात खोटा विडिओ दाखवून दंगली रचायचे कारस्थान करण्यासाठी रझाकार जन्मायला हवे होते का? भामटेगिरी पुरे आता. तुमचे इथे आयते बसून कमेंट द्यायला काही जात नाही, तिकडे लोकांचा जीव जातोय. जरा मुद्देसूद प्रतिक्रिया द्या नाही तर उद्या आफ्रिकेतल्या दंगलीचा उल्लेख देऊन इकडे दंगल पसरवाल. आले मोठे इतिहास वाचायला - वर्तमानात जगा नाहीतर बाराच्या भावात जाल.
      Reply
      1. S
       Suhas
       Jul 15, 2017 at 2:17 am
       पश्चिम बंगाल मधील दंगल हि एकतर्फी आहे का .. बासिरात मध्ये जे प्रकरण झाले त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे. हे म्हणजे अगदी गोध्रा सारखे आहे. आधी कारसेवकांना रेल्वेच्या डब्यात जाळले त्याचा कुठेच पत्ता नाही पण नंतर जी दंगल झाली त्याचा मात्र जगभर गवगवा... लोकसत्ता असल्या एकांगी बातम्या देऊ नका.
       Reply
       1. समीर देशमुख
        Jul 14, 2017 at 4:56 pm
        अमित, बरळण्या आधी मराठवाड्याचा इतिहास नीट वाचा. निजामाच्या काळात रझाकारांनी जे मुसलमान होते त्यांनी मराठवाड्यातील मुस्लिमेतरांवर किती अत्याचार केलेत हे तुम्हाला माहीत नाही. आणि राहीली गोष्ट बंगालची तर मी जे बोलतोय ते तिथे घडत आहे. आणि काश्मीर मध्ये काश्मीरी पंडीतांसोबत काय झाले हे सगळ्या जगाला माहीती आहे. तेव्हा माझ्या विरोधात पगारी प्रतिक्रिया देण्या आधी विचार करून द्या.
        Reply
        1. A
         AMIT
         Jul 14, 2017 at 11:25 am
         इथे कमेंटीमध्येसुद्धा असेच सुशिक्षित लोक जाणून बुजून चुकीची माहिती पसरवत आहेत. भाजप चे आय टी सेल देशद्रोही कामे करत आहे त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे म्हणजे देशद्रोह च.
         Reply
         1. S
          suresh deuskar
          Jul 13, 2017 at 11:13 am
          एक नेता, एक गीता, एक धर्म, एक भाषा यही है एक और एक ही एक अभिलाषा
          Reply
          1. समीर देशमुख
           Jul 13, 2017 at 9:10 am
           मुळात हा फोटो जरी खोटा असला तरी स्त्रियांवर बलात्कार करणे हा मुसलमान नावाच्या देशद्रोही जमातीचा आधीपासूनच विकृत छंद राहीला आहे. सुलतान शाहीच्या काळापासून हे चालत आले आहे. आमच्या मराठवाडय़ात निजामाच्या काळात 15 वर्षांच्या मुलीवर 20-30 मुसलमान बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. आताही निर्भया प्रकरणात निर्भया सोबत सर्वात क्रूरपणे वागणारा अल्पवयीन मोहम्मद अफरोज हा मुसलमानच होता. ही जमात मानवजातीला लागलेली किड आहे. आणि अ ी बंगालात माल्डा, कालियाचक, धुलागड सारख्या ठिकाणी हिंदु महीलांवर लांड्यांनी दंगलीच्या वेळी बलात्कार केले होते. त्याविरोधात लोक'सट्टा'मध्ये कधीही लिहून नाही आले. काश्मीरात पण हिंदु पंडीतांना याच गोष्टींना सामोरे जावे लागले होते. यांचा धर्मच मुळात हिंसाचार व क्रुरता यावर अवलंबलेला आहे. तेव्हा इतरधर्मीय लोक अशा बातम्या ज्या खोट्या पण असु शकतात त्यावर भरोसा ठेवतात. कारण या वाळवंटी जमातीचा इतिहासच या गोष्टींनी भरलाय.
           Reply
           1. Load More Comments