गेल्या वर्षी वॉल स्ट्रीट जर्नल या तालेवार आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रानं आशियाई हवाई क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला होता. विविध देशांतील विमानोड्डाणांसोबतच हवाई अपघातांची माहितीही त्यात आहे. या अहवालात दुर्दैवानं भारत नाही. पण अहवालाची सुरुवातच एका भारतीय घटनेनं झाली आहे. कोणती होती ती घटना?

या आठवडय़ातल्या बुधवारी आसामातल्या गुवाहाटी विमानतळावर दोन विमानांची टक्कर होता होता वाचली. एक उतरत होतं तर दुसरं उड्डाण करत होतं. त्यातल्या एकाला अचानक विमान ३०० फूट वर न्यावं लागलं तर तिथे त्या ठिकाणी हे दुसरं विमान होतं.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
readers reaction on loksatta editorial
लोकमानस :अग्रक्रम बदलल्याचे परिणाम!

अशा प्रसंगाला हवाई वाहतूक क्षेत्रात ‘नीअर मिस’ असं म्हणतात. यात विमानं एकमेकांच्या वाहतूक मार्गात धोकादायकरीत्या जवळ येतात. हे असं बऱ्याचदा होत असलं तरी गुवाहाटीत झालं ते गंभीर होतं. ही विमानं एकमेकांच्या खूपच जवळ आली. ही बातमी वाचली आणि गेल्या वर्षी वॉल स्ट्रीट जर्नल या तालेवार आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलेला आशियाई  हवाई क्षेत्राचा अहवाल आठवला. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या संघटनेच्या पाहणीवर तो आधारित आहे. वाचायला हवंच असं हे प्रकरण आहे. फक्त एकच गोष्ट हवी त्यासाठी. ती म्हणजे निधडी छाती. कारण..

गतसाली आशिया खंडातून ३ कोटी ९२ लाख इतकी विमानोड्डाणं झाली. युरोपमधल्या उड्डाणांची संख्या आहे ३ कोटी ५६ लाख आणि उत्तर अमेरिका खंडातनं झालेल्या उड्डाणांची संख्या भरते ५ कोटी १४ लाख इतकी. म्हणजे दिवसाच्या काही प्रहरांत रडारवर आकाश हे गजबजलेल्या बसस्टॅण्डांच्या आसपास दिसतं तसं असतं. म्हणजे वाहतुकीनं गजबजलेलं.

आता एका अर्थी चांगलंच आहे हे असं विमानांचं प्रमाण वाढणं. अर्थव्यवस्थेची उभारी दिसते त्यातनं. ते ठीकच आहे. पण या अहवालाचा खरा मुद्दा वेगळाच आहे. तो असा की इतक्या प्रचंड संख्येनं विमान वाहतूक या परिसरात वाढत असताना त्यात टळलेल्या विमान अपघातांचा तपशील आशिया खंडात प्रामाणिकपणा सादर केला जात नाही. विमानाच्या क्षेत्रात कितीही क्षुल्लक अपघात घडला तरी तो स्थानिक हवाई संचालकाकडे नोंदवणं अपेक्षित असतं. याचं कारण या अपघातांवरनं पुढे काय काय सुधारणा करायला हव्यात याचे धडे घेतले जात असतात. विमान वाहतूक हे अखंड शिकत असलेलं क्षेत्र आहे. संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो की आशिया खंडाला मात्र काही शिकायची इच्छा नाही.

उदाहरणार्थ इंडोनेशिया. गेल्या पाच वर्षांत या देशातनं जवळपास ५० लाख विमानांचं उड्डाण झालं. ही संख्या याच काळात ऑस्ट्रेलियातनं उतरलेल्या उडालेल्या विमानांच्या संख्येइतकी आहे. या पाच वर्षांत इंडोनेशियात विमानांचे २८ गंभीर अपघात नोंदले गेले. विमानं प्रत्यक्षात एकमेकांवर आपटणं, कोसळणं, काहींचा जीव जाणं आदी घटना या गंभीर अपघात मानल्या जातात. असे २८ अपघात इंडोनेशियानं पाहिले तर याच कालावधीत ऑस्ट्रेलियात झालेल्या अपघातांची संख्या आहे फक्त पाच. पण हा मामला इथे संपत नाही.

याच पाच वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियात गंभीर विमान अपघात टळल्याच्या ५८ घटना नोंदल्या गेल्या. हे अपघात नाहीत. पण गंभीर अपघात होता होता टळल्याच्या या घटना आहेत. याच कालावधीत इंडोनेशियात अशा फक्त १३ घटना नोंदल्या गेल्या. या वर्गवारीपेक्षा अधिक छोटे-मोठे असे ७४ अपघात ऑस्ट्रेलियात नोंदले गेले. त्या तुलनेत इंडोनेशियात अशा नोंदल्या गेलेल्या अपघातांची संख्या फक्त पाच इतकी आहे.

याचा अर्थ ऑस्ट्रेलियापेक्षा विमान वाहतूक क्षेत्रात इंडोनेशिया अधिक प्रगत आहे, असा नाही. तर प्रत्येक छोटा-मोठा अपघात नोंदवण्याचा प्रामाणिकपणा इंडोनेशियात नाही, हे यातून दिसतं. म्हणजे दाबून ठेवायची माहिती. नाहीच कळली कुणाला तर प्रश्नच नाही. पण कळली तर पुढचं पुढे बघू असं म्हणायचं आणि झालं गेलं विसरून जायचं, ही खास तिसऱ्या जगातली नतिकता. या अहवालाचं म्हणणं असं की विमानाबाबत प्रत्येक लहान-मोठा घात/अपघात हा नोंदला गेला पाहिजे. म्हणजे त्याची चौकशी तरी होते आणि त्यावरून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काय करायला हवं, याचे धडे घेतले जातात.

या अहवालाचं म्हणणं असं की आशियातले बरेचसे देश ही माहिती दडवतात. इंडोनेशियातली ही माहिती मग उघडकीस आली तरी कशी?

त्याचं झालं असं की या देशाची राष्ट्रीय वाहिनी असलेल्या गरुडा विमान कंपनीनं गतसाली आपली एक परिषद भरवलेली होती. त्यात सुरक्षा हा विषयही होता. या विषयावर बोलताना विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छोटय़ा-मोठय़ा अपघातांची जंत्रीच सादर केली. परंतु यातले अनेक अपघात हे विमान वाहतूक नियंत्रकांकडे नोंदलेच गेले नव्हते. ही बाब त्या वेळी उघड झाली आणि मग सगळीच लबाडी बाहेर आली. या अहवालाच्या म्हणण्यानुसार आशियाई देशात सर्रास असेच प्रकार होतात.

हे असं का, याची अनेक कारणं हवाई क्षेत्रातले तज्ज्ञ नमूद करतात. सुरक्षा उपाय, प्रतिबंधात्मक पावलं वगरे या देशांना मंजूर नसतं. एखादा धोका असेल तर त्याची जाणीव या देशात प्रत्यक्ष अपघातानंतरच होते. आणि अपघातानंतरही परत अशी दुर्घटना होऊ नये म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाते, असंही नाही. हे झालंच. परंतु याच्या जोडीला एक कारण जरा वेगळं आहे.

ते म्हणजे शिक्षा. आशियाई देशात विमानविषयक सुरक्षा उपायांत एखाद्यानं/एखादीनं हेळसांड केल्याचं आढळलं तर जबर शिक्षा आहे. ती बऱ्याचदा मोठा दंड वा प्रसंगी तुरुंगवास या रूपांत असते. यामुळे आपल्या हातून काही नियम उल्लंघन होऊ नये, असा प्रयत्न या देशांतील नागरिकांचा असतोच. पण त्याच बरोबरीनं विचार असतो की आपल्या हातनं समजा उल्लंघन झालंच तर ते निदान उघड तरी होऊ नये. शिक्षा असते ती उघड झालेल्या गुन्ह्य़ाला. एखाद्यानं तो दडवूनच ठेवला असेल तर कसली शिक्षा नि कसलं काय?

अमेरिकेत याच्या बरोबर उलट आहे. तिथे वैयक्तिक शिक्षाच केली जात नाही. म्हणजे एखाद्यानं ठरवून काही घातपात वगरे केला असेल तर गोष्ट वेगळी. परंतु त्याच्या/तिच्या हातून एखादी प्रामाणिक चूक झाली असेल तर त्यासाठी शिक्षा केली जात नाही. खेरीज, अमेरिकी हवाई नियंत्रक यंत्रणा निनावी तक्रारदारांना जास्तीत जास्त उत्तेजन देतात. तसंच एखाद्यानं स्वत:च आपली चूक कबूल करून संबंधितांना कळवलं तर त्यालाही काही शिक्षा वगरे केली जात नाही. तसंच निनावी तक्रारदाराचं नाव-गाव गुप्त राखलं जातं. सरकारी यंत्रणा त्याच्या मागे हात धुऊन लागल्यात असं काही तिथं होत नाही. याचा परिणाम असा की हवाई वाहतूक नियंत्रकांकडे वर्षांला शेकडय़ांनी तक्रारी दाखल होतात, त्याची दखल घेतली जाते आणि त्यावर मार्ग काढला जातो काही तरी. पण इंडोनेशियासारख्या देशात एकही तक्रार आल्याची नोंद गेल्या काही वर्षांत नाही. इंडोनेशियाच्या बरोबर या अहवालासाठी चीन, द. कोरिया आदी देशांच्या आकडेवारीचंही संकलन केलं गेलं. तिथेही साधारण हीच परिस्थिती. चीनच्या हवाई खात्याची प्रवक्ती तर म्हणाली, तक्रारी वगरे काही करायला आम्ही काही उत्तेजन देत नाही. आणि झालीच एखाद्या विरोधात तक्रार त्याला चांगली कडक शिक्षा देतो.

या अहवालात दुर्दैवानं भारत नाही. पण अहवालाची सुरुवातच एका भारतीय घटनेनं झाली आहे. आपल्या एक बडय़ा, खासगी प्रवासी विमान कंपनीच्या विमानातला हा प्रकार. हवेत असताना हे विमान अचानक २५०० फुटांनी खाली आलं. आतले सगळेच हादरले. ‘अल्टिटय़ूड बस्ट’ म्हणतात त्याला. पण ही अशी विमानाची उंची अचानक का घसरली? वैमानिकाला डोळा लागला आणि सहवैमानिक आपल्या फोनटॅब्लेटमध्ये हरवून गेली. नंतर एका वपर्यंत हात असलेल्या प्रवाशानं हा प्रकार संबंधितांच्या कानावर घातला. मग तक्रार नोंदली गेली आणि दोन्ही वैमानिक निलंबित झाले. हे असे वपर्यंत हात पोहोचलेले आणि असे कोणी नसलेले हीच तर खरी समस्या आहे.

 

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
Twitter; @girishkuber