नवीन महिना सुरू झाला की कुटुंबाला वेध लागतात घरातील किराणा सामान भरण्याचे. मग पगार झाल्यानंतरच्या पहिल्या सुटीच्या दिवशी किराणा खरेदीला जायचे ठरते. अनेकदा त्या सामानाची यादी बनवण्याचा एक खास कार्यक्रमही पार पडतो. असं चित्र काही वर्षांपूर्वी प्रत्येक सर्वसामान्य घरात हमखास पाहायला मिळायचं. अलीकडे ऑनलाइन शॉपिंग, महिन्याच्या पहिल्या तारखेलाच होणारे पगार, फोनवरून ऑर्डर करताच घरपोच येणारे सामान यामुळे किराणा सामान भरण्याचा मासिक प्रपंच आता काहीसा हलका झाला आहे. मात्र, या सर्वात एक गोष्ट अजिबात बदललेली नाही ती म्हणजे, किराण्याची यादी बनवण्याचं काम.
सामान कुठूनही, कसंही भरलं तरी आधी त्याची यादी बनवावीच लागते. तरीही प्रत्येक वेळी यादीतून काहीतरी राहून जातं, हा नेहमीचा अनुभव. बरं यादी करायची म्हटलं तर एकाच वेळी बसून फडताळातल्या सगळय़ा चिजवस्तूंचा एकत्र आढावा घ्यावा लागतो. पण स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सनी तुमचं हे कामही आता सोपं केलं आहे. अँड्रॉइड आणि अ‍ॅप्पलच्या ‘अ‍ॅप स्टोअर’वर उपलब्ध असलेलं ‘अवर ग्रोसरीज शॉपिंग लिस्ट’ (Our Groceries shopping list) हे अ‍ॅप म्हणजे महिनाभर तुमच्या जवळ असलेली तुमच्या पुढच्या महिन्याच्या सामानाची यादीच आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्यावर उपलब्ध असलेल्या जिनसांतून घरात संपलेल्या जिनसांची नावे आणि प्रमाण निवडत जायचं. असं करत करत महिन्याच्या शेवटी किंवा तुम्ही नवीन महिन्याचा किराणा भरायला जाल तेव्हा तुमच्या हातात आपोआप एक किराण्याची यादी असेल. या अ‍ॅपमध्ये असंख्य जिनसांची नावे आहेत. शिवाय त्यात आपणही नवीन जिन्नस नोंदवू शकतो. पण यादीपुरतेच हे अ‍ॅप मर्यादित नाही. तर तुम्ही या जिनसांचे बेकरी, डेअरी, फ्रोझन फूड असे वर्गीकरणही करू शकता. त्यामुळे सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक विभागात गेल्यानंतर त्या विभागाची यादी समोर घेऊन तुम्हाला सामान भरता येईल. एवढंच नव्हे तर दुकानांच्या प्रकारानुसार मेडिकल, फूड, हार्डवेअर स्टोअर अशी वस्तूंची विभागणीही या अ‍ॅपमध्ये करता येते. प्रत्येक पदार्थ घेतल्यानंतर त्याच्या नावावर ‘टच’ करताच तो खरेदी केल्याची नोंद होते. शिवाय ‘बारकोड स्कॅनर’हे पूरक अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर केवळ बारकोड स्कॅन करून तुम्ही पदार्थाची नोंद करू शकता. विशेष म्हणजे ही यादी घरातल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनशी ‘सिंक’ अर्थात जुळवून घेता येते आणि ऐनवेळी एकाने त्यात नोंदवलेला पदार्थ आपोआप दुसऱ्याच्या अ‍ॅपवरील यादीतही दर्शवला जातो. एकूणच पुढच्या वेळी तुम्ही किराणा भरायला जाल तेव्हा काहीही विसरू नये, याची हे अ‍ॅप पुरेपूर काळजी घेतं.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना