महिंद्रा बालविकास योजना

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी काही कमी पडू नये असे वाटते. नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेत कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्यावर त्याच्या भविष्याच्या आर्थिक तरतुदीसाठी विमा कंपन्यांच्या ‘चाईल्ड प्लॅन’ अर्थात मुलांच्या भविष्यातील खर्चाच्या तरतुदीसाठी बचतीचे साधन असलेल्या विमा कंपन्यांच्या उत्पादनांच्या खरेदीचा प्रस्ताव विमा विक्रेत्यांकडून मांडला जातो.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
What should parents do to reduce childrens mobile usage
Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एक परिचित दादरच्या फुल बाजारात भेटले होते. गोरेगांव येथे कायम वास्तव्यास असणारे हे गृहस्थ नवी मुंबईत मागील दोन वर्षांपासून राहात आहेत. त्यांच्या मुलीला नवी मुंबईत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने हे गृहस्थ नवी मुंबईत एक सदनिका भाडय़ाने घेऊन नवी मुंबईत राहात आहेत.

पूर्वी घराच्या जवळच्या महाविद्यालयात मुलाला किंवा मुलीला प्रवेश घेण्याचा प्रयत्न असे. आज मुलांना महाविद्यालय सोयीचे व्हावे म्हणून राहाण्याचे ठिकाण बदलले जाते. हल्ली अनेक कुटुंबात एकच अपत्य असल्याने लहान मुलांच्या भविष्यासाठी तरतूद हा आर्थिक नियोजनातील महत्वाचे वित्तीय ध्येय असते. मुलांच्या आपल्या शिक्षणाविषयी जाणिवा समृद्ध होत असल्याने मुले आपल्या करिअरबाबत संवेदनशील असतात.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी काही कमी पडू नये असे वाटते. नेमक्या याच मानसिकतेचा फायदा घेत कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाल्यावर त्याच्या भविष्याच्या आर्थिक तरतुदीसाठी विमा कंपन्यांच्या ‘चाईल्ड प्लॅन’ अर्थात मुलांच्या भविष्यातील खर्चाच्या तरतुदीसाठी बचतीचे साधन असलेल्या विमा कंपन्यांच्या उत्पादनांच्या खरेदीचा प्रस्ताव विमा विRेत्यांकडून मांडला जातो.

उदाहरणासाठी एका विमा कंपनीचे उत्पादन समजून घेऊ. एक वर्ष वय असलेल्या बालकासाठी वार्षिक विमा हप्ता २२,५०० रुपयांचा असेल. हा हप्ता २४ वर्षे भरावा लागेल. या हप्त्यात पालकांना ५ लाखाचे विमाछत्र व विमा प्रस्तावकाचा मृत्यू झाल्यास विमा हप्ता न भरण्याची मुभा आहे. प्रत्येकी १ लाख रूपये बालकाच्या वयाच्या १८, २०, व २२ व्या वर्षी मिळेल व ९.५ लाख बालकाच्या वयाच्या २५ व्या वर्षी मिळतील. ही योजना निश्चित उत्पन्न देणारी असल्याने व मिळणारी रक्कमसुद्धा मोठी वाटत असते. भविष्यात मिळणाऱ्या या रकमेची  महागाईच्या दरामुळे घटलेल्या क्रयशक्तीचा विचार न करता अनेक पालक या प्रकारच्या योजना खरेदी करतात. एखाद्याने १ फेब्रुवारी १९९४ पासून मासिक १८०० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास ५,०२,२०० रुपयांच्या ३ वेगवेगळ्या बँलंस्ड फंडातील गुंतवणुकीचे ११ मार्च २०१७ रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसारचे मूल्य ७५,२३,७८५ ते ९८,८४,३६७ दरम्यान असते. म्हणूनच मुलांच्या शिक्षणासाठी करावयाच्या तरतुदींसाठी बँलंस्ड फंडातील गुंतवणूक सर्वार्थाने पर्यायी साधन ठरते.

मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करावयाच्या बचतीबाबत पालक अतिसंवेदनशील असल्याने विमा कंपन्यांच्याप्रमाणे म्युच्युअल फंडाच्यासुद्धा ‘चिल्ड्रेन गिफ्ट प्लॅन’ प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत.

मुलांच्या शिक्षणासाठी करावयाच्या बचतीसाठी महिंद्रा म्युच्युअल फंडाने महिंद्रा बालविकास योजना ही योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली असून ही योजना २० एप्रिल ते ३ मे दरम्यान गुंतवणुकीस खुली राहणार आहे. ही योजना बँलंस्ड फंड गटात मोडणारी आहे. या फंडातील गुंतवणूक ५० टक्के समभाग ३५ टक्के रोखे व १५ टक्के ‘आर्बिटराज’ या मध्ये असेल. आई किंवा वडील निसर्गात: पालक असल्याने त्यांची ‘केवायसी’ करून या फंडात अज्ञान बालकाच्या नावाने गुंतवणूक करता येईल. मुल जन्मल्यापासून नामकरण,  पहिला वाढदिवस, मौंजीबंधनसारख्या प्रसंगी मुलांना भेटीच्या रूपात काही पैसे मिळतात. या फंडात एकाच फोलिओमध्ये नातेवाईक आपली  भेट या फंडाच्या गुंतवणुकीच्या रूपाने देऊ  शकतात. त्यासाठी दात्याची ‘केवायसी’ करून या भेटीचा उल्लेख करण्याची सोय या फंडात आहे.

या लेखाचा उद्देश म्युच्युअल फंडाच्या योजना विमा योजनांपेक्षा अव्वल आहेत, असे प्रबोधन करण्याचा नसून अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे व विमा विक्रेत्यांच्या आक्रमक विपणन तंत्रामुळे पालक मुलांच्या भविष्यातील मोठय़ा खर्चांच्या तरतुदीसाठी विमा कंपन्यांच्या मुलांसाठी असलेल्या योजनांची निवड करतात. या प्रकारच्या योजनांकडे महागाईचा दर व त्यामुळे बचतीची घटणारी क्रयशक्ती यांचा विचार केल्यास बँलंस्ड फंड हे एक बचतकर्त्यांंसाठी साधन आहे. विमा योजना या निश्चित रक्कम देणाऱ्या योजना असल्याने रक्कम मिळण्याची लवचिकता नसते. मुलाचा मोठा शैक्षणिक खर्च त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी सुरू होतो.

एखाद्या विमा योजनेत पहिली रक्कम १८ वर्षांंनी मिळणार असेल तर शैक्षणिक खर्चाला सुरुवात झाल्यावर २ किंवा ३ वर्षांंनी ही रक्कम हाती पडते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून बचतकर्त्यांने योग्य गुंतवणूक साधनाची निवड करावी हे सांगण्याचा आहे. हे विवेचन महिंद्रा बालविकास योजनेत गुंतवणूक करावी हे ठसविण्यासाठी केलेले नाही. आपल्या जोखीम प्रकारानुसार योग्य गुंतवणूक साधनाची निवड करणे महत्वाचे असते. हाच या विवेचनामागचा उद्देश आहे. हा फंड वित्तीय ध्येयांसाठी सुयोग्य वाटल्यास या फंडाचा समावेश आपल्या वित्तीय सल्लागाराच्या मदतीने आर्थिक नियोजनात करता येईल.

मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करावयाच्या बचतीबाबत पालक अतिसंवेदनशील असल्याने विमा कंपन्यांच्याप्रमाणे म्युच्युअल फंडाच्यासुद्धा ‘चिल्ड्रेन गिफ्ट प्लॅन’ प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत.

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com