गेल्या दोन वर्षांत भारतातील व्याजदर खाली आले आहेत. बऱ्याचशा कर्ज देणाऱ्या संस्था-बँका आणि गृहकर्ज कंपन्या- यांनी या कालावधीमध्ये आपले गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. ही स्थिती जे नव्याने गृहकर्ज घेणार आहेत त्यांच्यासाठी सुखावह आहे. ते गृहकर्ज देणाऱ्या विविध संस्थांच्या व्याजदरांची तुलना करू शकतात आणि त्यातून सर्वात कमी व्याजदराची निवड करू शकतात. पण ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत?

गृहकर्ज मिळविलेल्या प्रचलित कर्जदारांवरील व्याज बँक/ गृहवित्त कंपनीने कमी केले नसेल तर तुम्ही हे कर्ज दुसऱ्या गृहवित्त कंपनी/ बँकेकडे हस्तांतरित करू शकता. पण ते करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करून घ्यावी लागेल:

Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

सध्याच्या गृहवित्त कंपनीशी संपर्क साधा:

नवीन गृहवित्त कंपनीकडे जाण्यापूर्वी सध्याच्या गृहवित्त कंपनीशी संपर्क साधावा. वन-टाइम स्वीचिंग शुल्क आकारून कदाचित तुमची सध्याची गृहवित्त कंपनी अधिक चांगला दर देऊ  शकेल.

भारतातली गृहकर्ज बाजारपेठ चैतन्यशील आहे. त्यामुळे सध्याची गृहवित्त संस्था गृहकर्जाचा स्पर्धात्मक दर देऊ  शकत नसेल तर तुम्ही कमी व्याजदर असणाऱ्या दुसऱ्या गृहवित्त कंपनीकडे आपलं गृहकर्ज हस्तांतरित करू शकता.

कमी व्याजदराचा फायदा विरुद्ध हस्तांतरणाची किंमत:

गृहकर्ज हस्तांतरित करायचे झाल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क भरावे लागते. यासाठी नव्या कर्जदात्या संस्थेला प्रक्रिया शुल्क आणि इतर संबंधित चालू कर्ज असलेल्या संस्थेला हस्तांतरण (ट्रान्स्फर शुल्क) भरावे लागते. शिवाय नव्या कर्जासाठीचे मुंद्रांक शुल्क वेगळेच. या अदलाबदलीची किंमत साधारणत: उर्वरित कर्जाच्या रकमेच्या ०.५-१.५ टक्का इतकी असते. बदलीचा निर्णय हा तुमच्या गृहकर्जाच्या उर्वरित कालावधीवर आणि मिळणाऱ्या नव्या व्याजदराचा फायदा गृहकर्जाच्या उर्वरित रकमेवर व कालावधीसाठी मिळून एकूण कमी होणारी रक्कम यावर अवलंबून असायला हवा.

मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड (प्री-पेमेण्ट पेनल्टी):

वैयक्तिक ग्राहकाने तरल (फ्लोटिंग) दराने गृहकर्ज घेतले असल्यास त्यावर कोणतेही मुदतपूर्व परतफेडीसाठी दंड लागत नाही. पण जर स्थिर दराने गृहकर्ज घेतले असल्यास कर्जाच्या उर्वरित रकमेवर हा दंड भरावा लागू शकते. निर्णय घेण्यापूर्वी या मुद्दय़ाचाही अवश्य विचार करावा.

परतफेडीची कामगिरी स्वच्छ असणे:

भूतकाळात हे कर्ज किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कर्जाची परतफेड करताना एखाद-दुसरा हप्ता तुम्ही चुकवला असेल तर कर्ज हस्तांतरित होण्यात अडचणी येऊ  शकतात. अशा परिस्थितीत तुमच्यापुढे एकच पर्याय असतो, आपल्या सध्याच्याच गृहकर्ज संस्थेला चिकटून राहणे.

वरील मुद्दे समजून घेतल्यानंतर गृहकर्ज दुसऱ्या बँक/कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर नव्या वित्तसंस्थेशी कर्जासंदर्भात संपर्क साधावा. या अदलाबदली प्रक्रियेदरम्यान, नवीन गृहकर्ज संस्था कदाचित तुम्हाला टॉप-अप अर्थात वाढीव कर्जही देऊ  करेल. नव्याने आर्थिक गरज उद्भवल्यास तुम्ही या कर्जाचा पर्यायही स्वीकारू शकता. तुम्हाला देण्यात आलेला नवा व्याजदर हा अल्पकालीन नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून पाहा. नियम आणि अटी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या निव्वळ कर्जावर होत असतो. तुम्हाला कोणत्या शंका असल्यास आपल्या संस्थेतील संपर्क व्यवस्थापकाकडून त्यांचे निरसन करून घ्या.

आपल्या गृहकर्जाचे उत्तमरीत्या व्यवस्थापन केल्यास व्याजदरापोटी भरल्या जाणाऱ्या रकमेत बऱ्यापैकी घट होऊ  शकेल. यामध्ये गृहकर्ज हस्तांतरित करण्याच्या निर्णयामुळे बराच फरक पडू शकेल.

अनिल कोथुरी

(लेखक एडेल्वाइज फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसच्या रिटेल फायनान्स विभागाचे अध्यश्र आहेत.)