देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असल्याचा दृश्य परिणाम हा बँकिंग सेवेतील राज्यातील कर्मचारीसंख्येत स्पष्टपणे दिसून येतो. देशभरातील सर्व शेडय़ूल्ड वाणिज्य बँकांतील साडेदहा लाख बँक कर्मचाऱ्यांपैकी एकटय़ा महाराष्ट्रात त्यापैकी जवळपास १० टक्क्यांहून अधिक म्हणजे १,६३,९८५ कर्मचारी आहेत. भौगोलिकदृष्टय़ा देशात सर्वात मोठे राज्य असलेले उत्तरप्रदेश जवळपास ६० हजाराच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँकांमध्ये २०१३ सालात ५० हजारांची नवीन भरती अपेक्षित असून, त्यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला बँकांमधील ५००० नवीन नोकऱ्या येऊ शकतील.