टूजी ध्वनिलहरी परवाने लिलाव गैरप्रकारातील सुनील भारती मित्तल व रवी रुईया या उद्योगपतींच्या विरोधातील सुनावणी येत्या सोमवारी घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उभयतांनी सादर केलेल्या वैयक्तिक जातमुचलक्यानंतर येत्या आठवडय़ात सुनावणी घेण्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या टूजी ध्वनिलहरी परवाने लिलाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी विशेष केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी भारती एअरटेलचे मित्तल आणि एस्सार समूहाचे रुईया यांनी सादर केलेल्या वैयक्तिक जातमुचलक्याचा स्वीकार करत काहीसा दिलासा दिला आहे.
  ल्ल सिस्टेमा श्यामची ‘फोर जी’ सज्जता?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे २जी परवाने गमाविलेल्या सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसने येऊ घातलेल्या जलद इंटरनेट सेवा क्षेत्रात शिरकाव करण्याचा इरादा जाहीर केला आहे. ‘एमटीएस’ ब्रॅण्डअंतर्गत दूरसंचार सेवा देणाऱ्या सिस्टेमा श्याम कंपनीचे २०११ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व २१ परिमंडळातील सेवेचे परवाने रद्द झाले होते. मार्चमध्ये झालेल्या ८०० मेगाहर्ट्झसाठी निविदा प्रक्रियेत कंपनीने आठ परिमंडळात परवाने प्राप्त केले आहेत. नव्या १.४ मेगाहर्ट्झच्या ४जी तंत्रज्ञान सेवेसाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचाही कंपनीचा विचार आहे. ४जी तंत्रज्ञान क्षेत्रात मुकेश अंबानी यांची रिलायन्सही लवकरच सेवा सुरू करणार आहे.