भारतात अंदाजे १० कोटी स्थलांतरित देशभर विखुरलेले असून त्यांच्यामार्फतच निधी प्रेषण पद्धतीचा (मनी ट्रान्सफर)  अधिक उपयोग होत असल्याचे निरिक्षण नोंदविले गेले आहे. एकूम स्थलांतरितांपैकी तब्बल ६० टक्के व्यक्ती या माध्यमाचा उपयोग करतात असेही नमूद करण्यात आले आहे.
ई-बँकिंग आणि एटीएम अशा तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावरच पसे हस्तांतरित करणे ही क्रिया वेगाने वाढत असल्याचे व्होडाफोनने म्हटले आहे.भारतात ९० कोटी लोक मोबाईलधारक असल्याने या पद्धतीचा अधिक उपयोग होतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोबाईल कंपन्यांही त्यामुळे कॉल आदी सेवांबरोबरच अशा सुविधांवर अधिक भर देत असल्याचे कंपनीच्या एम-पैसा व्यवसाय विभागाचे प्रमुख सुरेश सेठी यांनी सांगितले.
अनेक मोबाइल कंपन्यांनी स्वत:च्या मोबाइल पेमेंट सेवा दाखल केल्या आहेत तसेच आणखी काही कंपन्या त्या दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.  
सेठी म्हणाले की, या सुविधेमुळे ग्राहकांना वीज, डीटीएच व मोबाइल बिल अशी बिले मोबाइलमार्फत भरता येतात. शिवाय नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून कोणत्याही सेवा पुरवठादाराकडून घेतलेल्या कोणत्याही नंबरला पसे हस्तांतरितही करता येतात. हे कोणत्याही मोबाइल हँडसेटवर करता येते आणि त्यासाठी जीपीआरएस किंवा डाटा प्लॅनची आवश्यकता नसते. बांधकाम मजुरापासून गृहिणीपर्यंत वा विद्यार्थ्यांपासून प्रोफेशनलपर्यंत कोणालाही पेमेंट करता येईल वा पसे पाठवता येतात, असेही सेठी यांनी सांगितले.
मोबाइलवर स्वीकारलेले पसे नंतर विशेष प्रशिक्षित असलेल्या आणि अधिकृत प्रतिनिधींकडून रोख रक्कमेच्या स्वरूपात काढून घेता येतात. व्होडाफोनकडे देशभर असे ८० हजार प्रतिनिधी आहेत. पकी ३,३६४ एकटय़ा मुंबईत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली. व्होडाफोनचे देशभरात जवळपास २० लाख मोबाईलधारक आहेत.
कंपनीच्या एकूण ग्राहकांपकी निम्मे (५०%) (९.२ कोटी) हे ग्रामीण भागात आहेत. व्होडाफोन एम-पसा ऑक्टोबर २०१३ मध्ये मुंबईत सुरू झाले व त्यानंतर ही सेवा देशभर उपलब्ध करून देण्यात आली. कंपनीचे मुंबईत २.११ लाख ग्राहक आहेत.
एम-पसाने ग्रामीण भागात आरोग्यसेवांना चालना देण्यासाठी बिहार व झारखंड येथे एनआरएचएम (नॅशनल रुरल हेल्थ मॅनेजमेंट) प्रकल्पासोबत सहयोग केला असून नरेगा कामगारांना मोबाइल-आधारित मजुरी देण्यासाठी ओडिशामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एमजी-नरेगा) सहयोग केला असल्याचेही सेठी म्हणाले.