मोठय़ा सवलतींसह प्रवाशांना देण्यात हवाई कंपन्यांच्या चढाओढ ही लाभाची ठरल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अहवालानुसार फेब्रुवारीअखेर देशांतर्गत हवाई प्रवाशी संख्येत घसघशीत २१.४८ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. देशातील आठ हवाई कंपन्यांनी महिनाभरात १२२ लाख ६१ हजार प्रवाशांना विमान सफर घडविली. फेब्रुवारी २०१४ अखेर हेच प्रमाण १०० लाख ९३ हजार असे होते. जानेवारी २०१५ मध्ये देशांतर्गत हवाई प्रवाशी संख्या दणदणीत २२ टक्क्य़ांनी वधारली आहे.e06