देशातील हवाई प्रवासी वाहतूक २०१५ च्या अखेरच्या महिन्यातही वाढती राहिली आहे. डिसेंबरमध्ये त्यात २०.३४ टक्के वाढ झाली असून ७७ लाख प्रवाशांनी या मार्गाचा अवलंब केला आहे.

ख्रिसमसनिमित्त सण – समारंभाच्या कालावधीत विमान कंपन्यांनी दिलेल्या सूट-सवलतींचा हा परिणाम मानला जातो.

डिसेंबर २०१४ मध्ये ६४.४० लाख प्रवाशांची नोंद करणाऱ्या भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात सर्वाधिक बाजारहिस्सा राखणाऱ्या इंडिगोने गेल्या महिन्यात २७.४० लाख प्रवाशांची ने-आण नोंदविली.