मोबाइलमध्ये थ्रीजी जोडणी आहे मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरचे संदेश लवकर येत नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीला वेळेत पोहचत नाही असा अनुभव सातत्याने येतो. पण मुंबईत आता एअरटेल ग्राहकांना या अडचणीपासून सुटका मिळणार आहे. कारण एअरटेलची नवीन ९०० मेगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी मुंबईच्या टॉवर्समधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
९०० मेगाहार्ट्झ, १८०० मेगाहार्टझ आणि २१०० मेगाहार्टझ या तिन्ही फ्रिक्वेन्सी पुरविणारी एअरटेलही देशातील पहिली कंपनी ठरणार आहे. एअरटेलच्या या अतिरिक्त फ्रिक्वेन्सीमुळे थ्रीजी जोडणीचा वेग ३४ टक्के अधिक वेगवान होणार आहे. यामुळे प्रवासादरम्यानही नेटवर्क मिळणे सोपे होणार आहे याचबरोबर बंद खोलीतील इंटरनेटचा वेगही ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे एअरटेलचे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातचे हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गणपती यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना यापुढे व्हिडीओ पाहण्यासाठी जास्त वेळे वाट पाहवी लागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जलदगती इंटरनेटमुळे मोबाइच्या बॅटरीचीही १७ टक्क्याने बचत होईल असा दावाही गणपती यांनी केला. ही सुविधा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. ९०० मेगाहार्टझच्या स्पेक्ट्रममुळे एअरटेलकडे असलेल्या नेटवर्क क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नेटवर्कच्या अनेक अडचणी दूर होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फोजीसाठीही एअरटेल सज्ज झाले असून त्याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले.
दरम्यान या नवीन प्लॅटिनम थ्रीजी सुविधेसाठी ग्राहकांना वेगळे पैसे मोजावे लागतील का या प्रश्नाला उत्तर देताना गणपती म्हणाले की, सध्या ग्राहाकांना ज्या दरात थ्रीजी मिळत आहे त्याच दारात ते उपलब्ध राहील.  
९००, १८०० मेगाहार्टझ आणि २१०० मेगाहार्टझ या तिन्ही फ्रिक्वेन्सी पुरविणारी एअरटेलही देशातील पहिली सेवा ठरणार
अतिरिक्त फ्रिक्वेन्सीमुळे थ्रीजी जोडणीचा वेग ३४ टक्के अधिक वेगवान होईल
एअरटेलधारकांना नेटवर्कची समस्या प्रवासादरम्यानही जाणवणार नाही