रिझव्‍‌र्ह बँकेने रेपोदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच अ‍ॅक्सिस बँकेने मुदतठेवींच्या दरात पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपोदरानंतर व्याजदरात कपात करणारी अ‍ॅक्सिस ही पहिली बँक आहे. अ‍ॅक्सिस बँकेची ही व्याजदर कपात १८ ते ३६ महिन्यांच्या मुदत ठेवींसाठी असेल. तसेच १८ महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ०.१५ टक्के कपात सुचवण्यात आली आहे. रेपोदरानंतर लगेचच कोणत्याही बँकांनी व्याजदरात कपात केलेली नाही. मार्चअखेपर्यंत व्याजदरात कपात करणे कठीण असल्याचे मत स्टेट बँकेने नोंदवले आहे. रेपोदरानंतर गृहकर्जावरील व्याजदरात कपात होणे अपेक्षित आहे.