चालू आर्थिक वर्षांतील तिसरी व्याजदर कपात लागू केल्यानंतर बँकांकडून होत असलेल्या व्याजदर कपात लागू करण्याच्या प्रक्रियेत दोन खासगी बँकांही सहभागी झाल्या. आयसीआयसीआय बँक तसेच अ‍ॅक्सिस बँकेने त्यांचे आधार दर अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत किरकोळ प्रमाणात काही कमी केले आहेत.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँक आयसीआयसीआय बँकेने तिचे आधार दर गुरुवारी अवघ्या ०.०५ टक्क्य़ाने कमी केले होते. त्यानंतर आता याच क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने तिचे आधार दर शुक्रवारी ०.१० टक्क्य़ाने कमी करत ते ९.८५ टक्क्य़ांवर आणून ठेवले आहेत. तिसरी मोठी खासगी बँक असलेल्या अ‍ॅक्सिसची ही सलग दुसरी दर कपात आहे. चालू आर्थिक वर्षांत बँकेने ०.३० टक्क्य़ापर्यंतचे दर कमी केले आहेत.
गेल्या काही दिवसांत व्याजदर कमी करणाऱ्या अन्य बँकांच्या तुलनेत अ‍ॅक्सिस बँकेचा दर अद्यापही सर्वाधिक आहे.