व्यावसायिक आणि औद्य्ोगिक क्षेत्रासाठी विस्तृत आणि नावीन्यपूर्ण एलईडी प्रकाश योजना पुरविण्याची घोषणा करताना बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षांत या व्यवसायात जोरदार वृद्धीचे संकेत बुधवारी दिले.

आपली उपनाममुद्रा ‘डॉट नेक्स्ट अपग्रेड’ (.ल्ल७३ ४स्र्ॠ१ंीि) सादर करताना, बजाज इलेक्ट्रिकल्सने यंत्रणा आयटी / आयटीईएस उद्योग, आधुनिक कंपन्या व उद्यम कार्यालये, औषधनिर्माण, रिटेल दालने त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी विकासक या सर्वासाठी तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक आणि उच्च कार्यक्षम एलईडी  प्रकाशयोजनांची नवी मालिका मुंबईतील ग्रँड हयात येथे आयोजित कार्यक्रमात प्रदर्शित के ली. संपूर्ण दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आघाडीचे वास्तुविशारद, वास्तुरचना सल्लागार, कॉर्पोरेट्स आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बाह्य़ प्रकाशयोजना क्षेत्रात निर्विवादपणे आघाडीच्या स्थानावर असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्सकडे आधुनिक कार्यालये, उद्योग आणि रिटेल दालनांमध्ये विद्युतीकरणाचा भक्कम अनुभव आहे. कंपनीचा विद्युत विभाग नव्या उत्पादनांच्या आणि विद्युत यंत्रणांच्या मालिकेद्वारे अतिशय जोरदार वृद्धीची अपेक्षा करत असून, त्यात केवळ व्यावसायिक नव्हे तर घरगुती आणि रस्त्यांवरील सार्वजनिक प्रकाशयोजनेचा देखील समावेश आहे, असे बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या प्रकाशयोजना विभागाचे अध्यक्ष आर सुंदरराजन यांनी सांगितले. महाराष्ट्र ही कंपनीसाठी अत्यंत मोठी संभाव्य बाजारपेठ असून येथील सेवाजाळे विस्तारण्याचे तसेच नवनवीन आणि जागतिक दर्जाची उत्पादने सादर करण्याचे कार्य निरंतर सुरू राहील. आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पात उत्साहाने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.