औद्योगिक वापराच्या रसायनांच्या (डीएमए-एचसीएल व मिथाइल अमाइन्स) निर्मितीतील जागतिक अग्रणी कंपनी बालाजी अमाइन्स लि.ने ३० जून रोजी समाप्त तिमाहीत निर्यातीतून ३६.५६ कोटींचा महसूल मिळविला, जो आधीच्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत १९.५१ टक्के अधिक आहे. निर्यातीतील या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीचा विक्री महसूलही आधीच्या तुलनेत १७.४ टक्क्य़ांनी वाढून जून तिमाहीअखेर १६४.४७ कोटींवर गेला आहे. परिणामी, कंपनीचा निव्वळ नफा जून तिमाहीत ९.४ टक्क्य़ांनी वाढून ९.३१ कोटी रुपये झाला आहे.