स्थापनेपूर्वीच बाहेर पडलेली तिसरी कंपनी

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचा गेल्या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीतील तोटा हा तब्बल ६३ पटीने विस्तारला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ५६.१४ कोटी तोटय़ाची नोंद करणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा तोटा मार्च २०१६ अखेरच्या तिमाहीत थेट ३,५८७ कोटी रुपयांवर गेला आहे.
उत्पन्नातही घसरण नोंदविणाऱ्या बँकेने यंदा कोणताही लाभांश जाहीर केला नाही.
बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढत ४९,८७९.१३ कोटी रुपयांवर गेले असून एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ते १३.०७ टक्के आहे. बँकेला बुडीत कर्जासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूदही दुपटीने विस्तारली असून ती यंदाच्या मार्चअखेर ५,४७०.३६ कोटी रुपये झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या विक्रमी ५,३६७ कोटी रुपयांच्या तोटय़ासह यापूर्वी काही सार्वजनिक बँकांनी मोठय़ा तिमाही तोटय़ाची नोंद केली आहे.
स्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाची नोंद केली होती. जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान बँकेने तब्बल ५,३६७ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला असून परिणामी बँकेचे बुडित कर्जाचे प्रमाण दुपटीने वाढले. तसेच यासाठी करावी लागणारी तरतूद तिपटीने विस्तारली आहे.