खरेदीदारांना एकाच छताखाली अनेकविध गृहोपयोगी वस्तूंच्या सवलतीत उपलब्धतेसह, प्रत्येक खरेदीवर आणखी बचतीचा लाभ देणारी सदस्यत्व योजना ‘प्रॉफिट क्लब रु. ५००० कार्ड’ नावाने बिग बझारने सुरू केली आहे.
ग्राहकाला ५,००० रुपये भरून हे कार्ड मिळविता येईल आणि त्यायोगे ६,००० रुपयांच्या खरेदीचा लाभ मिळविता येईल. दर महिन्याला ४०० रुपयांप्रमाणे १५ महिने ही खरेदी कार्डधारकाला करता येईल. या कार्डचा वैधता कालावधी १८ महिने असेल. म्हणजे ग्राहकाने केलेल्या गुंतवणुकीवरील हा वार्षिक १५ टक्के व्याजदराने दिला गेलेला लाभ असेल. यापूर्वी डिसेंबर २०१२ मध्ये बिग बझारने १० हजार रुपये रकमेचे प्रॉफिट क्लब कार्ड आणले होते. त्याचे देशभरात अडीच लाख ग्राहकांनी सदस्यत्व स्वीकारले असून, बचतीतील खरेदीचा लाभ ते मिळवीत असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.
नव्या ५,००० रुपयांच्या कार्डामुळे ग्राहकांच्या अधिक व्यापक वर्गाला सामावून घेता येईल, असा विश्वास बिग बझारचे मुख्य कार्यकारी सदाशिव नायक यांनी व्यक्त केला. या कार्डाचे सदस्यत्व मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सुलभ हप्ते (ईएमआय) सुविधाही देशातील निवड ४० बिग बझार स्टोअर्समध्ये सुरू करण्यात आली असल्याचे नायक यांनी सांगितले. सध्या देशातील ९८ शहरांमध्ये एकूण २४० बिग बझार आणि एफबीबी सुरू आहेत.