तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या आठवडय़ातील लेखाचे शीर्षक होते ‘निफ्टी ९,०००चे शिखर गाठणार का?’ आणि २१ जानेवारीच्या लेखाचे शीर्षक होते ‘निफ्टी सध्या काय करते?’ दोन्ही लेखांतील सामाईक आशय आणि वाक्य – ‘निफ्टीला जोपर्यंत ८,२००चा भरभक्कम आधार आहे तोपर्यंत ‘झोक्याची गती कमी झाली तरी चालेल, पण हा झोका निर्देशांकांचे वरचे उद्दिष्ट जरूर गाठेल,’ असे होते. खरोखरच जे गुंतवणूकदार जानेवारीपासून समभाग बाळगून आहेत त्यांच्या दृष्टीने जेव्हा मुंबई शेअर बाजार निर्देशांक – सेन्सेक्स २९,००० व निफ्टी निर्देशांक ९,०००च्या समीप पोहोचला तेव्हा त्यांच्या आनंदी भावनांचे वर्णन कवीवर्य सुरेश भटांच्या – ‘आताच अमृताची बरसून रात गेली’ या काव्यपंक्तीतून चपखल व्यक्त होईल.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
India, Manufacturing Sector, Surges, 16 Year High, in March, HSBC PMI, production sector, finance, finance knowledge, financial decision,
निर्मिती क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांकी जोम; मार्चचा ‘पीएमआय’ निर्देशांक विक्रमी ५९.१ गुणांवर
Anant Goenka and Minister Piyush Goyal
‘तेजांकित’ तरुणच देशाचे भविष्य, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ विजेत्यांचे विशेष कौतुक

येत्या आठवडय़ातील निर्देशांकाची वाटचाल :

गुरुवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स २८,८९२.९७
  • निफ्टी ८,९३९.५०

निर्देशांकांना – सेन्सेक्सला २७,८०० ते २८,००० आणि निफ्टी निर्देशांकाला ८,६५० ते ८,७००चा भरभक्कम आधार आहे. आताच्या घडीला निफ्टीवर १५० ते २५० अंशांची, सेन्सेक्सवर ५०० ते ६०० गुणांची संक्षिप्त घसरण अपेक्षित आहे. भविष्यात अनुक्रमे २७,८०० ते २८,००० आणि ८,६५० ते ८,७०० चा भरभक्कम आधार घेऊन सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक पुन्हा ४ मार्च २०१५च्या ऐतिहासिक उच्चांक ३०,०२४ / ९,११९ ला गवसणी घालायचा प्रयत्न करतील.

या सदरात गेल्या दोन आठवडय़ांपासून आपण निफ्टी-वाचक संवाद सुरू केला आहे. त्यात आपण ‘गुंतवणूक अवधीसंबंधी धारणा’ ही संकल्पना समजून घेऊ. गुंतवणुकीचा अवधी चार प्रकारात विभागला जातो.

१.  दिवसांतर्गत खरेदी-विक्री (इन्ट्रा डे) अवधी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.

२. अल्पकालीन गुंतवणूक धारणा (शॉर्ट टर्म) अवधी – तीन ते चार महिने.

३. मध्यम अवधीची गुंतवणूक धारणा (मीडियम टर्म) अवधी –  चार ते बारा महिन्यांच्या आत.

४. दीर्घकालीन गुंतवणूक धारणा (लाँग टर्म) अवधी – बारा महिन्याच्या पुढे ते २४ ते ३६ महिने. पुढील भागात गुंतवणुकीचा अवधी व कर रचना समजून घेऊ या.