सेन्सेक्समध्ये शतकी भर; सलग चौथी वाढ

गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीची अखेर होत असताना भांडवली बाजारात सलग पाचव्या सत्रात तेजी नोंदविली गेली. मुंबई निर्देशांकाने बुधवारी पुन्हा शतकी निर्देशांक भर टाकली. यामुळे सेन्सेक्सने नव्याने गेल्या पाच महिन्यातील उच्चांकावर पोहोचला.

१०३.१२ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २८,८६४.७१ वर बंद झाला. तर निफ्टीत १९.०५ अंश वाढ झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,९२६.९० वर स्थिरावला.

सेन्सेक्सने गेल्या सलग चार व्यवहारात एकूण ६०६.०३ अंश वाढ नोंदविली आहे. गुरुवारच्या तेजीमुळे मुंबई निर्देशांक ८ सप्टेंबर रोजीच्या २९,०४५.२८ नजीकच्या टप्प्यावर पोहोचला आहे. तर निफ्टीही आता ८,९०० च्या अधिक पुढे गेला आहे.

गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवसाचे व्यवहार होणार आहेत. गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीचे वातावरण बुधवारीही कायम राहिले.

२८,८२२.४० या वरच्या टप्प्यावर बुधवारच्या सत्राची सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सने व्यवहारात २८,९६३.५२ पर्यंत झेप घेतली. तर निफ्टीने बुधवारच्या सत्रात ८,९०५.२५ ते ८,९६०.७५ असा वरचा प्रवास अनुभवला. सेन्सेक्समधील ३० पैकी ११ समभागांचे मूल्य वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, पोलाद, माध्यमे आदी तेजीत राहिले. यासह ऊर्जा, तेल व वायू, दूरसंचार, बँक आदी निर्देशांक ४.५३ टक्क्यांपर्यंत वाढले.

सेन्सेक्समधील मूल्य वाढ नोंदविणाऱ्या समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, टाटा मोटर्स आदी राहिले. हे समभाग ३.९३ टक्क्यांपर्यंत उंचावले.  मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५८ व ०.५८ टक्क्यांनी घसरले.

घसरलेल्या ११ समभागांमध्ये एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी, सिप्ला, ल्युपिन, एचडीएफसी बँक हे ३.३६ टक्क्यांपर्यंत घसरले.

घसरलेल्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा निर्देशांक १.६९ टक्क्यांपर्यंत घसरले. सेन्सेक्सने मंगळवापर्यंतच्या सलग तीन व्यवहारांमध्ये ५०६.०२ अंश वाढ नोंदविली आहे. मुंबई निर्देशांकाचा यापूर्वीचा वरचा टप्पा २२ सप्टेंबर २०१६ रोजी २८,७७३.१३ होता.