गेल्या दोन दिवसातील तेजी मोडून काढणाऱ्या १५ टक्के अशा किरकोळ निर्देशांक वाढीपेक्षाही मुंबई शेअर बाजार सोमवारी अधिक चर्चेत राहिला तो मिड-कॅप आणि स्मॉल-कॅपमधील आपटीने. ‘सेन्सेक्स’ १९,३०० असा स्थिर प्रवास करत असताना सकाळच्या सत्रातच मोठय़ा प्रमाणात घसरलेल्या मिड आणि स्मॉल कॅपमधील आपटीची चौकशी भांडवली बाजार नियामक सेबीने सुरू केली आहे.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना मुंबई निर्देशांक तेजीसह वाटचाल करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा प्रवास नोंदविणारे मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक दुपारच्या सुमारासच आपटले. त्यांच्यातील अनेक समभागांची घसरण ही २० ते ६० टक्क्यांपर्यंतची होती. यामध्ये प्रामुख्याने कोअर प्रोजेक्ट्स, वेलकॉर्प, एबीजी शिपयार्ड, फ्लेक्सिटफ, ऑर्बिट कॉर्पोरेशन, ऑप्टो सर्किट, व्हिडिओकॉन इंडस्ट्रिज यांचा समावेश होता.सेबीने ऑगस्ट २०१२ मध्येही याच निर्देशांक श्रेणीतील काही कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण नोंदल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते.
जुन्यांना धडकी, नव्यांमध्ये उत्साह!
रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी उशिरा जाहीर केलेल्या नव्या बँकिंग परवान्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अनोखा परिणाम सोमवारी भांडवली बाजारावर दिसून आला. सध्या खाजगी क्षेत्रात अस्तित्त्वात असलेल्या बँक समभागांच्या मूल्यांमध्ये घशरणीच्या रुपात चांगलीच धडकी भरली. उलट या क्षेत्रात येण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.
रेलिगेअर                   +८.७५%
एल अ‍ॅन्ड टी फाय.     +४.९६%
बजाज फिनसव्‍‌र्ह.      +३.३६%
आदित्य बिर्ला नुवो    +०.९१%
एमअ‍ॅन्डएम फाय.     +०.६८%
आयडीएफसी             +०.५८%
पीएफसी                    +०.४९%
मारुती कंपनीमध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा केवळ २४ टक्केच आहे. तेव्हा त्यापेक्षा अधिक प्रमाण होईल, अशी गुंतवणूक विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी टाळावी.
डी. सुब्बराव
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर