बुधवारी जाहीर झालेल्या दिलासादायक महागाई व औद्योगिक उत्पादन दराचे स्वागत करण्याऐवजी मध्यरात्रीपासून लागू झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीची चिंतेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना ग्रासले. परिणामीगेल्या काही दिवसांपासून विक्रमी दौड सुरू असलेले  सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही त्यांच्या सार्वकालिक स्तरापासून दुरावले.
गुरुवारच्या व्यवहारात २८ हजारांच्या पुढे, २८,०९८.७४ पर्यंत गेलेला सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ६८.२६ अंश आपटीने २८ हजाराखाली, २७,९४०.६४ वर येऊन थांबला. तर २५.४५ अंश घसरणीसह निफ्टी ८,३५७.८५ पर्यंत खाली आला.