24 May 2016

मात्र ‘सेन्सेक्स’ची दौड सुरूच!

रोडावलेला आर्थिक विकासदर ही खरे तर शेअर बाजारासाठी चिंतेची बाब ठरावी, परंतु ती पूर्णपणे

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | December 1, 2012 12:13 PM

रोडावलेला आर्थिक विकासदर ही खरे तर शेअर बाजारासाठी चिंतेची बाब ठरावी, परंतु ती पूर्णपणे दृष्टीआड करीत शुक्रवारी सप्ताहाची अखेर बाजाराने ‘सेन्सेक्स’मध्ये आणखी १६९ अंशांची उत्साही भर घालत बाजाराने केली. अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती पाहून रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपात केली जाईल, असा बाजाराचा होरा असून त्यामुळेच वाईट बातमीवर सेन्सेक्सने वाढ दाखविणारी उलटी प्रतिक्रिया नोंदविली.
शुक्रवारी सकाळी जाहीर झालेले अर्थव्यवस्थेचा कल दर्शविणारे निराशाजनक आकडेही गेल्या काही दिवसापासून बाजाराने धरलेल्या उत्साही वळणावर पाणी फेरू शकले नाहीत. सेन्सेक्सने गुरुवारी १९ हजाराची पातळी ओलांडली. तर आज सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ०.८८ टक्के आणि ०.९४ टक्क्यांची केलेली कमाई ही शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकामध्ये झालेली सलग चौथी वाढ आहे. गेल्या चार सत्रात सेन्सेक्समध्ये ८३३.३३ अंशांची तर निफ्टीमध्ये २५३.२५ अंशांची भर पडली आहे. नोव्हेंबर २०११ च्या शेवटच्या सप्ताहानंतर एका आठवडय़ात निर्देशांकांनी केलेली ही सर्वात मोठी कमाई आहे. निर्देशांकांच्या या कमाईचा चांगलाच फायदा धातू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बँकिंग, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्र, तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या समभागांना झालेला दिसून आला. परिणामी सेन्सेक्सपाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही आज १९ महिन्यांपूर्वी स्थापलेल्या उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टीने शुक्रवारी ५४.८५ अंशांची कमाई करीत ५,८७९.८५ अंशांवर विश्राम घेतला, जो त्या निर्देशांकांचा २१ एप्रिल २०११ नंतर दिसलेला उच्चांकी स्तर आहे.

मंदीचे लक्षण..?
गेल्या सलग सहा तिमाहीत आर्थिक विकासदराला लागलेली उतरती कळा हे खरे तर मंदीचेच द्योतक ठरेल. तरी यापुढचा काळ हा चढीचा असेल असा आश्वासक सूर देशी-विदेशी अर्थसंस्था व मानांकन संस्था व्यक्त करीत आहेत.

First Published on December 1, 2012 12:13 pm

Web Title: bse sensex top