अजित बेकरीचे नवे दालन ‘बेक्ड कुकीज्’ सुरू
प्रतिनिधी, नागपूर
बेकरी उत्पादनांमध्ये मध्य भारतात आघाडीचे नाव असलेल्या अजित बेकरीतर्फे ‘बेक्ड कुकीज्’चे पहिले दालन लक्ष्मीनगरात सुरू करण्यात आले असल्याची माहिती अजित दिवाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘बेक्ड कुकीज्’मध्ये ३५ नवी बेकरी उत्पादने अहेत. यामध्ये बेकड् केकच्या नवीन प्रकार आणि चवींसह पेस्ट्रीज, पफ्स, नवे फ्युजन, चीज प्रॉडक्ट, हेल्थ कॉशन्स, मल्टी ग्रेन ब्रेड आदी उत्पादनांचा समावेश असल्याचे विक्रम दिवाडकर यांनी सांगितले. शहरात १ हजार ३०० डेली निड्स दालनांमधून उत्पादने पुरविण्यात येत असून विदर्भातून यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा येथूनही ग्राहकांकडून पसंती मिळाली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात नवी दालने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित बेकरी १९५५ साली नागपुरात सुरू झाली. त्यानंतर अजित बेकरीने मागे वळून पाहिलेले नाही. भारताच्या माजी पंतप्रधान दिवं. इंदिरा गांधी तसेच भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या १०० व्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर १०० फुटांचा केक तयार करून अजित बेकरीने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतातील बेकरी उद्योगाची पायाभरणी अजित बेकरीने केली असून आयसिंग केकचे तंत्रज्ञान आणि केकवर चित्रे काढण्याची खासियत अजित बेकरीनेच १९८० पासून विकसित केली आहे. शून्य कोलेस्टेरॉलची उत्पादने हे बेकरीची वैशिष्टय़ आहे.

‘बैद्यनाथ च्यवनप्राश स्पेशल’ दाखल
आयुर्वेदिक औषधी तयार करण्यात अग्रेसर असलेल्या बैद्यनाथ आयुर्वेद भवनने उत्कृष्ट आवळे व आयुर्वेदात वर्णन केलेल्या बहुमूल्य जडीबुटी, भस्माच्या मिश्रनाने च्यवनप्राश स्पेशलची निर्मिती केली आहे. हवेचे व पाण्याचे प्रदूषण, विषारी जीवाणू, डास, माश्या यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. व्यस्त वर्तमान जीवनशैली, तयार खाद्यपदार्थ, चहा, कॉफी आदीचे अत्याधिक सेवन यामुळे व्यक्तीचे आरोग्य खालावत चालले आहे. रक्ताल्पता, रोगप्रतिकारक्षमता कमी होणे असे त्रास होऊ लागले आहेत. या त्रासापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी बैद्यनाथने आयुर्वेदात वर्णन केलेल्या रसायनांनाच अभ्यास करून ‘बैद्यनाथ च्यवनप्राश स्पेशल’ची निर्मिती केली आहे.
याचा मुख्य घटक असलेल्या आवळयमध्ये प्राकृतिक रूपाने ‘सी’ जीवनसत्त्व व लोहतत्त्व असतो. आवळ्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही वाढते. हे च्यवनप्राश दुधासोबत घेणे जास्त लाभदायक आहे. या च्यवनप्राशमध्ये वापरलेल्या जडीबुटीमधील कार्यकारी तत्त्वाचे परीक्षण ‘एचपीटीएलसी’द्वारे केल्यानंतरच औषधी बनविण्याकरिता उपयोगात आणल्या जाते, असे वैद्या वीणा देव यांनी नमूद केले.

पंजाब नॅशनल बँकेकडून
गुणवंत शैक्षणिक योजनेंतर्गत कर्जवाटप
पंजाब नॅशनल बँकेच्या गुणवंत शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत शहरातील गुणवंत विद्यार्थी कपिल तहलियानी याला ७ लाख, ५० हजार रुपयांच्या शैक्षणिक कर्जाचा धनादेश बँकेचे सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक एन.के. सोमलिंगम यांच्या हस्ते देण्यात आला.
या समारंभाला बँकेच्या घाऊक मालमत्ता शाखेचे मुख्य व्यवस्थापक ओ.पी. चौधरी व सीताबर्डी शाखेचे सहायक महाव्यवस्थापक सर्वज्ञ भटनागर उपस्थित होते. बँकेच्या या योजनेची सर्वानी प्रशंसा केली.