रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात केलेल्या अर्धा टक्का कपातीनंतर ऋण दर कमी करणाऱ्या पाच बँकांचा सोमवारी समावेश झाला. पैकी चार सार्वजनिक तर एक विदेशी बँक आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाने शनिवारी ०.३५ टक्के, तर कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक व स्टेट बँक ऑफ म्हैसूर यांनी त्यांचे ऋण दर (बेस रेट) पाव टक्क्यापर्यंत कमी केले आहेत. यानुसार युनियन बँकेचा ऋण दर ९.६५ टक्के, कॅनरा बँकेचा दर ९.६५, कॉर्पोरेशन बँकेचा ९.७० व स्टेट बँक ऑफ म्हैसूरचा ऋण दर आता ९.९० टक्क्यांवर आला आहे. विदेशी खासगी क्षेत्रातील स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेनेही ऋण दरात पाव टक्क्याची कपात करत ते ९.५० टक्क्य़ांवर आणले. बँकेचा आधीचा दर ९.७५ टक्के होता. नवीन दर सोमवारपासूनच लागू झाला आहेत.